ऑलिम्पिकमध्ये अवतरली टेनिस स्टार पेंग शुआई
लैंगिक शोषणाचा आरोप करणारी चीनची टेनिस स्टार पेंग शुआई 7 फेब्रुवारी 2022 रोजी हिवाळी ऑलिम्पिकमध्ये दिसली. या वेळी तिने एक मुलाखतही दिली. मात्र, या मुलाखतीत हातचं राखूनच ती बोलली. चीनच्या सत्तारूढ कम्युनिस्ट पक्षातील एका सदस्याविरुद्ध तिने लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यानंतर जगभरात तिच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. मात्र, ही चिंता वृथा होता. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला, असे पेंग शुआई म्हणाली.
चीनच्या ऑलिम्पिक समितीच्या अधिकाऱ्यासमोरच ही मुलाखत झाली. या मुलाखतीत टेनिस स्टार पेंग शुआईने दिलेल्या उत्तरावर प्रश्न उपस्थित करण्याची परवानगी देण्यात आली नाही. मात्र, पेंग शुआई हिने अनेक प्रश्नांची उत्तरेच दिली नाहीत.
फ्रान्सचे क्रीडा वृत्तपत्र ‘ल एक्विप’मध्ये सोमवारी ही मुलाखत प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मुलाखतीत पेंग शुआईला काही थेट प्रश्न विचारण्यात आले होते. मात्र, सुरुवातीला केलेले लैंगिक शोषणाचे आरोप आणि चिनी सरकारकडून आलेल्या दबावासंदर्भातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे पेंग शुआईने टाळली.
या वृत्तपत्राने सांगितले, की बीजिंग ऑलिम्पिकच्या एक दिवस आधी टेनिस स्टार पेंग शुआई हिच्याशी तासभर चर्चा केली. चीनच्या ऑलिम्पिक समितीने ही मुलाखत घेण्यासाठी मदत केली. मात्र, तत्पूर्वी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने माहिती देताना सांगितले, की आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी 5 फेब्रुवारी 2022 रोजी पेंग शुआईसोबत रात्री भोजन घेतले. त्यांनी आयओसीचे सदस्य क्रिस्टी कोवेंट्री यांच्यासोबत चीन आणि नॉर्वेदरम्यानचा कर्लिंग सामनाही पाहिला. त्याच्या एक दिवस आधी चीनच्या राष्ट्रपतींनी बीजिंग शीतकालीन ऑलिम्पिकचे उद्घाटन केले. मानवाधिकाराच्या उल्लंघनावरून चीनची मलिन झालेली प्रतिष्ठा आणि शुआई पेंग हिच्याबाबत जगभरात चिंता व्यक्त केली जात होती.
वृत्तपत्राने मुलाखत घेण्यापूर्वी पेंग शुआई हिला प्रश्न पाठवण्यात आले होते. चीन ऑलिम्पिक समितीच्या अका अधिकाऱ्याने दुभाषाकाच्या माध्यमातून या मुलाखतीत भूमिका निभावली होती. वृत्तपत्राने पेंग शुआई हिला नोव्हेंबरमधील तिच्या सोशल मीडियावरील पोस्टसंदर्भात विचारले. या पोस्टमध्ये पेंग शुआई हिने चीनचे माजी उपप्रधानमंत्री आणि सत्तारूढ चिनी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्यूरोच्या स्थायी समितीचे सदस्य झांग गाओली यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. यानंतर पेंग शुआई कोणालाही दिसली नाही. मात्र, सरकारच्या काही प्रचार कार्यक्रमांत ती अधूनमधून समोर आली होती.
पेंग शुआई हिने वृत्तपत्राला सांगितले, ‘‘लैंगिक शोषण? मी तर असं काही बोललेच नाही. हा खूप मोठा गैरसमज आहे. मी केलेल्या पोस्टचे कोणतेही अन्वयार्थ काढले जाऊ नये.’’
ती पोस्ट पेंग शुआई हिच्या अकाउंटवरून लगेच हटवण्यात आली. त्यावर वृत्तपत्राने विचारले असता ती म्हणाली, ‘‘मीच ती पोस्ट हटवली.’’
ही पोस्ट हटवण्यामागचे कारण काय? यावर पेंग शुआई म्हणाली, ‘‘कारण मला तसं वाटलं.’’
तुझ्यावर चिनी सरकारचा दबाव आहे? या प्रश्नाचं मात्र पेंग शुआई हिने कोणतंही उत्तर दिलं नाही. ती म्हणाली, ‘‘मी सांगू इच्छिते, की खेळ आणि राजकारण वेगवेगळे आहेत. माझ्या वैयक्तिक समस्या, खासगी जीवन याचा खेळ आणि राजकारणाशी काहीही संबंध नाही.’’
नोव्हेंबर 2021 मध्ये पोस्ट केल्यानंतर तुझ्या आयुष्यात काय बदल झाले? पेंग शुआई म्हणाली, ‘‘जशी असली पाहिजे तशीच आहे. काही विशेष नाही.’’ पेंग शुआई हिने असेही सांगितले, की 36 व्या वर्षात गुडघ्याचे ऑपरेशन झाल्यानंतर डब्लूटीए टूरमध्ये वापसी करण्याची अपेक्षा सोडली आहे. ती फेब्रुवारी 2020 पासून महिला टूर खेळलेली नाही.
पेंग शुआई हिने 23 वेळची ग्रँडस्लॅम चॅम्पियन सेरेना विल्यम्ससह तिची काळजी करणाऱ्या सर्व खेळाडूंचे तिने आभार मानले.
पेंग शुआई म्हणाली, ‘‘मी हे जाणू इच्छिते, की एवढी चिंता कशासाठी? मी कुठेही गायब झालेले नव्हते. घटना एवढीच होती, की मित्र, आयओसी, इतरांनी मला इतके मेसेज पाठवले, की त्यांना उत्तर देणे शक्यच नव्हते.’’
Follow on Facebook page kheliyad
[jnews_block_37 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”90″]