Tennis

Nick Kyrgios : निक किर्गियोसची अमेरिकन ओपनमधून माघार

निक किर्गियोसचीही अमेरिकन ओपनमधून माघार


रोना महामारीचा coronavirus | धसका संपूर्ण जगानेच घेतला आहे. खेळाडूंनीही प्रतिष्ठित स्पर्धांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळेच टेनिसमधील प्रतिष्ठेच्या अमेरिकन ओपन (US Open) स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय स्टार खेळाडू घेत आहेत. स्टार टेनिसपटू निक किर्गियोसनेही Nick Kyrgios | करोनाच्या चिंतेमुळे अमेरिकन ओपनमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

ashleigh-barty-tennis

हेही वाचा…
अॅश्ले बार्टीची यूएस
ओपनमधून माघार

करोना महामारीमुळे मृत्युमुखी पडलेल्या शेकडो हजारो अमेरिकींच्या सन्मानार्थ किर्गियोसने स्पर्धेतून माघार घेतली आहे. याबाबत किर्गियोसने Nick Kyrgios | २ ऑगस्ट २०२० रोजी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने नमूद केले आहे, की अमेरिकी टेनिस संघटनेने (USTA) ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबरदरम्यान आयोजित केलेल्या स्पर्धेच्या योजनेबाबत कोणतीही अडचण नाही. मात्र करोनामुळे या स्पर्धेत आरोग्यस्वास्थ्य महत्त्वाचे आहे.

किर्गियोसने करोनामुळेच ही ग्रँडस्लॅम स्पर्धा न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीच जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावरील ऑस्ट्रेलियाची महिला टेनिसपटू अॅश्ले बार्टी Ashleigh Barty | हिने स्पर्धा न खेळण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 

किर्गियोसने सांगितले, ‘‘मी यंदा अमेरिकन ओपन खेळणार नाही. मला हा निर्णय घेताना दु:ख होत आहे; पण मी माझ्या देशबांधवांसाठी, मृत्युमुखी पडलेल्या हजारो अमेरिकींसाठी या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. हा सर्वस्वी माझा निर्णय आहे.’’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!