Jeswin Aldrin ची Long Jump ठरली हनुमान उडी!
- जेस्विन अल्ड्रिन (Jeswin Aldrin) याची लांब उडीत ((Long Jump)) 8.42 मीटर कामगिरी
- 2022 मध्ये फेडरेशन कपमध्ये श्रीशंकरने केलेला 8.36 मीटरचा विक्रम मोडीत
- टोकियो ऑलिम्पिक विजेत्यापेक्षा राष्ट्रीय विक्रम सरस
तमिळनाडूच्या जेस्विन अल्ड्रिन (Jeswin Aldrin) याने राष्ट्रीय लांब उडी (Long Jump) स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम केला. त्याने गुरुवारी, 2 मार्च 2023 रोजी ही विक्रमी कामगिरी केली. त्याने पुरुषांच्या लांब उडीत 8.42 मीटर कामगिरी नोंदवली.
त्याची ही कामगिरी टोकियो ऑलिम्पिकमधील; तसेच जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेतील विजेत्यापेक्षा सरस आहे. 21 वर्षीय जेस्विन याने तिसऱ्या प्रयत्नात 8.42 मीटर अंतरावर लांब उडी मारली.
त्याने ही कामगिरी करताना एम. श्रीशंकरने गेल्या वर्षीच्या फेडरेशन कपमध्ये केलेला 8.36 मीटर कामगिरीचा विक्रम मोडला. जेस्विनची कामगिरी टोकियो ऑलिम्पिक; तसेच जागतिक विजेत्यांपेक्षा सरस आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये ग्रीसच्या मिल्तादिस तेंतोग्लु याने सुवर्णपदक जिंकले होते. त्या वेळी त्याने 8.41 मीटर उडी घेतली होती. एवढेच नव्हे तर गेल्या वर्षीच्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत चीनच्या जिआनान वँग याने 8.36 मीटर या कामगिरीसह बाजी मारली होती. त्या स्पर्धेत मुरली श्रीशंकर सातवा होता.
ऑलिम्पिकसाठी पात्र
जेस्विनने (Jeswin Aldrin) गेल्याच महिन्यात आशियाई इनडोअर स्पर्धेत (Long Jump) 7.97 मीटर कामगिरीसह रौप्य पदक जिंकले होते. त्याने काही महिन्यांपूर्वी कोझीकोडे स्पर्धेत 8.37 मीटर कामगिरी केली होती; पण त्या वेळी वाऱ्याची साथ असल्याचे सांगत विक्रम नाकारण्यात आला होता. गुरुवारच्या कामगिरीमुळे तो जागतिक स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा; तसेच ऑलिम्पिकसाठीही पात्र ठरला आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारे याने उंच उडीत 2.24 मीटर कामगिरी करीत स्पर्धा विक्रम केला.
मुंबईच्या शर्वरी परुळेकर हिने दुसऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत गुरुवारी तिहेरी उडीमध्ये ब्राँझ पदक जिंकले.
शर्वरीने 12.30 मीटर उडी घेतली. या स्पर्धेत केरळच्या गायत्री सुकुमारने 12.98 मीटर अशी कामगिरी करून स्पर्धा विक्रमासह बाजी मारली.
या ऑलिम्पिकमध्ये विजेत्याला देण्यात आले होते खऱ्या सोन्याचे पदक
[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ header_filter_category=”1485″]