All Sportsscience

Meta कडून इतिहासातील सर्वांत मोठे OpenAI Model लाँच

गेल्या आठवड्यात फेसबुकची मूळ कंपनी ‘मेटा’ने एआय मॉडेलचा एक नवा संग्रह जारी करून ओपन सोर्स एआयसाठी एक मोठी लढाई लढली.

Meta कडून इतिहासातील सर्वांत मोठे OpenAI मॉडेल लाँच

गेल्या आठवड्यात फेसबुकची मूळ कंपनी Meta ने एआय मॉडेलचा एक नवा संग्रह जारी करून ओपन सोर्स एआय (OpenAI Model)साठी एक मोठी लढाई लढली.

Seyedali Mirjalili

Professor, Director of Centre for Artificial Intelligence Research and Optimisation, Torrens University, Australia 

सिडनी : कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) जगात एक लढाई सुरू आहे. एकीकडे अशा कंपन्या आहेत, ज्या आपल्या अद्ययावत, प्रगत सॉफ्टवेअरमागे डेटासेट आणि अल्गोरिदमला खासगी आणि गोपनीय ठेवण्यावर विश्वास ठेवतात. दुसरीकडे अशाही कंपन्या आहेत, ज्या एआय मॉडेलच्या मागे नेमके काय दडले आहे, हे लोकांना पाहण्याची परवानगी देतात.

या खुल्या आणि बंद स्रोत एआयमध्ये एक लढाई सुरू आहे. गेल्या आठवड्यात फेसबुकची मूळ कंपनी ‘मेटा’ (Meta)ने एआय मॉडेलचा (OpenAI Model) एक नवा संग्रह जारी करून ओपन सोर्स एआयसाठी एक मोठी लढाई लढली. यात ‘लामा 3.1 405बी’ (Llama 3.1 405B) नावाचे एक मॉडेलही आहे. या मॉडेलबाबत मेटाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी मार्क झुकेरबर्ग म्हणतात, “पहिला फ्रंटियर स्तरावरील ओपन सोर्स एआय आहे.”

जो अशा भविष्याची काळजी करतो, ज्यात प्रत्येक एआयच्या लाभापर्यंत पोहोचू शकेल, अशा प्रत्येक व्यक्तीसाठी हे मॉडेल आहे. ही चांगले वर्तमान आहे.

बंद स्रोत एआय (Closed-source AI)चा धोका आणि मुक्त-स्रोत एआय (Open-source AI)ची हमी

meta openai model

बंद स्रोत एआय अशा मॉडेल, डेटासेट आणि अल्गोरिदमला संदर्भित करतो, जे स्वामित्ववाले किंवा मालकी हक्क असलेले असतात. उदाहरणार्थ- चॅट जीपीटी, गुगलचे जेमिनी आणि एंथ्रोपिकचे क्लाउड.

अर्थात, कोणीही या मॉडेलचा उपयोग करू शकतो. मात्र, एआय मॉडेल किंवा टूल बनवण्यासाठी कोणत्या डेटासेट आणि स्रोत कोडचा उपयोग केला आहे हे लक्षात येण्याचा कोणताही मार्ग नाही. या कंपन्यांसाठी आपली बौद्धिक संपदा आणि नफ्याचे संरक्षण करण्याची ही उत्तम पद्धत आहे. मात्र, यामुळे सार्वजनिक विश्वास आणि जबाबदारीला कमी करण्याची जोखीमही आहे.

एआय तंत्रज्ञान क्लोज-सोर्स बनवण्यामुळे नावीन्यता कमी होते आणि कंपन्या किंवा इतर वापरकर्ते त्यांच्या एआय गरजांसाठी एकाच प्लॅटफॉर्मवर अवलंबून असतात.

असं यासाठी, की ज्या प्लॅटफॉर्मवर मॉडेलचा मालक आहे, ते परिवर्तन, परवाना आणि अपडेटला नियंत्रित करतात. एआयची निष्पक्षता, जबाबदारी, पारदर्शकता, गोपनीयता आणि मानवी देखरेख सुधारण्यासाठी अनेक नैतिक चौकटी आहेत.

तथापि, मालकी प्रणालीशी संबंधित पारदर्शकता आणि बाह्य उत्तरदायित्वाच्या अंतर्निहित अभावामुळे बंद-स्रोत एआयसह ही तत्त्वे सहसा पूर्णतः साध्य होत नाहीत.

चॅटजीपीटी (ChatGTP)च्या बाबतीत, त्याची मूळ कंपनी, ओपन एआय (OpenAI), डेटासेट किंवा त्याच्या नवीनतम एआय (AI) टूलचा कोड लोकांसाठी रिलीझ करीत नाही. त्यामुळे नियामकांना त्याचे ऑडिट करणे अशक्य होते. आणि सेवेचा प्रवेश विनामूल्य असताना, वापरकर्त्यांचा डेटा कसा संग्रहित केला जातो आणि मॉडेलला पुन्हा प्रशिक्षित करण्यासाठी वापरला जातो, याबद्दल चिंता कायम आहे.

याउलट, ओपन-सोर्स एआय मॉडेलमागील कोड आणि डेटासेट प्रत्येकाला पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.

हे सामुदायिक सहकार्याद्वारे जलद विकासास प्रोत्साहन देते आणि लहान संस्थांना आणि अगदी व्यक्तींना एआय विकासामध्ये सहभागी होण्यास सक्षम करते. हे लहान आणि मध्यम आकाराच्या उद्योगांसाठीही खूप फरक करते. कारण मोठ्या एआय मॉडेल्सना प्रशिक्षण देण्याची किंमत खूप जास्त आहे.

कदाचित सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, ओपन सोर्स एआय संभाव्य पूर्वाग्रह आणि कमकुवतपणाची चाचणी आणि ओळख करण्यास अनुमती देते. तथापि, मुक्त स्रोत एआय नवीन जोखीम आणि नैतिक चिंता निर्माण करते. उदाहरणार्थ, मुक्त स्रोत उत्पादनांमध्ये सामान्यत: कमी गुणवत्ता नियंत्रण असते.

हॅकर्स कोड आणि डेटामध्येही प्रवेश करू शकतात, मॉडेल सायबर हल्ल्यांसाठी अधिक असुरक्षित असतात आणि ते वाईट हेतूंसाठी तयार केले जाऊ शकतात, जसे की डार्क वेबवरील डेटासह मॉडेल पुन्हा प्रशिक्षित करणे.

एक मुक्त-स्रोत एआय अग्रणी

सर्व प्रमुख एआय कंपन्यांमध्ये, मेटा (Meta) मुक्त-स्रोत एआय (OpenAI Model)ची अग्रणी म्हणून उदयास आली आहे. एआय मॉडेलच्या आपल्या नव्या संचासह तो तेच करीत आहे, जी हमी ओपन एआयने डिसेंबर २०१५ मध्ये लाँच झाल्यानंतर दिली होती. अर्थात, डिजिटल इंटेलिजन्सला अशा पद्धतीने पुढे न्यायला हवे, ज्यामुळे ‘संपूर्ण मानवजातीला लाभ होण्याची सर्वाधिक शक्यता आहे.’  असे त्या वेळी ओपन एआयने (OpenAI) सांगितले होते.

लामा 3.1 405बी (Llama 3.1 405B) हा इतिहासातला सर्वांत मोठा मुक्त स्रोत एआय मॉडेल आहे. त्याला एका मोठ्या भाषा मॉडेलच्या रूपाने ओळखले जात आहे. तो अनेक भाषांमध्ये मानवी भाषेचा मजकूर तयार करण्यास सक्षम आहे. त्याला ऑनलाइन डाउलनोडही केले जाऊ शकते. मात्र, त्याच्या महाकाय आकारामुळे ते चालविण्यासाठी वापरकर्त्याला शक्तिशाली हार्डवेअरची गरज लागेल.

अर्थात, हे सर्व मेट्रिक्समध्ये इतर मॉडेलपेक्षा उत्तम कामगिरी नाही करीत. मात्र, लामा 3.1 405बी (Llama 3.1 405B)ला अत्यधिक प्रतिस्पर्धी मानले जाते आणि हा तर्क आणि कोडिंग कार्यासारखी काही कामे सध्याच्या बंद स्रोत आणि व्यावसायिक मोठ्या भाषा मॉडेलपेक्षा उत्तम कामगिरी करतो.

मात्र, नवीन मॉडेल पूर्णत: मुक्त नाही. कारण मेटा (Meta)ने त्याला प्रशिक्षित करण्यासाठी वापरात आणले जाणारे विशाल डेटासेटला जारी केलेले नाही. हे महत्त्वपूर्ण ‘मुक्त’ तत्त्व आहे, जे वर्तमानात गायब आहे. 

असे असले तरी, संशोधक, लहान संस्था आणि स्टार्टअप्सना मेटाचे लामा (Llama)सारख्याच संधी देतात. कारण मोठ्या भाषेच्या मॉडेल्सना सुरुवातीपासून प्रशिक्षित करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रचंड संसाधनांशिवाय त्याचा फायदा घेता येतो.

एआयच्या भविष्याला आकार देणे

एआय (AI)चे लोकशाहीकरण झाले आहे हे सुनिश्चित करण्यासाठी आम्हाला तीन प्रमुख स्तंभांची आवश्यकता आहे :

  1. सरकार : नियंत्रण आणि नैतिक चौकटीत एआय तंत्रज्ञानाचा विकास आणि वापर जबाबदारीने आणि नैतिकतेने करणे निश्चित करावे लागेल.
  2. प्रवेशयोग्यता : विकसक आणि वापरकर्त्यांसाठी योग्य चित्र स्पष्ट करण्यासाठी परवडणारी संगणकीय संसाधने आणि वापरकर्तास्नेही साधने.
  3. मोकळेपणा: एआय टूल्स प्रशिक्षित करण्यासाठी आणि तयार करण्यासाठी वापरलेले डेटासेट आणि अल्गोरिदम पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी मुक्त स्रोत असावेत.

हे तीन स्तंभ साध्य करणे ही सरकार, उद्योग, शिक्षण आणि जनता यांची संयुक्त जबाबदारी आहे. नैतिक धोरणांची वकिली करून, एआय (AI) घडामोडींची माहिती देऊन, एआय (AI)चा जबाबदारीने वापर करून आणि मुक्त-स्रोत एआय (AI) उपक्रमांना पाठिंबा देऊन जनता एआयमध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

मात्र, मक्त स्रोत एआयबाबत अनेक प्रश्न आहेत. बौद्धिक संपदेचे संरक्षण करणे आणि ओपन-सोर्स एआयद्वारे नवकल्पना वाढवणे यात संतुलन कसे साधता येईल? ओपन-सोर्स एआयबद्दलच्या नैतिक चिंता आपण कशा कमी करू शकतो? संभाव्य गैरवापरापासून आम्ही मुक्त-स्रोत एआयचे संरक्षण कसे करू शकतो?

या प्रश्नांचे योग्य समाधान केल्यास आपल्याला असे भविष्य बनविण्यास मदत मिळेल, जेथे एआय सर्वांसाठी एक समावेशक उपकरण होऊ शकेल. 

आम्ही आव्हानाचा सामना करू आणि एआय मोठ्या हितासाठी कार्य करते, याची खात्री करू का? किंवा आम्ही ते बहिष्कार आणि नियंत्रणाचे आणखी एक वाईट साधन बनू देऊ? भविष्य आपल्याच हातात आहे.

गाझा भूमीवर हल्ले करण्यासाठी इस्रायल वापरतेय एआय?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!