‘ग्रेट फिनिशर’ महेंद्रसिंह धोनीची निवृत्ती अनेकांना चटका लावून गेली. त्याच्या मैदानातल्या आठवणी जेवढ्या समृद्ध आहेत, तेवढ्याच एक मित्र म्हणूनही… MS Dhoni with childhood friends | आपल्या मित्रांबाबत माहीच्या हृदयाचा एक कोपरा नेहमीच हळवा राहिलेला आहे… त्याच्या बालपणीच्या मित्राने अशाच आठवणींना उजाळा दिला…
MS Dhoni with childhood friends | माहीसारखा ‘कोहिनूर’ आता क्रिकेटविश्वाला पुन्हा मिळणार नाही, अशी भावना माहीचा बालपणीचा मित्र सीमान्त लोहानी याने व्यक्त केली. रांचीत राहणारा सीमान्त हा चिट्टू या टोपणनावाने मित्रांमध्ये ओळखला जातो.
तो म्हणाला, ‘‘माहीविषयी काय सांगू नि काय नाही…! त्याने आम्हाला नेहमीच हसवलं… एवढ्या आयसीसी ट्रॉफी जिंकून दिल्या, की आतापर्यंत कोणत्याच कर्णधाराला अशी कामगिरी करता आलेली नाही. त्याच्यावर आम्हाला गर्व आहे.’’
MS Dhoni with childhood friends | चिट्टू माहीचं भरभरून कौतुक करीत होता. ‘‘तो भारतीय क्रिकेटचा ‘कोहिनूर’ आहे. पुढे अनेक महान क्रिकेटपटू येतीलही, पण महेंद्रसिंह धोनीसारखा कोणीच नसेल’’
माही महान क्रिकेटपटू झाला आणि त्याच्याभोवती ग्लॅमरस दुनियेचाही विळखा पडला. सेलिब्रिटी झाला म्हणून माही कधीच आपल्या बालपणीच्या मित्रांना विसरला नाही.
‘‘कोणी सेलिब्रिटी झालं म्हणून मित्रांना कधी विसरत नाही. जर तुम्ही त्याला भेटला असाल तर तुम्हाला जाणवेल, की सेलिब्रिटीचं वलय मित्रांसाठी कधीच अडसर ठरलेलं नाही.’’ चिट्टू माहीविषयी भरभरून बोलताना थांबत नव्हता.
धोनीवर एक चित्रपट आला होता- ‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’. या चित्रपटात त्याचे जीवलग मित्र चिट्टू अर्थात सीमान्त लोहानीसह परमजित सिंह आणि छोटू भैया यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२० मध्ये धोनीच्या फार्म हाउसवर चिट्टूच्या वाढदिवसाची छायाचित्रे समोर आली होती.
चिट्टूची आणि माहीची मैत्री नर्सरीपासूनची. या आठवणी सांगताना चिट्टू म्हणाला, ‘‘मी नर्सरीपासून त्याचा मित्र आहे. नर्सरीत वय तरी काय होतं.. इनमिन साडेतीन वर्षे. पुढे आपल्या करिअरमध्ये तो व्यस्त झाला. त्याने अनेक चढ-उतार पाहिले. मात्र आतून तो रांचीतला मुलगाच आहे. त्याच्या वर्तनात कोणताही बदल झालेला नाही.’’
MS Dhoni with childhood friends | धोनीसोबत घालवलेले आठवणींतले क्षण चिट्टूसमोरून झर्रकन गेले.
हेही वाचा… धोनीचा दे धक्का
‘‘जेव्हापासून तो क्रिकेट खेळतोय, एवढी मोठी कामगिरी केली आहे, की त्याच्याविषयीचा सर्वोत्तम क्षण सांगणे अवघड आहे. ‘यारों का यार है माही’ लोकं विचारतात, तुम्ही त्याला भेटता का? आम्ही म्हणतो, तुम्ही कधी आमचा एकत्रित फोटो पाहिला नाही का? तशीही आमची भेट इतकी खासगी बाब आहे, की ती इतरांना शेअर का करावी?’’ चिट्टू प्रश्नांकित उत्तर देतो…
सार्वजनिक जीवन जगतानाही तो खासगी आयुष्य कधी समोर येऊ देत नाही. अशा वेळी माही मित्रांमध्ये कसा राहत असेल, याची अनेकांना उत्सुकता आहे.
यावर चिट्टू म्हणतो, ‘‘तो मित्रांमध्ये गप्प कधी बसत नाही. अनेक गोष्टी आम्हाला सांगत असतो. मस्तीही करतो, जी सगळीच करतात. मात्र, आम्ही एकमेकांशी क्रिकेटच्या गप्पा कधीच मारत नाही. क्रिकेट खेळणं त्याचं काम आहे. क्रिकेटव्यतिरिक्त आमच्या गप्पांचे अनेक विषय असतात.’’
भविष्यात धोनीचा प्रवास काय असेल, याचीही अनेकांना उत्सुकता आहे. चिट्टूला हा प्रश्न पडत नाही.
तो म्हणतो, ‘‘आम्ही त्याचे खूप चांगले मित्र आहोत. मात्र त्याचं क्रिकेटवरही प्रेम आहे. भविष्यात त्याला काय करायचंय, याचा निर्णय तो घेईल. आम्ही त्याच्या क्रिकेटवर अजिबात टिप्पणी करणार नाही.’’
धोनीचा क्रिकेटचा सोळा वर्षांचा समृद्ध प्रवास. त्याच्या बालमित्रांसाठी तो माहीच आहे. क्रिकेटपटू नंतर. चिट्टूही कधीच माध्यमांसमोर माहीच्या प्रवासाविषयी कधीच बोलत नाही.
तो म्हणतो, ‘‘मी २००४ मध्ये त्याची भारतीय संघात निवड झाली तेव्हा अनेक माध्यम प्रतिनिधींचे फोन आले. तो निवृत्त झाला तेव्हाही फोन आले. मात्र, मी त्याच्या सोळा वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत कधीच माध्यमांशी बोललो नाही. काही कारणही नव्हते!’’
One Comment