MS Dhoni

Mahendra Singh Dhoni New IPL Record | धोनीचा आयपीएलमध्ये नवा विक्रम

 

Mahendra Singh Dhoni New IPL Record
धोनीचा आयपीएलमध्ये नवा विक्रम

चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने क्रिकेटच्या मैदानावर अनेक विक्रमांच्या राशी रचल्या आहेत. आता त्याने आयपीएलमध्ये नवा विक्रम रचला आहे. तो म्हणजे सर्वाधिक सामने खेळण्याचा. त्याने सुरेश रैनाला मागे टाकत सर्वाधिक 194 सामने खेळण्याचा विक्रम केला आहे. Mahendra Singh Dhoni New IPL Record

धोनीने 2 ऑक्टोबर 2020 रोजी सनराइझर्स हैदराबादविरुद्ध विक्रमी 194 वा सामना खेळला. त्यामुळे धोनी आता आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा (Most IPL matches) एकमेव खेळाडू बनला आहे. त्याने आपलाच संघसहकारी सुरेश रैनाला मागे टाकले आहे. वैयक्तिक कारणास्तव रैना यंदाची आयपीएल खेळत नाही. त्यामुळे धोनीला हा विक्रम आपल्या नावावर करता आला आहे.
धोनी आयपीएलमधील एकमेव खेळाडू आहे, ज्याने सर्वाधिक 194 सामने खेळले आहेत. Mahendra Singh Dhoni New IPL Record | यंदाच्या आयपीएलच्या मोसमात 200 सामन्यांचा आकडा तो पार करू शकेल. कारण हा आकडा पार करण्यासाठी त्याला फक्त सहा सामन्यांची गरज आहे.
अद्याप आयपीएल लीगमधील 10 सामने बाकी आहेत. सनराइजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यापूर्वी सुरेश रैना आणि महेंद्रसिंह धोनी हे दोन्ही खेळाडू सर्वाधिक सामने खेळणाऱ्यांच्या यादीत संयुक्त अव्वल स्थानावर विराजमान होते. त्या वेळी दोघांचेही 193 सामने होते. मात्र, 2 ऑक्टोबर 2020 रोजी धोनीने रैनाला मागे सारत आता हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
Mahendra Singh Dhoni New IPL Record
सर्वाधिक सामने खेळणारे पाच खेळाडू |  ही आकडेवारी 2 ऑक्टोबर 2020 रोजी सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स सामन्यापर्यंतची आहे.

Dhoni sets record for playing most matches in IPL history

2016 आणि 2017 चा अपवाद सोडला तर धोनी सुरुवातीपासून चेन्नई सुपरकिंग्सकडूनच खेळला आहे. सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम ( Mahendra Singh Dhoni New IPL Record) करतानाच चेन्नईतर्फे त्याचा 164 वा सामना होता.
2016 आणि 2017 मध्ये तो पुणे सुपरजायंट्स संघाकडून खेळला आहे. या दोन सत्रांत त्याने पुण्याकडून 30 सामने खेळले आहेत. 2013 मध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे चेन्नई सुपरकिंग्सला दोन वर्षांच्या बंदीला सामोरे जावे लागले होते.
सर्वाधिक सामने खेळण्याच्या यादीत धोनी आणि रैनानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा क्रमांक लागतो. अर्थात, या यादीत रोहित फार मागे नाही. त्यानेही यंदाच्या लीगमध्ये 192 सामने पार केले आहेत. तोही यंदाच्या मोसमात 200 चा जादूई आकडा पार करू शकेल.
धोनी, रैना, रोहित शर्मा या तीन दिग्गजांशिवाय सर्वाधिक सामने खेळण्याच्या यादीत कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिक (184) याने चौथे स्थान पटकावले आहे. पाचव्या स्थानावर विराट कोहली आणि रॉबिन उथप्पा (180-180 ) संयुक्त पाचव्या स्थानावर आहेत.
[jnews_block_34 first_title=”Read more…” header_text_color=”#dd0000″ header_line_color=”#dd0000″ include_category=”87″]

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!