केकेआरचा कर्णधार मॉर्गनला दंड
केकेआरचा कर्णधार मॉर्गनला दंड
कोलकाता नाइट रायडर्सचा (KKR) कर्णधार इयॉन मॉर्गनला (Eoin Morgan) १२ लाखांचा दंड झाला आहे. चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध (CSK) इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सामन्यात षटकांची गती न राखल्याने त्याला 12 लाखांचा भुर्दंड बसला आहे. KKR captain Morgan fined |
फाफ डुप्लेसिसच्या नाबाद 95 धावा आणि दीपक चहरने केकेआरचे चार गडी टिपले. या दोघांच्या योगदानामुळे सीएसकेने बुधवारी, २१ एप्रिल २०२१ रोजी केकेआरवर 18 धावांनी विजय मिळवला होता. तत्पूर्वी सीएसकेने तीन बाद २२० धावांचा डोंगर रचला होता. मात्र, ही धावसंख्या केकेआरच्या आवाक्याबाहेर गेली. केकेआर 202 धावांत गारद झाला.
Why Morgan was fined?
KKR captain Morgan fined | या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सला धावांची गती राखता आली नाही. आयपीएल आचारसंहितेनुसार केकेआरच्या कर्णधारावर दंडात्मक कारवाईची या मोसमातली ही पहिलीच घटना आहे. आयपीएलच्या नियमांनुसार षटकांची गती न राखल्यास कर्णधाराला 12 लाखांचा दंड करण्यात येतो.
मॉर्गनची ढासळती कामगिरी चिंताजनक
कोलकाता नाइट रायडर्सचा (KKR) कर्णधार इयॉन मॉर्गन (Eoin Morgan) याची कामगिरी यंदाच्या आयपीएलच्या सुरुवातीपासूनच ढासळली आहे. अर्थात, असा एखादा बॅडपॅच खेळाडूच्या वाट्याला येतच असतो. त्यामुळे तूर्तास मॉर्गनला चिंता भेडसावत नसेलही.. कारण त्याला हेही माहीत आहे, की कोणत्याही क्षणी एखादी मोठी धावसंख्या उभारण्याची संधी मिळेल. मॉर्गन केकेआरचाच नाही, तर विश्वविजेत्या इंग्लंडचाही कर्णधार आहे. त्याने आतापर्यंत झालेल्या आयपीएलच्या चार सामन्यांत दोन, सात, 29 आणि सात धावा केल्या आहेत. त्याची ही कामगिरी नक्कीच त्याच्या लौकिकास साजेशी नाही. याचा फटका केकेआरला बसू शकतो.
चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 18 धावांनी पराभवाचा सामना केल्यानंतर मॉर्गन म्हणाला होता, की हा एका प्रक्रियेचा भाग आहे. आम्ही ज्याप्रमाणे पुढे जात आहे, ते नक्कीच सकारात्मक आहे. मी दीर्घकाळापासून इथे आहे आणि उत्तम सरावही केला आहे. लवकरच मोठी धावसंख्या उभारण्याची आशा आहे.
चेन्नईने केकेआरविरुद्ध तीन बाद 220 धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआर डाव 202 धावांत संपुष्टात आला. मॉर्गनच्या संघाने पॉवर प्ले दरम्यान 31 धावांवर पाच विकेट गमावल्या होत्या.
मॉर्गन म्हणाला, की आमच्याकडे तळातही चांगले फलंदाज आहे. त्यामुळे आमचा संघ मजबूत आहे. संघात मधली व तळातल्या फळीत उत्तम अनुभवी फलंदाज आहेत आणि याची प्रचीती सीएसकेविरुद्ध (CSK) आम्ही पाहिली आहे. आंद्रे रसेल, पॅट कमिन्स आणि दिनेश कार्तिकच्या सुरेख फलंदाजीमुळे केकेआर 200 पेक्षा अधिक धावा करू शकला. मात्र, लक्ष्य गाठण्यात ते अपयशी ठरले.
[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”64,62″]