All Sportssports newsTokyo Olympic 2020

टोकियो ऑलिम्पिकमध्ये तुम्हाला माहीत नसलेल्या चार गोष्टी

तुम्हाला माहीत नसलेल्या टोकियो ऑलिम्पिकमधील या चार गोष्टी… प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये वाद होतात. मात्र, टोकियो ऑलिम्पिकमध्ये हे प्रथमच घडलं. काय आहेत या गोष्टी?

युक्रेनच्या विरोधानंतर ऑलिम्पिक वेबसाइटने बदलला नकाशा


ऑलिम्पिकच्या वेबसाइटवर युक्रेनचा नकाशा प्रसिद्ध करण्यात आला आहे. मात्र, या नकाशात क्रिमिया बेटाजवळ युक्रेनची सीमारेषा दाखवली आहे.  त्यावरून युक्रेनने विरोध दर्शवला. युक्रेनच्या विरोधानंतर हा नकाशा बदलण्यात आला. ऑलिम्पिक वेबसाइटवर हा नकाशा ‘चीयर जोन’चा एक भाग आहे. यात जगभरातील चाहते आपल्या संघांचं समर्थन करीत असतात. युक्रेनच्या नकाशावर क्रीमियाच्या वर काळी रेषा होती. ती राष्ट्रीय सीमेसारखी नमूद केलेली होती. क्रीमियाला 2014 मध्ये रशियाने आपल्या ताब्यात घेतले होते. मात्र, युक्रेन आजही हा भाग आपल्या देशाचाच एक भाग मानतात. त्यामुळेच क्रिमिया आणि युक्रेनमध्ये आखलेली सीमा ही चुकीची असून, त्यावर युक्रेनने आयओसीकडे आपला विरोध स्पष्ट केला होता. युक्रेनच्या विरोधानंतर नकाशात बदल करण्यात आला आहे.

उगवत्या सूर्याच्या ध्वजावरून ऑलिम्पिकमध्ये वाद


‘उगवता सूर्य’ हा जपानचा ध्वज आपल्या देशाच्या इतिहासातला एक भाग मानतात. मात्र, कोरिया, चीन आणि इतर आशियाई देशांचं म्हणणं आहे, की हा ध्वज युद्धादरम्यान जपानी अत्याचारांची आठवण देतो. या देशांनी या ध्वजाची तुलना नाझीच्या स्वस्तिक चिन्हाशी केली आहे. यामुळेच ऑलिम्पिकमध्ये जपानच्या या ध्वजावरून नाराजी पसरली आहे. जपानच्या शेजारी देशांनी ऑलिम्पिकदरम्यान या ध्वजावर बंदीची मागणी केली आहे.

दक्षिण कोरियाने 2019 मध्येच आतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला (आयओसी) या ध्वजावर टोकियो ऑलिम्पिकमध्ये बंदी घालण्याचे सुचविले होते. दक्षिण कोरियाने असंही सांगितलं होतं, की हा ध्वज आशियाई लोकांच्या वेदनांची आठवण देतो. युद्धकाळात जपानच्या सैन्याने प्रचंड अत्याचार केले होते. दुसऱ्या महायुद्धात जसे नाझी सेनेच्या स्वस्तिक चिन्ह अस्वस्थ करते तशीच वेदनादायी आठवण या ध्वजाने येते.

उत्तर कोरियाने तर जपानवर आरोप केला आहे, की युद्धातील अपराध्यांना ऑलिम्पिकमध्ये शांतीचं प्रतीक बनविण्याचा प्रयत्न जपान करीत आहे. ही आमच्यासाठी आणि आशियाई देशांतील लोकांसाठी अपमानजनक आहे. दक्षिण कोरियाने या ध्वजाच्या विरोधासाठी ऑलिम्पिक क्रीडाग्राममधील आपले बॅनरही हटविले होते. ऑलिम्पिकमधील इतर स्थळे व स्टेडियममधून या ध्वजावर बंदी घालण्यात येईल, असे आश्वासन आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) दक्षिण कोरियाला दिले होते. दक्षिण कोरियातील माध्यमांनी मात्र अशी माहिती दिली, की काही कार्यकर्ते क्रीडाग्रामजवळ हा ध्वज घेऊन आले होते. या ध्वजाला ऑलिम्पिक स्टेडियममध्ये बंदी नसल्याचे जपानच्या आयोजन समितीने सांगितले असल्याचेही माध्यमांनी सांगितले. सिओलमधील अहवा विद्यापीठाचे प्राध्यापक लेस एरिक ईस्ले यांनी सांगितले, ‘‘टोकियो ऑलिम्पिकचा यजमान जपान किंवा खेळाडूंच्या हाती उगवत्या सूर्याच्या ध्वजाचा उपयोग करण्याची अपेक्षा करूच शकत नाही. कारण हा काही जपानचा राष्ट्रीय ध्वज नाही. ’’

ऑलिम्पिक रद्द करण्यासाठी निदर्शने


करोना महामारीत टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा होत असून, त्याला जपानमध्येच विरोध होत आहे. जवळपास 50 आंदोलकांनी ऑलिम्पिक रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी 23 जुलै 2021 रोजी निदर्शनेही केली. ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा 23 जुलै रोजी सायंकाळी निश्चित असताना दुपारी हे आंदोलन भुवया उंचावणारे ठरले. निदर्शकांनी टोकियो मेट्रोपॉलिटन प्रशासकीय इमारतीबाहेर ‘नो टू ऑलिम्पिक्स’ आणि ‘सेव्ह पीपुल्स लाइव्स’च्या घोषणा दिल्या. ‘कॅन्सल दि ऑलिम्पिक्स’ असे फलक हाती घेतले होते. कोरोना महामारीमुळे एक वर्ष विलंबाने होणारा हा सोहळा प्रेक्षकांविना होणार आहे. या सोहळ्याच्या एक दिवस आधी टोकियोत सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदविण्यात आली होती. ही रुग्णसंख्या गेल्या सहा महिन्यांतील उच्चांकी होती.

रशियाच्या तिरंदाजाला वाढत्या उष्म्याने भोवळ


रशियाची तिरंदाज स्वेतलाना गोम्बोएवा 23 जुलै 2021 रोजी टोकियो ऑलिम्पिकदरम्यान भयंकर उष्म्यामुळे बेशुद्ध पडली. पात्रता फेरी पूर्ण केल्यानंतर काही वेळातच गोम्बोएवा भोवळ येऊन पडली. उष्माघातामुळे गोम्बाएवा हिला भोवळ आली होती. पात्रताफेरीत गोम्बोएवा 64 महिला तिरंदाजांमध्ये 45 व्या स्थानी राहिली.

Follow us

टोकियो ऑलिम्पिक टोकियो ऑलिम्पिक टोकियो ऑलिम्पिक टोकियो ऑलिम्पिक टोकियो ऑलिम्पिक टोकियो ऑलिम्पिक

[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”95″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!