दोन वेळा विश्वविजेता ठरलेल्या भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार याने सिद्ध केलं, की घराणेशाहीने नशीब चमकत नसतं. म्हणूनच तो नव्या भारताचं उत्तम उदाहरण आहे, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महेंद्रसिंह धोनीचे कौतुक केले. PM Modi writes a letter to MS Dhoni |
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनीला MS Dhoni | पंतप्रधान मोदी PM Modi | यांनी पाठविलेल्या पत्रात writes a letter | कौतुकाचा वर्षाव केला आहे.
धोनीने आपल्या ट्विटर पेजवर हे पत्र शेअर केलं आहे. PM Modi writes a letter to MS Dhoni |
धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी इन्स्टाग्रामवर ‘मैं पल दो पल का शायर हूं ’ या गीताच्या पंक्तीबरोबर ‘मला सायंकाळी सात वाजून २९ मिनिटांनी निवृत्त समजावं’ असा संदेश लिहून सर्वांनाच धक्का दिला. या संदेशानंतर धोनीने २० ऑगस्ट रोजी केलेली ही पहिलीच पोस्ट आहे.
पत्रात मोदी यांनी नमूद केले आहे, की ‘‘आपण नव्या भारतातील भावनांच्या महत्त्वपूर्ण उदाहरणांपैकी एक आहात. या भारतात तरुणांचं नशीब कुटुंबाच्या नावामुळे लिहिलं जात नाही. ते स्वत: आपलं नाव आणि नशीब चमकवतात.’’
मोदींनी पुढे लिहिले आहे, ‘‘हे महत्त्वाचं नाही, की तुम्ही कुठून येतात; महत्त्वाचं हे आहे, की आपल्याला कुठे जायचं आहे? तुम्ही तो आत्मविश्वास दाखवला आहे आणि त्याचबरोबर तरुणांनाही प्रेरणा दिली आहे.’’
मोदींनी हेही नमूद केलं, की फक्त एक खेळाडू म्हणून धोनीचं आकलन करणं त्याच्यावर अन्याय असेल. कारण त्याचा प्रभाव असामान्य आहे.
मोदींनी लिहिले आहे, ‘‘महेंद्रसिंह धोनी हे नाव फक्त आकडे किंवा सामने जिंकून लक्षात ठेवले जाणार नाही. एक खेळाडू म्हणून त्याचं आकलन करणं त्याच्यावर अन्यायकारक होईल.’’
पंतप्रधान मोदींनी केलेल्या गौरवानंतर प्रादेशिक सेनेतील मानद लेफ्टनंट कर्नल धोनीने त्यांचे आभार मानले.
‘‘एक कलाकार, सैनिक किंवा खेळाडू कौतुकाचीच अपेक्षा करतो. त्याची एवढीच इच्छा असते, की त्याची मेहनत, बलिदानाची आठवण राहावी, तसेच कौतुक व्हावे. पंत्रप्रधान नरेंद्र मोदी जी कौतुक आणि शुभेच्छांसाठी आभार.’’
– MS Dhoni
PM Modi writes a letter to MS Dhoni | धोनी म्हणाला, ‘‘एक कलाकार, सैनिक किंवा खेळाडू कौतुकाचीच अपेक्षा करतो. त्याची एवढीच इच्छा असते, की त्याची मेहनत, बलिदानाची आठवण राहावी, तसेच कौतुक व्हावे. पंत्रप्रधान नरेंद्र मोदी जी कौतुक आणि शुभेच्छांसाठी आभार.’’
आपल्या लांबलचक पत्रात पंतप्रधान मोदींनी धोनीच्या शांत स्वभावाचेही कौतुक केले आहे. ते म्हणाले, ‘‘तुमची हेअरस्टाइल कशी आहे, हे अजिबात महत्त्वाचं नाही. जय-पराजयात तुमचा शांत स्वभाव तरुणांसाठी अधिक महत्त्वाचा आहे.’’
वेगवेगळ्या हेअरकटमुळे धोनी परिचित आहे. सुरुवातीच्या काळात त्याचे मानेवर रुळणारे केस असायचे. या केसांचं तर पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान परवेझ मुशर्रफ यांनीही कौतुक केलं होतं.
त्याची गणना जगातील सर्वोत्तम कर्णधार आणि यष्टिरक्षकांमध्ये करताना मोदी म्हणाले, ‘‘कठीण परिस्थितीत आपण भरवशाचे खेळाडू राहिले आणि सामना जिंकून देण्याचं आपलं कौशल्य लोकांच्या आठवणीत अनेक पिढ्या राहील. विशेषत: २०११ चा विश्वकप स्पर्धेची अंतिम फेरी.’’
मोदींनी लिहिले, ‘‘एका लहान शहरातील साधारण कुटुंबातील असूनही तुम्ही राष्ट्रीय स्तरावर चमकला आणि नावलौकिकाबरोबरच देशाचाही गौरव वाढविला. हे खूप महत्त्वपूर्ण आहे.’’ PM Modi writes a letter to MS Dhoni |
पंतप्रधान म्हणाले, की धोनीचं यश आणि वर्तन कोट्यवधी तरुणांना ताकद आणि प्रेरणा देते. तो मोठ्या शाळेत किंवा महाविद्यालयात शिकलेला नाही किंवा मोठ्या कुटुंबातलाही नाही. मात्र त्याच्यात इतकी प्रतिभा आहे, की सर्वोच्च पातळीवर तो वेगळी ओळख निर्माण करू शकला.’’
धोका पत्करण्याची क्षमता आणि यशस्वी बनविण्यासाठी धोनीचे कौतुक करताना मोदींनी २००७ च्या टी-२० विश्वकपचं उदाहरण दिलं. पाकिस्तानविरुद्ध अंतिम फेरीच्या अखेरच्या षटकात धोनीने नव्या दमाचा मध्यमगती गोलंदाज जोगिंदर शर्माकडे चेंडू सोपवला होता. PM Modi writes a letter to MS Dhoni |
मोदीने सांगितले, ‘‘भारताची ही पिढी धोका पत्करताना आणि एकमेकांच्या क्षमतेवर विश्वास ठेवताना मागेपुढे पाहत नाही. अतिशय कठीण प्रसंगातही! आपण अनेक मोक्याच्या क्षणी धोका पत्करून अशा तरुणांवर विश्वास ठेवला, ज्यांची लोकांना माहितीही नव्हती.’’
ते म्हणाले, ‘‘२००७ च्या टी-२० विश्व कपमधील अंतिम फेरी हे त्याचं उत्तम उदाहरण आहे.’’
मोदींनी सैन्यदलांसाठी धोनीने केलेल्या योगदानाचेही कौतुक केले. धोनीने गेल्या वर्षी क्रिकेटमधून विश्रांती घेत अनेक आठवडे प्रादेशिक सेनेत प्रशिक्षण घेतले.
मोदी म्हणाले, ‘‘सैनिकांमध्ये आपण आनंदी राहत होता. त्यांच्या भल्यासाठी आपला विचार कौतुकास्पद आहे.’’
‘‘मला आठवतंय, एका महत्त्वाच्या क्षणी तुमच्या भवताली विजयाचा जल्लोष सुरू होता आणि आपण आपल्या गोड मुलीसोबत (जीवा) खेळत होता.’’
-PM Narendra Modi
मोदींनी हेही सांगितलं, की व्यावसायिक आणि खासगी आयुष्यात संतुलन राखणे हे धोनीचं वैशिष्ट्य आहे.
ते म्हणाले, ‘‘मला आठवतंय, एका महत्त्वाच्या क्षणी तुमच्या भवताली विजयाचा जल्लोष सुरू होता आणि आपण आपल्या गोड मुलीसोबत (जीवा) खेळत होता.’’
ही घटना २०१८ मधील आहे, ज्या वेळी चेन्नई सुपरकिंग्सने आयपीएलचा किताब जिंकला होता. मोदींनी धोनीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, ‘‘मी अपेक्षा करतो, की साक्षी (धोनीची पत्नी) आणि जीवा यांच्यासोबत तुम्हाला अधिक वेळ मिळेल. त्यांच्या पाठिंब्याशिवाय हे सगळं शक्यच नसतं.’’
One Comment