All Sportsscience

तुमचा मेंदू एडीएचडीने प्रभावित आहे का?

तुमचा मेंदू एडीएचडीने प्रभावित आहे का? जर असेल तर वेळीच सावध व्हा; अन्यथा स्मृतिभ्रंश, कामात लक्ष न लागणे अशा विकारांना सामोरे जावे लागू शकते. यावर सुरू असलेल्या संशोधनातून काही निष्कर्ष समोर आले आहेत.

तुमचा मेंदू एडीएचडीने प्रभावित आहे का?

तुमचा मेंदू एडीएचडीने प्रभावित आहे का? जर असेल तर वेळीच सावध व्हा; अन्यथा स्मृतिभ्रंश, कामात लक्ष न लागणे अशा विकारांना सामोरे जावे लागू शकते. यावर सुरू असलेल्या संशोधनातून काही निष्कर्ष समोर आले आहेत.

Kate Harrington

Lecturer of Clinical Pathophysiology and Family Nurse Practitioner, Kennesaw State University

‘मला खूप गोंधळ वाटत आहे’, ‘मला काम पूर्ण का नाही करता येत?’, ‘मी वेळेचे भान का नाही ठेवत?’, ‘मी लक्ष का नाही देऊ शकत?’ ही सगळी लक्षणे कमी लक्ष/अतिसक्रियता विकार किंवा एडीएचडीने प्रभावित लोक स्वत:ला रोज किंवा दर तासाला विचारू शकतात.
प्राथमिक काळजी घेताना मी एक कौटुंबिक नर्स प्रॅक्टिशनर म्हणून एडीएचडीच्या अनेक आजारांचे निदान व उपचार केले आहेत. मी स्वत: वयाच्या 21 व्या वर्षी हा आजार अनुभवला होता. एडीएचडीने प्रभावित झालेल्या मेंदूमध्ये वायरिंग कसे बदलते आणि कार्य कसे सुधारावे हे समजून घेणे, त्यांच्या मेंदूच्या वैशिष्ट्यामुळे संघर्ष करीत असलेल्यांना मदत करण्यासाठी महत्त्वाचे आहे.

या शोधात एडीएचडीने प्रभावित मेंदूच्या कार्य करण्याच्या पद्धतीत बराच फरक असल्याची ओळख पटली आहे. सोप्या शब्दांत सांगायचे, तर एडीएचडी कार्यप्रणालीला प्रभावित करतो. कार्यकारी कार्यप्रणाली संज्ञानात्मक प्रक्रियांचा एक एसा समूह आहे, ज्यात नियोजन, प्राधान्य, आवेग नियंत्रण, लवचिकता, वेळेचे व्यवस्थापन आणि भावनात्मक नियमनाचा समावेश आहे. ते लोकांना दीर्घाकालीन लक्ष्य मिळवून देण्यात मदत करतात. या प्रक्रिया मेंदूच्या प्रीफंटल कॉर्टेक्स (prefrontal cortex) या ‘व्यक्तिमत्त्व केंद्रात’ असते.

प्रीफ्रंटल कॉर्टेक्सशिवाय एडीएचडी मेंदूच्या इतर क्षेत्रांनाही प्रभावित करतो. यात बेसल गँग्लिया (basal ganglia), सेरिबॅलम (cerebellum) यांचा समावेश आहे. बेसल गँग्लिया म्हणजे मेंदूच्या आतील संचारावर नियंत्रण ठेवणारे क्षेत्र, तर सेरिबॅलम म्हणजे गती आणि संतुलनास जबाबदार असलेले क्षेत्र. या सर्व एकत्रित लक्ष, कार्यकारी कार्य मोटर हालचाली आणि आवेग नियंत्रणाला नियंत्रित करतात. न्यूरोट्रान्समीटर (neurotransmitters) नावाचे रासायनिक संदेशवाहक मेंदूच्या पेशींना एकमेकांशी संवाद साधण्यास परवानगी देतात. डोपामाइन (Dopamine) आणि नोरेपिनेफ्राइन (Norepinephrine) हे दोन मुख्य न्यूरोट्रान्समीटर आहेत, जे मेंदूच्या कार्यकारी कामकाजात महत्त्वाची भूमिका निभावतात.

डोपामाइन (Dopamine) प्रेरणा, उत्साह आणि आनंदाला नियंत्रित करतो. खाणे, पिणे, लैंगिक संबंध ठेवणे आणि पुष्टी किंवा चांगले ग्रेड प्राप्त करणे यांसारख्या आनंददायक गोष्टींमधून आपल्याला डोपामाइनचा पूर येतो. हा पूर आपल्याला ‘पुरस्कृत’ वर्तनाला पुन्हा करण्यासाठीही प्रेरित करतो. नोरेपिनेफ्राइन (Norepinephrine) लक्ष केंद्रित करण्यास जबाबदार आहे आणि कार्यकारी कामकाजात मदत करतो.

एडीएचडी असणाऱ्या लोकांच्या मेंदूच्या क्षेत्रांत आणि डोपामाइन (Dopamine) आणि नोरेपिनेफ्राइन (Norepinephrine)चा स्तर कमी होतो. यात प्रीफ्रंटल कॉर्टेक्सचाही समावेश आहे. यात लक्ष, आवेग नियंत्रण आणि प्रेरणासारख्या संज्ञानात्मक कार्यांना केंद्रित ठेवणे कठीण होते.

अभ्यासांती असे लक्षात येते, की एडीएचडी असणाऱ्या लोकांमध्ये मेंदूत ट्रान्स्पोर्टर जास्त असतात. ट्रान्स्पोर्टरला व्हॅक्यूमच्या रूपाने विचार केला, तर डोपामाइनला न्यूरॉनमध्ये परत खेचतो. त्यामुळे तो कमी उपलब्ध होतो. संशोधकांनी कमीत कमी २७ संभाव्य आनुवंशिक मार्करची ओळख पटवली आहे, जो मेंदूत डोपामाइनला नियंत्रित करतो.

एडीएचडीचा उपचार

एडीएचडीने प्रभावित किंवा विनाप्रभावित प्रत्येक व्यक्तीत विसरण्याचा अथवा स्मृतिभ्रंशाच्या आजारासारखी काही लक्षणे आढळतात. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही एका क्षणासाठीही मीटिंगमध्ये बसणे सहण करू शकत नाही किंवा तुम्हाला लक्षात नाही, की आपण एखाद्या खोलीत का आलो आहोत? जर तुम्ही एडीएचडीशी संघर्ष करीत असाल तर तुमच्यात बेसावधपणा, अतिसक्रियतेची श्रेणीत कमीत कमी पाच ते सहा लक्षणे असतील. जसे विसरण्याची सवय, स्थिर बसण्यात अडचणी, सामान विसरणे आणि सहजपणे विचलित होणे.

औपचारिक निदानासाठी, ADHD लक्षणे वयाच्या 12 वर्षापूर्वी उपस्थित असणे आवश्यक आहे, जे बालपणात किंवा माझ्या बाबतीत, खूप नंतर आढळू शकते. याशिवाय एडीएचडीचे लक्षण असलेल्या व्यक्तीला अनेक स्थितीत नकारात्मकतेने प्रभावित करतात. जसे घरात, शाळेत किंवा कामावर आणि त्यांना इतर स्थितीत, जसे थायरॉइड डिसफंक्शन, मधुमेह, कमी निद्रा किंवा ॲनिमियातून समजावले जाऊ शकत नाही.

संशोधनातून असे लक्षात येते, की एडीएचडीने पीडित मुलींमध्ये हमखास एडीएचडीशी संबंधित वैशिष्ट्यांसोबत लक्ष विचलित होण्याचे लक्षण आढळते. रुग्ण, विशेषत: महिला आणि मुलींमध्ये एडीएचडीचे उपचार न केल्याने नैराश्य किंवा चिंता किंवा दोन्हीही विकसित होण्याचा धोका आहे. एकदा एडीएचडीचा उपचार झाल्यावर चिंता आणि नैराश्याचे लक्षण बरंच कमी होतं.

एडीएचडी असणाऱ्या लोकांमध्ये एडीएचडीने पीडित न होणाऱ्या लोकांच्या तुलनेत आत्महत्येचे प्रयत्न दुप्पट असतात. त्यांच्यात आत्महत्येचे विचार येण्याचा दर तिप्पट आणि आत्महत्या करण्याचा दर सहा पट अधिक होतो.
अमेरिकन ॲकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स मुले आणि किशोरवयीनांमध्ये एडीएचडीच्या उपचारासाठी पुराव्यांच्या आधारावर मार्गदर्शक तत्त्वे देतात. 2024 च्या शरद ऋतूमध्ये प्रौढ एडीएचडीच्या उपचारांसाठी प्रथम यूएस मार्गदर्शक तत्त्वे जाहीर होण्याची अपेक्षा आहे. मुलांशी संबंधित सकारात्मक पालनपोषणासंबंधी शोधात आढळले आहे, की जेव्हा आईवडील सकारात्मक पालकत्व शिक्षणात भाग घेतात, तेव्हा आईवडील आणि मुलांच्या जीवनाच्या गुणवत्तेत उल्लेखनीय सुधारणा होते. औषधांसोबत मिळणारे परिणामही अधिक स्पष्ट होतात.

पूरक आहार

अनेक अभ्यासांतून असे लक्षात येते, की एडीएचडी पीडित मुलांच्या रक्तप्रवाहा ‘व्हिटामिन डी’चा स्तर कमी असतो. शोधातून असे लक्षात येते, की फेरिटिनचा कमी स्तर डोपामाइन हालचालींमध्ये अडथळा निर्माण करतो. कमी स्तर असणाऱ्या मुलांमध्ये एडीएचडीचा उपचार होण्याची शक्यता अधिक असते. जर तुम्हाला वाटत असेल, की तुमची मुले किंवा तुम्हाला एडीएचडी होऊ शकतो, तर एडीएचडी उपचार माहिती असणारे किंवा अशी आरोग्यसेवा देणाऱ्यांशी चर्चा करा. शोध अजूनही सुरूच आहे. मात्र, प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांच्या अतिसेवनामुळे एडीएचडीची लक्षणे आणखी वाईट होऊ शकतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!