भारतीय फुटबॉल संघाचे माजी डिफेंडर ए डी नागेंद्र यांचे निधन
भारताचे माजी फुटबॉलपटू ए डी नागेंद्र यांचे 26 जानेवारी 2022 रोजी वयाच्या 79 व्या वर्षी निधन झाले. नागेंद्र 1969 मध्ये मरडेका कप स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघात होते. माजी डिफेंडर नागेंद्र 1966 ते 1975 पर्यंत म्हैसूर राज्य संतोष ट्रॉफी संघाचे सदस्यही होते. ते 1967 आणि 1968 मध्ये विजेत्या संघातही होते. कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेच्या संचालन बोर्डाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. अनेक राज्यांच्या संघांना त्यांनी प्रशिक्षणही दिले. त्यांनी भारताच्या 19 वर्षांखालील संघालाही प्रशिक्षण दिले होते.
एआयएफएफचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी नागेंद्र यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. ते म्हणाले, ‘‘नागेंद्र आता आमच्यासोबत नाही, याचे दु:ख मोठे आहे. उत्तम फुटबॉलपटूच नव्हे, तर ते उत्तम प्रशासकही होते. भारतीय फुटबॉलसाठी त्यांचे अनमोल योगदान नेहमीच आमच्यासोबत राहील.’’ एआयएफएफचे महासचिव कुशाल दास यांनी नागेंद्र यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.
Follow on Facebook Page kheliyad
[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#1e73be” header_line_color=”#1e73be” include_category=”63″]