कहाणी मायकेल जॉर्डन नावाच्या बास्केटबॉलपटूची
ब्रुकलिन काउंटीतलं महापालिकेचं कम्बरलँड रुग्णालय माहीत असण्याचं काही कारण नाही. अठराव्या शतकापासून या रुग्णालयात रोज कित्येक बालकांनी जन्म घेतला असेल. त्यांची कुणी दखल घ्यावं असं काहीही नाही. मात्र, ६० च्या दशकात या रुग्णालयात दोन बालकांनी जन्म घेतला, ज्यांनी पुढे क्रीडाविश्वात अमीट छाप सोडली. त्यापैकी एक नाव मायकेल जॉर्डन, ज्यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1963 रोजी झाला, तर त्याच्या तीन वर्षांनी माइक टायसनने जन्म घेतला. तो दिवस होता 30 जून 1966 चा.
महापालिकेच्या रुग्णालयात जन्म घेणारी बालकं साधारण कुटुंबातलीच असतात. साठच्या दशकात तरी ही स्थिती होती. आताही यात फारसा काही बदल नाही. मायकेल जॉर्डन हलाखीचं जगणं घेऊनच जन्माला आला. जॉर्डन कुटुंबाचं घरही अतिशय छोटं. मात्र घर लहान असलं तरी त्याचे विचार मोठे होते. मायकेलला चार भावंडं होती- लॅरी आणि जेम्स ज्युनिअर हे दोन मोठे भाऊ, तर डेलोरिस आणि रोजलिन या दोन मोठ्या बहिणी. मायकेल शेंडेफळ. म्हणजे जॉर्डन कुटुंबातला पाचवा मुलगा.
खाणारी तोंडे सात आणि कमाईची साधनं तुटपुंजी. मायकेलचे वडील छोटीमोठी नोकरी करायचे. मात्र, त्यात कुटुंबाचा उदरनिर्वाह मोठ्या मुश्किलीने व्हायचा.
मायकेलचे वडील न्यूयॉर्कमध्ये उपकरण पर्यवेक्षकाची नोकरी करीत होते. मायकेल तेव्हा फारच लहान होता. जेव्हा त्यांचं कुटुंब नव्या संधीच्या शोधात ब्रुकलिन न्यूयॉर्कपासून उत्तर कॅरोलिनाच्या विल्मिंग्टन येथे राहण्यास आले. इथंच त्याच्या वडिलांना एअरफोर्समध्ये नोकरी मिळाली. आई एका बँकेत छोटीशी नोकरी करीत होती. मायकेलला जवळच्याच एका शाळेत दाखल करण्यात आले होते.
विजिगीषू मायकेल जॉर्डन
मायकेल जॉर्डनच्या कुटुंबाला गुलामीची किनार होती. त्याचे आजोबा गुलामी सोसत बाहेर पडले. ते स्वत:च लिहिणे-वाचणे शिकले आणि शेती करणेही शिकले. कुणाचीही मदत न घेता ते स्वयंपूर्ण झाले. याच गुलामीच्या वातावरणातून मायकेलचे आईवडीलही बाहेर आले होते.
कदाचित हेच ते संघर्षमय जीवन होते, ज्यात मायकेल जॉर्डनला आयुष्यात काही तरी मोठे करण्याची प्रेरणा मिळाली. मायकेलने एका मुलाखतीत सांगितले, की आई मला सतत जिंकण्यासाठी प्रोत्साहन द्यायची. कारण आईवडिलांनी अतिशय सामान्य जीवनापासून सन्मानजनक जीवनापर्यंतचा प्रवास केला होता. म्हणून मायकेल जॉर्डनच्या डोक्यात एक गोष्ट पक्की बसली होती, की कठोर मेहनत आणि शिस्तीशिवाय दुसरा पर्याय नाही. याच दोन महत्त्वाच्या गोष्टींमुळे मायकेल आपल्या जीवनात यश मिळवू शकला.
वडिलांनी शिकवलं जगणं…
मायकेल जॉर्डन लहान होता, तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला बोलावलं. हातात एक कपडा घेत म्हणाले, “बाळा, हा कपडा मी तुला देतो. तू तो एक डॉलरला विकून ये.”
लहानग्या मायकेलने तो कपडा पाहिला आणि विचार करू लागला, की आता हा फाल्तू कपडा एक डॉलरला कोण घेणार? पण विकायचा तर आहे. त्याने तो कपडा छानपैकी धुतला. घरी इस्त्री करायचं कोणतंही साधन नव्हतं. त्याने काही वजनदार वस्तू त्या कपड्यावर ठेवल्या. काही वेळाने तो कपडा सरळ झाला. सुरकुत्या काही प्रमाणात कमी झाल्या आणि छान दिसू लागला.
तो कपडा घेऊन तो बाजारात गेला. कपडा एक डॉलरला विकून वडिलांकडे आला. वडील खूश झाले.
काही दिवसांनी वडिलांनी पुन्हा मायकेलला बोलावले. म्हणाले, “बाळा, मी तुला एक शर्ट देतो. तू तो १० डॉलरला विकून दाखव.” मायकेल ते ऐकून अचंबित झाला. तो विचार करू लागला, की वडिलांना झालंय काय? ते मला अशी कामं का सांगताहेत? मात्र, त्याने वडिलांना एक शब्दही बोलला नाही. तो शर्ट घेऊन निघाला.
सर्वांत आधी त्याने तो छानपैकी धुतला. मित्राकडे जाऊन शर्टवर मिकी माउसचं स्टिकर लावलं. शर्ट आता आणखीच खुलला. हा शर्ट तो एका शाळेत विकण्यासाठी नेला. त्या शाळेत श्रीमंतांची मुले शिकत होती. मायकेलने तो 20 डॉलरला विकून आला.
वडिलांनी मुलाचं भरपूर कौतुक केलं. ते म्हणाले, “एक दिवस तू खूप मोठा होशील.”
कमी उंचीमुळे शालेय संघात निवड झाली नाही…
मायकेल जॉर्डनला बालपणापासून खेळण्याचं भारीच वेड होतं. विशेषत: त्याला बास्केटबॉलसारखे खेळ खूप आवडायचे. त्याने याच खेळात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. शालेय संघात स्थान मिळविण्याचा प्रयत्न केला; पण शारीरिक उंची कमी असल्याने त्याला शालेय बास्केटबॉल संघात स्थान मिळाले नाही. संघात निवड न झाल्याने तो खूप निराश झाला. कारण त्याच्यापेक्षा कमी प्रतिभा असलेल्या खेळाडूंची संघात निवड झाली होती. केवळ उंचीच्या निकषावर संघ निवड झाली होती. कौशल्य गौण ठरवलं होतं.
मात्र, मायकेलने हार मानली नाही. बालपणापासूनच काही तरी मोठं करण्याची त्यांची इच्छा होती. मायकेल जॉर्डनने त्यानंतर कठोर मेहनत घेत उंची वाढवली. शाळेच्या अखेरच्या दोन वर्षांत मायकेल शाळेतला सर्वांत उत्तम खेळाडू म्हणून चर्चेत आला. मायकेलमध्ये विजिगीषू वृत्ती आणि सातत्याने शिकण्याची भूक या गुणांमुळेच तो इतरांपेक्षा वेगळा ठरला.
अशी वाढली बास्केटबॉलमध्ये रुची
मायकेल जॉर्डनच्या बास्केटबॉल प्रवासातले पहिले टप्पे सांगितले. ते म्हणाले, की कुटुंबात मायकेलपेक्षाही त्याचा मोठा भाऊ लेरी याला बास्केटबॉलचं प्रचंड वेड होतं. त्याच्याकडे मायकेलपेक्षा अधिक गती होती. मायकेल आणि लेरी घरामागे तासन् तास बास्केटबॉल खेळायचे. दोघांपैकी एकही हार मानत नव्हता. कदाचित यामुळेच मायकेलमध्ये बास्केटबॉलप्रती रुची वाढली होती. जेव्हा शालेय संघात मायकेलची निवड होऊ शकली नाही, तेव्हा त्याने प्रचंड मेहनत घेतली. ही मेहनत कामी आली. मायकेलला शाळेच्या अखेरच्या दोन वर्षांत संघातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
खेळाने बदललं आयुष्य
शालेय संघातील कामगिरीने मायकेलचं आयुष्यच बदललं. असा गुणवान खेळाडू माझ्या विद्यापीठात असायला हवा, यासाठी अनेक विद्यापीठांनी मायकेल जॉर्डन याला घसघशीत स्कॉलरशिपच्या ऑफर दिल्या. मायकेल जॉर्डनकडे पुष्कळ संधी होत्या. त्याने विचार केला आणि घराजवळचंच विद्यापीठ निवडलं. ते होतं नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठ.
विद्यापीठाच्या संघात मायकेल सुरुवातीला फार चांगला खेळाडू होता असं अजिबात नव्हतं. मात्र, त्याने प्रशिक्षकाला सांगितलं, की मी सिद्ध करीन, की संघात माझ्यापेक्षा चांगलं बास्केटबॉल दुसरं कुणीच खेळू शकत नाही. मात्र, प्रशिक्षकाने मायकेल जॉर्डनला फार गंभीरपणे घेतलं नाही.
विद्यापीठाचे प्रशिक्षक मायकेलबाबत सांगतात, की “सुरुवातीला मायकेलचा खेळ अनियमित होता. म्हणजे कधी चांगला खेळायचा, कधी खूपच चांगला खेळायचा, तर कधी अतिशय वाईट खेळायचा. मात्र, विद्यापीठाच्या इतिहासात मी आजपर्यंत असा बास्केटबॉलसाठी जीव तोडून खेळणारा खेळाडू पाहिला नव्हता.”
पहिल्याच मोसमात 1982 मध्ये त्याने नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठात अटलांटिक कोस्ट कॉन्फरन्स (एसीसी) रूकी (Rookie) पुरस्कार जिंकला. 1984 मध्ये माइकल जॉर्डन याची युनायटेड स्टेट्स ऑलिम्पिक्स बास्केटबॉल संघात निवड झाली आणि संघाने कॉलिफोर्नियात गोल्ड मेडल जिंकले. नंतर त्याची नॅशनल बास्केटबॉल संघटनेत (NBA) शिकागो बुल्स संघात निवड झाली. हे त्याच्या कारकिर्दीतलं महत्त्वाचं वळण ठरलं. त्याने कारकिर्दीत एनबीए स्पर्धांमध्ये शिकागो बुल्स आणि वाशिंग्टन विजॉर्ड संघांसाठी सलग 15 सिझन खेळला.
ज्या वेळी मायकेल जॉर्डन शिकागो बुल्स संघात आला, त्या वेळी संघाची कामगिरी फारशी समाधानकारक नव्हती. मात्र, मायकेल जॉर्डन आल्यानंतर संघाने कात टाकली. त्याच्या वेगळ्या शैलीने संघ लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला. माइकल जॉर्डन याला आधी ‘ऑल स्टार टीम’, नंतर ‘लीग्स रूकी ऑफ दि इयर’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
पदवी घेतली ब्रेक के बाद…
मायकेलने 1984 मध्ये महाविद्यालयीन शिक्षण अर्ध्यावरच सोडलं. कारण ‘एनबीए’मध्ये त्याला खेळायचं होतं. त्यामुळे त्याला उत्तर कॅरोलिना विद्यापीठाची डीग्री घेता आली नाही. मात्र, आईवडिलांची इच्छा होती, की मायकेलने डीग्री पूर्ण करावी. मायकेल 1986 मध्ये एनबीएच्या मोसमातच उत्तर कॅरोलिना विद्यापीठात परतला. तेथे त्याने सांस्कृतिक भूगोलची पदवी घेतली आणि आईवडिलांचं स्वप्न पूर्ण केलं.
ऑलिम्पिक कारकीर्द
अमेरिकेच्या बास्केटबॉल संघाकडून मायकेल जॉर्डन याने दोन ऑलिम्पिक सुवर्ण पदके जिंकली. महाविद्यालयीन खेळाडूच्या रूपाने त्याने 1984 च्या ग्रीष्मकालीन ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला आणि सुवर्ण पदकही जिंकले. 1992 च्या ग्रीष्मकालीन ऑलिम्पिक स्पर्धेत मॅजिक जॉन्सन, लॅरी बर्ड आणि डेव्हिड रॉबिन्सन याच्या स्क्वाड टीमचा सदस्यही बनला. ही टीम ‘ड्रीम टीम’ म्हणून ओळखली गेली.
निवृत्तीनंतर पुन्हा खेळात
1997-1998 च्या काळात मायकेल जॉर्डनने बास्केटबॉलमधून निवृत्ती घेतली. तो वॉशिंगटन विजार्ड टीमचा मालक झाला. मात्र, तो बास्केटबॉलपासून लांब राहू शकला नाही. 2001 मध्ये त्याने पुन्हा वॉशिंगटन विजार्ड टीमसाठी खेळणे सुरू केले. सलग दोन वर्षे तो या संघाकडून खेळला. अखेर 2003 मध्ये मायकेलने खेळातून कायमची निवृत्ती जाहीर केली. मायकेल उत्तम खेळाडू आहेच, पण एक यशस्वी उद्योजकही आहे. तो चार्लोट बोब्कट्स नामक कंपनीचा मालकही आहे.
मायकेल जॉर्डनची कौटुंबिक पार्श्वभूमी
मायकेल जॉर्डन याने दोन विवाह केले. त्याचं पहिलं लग्न सप्टेंबर 1989 मध्ये झालं. पहिल्या पत्नीचं नाव होतं जुआनिता वनोय. मायकेल आणि जुआनिता यांना तीन मुलं झाली. त्यापैकी मार्क्स जेम्स आणि जेफ्फेरी मायकेल ही दोन मुलगे, तर जस्मीन नावाची एक मुलगी आहे. मायकेलची दोन्ही मुलं बास्केटबॉलपटू आहेत.
हे लग्न १७ वर्षे टिकलं. 2006 मध्ये त्याने जुआनिताला घटस्फोट दिला. त्या बदल्यात मायकेलला 168 कोटी डॉलर मोजावे लागले. 2006 पर्यंत हा सर्वांत महागडा घटस्फोट ठरला. त्यानंतर मायकेलने 27 एप्रिल 2013 रोजी क्यूबाची मॉडेल येवती प्रीतो हिच्याशी दुसरं लग्न केलं. लग्नापूर्वी मायकेलची ती गर्लफ्रेंड होती. दीर्घकाळापासून ते एकमेकांना डेट करीत होते. या दाम्पत्याला दोन जुळ्या मुली झाल्या. एकीचं नाव व्हिक्टोरिया, तर दुसरी यसबेल. या जुळ्या मुलींचा जन्म फेब्रुवारी 2014 मध्ये झाला.
सर्वांत लोकप्रिय व्यक्ती
जॉर्डन क्रीडाविश्वाच्या इतिहासातील लोकप्रिय व्यक्ती म्हणून ओळखला जातो. नाइके, कोका कोला, शेवरलेट, गेटोरेड, मॅकडॉनल्ड्स, गेंद पार्क फ्रँक्स, रेयोवैक, व्हीटीस, हेन्स आणि एमसीआय अशा ब्रँडचा प्रमुख अम्बॅसॅडर होता. ‘नाइके’ने तर त्याच्यासाठी खास सिग्नेचर बूट बनवले. या बुटांना ‘एअर जॉर्डन’ नाव देण्यात आले. जून 2010 मध्ये मायकेल जॉर्डन याला ‘फोर्ब्ज मॅगेझिन’ने सर्वांत तेजस्वी लोकप्रिय व्यक्तींमध्ये २० वा क्रमांक दिला होता.
शेर्लोट बोब्कट्स
मायकेल जॉर्डन ‘शेर्लोट बोब्कट्स’ संघाचा मालक होता. त्याला बास्केटबॉल खेळाचे सर्वाधिकार देण्यात आले होते. मायकेल जॉर्डन यशाच्या शिखरावर असूनही एकाही जाहिरातीत सहभागी न होण्याचा त्याने निर्णय घेतला होता. शेर्लोट बोब्कट्ससाठी मायकेल जॉर्डनचे मोठे योगदान आहे. 2012-2013 दरम्यान 66 सामने खेळले गेले. त्यात बोब्कट्सने 7-59 चा विक्रम रचला होता. मात्र, जॉर्डन या विक्रमाने फारसा खूश नव्हता. 21 मे 2013 मध्ये जॉर्डनने बोब्कट्सचं नाव बदलून ‘होरनेट्स’ नाव ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
मायकेल जॉर्डन याने एनबीएमध्ये एकूण 15 सिझन खेळले. त्यापैकी सहा वेळा त्याने विजेतेपद मिळवले. जगातला सर्वोत्तम बास्केटबॉलपटू म्हणून मायकेल जॉर्डनची ओळख आहे. आजही मायकेल जॉर्डनला बास्केटबॉलचा देव मानतात.
- पूर्ण नाव : मायकेल जेफ्री जॉर्डन (Michael Jeffrey Jordan)
- जन्म : 17 February 1963
- व्यवसाय : माजी बास्केटबॉलपटू, अमेरिकी उद्योजक
- टोपणनाव : बास्केटबॉलचा देव, चेअरमन ऑफ दि चार्लोट हॉर्नेट्स, जम्प मॅन
- कमाई : 160 कोटी डॉलर
- आई/वडील : डेलोरिस ई. जॉर्डन/जेम्स रेमंड जॉर्डन सीनिअर
- पत्नी : वेट्टे प्रीटो (2013), जुआनिता वनोय (1989–2006)
- मुले : जस्मीन, जेफ्री, मार्कस, इसाबेल, व्हिक्टोरिया
- धर्म : ख्रिश्चन
- नागरिकत्व : अमेरिकन
मायकेल जॉर्डनची कमाई किती?
मायकेल जॉर्डनची वार्षिक उत्पन्न सुमारे 200 कोटी डॉलर सांगितली जाते. अर्थात, गुंतवणूक, व्यापार आणि बाजारातील चढ-उतार यामुळे त्याच्या निव्वळ उत्पन्नात चढ-उतार असतीलही. मात्र, त्याची कमाई विशेषत: यशस्वी बास्केटबॉल कारकीर्द, ब्रँड अँडोर्समेंट आणि बिझनेस व्हेंचर्सशी संबंधित आहे. नाइके आणि एअर जॉर्डन ब्रँडसोबत असलेली भागीदारी त्याला विशेष फलदायी ठरली आहे. यात स्नीकर्स अब्जावधीचा महसूल मिळवता. त्याच्याकडे शार्लेट हॉर्नेट्स या एनबीएच्या संघातही भागीदारी आहे. ही भागीदारीही त्याच्या संपत्तीची व्याप्ती वाढवत आहे.
[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=jbW4f60dCNA” column_width=”4″]एनबीए कारकीर्द
- 1984 एनबीएमध्ये ‘शिकागो बुल्स’ संघात प्रवेश
- 1984 ते 1993 पर्यंत, नंतर 1995 ते 1998 पर्यंत शिकागो बुल्स संघात सहभाग
- 1991, 1992, 1993, 1996, 1997 आणि 1998 अशी सहा वेळा ‘शिकागो बुल्स’ संघाला एनबीएची चॅम्पियनशिप जिंकून दिली.
- 1988, 1991, 1992, 1996, 1998 अशा एकूण पाच मोसमांत एनबीएचा सर्वांत मौल्यवान खेळाडूचा बहुमान मिळवला.
- 14 एनबीए ऑल स्टार निवड पुरस्कार मिळवले, तर तीन वेळा ऑल-स्टार गेम एमव्हीपी पुरस्कार जिंकला.
- 2003 मध्ये आपल्या निवृत्तीच्या काळात एनबीएचा सर्वकालिक प्रमुख स्कोअरर बनला. अविश्वसनीय स्कोअरिंगची क्षमता, प्रतिस्पर्धात्मकता, क्लच प्रदर्शन आणि संरक्षणात्मक कौशल्यासाठी त्याला ओळखले जाते.
बेसबॉल कारकीर्द
1993 मध्ये वडिलांची हत्या झाल्यानंतर मायकेल जॉर्डनने बास्केटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आणि व्यावसायिक बेसबॉलमध्ये पदार्पण केले.
कोबे ब्रायंट : कुटुंबवत्सल पिता आणि महान खेळाडूची अकाली एक्झिट
[jnews_block_9 first_title=”Read more at:” include_category=”72,60″]