सनग्लासेस (SUNGLASSES) खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा…
सनग्लासेस (SUNGLASSES) खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा…
आजकाल तुम्हाला सुपरमार्केट आणि पेट्रोलपंपांपासून जनरल स्टोअर्स आणि ऑनलाइन फॅशन रिटेलर्सपर्यंत स्वस्तात सनग्लासेस (SUNGLASSES) मिळू शकतात. मात्र, ही सनग्लासेस उन्हापासून डोळ्यांचे संरक्षण करू शकतात का, याची माहिती कुणालाच नसते.
- By Jacobo Garcia Queiruga/Veronica Noya Padin
- The University of Santiago de Compostela
गॅलिसिया (स्पेन) : आजकाल तुम्हाला सुपरमार्केट आणि पेट्रोलपंपांपासून जनरल स्टोअर्स आणि ऑनलाइन फॅशन रिटेलर्सपर्यंत स्वस्तात सनग्लासेस (SUNGLASSES) मिळू शकतात. मात्र, ही सनग्लासेस उन्हापासून डोळ्यांचे संरक्षण करू शकतात का, याची माहिती कुणालाच नसते. किंबहुना हे सनग्लासेस अर्थात गॉगल उन्हापासून संरक्षण करतात, अशीच धारणा प्रत्येकाची असते.
अशा प्रकारचे चष्म्यांमध्ये असलेली लेन्स साधरणपणे यूव्ही (Ultraviolet) किरणांपासून तेवढ्या सक्षमतेने संरक्षण करताना दिसत नाही. इतर बाबतीतही त्यांची गुणवत्ता निराशाजनकच असते.
‘ऑप्टिशियन’ला (चष्मा बनविणारा) राष्ट्रीय आरोग्य नियमांचे पालन करावे लागते. म्हणजे चष्मा बनविताना त्यांच्यासाठी उच्च मानकांची पूर्तता करणे अपरिहार्य आहे. याचा अर्थ असा आहे, की व्यावसायिक ऑप्टिशियन ग्राहकांना सनग्लासेस निवडण्यास अधिक चांगल्या प्रकारे मदत करू शकतात, जे केवळ त्यांच्या व्यावहारिक गरजा पूर्ण करीत नाहीत, तर आरामदायक आणि त्यांच्या चेहऱ्याच्या वैशिष्ट्यांना अनुरूपदेखील आहेत.
सुरक्षेचे नियम
- युरोपीय कायदा सनग्लासेस लेन्सचे वर्गीकरण ‘वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे’ म्हणून करतो, ज्याने संरक्षणाच्या पाच स्तरांची पूर्तता करणे आवश्यक आहे.
- श्रेणी ‘शून्य’ लेन्स 80-100 टक्के प्रकाश चष्म्यांमधून जाऊ देतात, तर श्रेणी चारचे लेन्स केवळ तीन ते आठ टक्के प्रकाश चष्म्यांमधून जाऊ देतात, म्हणजे ते वाहन चालवताना परिधान करण्यासाठी योग्य नाहीत.
- श्रेणी तीनचा सर्वाधिक उपयोग केला जातो. कारण ते ड्रायव्हिंगसह बऱ्याच परिस्थितीसाठी योग्य आहेत.
मग गडद रंगाचे लेन्स तुमची उत्तम सुरक्षा करू शकतात का? त्याचं थोडक्यात उत्तर आहे- असं अजिबात नाही.
प्रकाश शोषण्याची डिग्री ते कसे आणि कुठे वापरले जातील, यावर अवलंबून असते : श्रेणी चार लेन्स उंच पर्वत किंवा वाळवंटासारख्या अत्यंत प्रकाशित क्षेत्रासाठी डिझाइन केले आहेत. मात्र, वास्तविकपणे इतर परिस्थितीत त्यांचा उपयोग केल्यास तुमची दृश्यमानता कमी होऊ शकते.
असे असले तरी, स्थापित मानकांची पूर्तता करणारे सर्व सनग्लासेस तुमच्या डोळ्यांचे अतिनील किरणांपासून संरक्षण करतील.
दृश्यमानता की गुणवत्ता?
सनग्लासेस घातल्याने तुम्हाला असे जाणवते, की पाहण्यास त्रास का होत आहे? त्याचे कारण असे आहे, की लेन्स निवडकपणे प्रकाश फिल्टर करतात. ते एक प्रकारे रेडिएशन (विकिरण) आत येऊ देतात आणि इतरांना प्रवेश मर्यादित करतात.
रंग किती महत्त्वाचा असतो?
आपल्याला लेन्सच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवतानाच त्याच्या रंगाकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. चष्म्याच्या लेन्सचा रंग उन्हापासून मिळणाऱ्या सुरक्षेला प्रभावित करीत नाही. मात्र, त्याचा परिणाम डोळ्यांच्या तेजावर होतो. कारण प्रत्येक रंग प्रकाशाची वेगळी तरंगलांबी फिल्टर करतो.
प्लास्टिक की काचेची लेन्स?
केवळ रंगच दृश्यमानतेच्या दर्जाच्या गुणवत्तेला प्रभावित करीत नाही. लेन्स कशापासून बनली आहे याकडेही आपल्याला लक्ष द्यावे लागेल. जरी हे सहसा वैशिष्ट्यपूर्ण प्लास्टिकचे बनलेले असले तरी, आपण काचेच्या लेन्सदेखील वापरू शकता. प्लास्टिकचे लेन्स हलके आणि मजबूत असतात. याउलट काचेची लेन्सवर स्क्रॅचेस पडण्याची शक्यता कमी असते आणि काचेचा रंगही लवकर खराब होत नाही. म्हणजे काचेची लेन्स उत्तम दृश्यमानता प्रदान करते.
पोलराइज्ड लेन्स (polarised lenses) म्हणजे काय?
‘पोलराइज्ड लेन्स’ (polarised lenses) रस्ते किंवा पाण्यासारख्या पृष्ठभागावरून परावर्तित झाल्यानंतर एका विशिष्ट कोनात डोळ्यापर्यंत पोहोचणारा प्रकाश रोखतात. त्यामुळे चमक कमी होते. ते विशेषत्वाने त्या काळासाठी उपयुक्त असतात जेव्हा तुम्हा ड्रायव्हिंग करीत असाल किंवा पाण्याच्या जवळपास असाल.
Read more….चवीला कशी असते रोमन वाइन?
इतर वैशिष्ट्ये
सनग्लासेस निवडताना डिझाइनशी संबंधित वैशिष्ट्यांकडे दुर्लक्ष करू शकत नाही. चष्मा निवडताना तुम्हाला काही शंका असल्यास, तुमच्या गरजेनुसार सर्वांत योग्य सनग्लासेस शोधण्यासाठी तुमच्या ऑप्टिशियन किंवा ऑप्टोमेट्रिस्टशी संवाद साधणे हा सर्वोत्तम सल्ला आहे.
Visit us
- Facebook page : @kheliyad
- Instagram : @kheliyad
- X : @kheliyad
- Linkedin : @MaheshPathade03
- Youtube Channel : Team Kheliyad
- WhatsApp Channel: kheliyad
- email : kheliyad.sports@gmail.com
Hey people!!!!!
Good mood and good luck to everyone!!!!!