equestrian Mirza chose ‘Dajara 4’ mare for the Games
मिर्झाची ‘दजारा 4’ घोडी उतरणार ऑलिम्पिकमध्ये
olympic equestrian India mirza | इक्वेस्ट्रियन हा खेळ भारतात फारसा लोकप्रिय नाही. किंबहुना या खेळात भाग घेणाऱ्या खेळाडूंची नावंही कुणाला सांगता येणार नाहीत. इक्वेस्ट्रियन म्हणजे घोडेस्वारी. घोडेस्वार फवाद मिर्झा (Fouaad Mirza) टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. त्यासाठी त्याने ‘दजारा 4’ नावाच्या घोडीची निवड केली आहे. टोकियो ऑलिम्पिक 23 जुलै ते आठ ऑगस्ट 2021 दरम्यान होणार आहे.
ऑलिम्पिकमध्ये इक्वेस्ट्रियन या खेळात खेळाडूपेक्षा अश्व महत्त्वाचा घटक मानला जातो. ऑलिम्पिकमध्ये कोणत्या अश्वाची निवड करावी, यावरून मिर्झा द्विधा मन:स्थितीत होता. अखेर त्याने ‘दजारा 4’ नावाच्या मादी अश्वाची निवड करीत द्विधा मन:स्थितीला पूर्णविराम दिला.
olympic equestrian India mirza | इंद्रजित लांबा आणि इम्तियाज अनीस यांच्यानंतर ऑलिम्पिक इक्वेस्ट्रियनमध्ये भाग घेणारा मिर्झा तिसरा भारतीय खेळाडू आहे. मिर्झाने ऑलिम्पिकमध्ये इव्हेंटिंग स्पर्धेत वैयक्तिक स्थान मिळविले आहे. अनीस इक्वेस्ट्रियनमध्ये भाग घेणारा अखेरचा भारतीय घोडेस्वार होता. त्यांनी सिडनी ओलिम्पिकमध्ये 2000 मध्ये वाइल्ड कार्डाद्वारे प्रवेश केला होता.
olympic equestrian India mirza
मिर्झाने सांगितले, ‘‘मी टोकियोत ‘दजारा 4’ या मादी अश्वाची निवड केली आहे. आम्ही उत्तम तयारी करीत आहोत. आम्ही इतिहास रचण्याच्या मार्गावर आहोत. आणि ‘दजारा 4’ त्यासाठी मला मदत करणार आहे. मी तिच्यासोबत भाग घेण्यासाठी उत्सुक आहे.’’
मिर्झाने सांगितले, ‘‘ती (दजारा 4) एक देखणी घोडी आहे. मला विश्वास आहे, की ती या खेळाकडे लोकांचं लक्ष वेधेल. आशा आहे, की तरुणांना या खेळासाठी प्रोत्साहन मिळेल. ’’
olympic equestrian India mirza | मिर्झाकडे ‘सिगनुर मेडिकोट’ हा अनुभवी अश्वही आहे. ‘दजारा 4’ला की ‘सिगनुर मेडिकोट’? मेडिकोटसोबत त्याने जाकार्ता आशियाई स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. तो म्हणतो, ‘‘हा कठीण निर्णय होता. दोन्ही अश्व खूपच उत्तम आहेत. मी भाग्यवान आहे, की हे दोन्ही अश्व माझ्याकडे आहेत.’’
मिर्झा म्हणाला, ‘‘ऑलिम्पिकमध्ये क्रॉस कंट्रीनंतर दोन दौरे ‘शो जम्पिंग’चे असतील. त्यात ‘मेडिकोट’ची बाजू कमकुवत होती. मेडिकोटची निवड न करण्यामागे हेच प्रमुख कारण आहे. त्यामुळेच दजारा 4 ची मी निवड केली.’’
मिर्झाला अर्जुन पुरस्कारही मिळालेला आहे. मिर्झा इतर स्पर्धांसारखीच ऑलिम्पिकची तयारी करीत आहे. तो म्हणाला, ‘‘दजाराने गेल्या आठवड्यात पोलंडमधील नेशन्स कपमध्ये भाग घेतला होता. त्यात दुसरे स्थान मिळवले. आता ती एक आठवड्यापासून विश्रांती घेत आहे. त्यानंतर आम्ही पुन्हा लयीत येऊ.’’
[jnews_block_9 first_title=”हेही वाचा…” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”106,95″]