Six Pakistan cricketers test positive for COVID-19 | पाकिस्तानच्या सहा क्रिकेटपटूंना करोना!
पाकिस्तानच्या सहा क्रिकेटपटूंना करोना!
न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानच्या सहा क्रिकेटपटूंना करोना झाल्याचे समोर आले आहे. Six Pakistan cricketers test positive for COVID-19 |
क्रिकेटपटूंना करोनाची लागण होणे गंभीर आहेच, पण न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान संघातील सहा जणांना करोना होणे हे त्यापेक्षाही गंभीर मानले जात आहे. प्रोटोकॉल तोडल्यामुळे या खेळाडूंना करोना झाल्याचा आरोप न्यूझीलंड क्रिकेटने New Zealand Cricket | केला आहे.
Six Pakistan cricketers test positive for COVID-19 | आता या क्रिकेटपटूंना विलगीकरणात राहावे लागेल. त्यामुळे त्यांना सराव सत्रातही सहभाग घेता येणार नाही. या खेळाडूंना शेवटचा इशाराही देण्यात आला आहे.
Six Pakistan cricketers test positive for COVID-19 | बाबर आझमच्या नेतृत्वाखाली 53 सदस्यीय पाकिस्तानचा संघ २६ नोव्हेंबर २०२० रोजी न्यूझीलंडमध्ये दाखल झाला. त्यानंतर 14 दिवसांसाठी हा संघ विलगीकरणातच आहे.
न्यूझीलंड क्रिकेटने सांगितले, ‘‘या सहा दिवसांत दोन नवे, दोन जुने, तर चार नवे अहवाल आले आहेत.” या खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. हे सर्व खेळाड विलगीकरण केंद्रात रवाना करण्यात आले आहेत.
पाकिस्तानला न्यूझीलंडमध्ये तीन टी20 आणि दोन कसोटी सामने खेळायचे आहेत.
न्यूझीलंड क्रिकेटने सांगितले, ‘‘पाकिस्तानी संघ सध्या सराव करू शकणार नाही. तपासणी पूर्ण होईपर्यंत त्यांच्या सरावास बंदी असेल.’’
पाकिस्तानी संघातील काही सदस्यांनी विलगीकरणाच्या पहिल्याच दिवशी प्रोटॉकॉल तोडल्याचे न्यूझीलंड क्रिकेटच्या लक्षात आले आहे. न्यूझीलंड क्रिकेट आता या खेळाडूंना त्यांना समजून सांगणार आहे, की प्रोटोकॉलच्या अटी नेमक्या काय आहेत ते.
कँटरबरी जिल्हा आरोग्य मंडळाच्या अधिकाऱ्याने पाकिस्तानी संघ व्यवस्थापनाला खरमरीत पत्रच लिहिले आहे. या पत्रात नमूद केले आहे, की पुढील सूचना मिळेपर्यंत संघातील सर्व खेळाडूंनी आपल्या रूममध्येच राहावे.
आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले, की खेळाडूंना सर्व सूचना विस्तृतपणे आणि स्पष्टपणे दिल्या होत्या. मात्र, पाकिस्तानी खेळाडूंनी प्रोटोकॉलचे उल्लंघन केले आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे.
पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा
आरोग्य महानिदेशक अॅश्ले ब्लूमफील्ड यांनी सांगितले, ‘‘न्यूझीलंडमध्ये येऊन खेळणे भाग्याची गोष्ट आहे. मात्र, आपल्या कर्मचाऱ्यांना आणि समाजाला करोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी जे नियम तयार केले आहेत, त्याचे पालन करणे आवश्यक आहे. आम्ही संघाला अखेरचा इशारा दिला आहे.’’
प्रोटोकॉलचे नियम धाब्यावर बसवण्यात पाकिस्तानचा कोणी हात धरू शकणार नाही. यापूर्वी इंग्लंड दौऱ्यापूर्वी पाकिस्तानचे दहा खेळाडू करोना पॉझिटिव्ह आले होते.
[jnews_block_8 first_title=”Read more at :” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”65″]