श्रीलंकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार थिसरा परेरा क्रिकेटमधून निवृत्त
श्रीलंकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार थिसरा परेरा क्रिकेटमधून निवृत्त
श्रीलंकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार थिसरा परेरा (Thisara Parera) याने सोमवारी, 5 मार्च 2021 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती (Retire) जाहीर केली. श्रीलंका क्रिकेटला (SLC) पाठविलेल्या पत्रात परेरा याने निवृत्त होण्याचा निर्णय कळविला. परेरा 32 वर्षांचा आहे. त्याने सहा कसोटी, 166 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि 84 टी20 अंतरराष्ट्रीय सामन्यांत श्रीलंकेचे प्रतिनिधित्व केले. निवृत्त झाल्यानंतर थिसरा परेरा जगभरातील फ्रँचायझी संघांत खेळण्याची शक्यता आहे.
परेराने एसएलसीला (SLC) लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे, की ‘‘मला अभिमान आहे, की मी सात क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धांत श्रीलंकेचं प्रतिनिधित्व करू शकलो. बांगलादेशात 2014 मध्ये भारताविरुद्ध टी20 विश्वकपमध्ये संघाला विजय मिळवून देण्यात माझे महत्त्वाचे योगदान होते. हा माझ्या आयुष्यातला सुवर्णक्षण आहे.’’
थिसरा परेरा याने का घेतला निवृत्त होण्याचा निर्णय
श्रीलंका तरुण खेळाडूंची फळी उभी करण्याच्या विचारात आहे. त्यामुळे अनेक वरिष्ठ खेळाडूंना डच्चू मिळण्याची चर्चा सुरू होती. या वरिष्ठ खेळाडूंमध्ये तिशी पार केलेले थिसरा परेरासह दिमुथ करुणारत्ने, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडिमल, सुरंगा लकमल यांचा समावेश होता. बांगलादेश, इंग्लंडमध्ये श्रीलंका आगामी दौऱ्यात मर्यादित षटकांचे सामने खेळणार आहे. बांगलादेशविरुद्ध वन-डे, तर इंग्लंडविरुद्ध वन-डे, टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकांसाठी ज्येष्ठ खेळाडूंना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. परेराला याची जाणीव होती. त्यामुळे त्याने डच्चू मिळण्यापूर्वीच निवृत्तीची घोषणा केली आहे. पुढच्या काळात अन्य खेळाडूही निवृ्त्ती जाहीर करण्याची शक्यता आहे. तसे न झाल्यास श्रीलंका निवड समिती वरिष्ठ खेळाडूंना संघाबाहेर ठेवणारच आहे.
एका षटकात सहा षटकार
सहा चेंडूंत सहा षटकार ठोकणारे जगात काही निवडक क्रिकेटपटू आहेत. त्यात थिसारा परेराचा समावेश होता. अर्थात, परेराच्या या कामगिरीची नोंद आंतरराष्ट्रीय सामन्यांत झालेली नाही. कारण काही दिवसांपूर्वीच त्याने स्थानिक सामन्यात ६ चेंडूंत ६ षटकारांची आतषबाजी केली होती. त्या वेळी परेरा आर्मी स्पोर्ट्स क्लबकडून खेळत होता. त्याने ब्लूमफिल्ड संघाविरुद्ध सहा चेंडूंत सलग सहा षटकार ठोकले होते. अशी कामगिरी करणारा तो श्रीलंकेचा पहिला क्रिकेटपटू आहे. त्याचबरोबर एका षटकात सहा षटकार ठोकणारा तो जगातील नववा आणि ५० षटकांच्या सामन्यात ही कामगिरी करणारा दुसराच फलंदाज ठरला.
2011 च्या वर्ल्डकपमध्ये लक्षणीय कामगिरी
2011 चा वर्ल्डकप भलेही भारताने जिंकला असेल, पण लक्षात राहिला तो थिसारा परेराच. या स्पर्धेत भारताचा अंतिम सामना श्रीलंकेविरुद्ध होता. विजेतेपदाच्या या झुंजीत श्रीलंकेकडून भारताला कडवा प्रतिकार सहन करावा लागला. या स्पर्धेत परेराने १० चेंडूंत २२ धावा केल्या होत्या. ही कामगिरी भारतासाठी चिंताजनक होती. एवढेच नाही, तर भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरला शतकापासून वंचित ठेवले होते. गंभीरला त्याने ९७ धावांवर बाद केले होते.
[visualizer id=”3688″]परेराची कामगिरी
2009
मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण
06
कसोटी सामन्यांत 203 धावा 11 बळी
166
वन-डे सामन्यांत 2,338 धावा आणि 175 बळी
84
टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 1,204 धावा 51 विकेट
140
धावा न्यूझीलंडविरुद्ध (वर्ष 2019)
[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_tag=”541″]