All SportsFootballSports Historysports news

इंडोनेशिया- फुटबॉल स्पर्धेत मृत्यू सामना

इंडोनेशिया- फुटबॉल स्पर्धेत मृत्यू सामना

इंडोनेशियातील जावा येथे 2 ऑक्टोबर 2022 रोजी एका फुटबॉल सामन्यानंतर हिंसाचार आणि चेंगराचेंगरीत सुमारे 174 प्रेक्षकांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण क्रीडाविश्व सुन्न झाले. या घटनेत तब्बल 180 पेक्षा अधिक प्रेक्षक जखमी झाले. असं म्हणतात, की आपल्या आवडत्या संघाचा पराभव चाहत्यांच्या जिव्हारी लागला. त्यानंतर बेफाम झालेल्या चाहत्यांनी स्टेडियममध्ये घुसून संताप व्यक्त केला. नियंत्रणाबाहेर गेलेल्या प्रेक्षकांना आवरण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा मारा करावा लागला. मात्र, त्यानंतर जी चेंगराचेंगरी झाली, त्याने पावणेदोनशेवर प्रेक्षकांना जीव गमवावा लागला. मत्युमुखींंची संख्या नंतर 125 असल्याचे सांगण्यात आले. मात्र, क्रीडाविश्वातील हा काळा दिवस ठरला. जगातील सर्वांत वाईट घटना म्हणून अनेकांनी दुःख व्यक्त केले.

कुठे घडली घटना?

इंडोनेशिया देशातील ईस्ट जावा प्रांतात मलंग येथील कंजुराहन (Kanjurahan) स्टेडियममध्ये 2 ऑक्टोबर 2022 रोजी अरेमा एफसी आणि पर्सेबाया सुरबाया या दोन संघांमध्ये फुटबॉल सामना सुरू होता. या सामन्यात अरेमा एफसी संघ 2-3 असा पिछाडीवर पडला. पराभव समोर दिसताच अरेमा संघाचे चाहते मैदानात घुसण्याचा प्रयत्न करू लागले. इंडोनेशियाच्या ईस्ट जावा प्रांताचे पोलिसप्रमुख निको अफिंटा यांनी सांगितले, की अरेमा एफसी संघ पराभूत होत असल्याचे दिसताच चाहते बेकाबू झाले. ते फुटबॉल मैदानात घुसण्याचा प्रयत्न करू लागले. या वेळी स्टेडियममध्ये हाणामारी सुरू झाली. प्रेक्षक सैरावैरा पळू लागले. निव्वळ 34 मृत्यू स्टेडियममध्येच झाले, तर उर्वरित प्रेक्षकांनी रुग्णालयात प्राण सोडले. मृत्युमुखींमध्ये दोन जण पोलिस कर्मचारी आहेत.

[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=_fJ9GY8vqSA” column_width=”4″]

मृतांमध्ये 17 मुलेही

इंडोनेशिया शनिवारच्या दुर्घटनेतून अद्याप सावरलेले नाही. या दुर्घटनेतील मृतांत 17 मुलांचाही समावेश आहे. याशिवाय सात मुलांवर उपचारही सुरू आहेत. दरम्यान, रुग्णालयातील अनेक जण अजूनही डोळे चुरचुरत असल्याची तक्रार करीत होते.

काय पाहिलं?

  • सामन्यानंतर अरेमा संघाच्या काही चाहते स्थानिक संघाच्या खेळाडूंविरुद्ध घोषणा देत मैदानात उतरले. पोलिसांनी त्यांना रोखलं आणि त्यांना फटके दिले.
  • त्यानंतर आणखी काही प्रेक्षक खेळाडूंविरुद्ध मैदानात उतरले आणि संपूर्ण स्टेडियम तणावाचे केंद्रबिंदू झाले. हळूहळू पोलिसांची संख्या वाढली. ते शील्ड आणि श्वान पथकासह आले. त्यांनी अश्रुधुरांचा मारा सुरू केला.
  • गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी एकामागोमाग अश्रुधुरांचा मारा सुरू केल्याने प्रेक्षक आणखी बेकाबू झाले.
  • प्रेक्षक स्टेडियमच्या बाहेर जाण्यासाठी प्रयत्न करू लागल्याने गर्दी सैरभैर झाली. त्यांचा श्वास कोंडला होता. मैदानावर लहान मुले, ज्येष्ठ नागरिक होते. अश्रुधुरांमुळे त्यांना श्वास घेणे अवघड झाले होते.

चेंगराचेंगरीची पाच कारणे

  1. कंजुरुहान स्टेडियममध्ये या सामन्यासाठी 42,000 तिकिटांची विक्री झाली होती. मात्र, स्टेडियमची क्षमता आहे, 38,000. म्हणजे क्षमतेपेक्षा अधिक प्रेक्षकसंख्या.
  2. अरेमा एफसी आणि पर्सेबाया सुरबाया या दोन संघांत नेहमीच कडव्या लढती. दोन्ही संघांचे चाहते या सामन्यावेळी प्रचंड आक्रमक असतात.
  3. अरेमा एफसीच्या पराभवाचे कारण स्पष्ट न केल्याने चाहत्यांमध्ये संताप
  4. चाहते मैदानात घुसल्यानंतर पोलिसांनी लाठीमार सुरू केला, नंतर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या
  5. अश्रुधुराच्या वापरामुळे चाहते अधिक संतप्त, तर लहान मुले, ज्येष्ठांचे श्वास कोंडले. त्यामुळे गर्दी आणखी नियंत्रणाबाहेर गेली.

पोलिस काय म्हणतात…?

  • दुर्घटना झालेल्या स्टेडियमवरील १४ पैकी सहा दरवाजे खूपच लहान
  • एका ठिकाणी सलग चार दरवाजे आणि तेच मुख्य प्रवेशद्वार
  • लहान सहा दरवाजानजिक मृतांची संख्या अधिक
  • सहा दरवाजे बंद नव्हते; पण त्यातून एकावेळी दोघेच बाहेर पडू शकत होते.
  • एकावेळी शंभर जणांनी बाहेर जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे जास्त चेंगराचेंगरी

अ‍ॅम्नेस्टी आणि फिफाची काय आहे भूमिका?

अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडोनेशिया संघटनेचे कार्यकारी निदेशक उस्मान हामीद यांनी देशातील चेंगराचेंगरी, मृत्यू यामुळे दुःख व्यक्त केले. ते म्हणाले, “अश्रुधूर आणि तत्सम धोकादायक अस्त्रांचा वापर करण्याबाबत आता समीक्षा व्हायला हवी, अशी आम्ही पोलिसांना विनंती करतो. त्यामुळे अशी घटना पुन्हा होणार नाही.” फ़ुटबॉलची शिखर संघटना फिफाने म्हंटले आहे, की एखाद्या सामन्यात बेकाबू गर्दीवर नियंत्रणासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर करायला नको होता. फिफाचे अध्यक्ष गियानी इन्फँटिनो यांनी सांगितले, “हा फुटबॉलविश्वातील काळा दिवस आहे. ही घटना समजण्याच्या पलीकडे आहे. या घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या प्रेक्षकांच्या परिवाराप्रती मी संवेदना व्यक्त करतो.”

चेंगराचेंगरीनंतर इंडोनेशियाने काय पावले उचलली?

इंडोनेशियातील फ़ुटबॉल संघटनेने (पीएसएसआय) 2 ऑक्टोबर 2022 रोजी रात्री उशिरा आपली भूमिका स्पष्ट केली. या घटनेवर त्यांनी दुःख व्यक्त केले. या घटनेची चौकशी करण्यासाठी आम्ही एक समिती मलंग येथे पाठवली आहे, असे या संघटनेने म्हंटले आहे. चेंगराचेंगरीत मृत्यू झाल्याने इंडोनेशिया फुटबॉल खेळाची छबी धुळीस मिळाल्याचे सांगत संघटनेने खेद व्यक्त केला आहे. संघटना पुढे म्हणते, ”कंजुराहन स्टेडियममधील अरेमा संघाच्या समर्थकांनी जे केले त्याचा पीएसएसआयला खेद आहे. मृत्युमुखी पडलेल्यांच्या परिवाराची आम्ही माफी मागतो. पीएसएसआयने तत्काळ या घटनेची चौकशी करण्यासाठी एक समिती नियुक्त केली असून, ती मलंग येथे रवाना झाली आहे.” या घटनेनंतर अरेमा एफसी संघाला या मोसमासाठी निलंबित करण्यात आले आहे. इंडोनेशियाचे मुख्य सुरक्षामंत्र्याने सांगितले, की स्टेडियममध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रेक्षक उपस्थित होते. क्षमतेपेक्षा जवळपास 4,000 वर प्रेक्षक होते. इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत इंडोनेशियातील सर्वोच्च फ़ुटबॉल लीगचे (बीआरआय लीगा 1 ) सर्व सामने रद्द केल्याचे विडोडो यांनी म्हंटले आहे. ‘देशातला ही अखेरची घटना असेल’, असा विश्वासही विडोडो यांनी या वेळी दिला.

अरेमा एफसी – पर्सेबाया सुरबाया संघात विळा-भोपळ्याचं नातं

इंडोनेशिया देशात फ़ुटबॉल सामन्यादरम्यान हिंसा, मृत्यू होणे ही नवी घटना नाही. अरेमा एफसी आणि पर्सेबाया सुरबाया दीर्घकाळापासून कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. या दोन्ही संघांतून विस्तवही जात नाही. या दोन संघांच्या सामन्यात चाहतेही कमालीचे आक्रमक असतात.

चेंगराचेंगरीस पोलिस जबाबदार असल्याचा आरोप

इंडोनेशिया देशातील फुटबॉल लीग स्पर्धेतील चेंगराचेंगरीमुळे 125 मृत्यू झाल्यानंतर आता या घटनेची समीक्षा सुरू झाली आहे. अनेकांनी या दुर्घटनेस पोलिसांना जबाबदार धरले आहे. स्पर्धास्थळी नसले तरी अनेकांनी हा सामना पाहताना पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. चिलीचे प्रशिक्षक स्पॅनिश माध्यमांशी बोलताना सांगितले, की पोलिसांनी मर्यादा ओलांडल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचे म्हंटले आहे.

पूर्व जावाचे पोलिसप्रमुख निको अफिन्टा यांनी अश्रुधुराच्या वापराचे समर्थन केले. त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की, “चाहत्यांनी पोलिसांवर हल्ला करणे, अराजकतेने वागणे आणि वाहने जाळणे सुरू केले. त्यामुळे नाइलाजाने अश्रुधुराचा वापर करावा लागला.”

मात्र बचावलेल्या प्रेक्षकांनी सांगितले, की संपूर्ण स्टेडियम खचाखच भरलेले होते. प्रेक्षक कमालीचे भेदरलेले होते. अशा वेळी अश्रुधुराचा वापर झाल्यानंतर गर्दी नियंत्रणाबाहेर गेली.

अश्रुधुराचा मारा झाल्याने गर्दीचा लोंढा बाहेर जाण्यासाठी धावत सुटला. प्रत्येक जण एकमेकांना ढकलत होता. यात अनेकांनी जीव गमवावा लागला, असे डोनी नावाच्या एका 43 वर्षीय प्रेक्षकाने सांगितले.

पोलिसांच्या बचावात्मक भूमिकेच खंडन करीत एक महिला प्रेक्षक म्हणाली, “मैदानावर कोणतीही हिंसात्मक घटना घडत नव्हती, दंगलही झाली नव्हती. मला माहीत नाही त्यांना (पोलिसांना) नेमकी काय अडचण होती. त्यांनी अचानक अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, त्याचाच मला धक्का बसला. त्यांनी मुलांचा, महिलांचा विचार का नाही केला?”

22 वर्षीय सॅम गिलांग हा तरुण बोलण्याच्याही मनःस्थितीत नव्हता. कारण त्याने या चेंगराचेंगरीत तीन मित्र गमावले. तो फक्त एवढेच म्हणाला, “हे खूप भयंकर आणि धक्कादायक होते.”

तो म्हणाला, “लोक एकमेकांना ढकलत होते आणि… बाहेर पडण्यासाठी अनेकांना पायदळी तुडवले गेले. अश्रुधुरामुळे माझे डोळे जळजळत होते. मी सुदैवाने कुंपणावर चढण्यात यशस्वी झालो आणि वाचलो.”

रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले, की या घटनेत पाच वर्षांचा बालक जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

दंगाप्रतिबंधक शील्ड धारण केलेले आणि लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर लोक संताप व्यक्त करतानाचे व्हिडीओ फूटेज सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत.

जळालेली पोलिस वाहने आणि कचरा स्टेडियमवर इतस्ततः पसरलेला होता. सुमारे तीन हजारावर प्रेक्षक मैदानात घुसल्याचे पोलिसांनी सांगितले.

इंडोनेशियामध्ये चाहत्यांकडून होणारी हिंसा नेहमीचीच झाली आहे. कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने आल्यानंतर हा संघर्ष प्राणघातक हल्ल्यात परावर्तित झाल्याचे अनेकदा घडले आहे.

हिंसाचाराच्या भीतीनेच पर्सेबाया सुराबाया संघाच्या चाहत्यांना सामन्याची तिकिटे खरेदी करण्यास परवानगी दिली नव्हती.

इंडोनेशियाचे राजकीय, कायदेशीर आणि सुरक्षा प्रकरणांचे समन्वयक मंत्री महफूद एमडी म्हणाले, की आयोजकांनी कमी तिकिटे छापण्याच्या आणि सायंकाळऐवजी दुपारी सामना आयोजित करण्याच्या शिफारशीकडे दुर्लक्ष केले.

इंडोनेशिया देशातील फुटबॉल सामन्यात मृत्यू झालेल्या प्रेक्षकांप्रती अरेमा एफसी संघाच्या चाहत्यांनी शोक व्यक्त करीत श्रद्धांजली वाहिली. स्टेडियमच्या बाहेर अरेमा क्लबचा शुभंकर असलेल्या सिंहाच्या प्रतिकृतीवर फुलांच्या पाकळ्या वाहिल्या. जकार्तामध्ये गेलोरा बुंग कार्नो स्टेडियमबाहेर 300 फुटबॉल चाहते शोक व्यक्त करण्यासाठी जमले होते. अनेकांच्या हातात श्रद्धांजलीचे फलक होते, तसेच “पोलिसांची क्रूरता थांबवा” (stop police brutality) असेही फलक होते.

या घटनेवर मँचेस्टर युनायटेड आणि बार्सिलोना संघाने ऑनलाइन श्रद्धांजली पोस्ट केली. स्पॅनिश फुटबॉल क्लबने एक मिनिटाचे मौन पाळले. आशियाई फुटबॉल महासंघ, जर्मन फुटबॉल संघटना आणि इटलीच्या सेरी ए या सर्वांनी दुःख व्यक्त केले.

निर्बंध टाळण्यासाठी फुटबॉल असोसिएशन ऑफ इंडोनेशिया (PSSI) फिफा (FIFA)च्या संपर्कात आहे, अशी माहिती पीएसएसआयचे सरचिटणीस युनूस युसी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यापूर्वी घडलेल्या घटना

[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=9WxHX9fltBo&t=83s” column_width=”4″]
  • 24 मे 1964 : लीमा येथे 24 मे 1964 रोजी पेरू आणि अर्जेंटिना या दोन संघांत ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या सामन्यादरम्यान हिंसाचार झाला होता. रेफ्रींच्या निर्णयांवरून भडकलेल्या पेरूच्या चाहत्यांनी केलेल्या हिंसाचारात एकूण 320 प्रेक्षकांचा मृत्यू झाला होता. याशिवाय 1,000 प्रेक्षक जखमी झाले होते.
  • 20 जानेवारी 1980 : कोलंबियात तात्पुरते तयार करण्यात आलेले स्टेडियम कोसळून 200 जणांचा मृत्यू.
  • 20 ऑक्टोबर 1982 : मॉस्कोतील स्टेडियममधील चेंगराचेंगरीत 68 जणांचा मृत्यू
  • 28 मे 1985 : युरोपियन कप स्पर्धेतील अंतिम लढतीवेळी हिंसाचारात 39 जणांचा मृत्यू
  • 13 मार्च 1988 : गारांपासून बचाव करण्यासाठी स्टेडियममध्ये जाण्याच्या प्रयत्नात नेपाळमध्ये 93 जणांचा मृत्यू
  • 1989 : शेफिल्डच्या (इंग्लंड) हिल्सबोरो स्डेडियममध्ये 1989 मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत लिव्हरपूल संघाच्या 97 चाहत्यांचा मृत्यू झाला होता.
  • 16 ऑक्टोबर 1996 : ग्वाटेमाला आणि कोस्टा रिका यांच्यातील वर्ल्ड कप फुटबॉलच्या पात्रता लढतीपूर्वी स्टेडियममध्ये संघर्षात 84 जणांचा मृत्यू
  • 9 मे 2001 : आफ्रिकेतील 9 मे 2001 मधील सर्वांत मोठी दुर्घटना. घानाची राजधानी आक्रा येथील प्रमुख स्टेडियममध्ये आक्रा हर्ट्स ऑफ ओक आणि असांते कोटोको या संघांत झालेल्या सामन्यात चाहते संतापले. पोलिसांनी गोळ्या झाडल्यानंतर या सामन्यात झालेल्या चेंगरांचेंगरीत 126 प्रेक्षकांचा मृत्यू झाला. त्या वेळी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यानंतर स्टेडियमच्या बाहेर पडण्यासाठी चेंगराचेंगरी झाली होती.
  • 2009 : आयवरी कोस्टमधील आबिदजान येथील फेलिक्स हुफे बोइनी स्टेडियममध्ये मार्च 2009 ची ही घटना. मलावीविरुद्धच्या वर्ल्ड कप सॉकर पात्रता फेरीच्या सामन्यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 19 लोकांचा मृत्यू झाला होता.
  • 2012 : इजिप्तच्या पोर्ट सईद शहरात फेब्रुवारी 2012 मध्ये अल-मसरी आणि अल-अहली या दोन संघांतील सामन्यादरम्यान चाहते एकमेकांशी भिडले. या घटनेत सुमारे 73 लोकांचा मृत्यू, तर 1000 पेक्षा अधिक लोक जखमी झाले. या घटनेनंतर इजिप्तची फ़ुटबॉल लीग दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आली होती.
  • 2015 : इजिप्तची राजधानी काहिरा येथील स्टेडियममध्ये फेब्रुवारी 2015 मध्ये पोलिस आणि काहिरा येथील प्रसिद्ध फ़ुटबॉल क्लब ‘जमालेक फ़ुटबॉल क्लब’च्या चाहत्यांमध्ये झालेल्या हिंसाचारात 22 लोकांचा मृत्यू झाले.
  • 2022 : जानेवारी 2022 मध्ये कैमरून या देशात ‘आफ्रिका कप ऑफ नेशंन्स’ या स्पर्धेचे यजमानपद होते. अंतिम-16 सामन्यात कॅमेरून आणि कोमोरोज हे दोन संघ आमनेसामने होते. या सामन्यात झालेल्या चेंगराचेंगरीत 8 जणांचा मृत्यू, तर 38 प्रेक्षक जखमी झाले.

फुटबॉल 2022 : भारतीय फुटबॉलवरील बंदीने गाजले वर्ष

[jnews_block_8 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”63″]

Related Articles

One Comment

  1. My name’s Eric and I just found your site kheliyad.com.

    It’s got a lot going for it, but here’s an idea to make it even MORE effective.

    Talk With Web Visitor – CLICK HERE https://boostleadgeneration.com for a live demo now.

    Talk With Web Visitor is a software widget that’s works on your site, ready to capture any visitor’s Name, Email address and Phone Number. It signals you the moment they let you know they’re interested – so that you can talk to that lead while they’re literally looking over your site.

    And once you’ve captured their phone number, with our new SMS Text With Lead feature, you can automatically start a text (SMS) conversation… and if they don’t take you up on your offer then, you can follow up with text messages for new offers, content links, even just “how you doing?” notes to build a relationship.

    CLICK HERE https://boostleadgeneration.com to discover what Talk With Web Visitor can do for your business.

    The difference between contacting someone within 5 minutes versus a half-hour means you could be converting up to 100X more leads today!

    Eric
    PS: Studies show that 70% of a site’s visitors disappear and are gone forever after just a moment. Don’t keep losing them.
    Talk With Web Visitor offers a FREE 14 days trial – and it even includes International Long Distance Calling.
    You have customers waiting to talk with you right now… don’t keep them waiting.
    CLICK HERE https://boostleadgeneration.com to try Talk With Web Visitor now.

    If you’d like to unsubscribe click here http://boostleadgeneration.com/unsubscribe.aspx?d=kheliyad.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!