नूट्रोपिक्स (Nootropics) म्हणजे काय, ते खरोखर तुम्हाला स्मार्ट बनवतात का?

नूट्रोपिक्स (Nootropics) म्हणजे काय, ते खरोखर तुम्हाला स्मार्ट बनवतात का?
जादूई औषधे नसतीलही, पण आता आपल्याकडे ‘नूट्रोपिक्स’ (Nootropics) आहे. यालाच स्मार्ट ड्रग्स, मेंदू बूस्टर किंवा संज्ञानात्मक क्षमतावर्धक म्हणूनही ओळखले जाते.
- Nenad Naumovski/Amanda Bulman/Andrew McKune
- University of Canberra
कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया) : माणसाला स्मार्ट बनायचंय. म्हणजे प्रचंड हुशार व्हायचंय. लक्ष आणि स्मरणशक्ती सुधारायचीय. त्यासाठी मनुष्य दीर्घकाळापासून एक ‘जादुई अमृत’ शोधत आहे. असं म्हणतात, की हजारो वर्षांपूर्वी संज्ञानात्मक कार्य सुधारण्यासाठी एक चिनी औषध वापरलं जायचं. ‘जादूई अमृत’ शोधण्याच्या लालसेत माणूस या चिनी औषधाच्याही शोधात आहे. ही औषधे अस्तित्वात आहेत की नाहीत माहीत नाही; पण आता आपल्याकडे ‘नूट्रोपिक्स’ (Nootropics) आहे. यालाच स्मार्ट ड्रग्स, मेंदू बूस्टर किंवा संज्ञानात्मक क्षमतावर्धक म्हणूनही ओळखले जाते.
तुम्ही या गमीज, च्युइंगम, गोळ्या आणि त्वचा पॅच ऑनलाइन किंवा सुपरमार्केट, फार्मसी किंवा पेट्रोल स्टेशनवरून खरेदी करू शकता. त्यासाठी तुम्हाला प्रिस्क्रिप्शन किंवा आरोग्य व्यावसायिकांशी सल्लामसलत करण्याची अजिबात गरज नाही. पण प्रश्न हे आहेत, की नूट्रोपिक्स (Nootropics) खरोखर तुमच्या मेंदूला चालना देतात का? इथं विज्ञान काय सांगतं?
नूट्रोपिक्स (Nootropics) म्हणजे काय? ते कसे काम करते?
‘नूट्रोपिक्स’ (Nootropics) हा शब्द सत्तरच्या दशकात पहिल्यांदा वापरण्यात आला. रोमानियन मानसशास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञ कॉर्नेलियस ई. ज्युर्गिया (Cornelius E. Giurgea) यांनी 1970 च्या दशकाच्या सुरुवातीला स्मरणशक्ती आणि शिक्षणाला चालना देणाऱ्या संयुगांचे वर्णन करण्यासाठी ‘नूट्रोपिक्स’ (Nootropics) हा शब्द तयार केला. हा शब्द ग्रीक भाषेतील नोस (nos विचार) आणि ट्रोपिन (tropein- गाइड) या शब्दांपासून आला आहे.
‘नूट्रोपिक्स’ मेंदूतील चेतापेशींमधील सिग्नल्सचे प्रसारण सुधारून, तंत्रिका चेतापेशींचे आरोग्य राखून आणि ऊर्जा उत्पादनात मदत करून कार्य करू शकतात. काही ‘नूट्रोपिक्स’मध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात आणि ते मुक्त रॅडिकल्सच्या संचयामुळे मेंदूतील चेतापेशींना होणारे नुकसान कमी करू शकतात. मात्र, ते किती सुरक्षित आणि परिणामकारक आहेत? चला तर आपण सर्वांत जास्त वापरल्या जाणाऱ्या चार ‘नूट्रोपिक्स’वर एक नजर टाकूया.
1. कॅफीन (Caffeine)
तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण कॅफीन (Caffeine)एक ‘नूट्रोपिक’ आहे. आपल्यापैकी बहुतांश लोकांच्या दिवसाची सुरुवात कॉफीपासून होते, यात आश्चर्य वाटण्याचं काहीही कारण नाही. ते आपल्या तंत्रिका तंत्राला उत्तेजित करतात. कॅफीन (Caffeine) वेगाने रक्तामध्ये शोषले जाते आणि जवळजवळ सर्व मानवी ऊतींमध्ये वितरित केले जाते. यात मेंदूचाही समावेश होतो जिथे ते आपली सतर्कता, प्रतिक्रिया वेळ आणि मनोवस्था वाढवते आणि आपल्याला अधिक ऊर्जावान झाल्यासारखं वाटतं. कॅफीनचे हे परिणाम साधायचे असतील, तर तुम्हाला एकाच डोसमध्ये 32-300 मिलिग्रॅम सेवन करावे लागेल. हे अंदाजे दोन ‘एस्प्रेसो’च्या (espressos) समतुल्य आहे (300 मिलिग्रॅम डोससाठी).
दुर्दैवाने, खूप जास्त कॅफीनमुळे चिंतेसारखी लक्षणे आणि पॅनिक अॅटॅक (भीतीचे झटके), झोपेचा त्रास, स्मृतिभ्रंश, आतड्यांचा त्रास आणि हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात! त्यामुळे प्रौढांना एका दिवसात 400 मिलिग्रॅमपेक्षा अधिक कॅफीन न पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण ते तीन एस्प्रेसो (espressos)च्या समतुल्य आहे.
Read More… Flat White Coffee स्वस्त आहे का?
2. एल-थेनाइन (L-theanine)
एल-थेनाइन (L-theanine) हे पूरक, च्युइंगम किंवा पेय म्हणून येते. ग्रीन टीमध्ये हे सर्वांत सामान्य अमिनो ॲसिड (amino acid)देखील आहे. पूरक म्हणून एल-थेनाइन (L-theanine)चे सेवन केल्याने मेंदूतील अल्फा लहरींचे उत्पादन वाढू शकते. ही वाढ सतर्कता आणि शांततेच्या जाणिवेशी जोडलेली आहे. तथापि, संज्ञानात्मक कार्यप्रणालीवर त्याचा परिणाम अद्याप अस्पष्ट आहे. वेगवेगळे अभ्यास आणि वेगवेगळ्या लोकसंख्येमध्ये, एका डोसची अनेक आठवड्यांतील दैनिक डोसशी तुलना करून भिन्न परिणाम दर्शवतात. मात्र, एका अध्ययनात पूरक म्हणून कॅफीनसोबत एल-थेनाइन घेतल्याने संज्ञानात्मक कामगिरी आणि सतर्कतेत सुधारणा झाल्याचे आढळले आहे.
एल-थेनाइन (L-theanine) (97 मिलिग्रॅम) आणि कॅफीन (40 मिलिग्रॅम) सेवन करणारे तरुण व प्रौढ एकाच डोसनंतरच्या कार्यांमध्ये अधिक अचूकपणे स्विच करू शकतात आणि त्यांनी सांगितले, की ते अधिक सतर्क आहेत. वरील अभ्यासाप्रमाणेच कॅफीनसह एल-थेनाइन घेत असलेल्या लोकांच्या आणखी एका अभ्यासात अनेक संज्ञानात्मक परिणामांमध्ये सुधारणा आढळून आल्या, ज्यात विचलनास कमी संवेदनशील असण्याचा समावेश आहे.
शुद्ध एल-थेनाइन (L-theanine)चे चांगल्या परिणामांसाठी ओळखले जात असले तरी ते दीर्घकाळापर्यंत कार्य करते की सुरक्षित आहे हे दर्शविण्यासाठी अजूनही तुलनेने कमी मानवी चाचण्या आहेत. इष्टतम डोसचे परीक्षण करणारे मोठे आणि दीर्घ अभ्यासदेखील आवश्यक आहेत.
3. अश्वगंधा (Ashwaghanda)
अश्वगंधा (Ashwaghanda) हा वनस्पतीचा अर्क आहे, जो सामान्यतः भारतीय आयुर्वेदिक औषधांमध्ये स्मृती आणि संज्ञानात्मक कार्य सुधारण्यासाठी वापरला जातो. एका अभ्यासात, 30 दिवस दररोज 225-400 मिलिग्रॅम घेतल्याने निरोगी पुरुषांमध्ये संज्ञानात्मक कार्यक्षमता सुधारते. संज्ञानात्मक लवचिकता (कार्ये बदलण्याची क्षमता), दृश्य स्मृती अथवा व्हिज्युअल मेमरी (प्रतिमा आठवणे), प्रतिक्रिया वेळ (उत्तेजनावर प्रतिक्रिया) आणि कार्यकारी कामकाज (नियम आणि श्रेणी ओळखणे आणि जलद निर्णय घेणे) यामध्ये लक्षणीय सुधारणा झाल्या आहेत.
सौम्य संज्ञानात्मक कमजोरी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये असेच परिणाम होतात. मात्र, आपण अश्वगंधा (Ashwaghanda)सप्लिमेंट्स वापरून केलेल्या अभ्यासाच्या परिणामांबद्दल सावध असले पाहिजे; अभ्यास तुलनेने लहान आहेत आणि केवळ अल्प कालावधीसाठी सहभागींवर उपचार करतात.
4. क्रिएटिन (Creatine)
क्रिएटिन (Creatine)हे एक सेंद्रिय संयुग आहे, जे शरीरात ऊर्जा निर्माण करण्यात गुंतलेले आहे आणि ते क्रीडापूरक म्हणून वापरले जाते. मात्र, त्याचे संज्ञानात्मक परिणामदेखील आहेत. उपलब्ध पुराव्यांच्या पुनरावलोकनात, 66 ते 76 वयोगटांतील निरोगी प्रौढ, ज्यांनी क्रिएटिन (Creatine)पूरक आहार घेतला, त्यांच्या अल्पकालीन स्मरणशक्तीत सुधारणा झाल्या. दीर्घकालीन पूरक आहारदेखील फायदेशीर ठरू शकतो. एका अभ्यासानुसार, कोविडनंतर थकव्याने ग्रस्त असलेल्या लोकांनी सहा महिन्यांपर्यंत दररोज 4 ग्रॅम क्रिएटिन (Creatine) घेतले आणि त्यांनी नोंदवले, की आता आम्ही उत्तम ध्यान केंद्रित करू शकतो आणि थकवाही कमी झाला.
क्रिएटिन (Creatine) मेंदूची जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह ताण (oxidative stress) कमी करू शकते, संज्ञानात्मक कार्यक्षमता सुधारते आणि थकवा कमी करते. क्रिएटिन (Creatine) सप्लीमेंट्सचे दुष्परिणाम अभ्यासात क्वचितच नोंदवले गेले आहेत. मात्र, यामध्ये वजन वाढणे, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल (gastrointestinal) व्यत्यय आणि यकृत आणि मूत्रपिंडातील बदल यांचा समावेश होतो.
आता कुठे जावे?
कॅफीन (Caffeine) आणि क्रिएटिन (Creatine)च्या मेंदूला चालना देणाऱ्या परिणामांचे पुरावे चांगले आहेत. मात्र, इतर बहुतांश ‘नूट्रोपिक्स’ची परिणामकारकता, इष्टतम डोस आणि सुरक्षितता यावर ज्यूरी अद्याप ठाम नाहीत. त्यामुळे जोपर्यंत आपल्याकडे अधिक पुरावे येत नाहीत, तोपर्यंत नूट्रोपिक्स घेण्यापूर्वी आपल्या आरोग्य व्यावसायिकांचा सल्ला घ्या. मात्र, रोज कॉफी प्याल्याने फारसे नुकसान होण्याची शक्यता नाही. देवाचे आभार, कारण आपल्यापैकी काहींसाठी ते एक ‘जादुई अमृत’ आहे.
Visit us
- Facebook page : @kheliyad
- Instagram : @kheliyad
- X : @kheliyad
- Linkedin : @MaheshPathade03
- Youtube Channel : Team Kheliyad
- WhatsApp Channel: kheliyad
- email : kheliyad.sports@gmail.com