निदेशकाचा राजीनामा; ‘हॉकी इंडिया’तील अंतर्गत धुसफूस उघड
दीर्घ काळापासून हॉकी इंडियाचे हाय परफॉर्मन्स निदेशक High Performance Director | डेव्हिड जॉन David John | यांनी पदाचा राजीनामा दिला. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) त्यांचा करार वाढविला होता. Hockey India David John resigns |
राष्ट्रीय महासंघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या मतभेदांमुळे डेव्हिड जॉन यांनी हे पाऊल उचलले असावे. यामुळे हॉकी इंडियातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. Hockey India David John resigns |
‘साई’ने (SAI) जॉन David John | यांचा करार नुकताच सप्टेंबर २०२१ पर्यंत वाढवला होता. तरीही त्यांनी राजीनामा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हॉकी इंडियाने मला दुर्लक्षित केल्याने हा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑस्ट्रेलियाचे असलेले डेव्हिड जॉन यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याचे म्हंटले आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी हा राजीनामा सुपूर्द केला होता.
सूत्रांनी सांगितले, की हॉकी इंडियाने हा राजीनामा स्वीकारला आहे. त्यांच्या जागेवर आता कुणाची नियुक्ती होते, याबाबत ‘साई’ने (SAI) कोणताही निर्णय घेतलेला नाही.
Hockey India David John resigns | एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ‘‘डेव्हिड जॉन दीर्घ काळापासून निराश होते. कारण हॉकी इंडियाने त्यांना दुर्लक्षित केले होते. हॉकी इंडियाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी संघातील महत्त्वपूर्ण निर्णयात जॉन यांना दूर ठेवले होते.’’
या सूत्राने असेही सांगितले, ‘‘डेव्हिड जॉन यांना संघातील निर्णयात सहभागी केले जात नव्हते. ते प्रशिक्षक आणि खेळाडूंसाठी फक्त ऑनलाइन क्लास घेत होते. करोना महामारीमुळे पाच महिन्यांपासून सक्तीच्या विश्रांतीनंतर त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला.’’
जॉन यांना निदेशकपदावर १२ हजार डॉलर मासिक वेतन मिळत होते. करोना महामारीमुळे मार्चनंतर लॉकडाउन झाल्याने ते नवी दिल्लीतील आपल्या घरातूनच काम करीत होते.
राजीनाम्यानंतर जॉन यांनी कुणाशीही संपर्क साधलेला नाही. ते २०११ पासून भारतीय हॉकीशी जोडले होते. ते सुरुवातीला मुख्य प्रशिक्षक माइकेल नोब्स यांच्यासोबत पुरुष संघाचे फिजिओ म्हणून काम पाहत होते.
Hockey India David John resigns | भारतीय संघाची तंदुरुस्ती वाढवण्यात उत्तम काम करणारे जॉन यांनी २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकनंतर राजीनामा दिला होता. मात्र, २०१६ मध्ये ते हाय परफार्मन्स निदेशक म्हणून पुन्हा संघाशी जोडले गेले.