PCB against india | आयसीसीवर पाकला हे तीन देश नको!
आयसीसीवर पाकला हे तीन देश नको!
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष एहसान मनी Ehsan Mani | यांचा तीन देशांना आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी विरोध आहे. PCB against india |
PCB against india | हे तीन देश आहेत भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया. या तीन देशांतील कोणीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ICC | अध्यक्षपदासाठी दावा सांगत असेल तर त्याला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा विरोध असेल, अशी भूमिका पीसीबीचे अध्यक्ष एहसान मनी यांनी घेतली आहे.
PCB against india | आयसीसीच्या अध्यक्षपदावर या तीन देशांव्यतिरिक्त कोणीही आला तर ते आयसीसीच्या ‘आरोग्या’साठी चांगले असेल, असे मनी यांना वाटते.
ते म्हणाले, की भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय), क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड एवं वेल्स क्रिकेट बोर्डामुळे (ईसीबी) आयसीसीमध्ये ICC | राजकारण घुसले आहे.
भारताचे शशांक मनोहर यांचा कार्यकाळ संपल्याने आयसीसीचे अध्यक्षपद अद्याप रिक्त आहे. आता आयसीसीच्या अध्यक्षपदाची निवड दोन तृतीयांश बहुमताने घ्यायचा की साधारण बहुमताने, याचा निर्णय आयसीसीच्या बोर्डावर अवलंबून आहे. तूर्तास इम्रान ख्वाजा यांच्याकडे अध्यक्षपदाचा तात्पुरता कार्यभार सोपविलेला आहे.
मनी यांनी फोर्ब्स पत्रिकेला सांगितले, ‘‘हे दुर्दैवी आहे, की अध्यक्षपदाच्या निवडीला विलंब झाला आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि भारताने २०१४ मध्ये आपले हितसंबंध जोपासण्यासाठी राजकारण सुरू केले. त्यामुळेच ते अध्यक्षपद मिळविण्यासाठी संघर्ष करीत आहेत. कारण आता त्यांच्यासाठी अनुरूप स्थिती राहिलेली नाही.’’
मनी २००३ ते २००६ पर्यंत आयसीसीचे अध्यक्ष राहिलेले आहेत. ते म्हणाले, ‘‘आयसीसीसाठी हेच योग्य राहील, की या तीन मोठ्या देशांव्यतिरिक्त अन्य बोर्डाला अध्यक्षपदाची संधी मिळावी.’’
PCB against india | आयसीसीच्या अध्यक्षपदावर मनी यांनी दावा केल्याची चर्चा आहे. मात्र, त्याचे खंडन करताना मनी म्हणाले, ‘‘मी या पदासाठी अजिबात इच्छुक नाही.
मला काही जणांनी विचारलेही, पण मी त्यांना सांगितले, की मी केवळ पाकिस्तान क्रिकेटची सेवा करीत आहे. मी हे सगळं यापूर्वीच करून चुकलो आहे.’’
आयसीसीच्या २०२३-३१ मधील आगामी कार्यक्रमांत पाकिस्तान विश्वकरंडक स्पर्धेचं यजमानपद मिळवेल, अशी आशाही मनी यांनी व्यक्त केली आहे.