महमुदुल्लाह याने घेतली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती
महमुदुल्लाह याने घेतली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती
बांग्लादेशचा वरिष्ठ खेळाडू महमुदुल्लाह याने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याच्या या निर्णयाने क्रिकेटप्रेमींना धक्का बसला आहे. कारण निवृत्ती घेण्यापूर्वी एक दिवस आधीच त्याने झिम्बाब्वेविरुद्ध दीडशे धावांची शतकी खेळी साकारली होती. झिम्बाब्वेच्या हरारे येथे त्याने ही शतकी खेळी साकारली होती. उत्तम कामगिरी केल्यानंतर निवृत्ती जाहीर केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
क्रिकबज वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, महमुदुल्लाहने आपल्या सहकाऱ्यांना याबाबत सांगितले, की आता मला यापुढे कसोटी क्रिकेट खेळण्याची इच्छा नाही. याचाच अर्थ महमुदुल्लाह याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. बांग्लादेश क्रिकेट मंडळाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले, की ‘‘महमुदुल्लाह यापुढे कसोटी क्रिकेट खेळण्यास इच्छुक नाही. त्याने अधिकृतरीत्या याबाबत माहिती दिलेली नाही. आम्हाला हे पाहायचंय, की त्याने अतिउत्साहात हा फुगा तर सोडला नाही ना?’’
महमुदुल्लाहने बांग्लादेशसाठी 49 कसोटी सामने खेळले आहेत. यात 31 पेक्षा अधिक सरासरीने त्याने 2,764 धावा केल्या आहेत. त्याने वेस्ट इंडीजविरुद्ध 2009 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यात त्याची फलंदाजी समाधानकारक नसली तरी गोलंदाजीत त्याने आठ विकेट घेतल्या होत्या. त्या वेळी विदेशी भूमीवर बांग्लादेशने जिंकलेला तो पहिलाच कसोटी सामना होता. महमुदुल्लाह सध्या टी 20 संघाचा कर्णधार आहे. 2015 च्या विश्वकप स्पर्धेत तो बांग्लादेशचा सर्वोत्तम फलंदाज राहिलेला आहे.
[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”65″]