इंडोनेशियाने या स्पर्धांतून घेतली माघार
इंडोनेशियाने या स्पर्धांतून घेतली माघार
जाकार्ता : करोना महामारीने जगभरात चिंता व्यक्त होत असून, खेळाडूही आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे. Indonesia withdraws badminton tournaments |
याच कारणामुळे इंडोनेशियाने सर्वांत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या थॉमस आणि उबेर कप बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. Indonesia withdraws badminton tournaments |
या स्पर्धांतून माघार घेणारा इंडोनेशिया हा पाचवा देश आहे. या दोन्ही स्पर्धा डेन्मार्कमधील से आरहस येथे तीन मे ते 11 ऑक्टोबरदरम्यान होणार आहेत. Indonesia withdraws badminton tournaments |
इंडोनेशियन बॅडमिंटन अधिकाऱ्यांनी 12 सप्टेंबर 2020 रोजी सांगितले, की या स्पर्धांमध्ये खेळाडूंना करोनाची बाधा होऊ शकते, याची आम्हाला अधिक चिंता आहे.
या स्पर्धा खेळण्यासाठी प्रत्येकाची इच्छा आहे. कारण या दोन्ही प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये खेळण्याची नामी संधी खेळाडूंना मिळते. मात्र, करोना महामारीची सद्य:स्थिती पाहिली तर इंडोनेशियाच नव्हे, तर इतर देशांतील खेळाडूंमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे. ’’
इंडोनेशियाने हेही स्पष्ट केले, की आमचा एकही खेळाडू डेन्मार्क ओपन आणि डेन्मार्क मास्टर्स स्पर्धा खेळणार नाही. या स्पर्धाही ऑक्टोबरमध्येच होणार आहेत. Indonesia withdraws badminton tournaments |
थॉमस आणि उबेर कप स्पर्धेतून आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, तैवान, थायलंड आणि दक्षिण कोरिया या देशांनी माघार घेतली आहे. इंडोनेशियात आतापर्यंत 2 लाख 14 हजार 746 जणांना करोनाची लागण झाली आहे, तर ८,६५० जणांचा मृत्यू झाला आहे.
तुलनेने डेन्मार्कमध्ये करोनाचे रुग्ण कमी आहेत. या देशात 19,216 जणांना करोनाची बाधा झाली आहे, तर ६२० जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरात करोनाचे 2 कोटी 86 लाख 92 हजार 285 रुग्ण असून, 9 लाख 20 हजार 461 रुग्णांना जीव गमवावा लागला आहे.
Follow us
[jnews_footer_social social_icon=”circle”]