All SportsCricket

मिशन टी 20 विश्वचषक- भारत 13 वर्षांपासून वंचित

मिशन टी 20 विश्वचषक- भारत 13 वर्षांपासून वंचित

भारतीय संघाला 13 वर्षांपासून टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या विजेतेपदाने हुलकावणी दिली आहे. भारताने 2007 मध्ये पहिलावहिला टी 20 विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर 2014 मध्ये भारताने या स्पर्धेची अंतिम फेरीही गाठली. मात्र, त्या वेळी भारतीय संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. आता पुन्हा एकदा भारतीय संघ 2007 मधील कामगिरीची पुनरावृत्ती करणार का, याचीच उत्सुकता आहे.

विराट, रोहितला संधी

भारताचा रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना टी 20 विश्वचषक स्पर्धेत एक हजार धावांचा टप्पा पार करण्याची संधी आहे. रोहितने आतापर्यंत या वर्ल्ड कपच्या 33 सामन्यांत आठ अर्धशतकांसह 847, तर विराटने 21 सामन्यांत दहा अर्धशतकांसह 845 धावा केल्या आहेत. टी 20 वर्ल्ड कपमध्ये माहेला जयवर्धने हजार (1016) धावांचा टप्पा ओलांडणारा एकमेव फलंदाज आहे. त्यापाठोपाठ ख्रिस गेल 965, तर तिलकरत्ने दिलशानने 997 धावा केल्या आहेत.

विक्रमी षटकार…

[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=8b0ubLO2MUE” column_width=”4″]

टी 20 विश्वचषक स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक षटकारांचा विक्रम युवराजसिंगच्या नावावर आहे. युवराजने 33 षटकार ठोकले आहेत. युवराजला मागे टाकण्यासाठी रोहित शर्माला तीन षटकारांची आवश्यकता आहे. रोहितने 31 षटकार मारले आहेत. या वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडीजच्या ख्रिस गेलने सर्वाधिक 63 षटकार लगावले आहेत.

सर्वोत्तम कामगिरी

पहिल्यावहिल्या 2007 टी 20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली जेतेपद पटकावले होते. ही भारतीय संघाची टी 20 वर्ल्ड कपमधील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. 2014 मध्ये भारताने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. त्या वेळी श्रीलंकेने हरवल्याने, भारतीय संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

  • टी 20 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा-लोकेश राहुल यांनी अफगाणिस्तानविरुद्ध 140 धावांची सलामी दिली होती. भारताकडून टी 20 वर्ल्ड कपमध्ये नोंदली गेलेली ही सर्वोच्च भागीदारी आहे.
  • भारताला दोनदाच टी 20 वर्ल्ड कपमध्ये दोनशेहून अधिक धावा करता आल्या आहेत. भारताने 2007 मध्ये इंग्लंडविरुद्ध 218 आणि 2021 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध 2 बाद 210 धावा केल्या आहेत.
  • भारताची टी 20 वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या. 2007 मध्ये डर्बनला भारताने इंग्लंडविरुद्ध 4 बाद 218 धावा केल्या होत्या.
  • टी 20 वर्ल्ड कपमधील भारताची नीचांकी धावसंख्या. 2016 मध्ये नागपूरला न्यूझीलंडने भारताचा डाव 79 धावांत रोखला होता.
  • टी 20 वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत एकाच भारतीय फलंदाजाला शतक झळकावता आले आहे. 2010 मध्ये सुरेश रैनाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 101 धावांची खेळी केली होती.
  • टी 20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने 38 पैकी 24 सामने जिंकले आहेत.

टी-20 वर्ल्ड कप : हे ऐकलं आहे काय?

  • भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक विकेट मिळवणारा (झेल/यष्टिचीत) यष्टिरक्षक आहे. त्याच्या नावावर यष्टीमागे 32 विकेट आहेत. एबी डिव्हिलियर्सने टी 20 वर्ल्ड कप इतिहासात सर्वाधिक 23 विकेट टिपल्या आहेत.
  • 2007 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत एकमेव बॉलआउटवर निर्णय झाला होता. त्यानंतर एका षटकाचा एलिमिनेटर किंवा सुपर ओव्हर खेळला जात आला आहे.
  • वेस्ट इंडीज संघाने दोनदा (2012, 2016) स्पर्धा जिंकण्यात यश मिळवले आहे.
  • टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक 23 झेल घेण्याचा विक्रम एबी डिव्हिलियर्सच्या नावावर आहे.
  • टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत फक्त ख्रिस गेल याच्या नावावर दोन शतके आहेत. त्याने 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध शतक केले होते.
  • टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारताकडून फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने सर्वाधिक 26 विकेट घेतल्या आहेत.
  • कोणत्याही यजमान देशाने टी 20 वर्ल्ड कप जिंकलेला नाही आणि कोणत्याही गतविजेत्यालाही विश्वचषक जिंकता आलेला नाही.
  • 2007 मध्ये पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा झिम्बाब्वेने पाच विकेटने पराभव केला होता.
  • 2007 मध्ये केनियाविरुद्ध 6 बाद 260 धावा करत सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम श्रीलंकेच्या नावावर आहे.
  • माहेला जयवर्धनेने टी 20 विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक 1016 धावा केल्या आहेत.
  • टी 20 विश्वचषकातील सर्वांत पहिली हॅटट्रिक ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने 2007 मध्ये बांगलादेशविरुद्ध केली होती.
  • बांगलादेशच्या शाकीब अल हसनने टी 20 विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक 41 विकेट घेतल्या आहेत.
  • टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वांत नीचांकी धावसंख्या नेदरलँड्सच्या नावावर आहे. नेंदरलँडने 2014 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 39 धावा केल्या आहेत.

भारताचे सामने

  • 23 ऑक्टोबर 2022 : प्रतिस्पर्धी- पाकिस्तान, ठिकाण- मेलबर्न
  • 27 ऑक्टोबर 2022 : पहिल्या फेरीतून आलेला  संघ, ठिकाण- सिडनी
  • 30 ऑक्टोबर 2022 : प्रतिस्पर्धी- दक्षिण आफ्रिका, ठिकाण- पर्थ
  • 2 नोव्हेंबर 2022 : प्रतिस्पर्धी- बांगलादेश, अ‍ॅडलेड
  • 6 नोव्हेंबर 2022 : पहिल्या फेरीतून आलेला संघ, ठिकाण- मेलबर्न

Who is the first cricketer to score a double century in 100th Test? | शंभराव्या कसोटीत द्विशतक ठोकणारा पहिला क्रिकेटपटू कोण?

[jnews_block_9 first_title=”READ MORE AT:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”65″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!