Cricket

जेम्स अँडरसनचा बळींचा विक्रम

Your Content Goes Here

जेम्स अँडरसनचा बळींचा विक्रम

इंग्लंडच्या जेम्स अँडरसनने James Anderson | पाकिस्तानविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यातील पाचव्या दिवशी 25 ऑगस्ट 2020 रोजी 600 विकेटचा टप्पा पूर्ण केला. | James Anderson record | तो विश्वातला पहिला वेगवान गोलंदाज आहे, ज्याने 600 विकेटचा पल्ला गाठला.

पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यात 62 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर अँडरसनने पाकिस्तानच्या अजहर अलीला कर्णधार जो रूटकरवी झेलबाद केले. अजहरने 114 चेंडूंमध्ये 2 चौकारांसह 31 धावा केल्या.

James Anderson record | इंग्लंडने आठ बाद 583 धावांवर आपला पहिला डाव घोषित केला होता. प्रत्युत्तरात पाकिस्तानची फलंदाजी फारशी चमक दाखवू शकली नाही. त्यांनी दुसऱ्या डावात 273 धावा केल्या.

कसोटी क्रिकेटमध्ये ६०० विकेट घेणाऱ्या वेगवान गोलंदाजांमध्ये इंग्लंडच्या जेम्स अँडरसनने James Anderson | पहिले स्थान मिळवले आहे. यापूर्वी गोलंदाजीत ७०० च्या क्लबमध्ये आतापर्यंत दोनच गोलंदाज पोहोचले आहेत.

ते म्हणजे श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन आणि ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न. आता त्या दिशेने जेम्स अँडरसननेही पाऊल टाकले आहे.

सर्वाधिक विकेट घेणारे पहिले दोन खेळाडू फिरकी गोलंदाज आहेत. अँडरसनने 25 ऑगस्ट 2020 रोजी पाकिस्तान क्रिकेट संघाचा अजहर अली याची सहाशेवी विकेट घेतली. James Anderson record | त्याने आता सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चौथे स्थान मिळविले आहे.

james anderson record

वेगवान गोलंदाजांमध्ये अव्वल | James Anderson record |

सर्वाधिक ८०० विकेट घेत मुरलीधरन पहिल्या स्थानावर, शेन वॉर्न (७०८) दुसऱ्या, तर अनिल कुंबले (६१९) तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र वेगवान गोलंदाजांचा विचार केला, तर अँडरसन अव्वल आहे.

अँडरसननंतर ग्लेन मॅकग्रथ (५६३ विकेट), कर्टनी वॉल्श (५१९) आणि अँडरसनचाच सहकारी स्टुअर्ट ब्रॉड (५१४) यांचा क्रमांक लागतो. या सर्व गोलंदाजांना पाचशेपेक्षा अधिक विकेट घेतल्या आहेत. डेल स्टेन (४३९), कपिलदेव (४३४4), रिचर्ड हॅडली (४३१), शॉन पोलॉक (४२१), वसीम अक्रम (४१४) आणि कर्टली अँब्रोस (४०५) यांचाही सर्वाधिक विकेट घेणाऱ्या दहा वेगवान गोलंदाजांमध्ये समावेश होतो.

सामना बरोबरीत सुटल्यानंतर ३८ वर्षीय गोलंदाज अँडरसनने आपले इरादे स्पष्ट केले.

‘ईएसपीएनक्रिकइन्फो’शी अँडरसन म्हणाला, ‘‘मी याबाबत जो रूटशी बोललो आहे. त्याने सांगितले, की तुला ऑस्ट्रेलियात (२०२१ मधील अॅशेस मालिका) मला पाहायचे आहे. मला असं कोणतंही कारण दिसत नाही, की मी संघात का नसेन? मी नेहमीप्रमाणेच माझ्या फिटनेसवर मेहनत घेत आलो आहे. मी माझ्या खेळावर प्रचंड मेहनत घेत आहे.’’

‘‘मी यंदाच्या उकाड्यामुळे लौकिकास साजेशी गोलंदाजी करू शकलो नाही. मात्र, या कसोटीमुळे मला आता जाणवलं, की मी या संघात चांगले योगदान देऊ शकतो. जोपर्यंत ही जाणीव होते, तोपर्यंत मी खेळत राहीन. मला नाही वाटत, की इंग्लंडचा क्रिकेटपटू म्हणून मी माझी अखेरची कसोटी जिंकली आहे. का मी ७०० बळींपर्यंत पोहोचू शकत नाही? का नाही?’’
जेम्स अँडरसन

अँडरसनने तिसऱ्या कसोटी सामन्यात २९ व्या डावात पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेतल्या आहेत. वेगवान गोलंदाजांमध्ये फक्त रिचर्ड हॅडलीच अँडरसनच्या पुढे आहेत.

अँडरसन म्हणाला, की माझी गडी बाद करण्याची भूक अद्याप कमी झालेली नाही. मी अजूनही खेळत आहे.

तो म्हणाला, ‘‘आता कसोटी चॅम्पियनशिप सुरू आहे. आता आम्हाला कसोटी मालिका खेळायची आहे आणि जिंकायचीही आहे.’’

आपल्या ६०० विकेटबाबत अँडरसन म्हणाला, ‘‘मी जेव्हा पहिला कसोटी सामना (२००३) खेळलो, तेव्हा हा विचार कधीच केला नव्हता, की मी कधी ६०० विकेटच्या जवळही पोहोचेन.’’

भारतीय खेळाडूंकडून कौतुक

भारताचा माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे आणि सौरव गांगुली यांनी जेम्स अँडरसनचे कौतुक केले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ६०० विकेट घेणारा तो पहिलाच वेगवान गोलंदाज आहे. कुंबळे यांनी ट्विट केले, ‘‘अभिनंदन जिम्मी, ६०० विकेटबद्दल!. महान वेगवान गोलंदाजाचा सुंदर प्रयत्न. क्लबमध्ये तुझे स्वागत.’’

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही ट्वीटवर अँडरसनचे कौतुक केले.

गांगुली म्हणाले, ‘‘जेम्स अँडरसन शानदार! ही कामगिरी फक्त महानता आहे. १५६ कसोटी सामन्यांत वेगवान गोलंदाजाच्या रूपाने खेळण्याचा विचारही करता येणार नाही. सर्व तरुण गोलंदाजांना तुम्ही विश्वास दिला, की महानता मिळवता येते.’’

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही अँडरसनचे कौतुक केले. त्याने ट्वीट केले, की ‘‘अभिनंदन जिम्मी, ६०० विकेटच्या शानदार कामगिरीबद्दल. मी आतापर्यंत ज्या वेगवान गोलंदाजांचा सामना केला आहे, त्यापैकी निश्चितच सर्वश्रेष्ठ गोलंदाजांपैकी एक आहे.’’


[table id=28 /] [table id=29 /]
[jnews_block_18 first_title=”Read more” header_text_color=”#dd0000″ header_line_color=”#dd0000″ include_tag=”541,517,363,323,318″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!