Kolkata vs Rajasthan Highlights | कोलकात्याने असा साकारला विजय

Kolkata vs Rajasthan Highlights | कोलकात्याने असा साकारला विजय
इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) बाराव्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) राजस्थान रॉयल्सविरुद्ध 37 धावांनी दणदणीत विजय मिळवला. केकेआरने पहिल्यांदा फलंदाजी करताना 6 बाद 174 अशी आव्हानात्मक धावसंख्या रचली. Kolkata vs Rajasthan Highlights |
प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सचा डाव 20 षटकांत 9 बाद 137 धावांत आटोपला. आयपीएलमध्ये केकेआरचा हा दुसरा विजय आहे, तर राजस्थानचा पहिला पराभव.
Kolkata vs Rajasthan Highlights | राजस्थानच्या टॉम करनची फलंदाजी धडाक्यात होती. त्याने 36 चेंडूंत 54 धावांची खेळी रचली खरी, पण संघाला विजय मिळवून देण्याइतपत ती पुरेशी ठरली नाही.
कर्णधार स्टीव स्मिथ अपयशी Kolkata vs Rajasthan Highlights |
राजस्थानचा कर्णधार स्टीव स्मिथ सलामीचा हुकमी फलंदाज. IPL 2020 LIVE SCORE | सुरुवात दणक्यात करण्याची त्याची हातोटी केकेआरविरुद्ध निष्प्रभ ठरली. अवघ्या तीन धावांवर असताना पॅट कमिन्सने त्याची शिकार केली. स्मिथने त्याचा चेंडू टोलवण्याच्या प्रयत्नात तो दिनेश कार्तिककडे झेल देऊन बाद झाला.
12 धावांत चार फलंदाज तंबूत Kolkata vs Rajasthan Highlights |
रिकी पाँटिंगने ज्याचं वारेमाप कौतुक केलं, त्या संजू सॅमसनने या वेळी निराशा केली. कोलकात्याच्या शिवम मावीने त्याला 8 धावांवर सुनील नरिनकरवी झेलबाद केले.
खंदे फलंदाज बाद झाल्याने राजस्थानच्या हातातून सामना निसटत गेला. याच शिवमने जोस बटलरलाही (16 चेंडूंत 21) बाद केले. Kolkata vs Rajasthan Highlights |
त्यानंतर कमलेश नागरकोटीने रॉबिन उथप्पा (2) आणि रियान पराग (1) याला एकाच षटकात तंबूत धाडले. त्या वेळी राजस्थानची 4 बाद 42 अशी केविलवाणी अवस्था झाली होती. IPL 2020 LIVE Score |
राहुल तेवतियाची जादूही निष्प्रभ IPL 2020, RR vs KKR Highlights |
शिवम मावी आणि नागरकोटीने खंदे फलंदाज तंबूत धाडून कोलकात्याच्या विजयाच्या मार्गातले अडथळे दूर केले. पाठोपाठ लेग स्पिनर वरुण चक्रवर्तीनेही इतर फलंदाजांचा समाचार घेतला. RR vs KKR highlights | त्याच्या फिरकीने राहुल तेवतिया (14) आणि जोफ्रा आर्चर (6) यांना विलगीकरण कक्षात पाठवले.
इथेच राजस्थानची पॉवर गेली होती. सामना जिंकण्याचे मनसुबे आता राहिले नव्हते. राहिलं फक्त पराभवाचं अंतर कमी करणं एवढंच. RR vs KKR, IPL 2020 result |
नाही म्हंटलं, तरी टॉम करन एका बाजूने किल्ला लढवत होता. त्याने 36 चेंडूंत 2 चौकार आणि तीन षटकारांची आतषबाजी करीत 54 धावांची खेळी साकारली. मात्र, त्याच्या एकट्याच्या जिवावर संघ जिंकणं शक्यच नव्हतं. IPL 2020 LIVE Score |
ताशी 152 किमी वेगाचा जोफ्राचा स्पर्धेतला सर्वांत वेगवान चेंडू
राजस्थानच्या जोफ्रा आर्चरची गोलंदाजी कमाल होती. त्याच्या गोलंदाजीची धार इतकी भयंकर होती, की राजस्थानचे फलंदाज त्याच्यापुढे अक्षरशः चाचपडत होते. Jofra Archer pace |
त्याच्यामुळेच कोलकात्याला 6 बाद 174 धावांवर रोखता आले. आर्चरची सामन्यातील पहिलं षटक आक्रमक होतं. शुभमन गिल विकेट वाचवतच जोफ्राचा सामना करीत होता.
पहिल्या षटकात जोफ्राने फक्त एकच धाव दिली. त्याने 18 धावांवर दोन गडी बाद केले. त्याने ताशी 152.1 च्या वेगाने यंदाच्या लीगमधील सर्वांत वेगवान चेंडू टाकला.
जोफ्रामुळे शुभमन व कार्तिक तंबूत RR vs KKR LIVE Cricket Score |
कोलकात्याचा सलामीचा फलंदाज शुभमन गिल सध्या चांगलाच फॉर्मात आहे. आर्चरनेच शुभमनला (34 चेंडूंत 47) आणि कर्णधार दिनेश कार्तिक (1) बाद केले.
जोफ्राच्या गोलंदाजीची धार पाहता राजस्थानचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय योग्य होता, हे एव्हाना अनेकांना वाटलं होतं. गिल याचं अर्धशतक अवघ्या तीन धावांनी हुकलं. अन्यथा हे त्याचं सलग दुसरं अर्धशतक असतं.
मात्र, आर्चरने बाराव्या षटकात त्याचे मनसुबे उधळून लावले. आर्चरने त्याच्या पुढच्याच षटकात अप्रतिम इनस्विंगवर कार्तिकचाही अडसर दूर केला. जोस बटलरकडे झेल देऊन कार्तिक तंबूत परतला.
रसेल-मोर्गनची धुव्वाधार खेळी
रसेल आक्रमक फलंदाज. मात्र, तोही फार काळ टिकला नाही. त्याने सुरुवात तर दणक्यात केली होती. सलग तीन षटकार खेचत त्याने राजस्थानच्या गोटात खळबळ उडवून दिली होती. मात्र 14 चेंडूंत 24 धावा करून तोही तंबूत परतला. Kolkata vs Rajasthan Highlights |
त्याला अंकित राजपूतच्या गोलंदाजीवर रसेलने मारलेला चेंडू जयदेव उनाडकटच्या हातांत विसावला. केकेआरने 33 धावांत चार फलंदाज गमावले. मुळात केकेआरने या वेळी एक अतिरिक्त गोलंदाज खेळवला.
त्यामुळे धावांची सगळी जबाबदारी इयान मॉर्गनवर येऊन पडली. मॉर्गनला तुम्ही ओळखतच असाल. त्याच्याच नेतृत्वाखाली इंग्लंडने विश्वकरंडक जिंकला आहे. मॉर्गनने 23 चेंडूंत नाबाद 34 धावांची खेळी साकारली. Kolkata vs Rajasthan Highlights |
12 वा सामना | दुबई |
30 सप्टेंबर 2020 |
|
|
कोलकाता नाइट रायडर्स |
राजस्थान रॉयल्स |
कोलकाता नाइट रायडर्स | ||||
फलंदाज | धावा | चेंडू | 4 | 6 |
शुभमन गिल झे. व गो. आर्चर | 47 | 34 | 5 | 1 |
एसपी नरिन त्रि. उनाडकट | 15 | 14 | 2 | 1 |
एन. राणा झे. पराग गो. तेवतिया | 22 | 17 | 2 | 1 |
अँड्र्यू रसेल झे. उनाडकट गो. राजपूत | 24 | 14 | 0 | 3 |
दिनेश कार्तिक झे. बटलर गो. आर्चर | 1 | 3 | 0 | 0 |
इयॉन मॉर्गन नाबाद | 34 | 23 | 1 | 2 |
पॅट कमिन्स झे. सॅमसन गो. करन | 12 | 10 | 1 | 0 |
केएल नागरकोटी नाबाद | 8 | 5 | 1 | 0 |
अवांतर 11 |
एकूण 20 षटकांत 6 बाद 174 |
गोलंदाज | षटके | निर्धाव | धावा | विकेट |
जोफ्रा आर्चर | 4 | 0 | 18 | 2 |
अंकित राजपूत | 4 | 0 | 39 | 1 |
जयदेव उनाटकट | 2 | 0 | 14 | 1 |
टॉम करन | 4 | 0 | 37 | 1 |
श्रेयस गोपाल | 4 | 0 | 43 | 0 |
रियान पराग | 4 | 0 | 43 | 0 |
राहुल तेवतिया | 1 | 0 | 6 | 1 |
फलंदाज | धावा | चेंडू | 4 | 6 |
जोस बटलर झे. वरुण गो. शिवम मावी | 21 | 16 | 1 | 2 |
स्टीव स्मिथ झे. कार्तिक गो. कमिन्स | 3 | 7 | 0 | 0 |
संजू सॅमसन गो. नरिन गो. शिवम मावी | 8 | 9 | 1 | 0 |
रॉबिन उथप्पा झे. शिवम गो. नागरकोटी | 2 | 7 | 0 | 0 |
रियान पराग झे. शुभमन गो. नागरकोटी | 1 | 6 | 0 | 0 |
राहुल तेवतिया त्रि. वरुण | 14 | 10 | 0 | 1 |
टॉम करन नाबाद | 54 | 36 | 2 | 3 |
श्रेयस गोपाल झे. कार्तिक गो. नरिन | 5 | 7 | 0 | 0 |
जोफ्रा आर्चर झे. नागरकोटी गो. वरुण | 6 | 4 | 0 | 1 |
उनाडकट झे. नागरकोटी गो. यादव | 9 | 13 | 0 | 0 |
अंकित राजपूत नाबाद | 7 | 5 | 0 | 1 |
अवांतर 7 |
एकूण 20 षटकांत 9 बाद 137 |
गोलंदाजी | षटके | निर्धाव | धावा | विकेट |
एसपी नरिन | 4 | 0 | 40 | 1 |
पॅट कमिन्स | 3 | 0 | 13 | 1 |
शिवम मावी | 4 | 0 | 20 | 2 |
कमलेश नागरकोटी | 2 | 0 | 13 | 2 |
वरुण चक्रवर्ती | 4 | 0 | 25 | 2 |
कुलदीप यादव | 3 | 0 | 20 | 1 |