All SportsFootballSports Historysports newsTennis
टेनिसपटू स्लोएने स्टीफेन्स हिने केले या फुटबॉलपटूशी लग्न
टेनिस स्टार स्लोएने स्टीफेन्स आणि फुटबॉलपटू जोझी अल्टिडोर 5 जानेवारी 2022 रोजी विवाहबंधनात अडकले. दोघांनी इन्स्टाग्रामवर विवाहाची छायाचित्रे पोस्ट केली आहेत. हा विवाह सोहळा शादी मियामी बीचवर झाला.
टेनिस स्टार स्लोएने स्टीफेन्स आणि फुटबॉलपटू जोजी अल्टिडोर यांनी एप्रिल 2019 मध्ये ट्विटरवर साखरपुडा झाल्याची घोषणा केली होती. आता ते विवाहबंधनात अडकले आहेत.
स्टीफेन्सने 2017 मध्ये अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली होती. 2018 मधील फ्रेंच ओपनचे विजेतेपद मात्र हुकले. यात ती उपविजेता ठरली. तिने 2013 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनची उपांत्य फेरी आणि विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली आहे.
अल्टिडोर 2015 पासून टोरोंटो एफसीकडून खेळत आहे. तो न्यूयॉर्क रेडबुल्स, स्पेनचा विलारियाल आणि शेरेज, तसेच इंग्लंडच्या हल तथा संडरलँडकडूनही खेळला आहे.
स्लोएने स्टीफेन्स {Sloane Stephens} | जोस्नर वोल्मी अल्टिडोर {Josmer Volmy Altidore} |
नाव : स्लोएने स्टीफेन्स | नाव : जोस्नर वोल्मी अल्टिडोर (जोझी) |
देश : अमेरिका | देश : अमेरिका |
निवास : फोर्ट लाउडरडेल, फ्लोरिडा, अमेरिका | जन्म : 6 नोव्हें. 1989, लिव्हिंगस्टन |
जन्म : 20 मार्च 1993, प्लँटेशन, फ्लोरिडा | खेळ : फुटबॉल |
खेळ : टेनिस | उंची : 6 फूट 1 इंच (185 सेंमी) |
खेळण्याची शैली : उजव्या हाताची खेळाडू (दोन्ही हातांनी बॅकहँड) | खेळातील स्थान : स्ट्रायकर |
2022 पर्यंत मिळविलेल्या बक्षिसांची रक्कम : 16,281,104 डॉलर | क्लब : टोरोंटो फुटबॉल क्लब |
अधिकृत वेबसाइट : स्लोआने स्टीफेन्स | जर्सी क्रमांक : 17 |
कारकिर्दीतील कामगिरी : 315/223 (58.6%) | युवा कारकीर्द |
कारकिर्दीतील एकूण जेतेपद : 6 | 2004-2006 : आयएमजी सॉकर अॅकॅडमी वरिष्ठ स्तरावरील कारकीर्द |
सर्वोत्तम रँकिंग : 3 (16 जुलै 2018) | 2006–2008 : न्यूयॉर्क रेड बुल्सकडून 15 गोल |
सध्याचे रँकिंग : 63 (1 नोव्हेंबर 2021) | 2008–2011 : विलारियाल क्लबकडून 1 गोल |
एकेरीतील ग्रँडस्लॅम स्पर्धेतील कामगिरी | 2009 : झेरेझ क्लबकडून शून्य गोल |
ऑस्ट्रेलियन ओपन : सेमिफायनल (2013) | 2009–2010 : हल सिटी क्लबकडून 1 गोल |
फ्रेंच ओपन : फायनल (2018) | 2011 : बुर्सापोरकडून 1 गोल |
विम्बल्डन : उपांत्यपूर्व फेरी (2013) | 2011–2013 : अल्कमार झानस्ट्रीक (एझेड) क्लबकडून 39 गोल |
अमेरिकन ओपन : विजेती (2017) | 2013–2015 : सुंदरलँड क्लबकडून 1 गोल |
इतर स्पर्धा | 2015-2021 : टोरोंटो फुटबॉल क्लबकडून 62 गोल |
टूर फायनल्स : फायनल (2018) | 2022 : न्यू इंग्लंड रिव्होल्युशनकडून 1 गोल |
ऑलिम्पिक गेम्स : पहिली फेरी (2016) | 2022 : पुएब्ला क्लबकडून 1 गोल |
दुहेरीतील कामगिरी | राष्ट्रीय संघ |
कारकिर्दीतील कामगिरी : 41–58 (41.4%) | 2005 : 17 वर्षांखालील अमेरिका संघ |
कारकिर्दीतील विजेतीपदे : 0 | 2007 : 20 वर्षांखालील अमेरिका संघ (4 गोल) |
सर्वोत्तम रँकिंग : 94 (24 ऑक्टोबर 2011) | 2008 : 23 वर्षांखालील अमेरिका संघ (1 गोल) |
सध्याचे रँकिंग : 1085 (1 नोव्हेंबर 2021) | 2007 : अमेरिका (42 गोल) |