धोनीने संन्यास घेतला तर माझाही क्रिकेटला अलविदा… ही भूमिका कोणा भारतीय क्रिकेटपटूची नाही, तर पाकिस्तानी चाहत्याची Dhoni’s Fan | आहे. विश्वास बसणार नाही, पण पाकिस्तानचे ‘चाचा शिकागो’ Chacha Chicago | नावाने ओळखले जाणारे मोहम्मद बशीर बोजाई आता प्रेक्षकांमध्ये खेळाडूंना प्रोत्साहन देताना दिसणार नाहीत…
जगभर क्रिकेट चाहत्यांची Dhoni’s Fan | संख्या कमी नाही. मात्र, असेही क्रिकेट चाहते आहेत, ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्यच क्रिकेटला वाहिलं.
या चाहत्यांमध्ये भारताचा निष्काम क्रिकेटयोगी सुधीर गौतम चौधरी याचं जसं नाव घेतलं जातं, तसंच पाकिस्तानचे बशीर चाचा Chacha Chicago | यांनाही ओळखलं जातं. क्रिकेट चाहत्यांमध्ये यांची नावं अग्रक्रमाने घ्यावी लागतील…
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला त्या वेळी क्रिकेटप्रेमींना Dhoni’s Fan | प्रचंड धक्का बसला.
हा धक्का केवळ भारतीय चाहत्यांनाच नाही, तर सीमापार असलेल्या पाकिस्तानातील चाहत्यांनाही नक्कीच वाईट वाटलं असेल.
पाकिस्तानच्या कराचीत जन्मलेले मोहम्मद बशीर बोजाई Chacha Chicago | हे त्यापैकीच एक. पाकिस्तान क्रिकेट संघाचे समर्थन करताना बशीर चाचा पाकिस्तानचा ध्वज हवेत फडकावताना अनेकांनी पाहिले असेल.
धोनीने संन्यास घेतला तर माझाही क्रिकेटला अलविदा
अर्थात, ते भारतीय क्रिकेटपटूंचेही Dhoni’s Fan | तेवढेच चाहते आहेत. महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीनंतर त्यांनीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) स्पर्धांना न जाण्याचा निर्णय घेतला आहे. भारत आणि पाकिस्तानदरम्यान जेथेही लढती होतील, तेथे आता बशीर चाचा दिसणार नाहीत.
‘चाचा शिकागो’ Chacha Chicago | नावाने ओळखले जाणारे मोहम्मद बशीर यांच्यासाठी भारत-पाकिस्तान सामना पाहणे औत्सुक्याचे अजिबातच राहिलेले नाही.
धोनीचं कौतुक केल्याने बशीर चाचा Chacha Chicago | यांना पाकिस्तानी समर्थकांचा प्रचंड रोष पत्करावा लागला आहे.
बशीर चाचा आता थेट रांचीमध्ये धोनीची भेट घेण्याचा विचार करीत आहेत.
बशीर चाचा यांचं शिकागोमध्ये रेस्टॉरंट आहे. ते म्हणाले, ‘‘धोनीने क्रिकेट संन्यास घेतला आहे आणि मीही… तो खेळणार नसल्याने आता मला नाही वाटत, की पुन्हा क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी मी दौरा करू शकेन. माझं त्याच्यावर प्रेम आहे आणि त्या बदल्यात त्यानेही माझ्यावर तेवढंच प्रेम केलं आहे.’’
तो म्हणाला, ‘‘सर्व महान खेळाडूंना एक दिवस संन्यास घ्यावाच लागतो. मात्र, त्याच्या निवृत्तीने मला दु:खी केलं आहे. त्याचा निरोप सोहळा शानदार व्हायला हवा होता. मात्र, त्यापेक्षाही त्याचं कर्तृत्व मोठं आहे.’’
Dhoni’s Fan Chacha Chicago | बशीर आणि धोनी यांच्यातील नातं २०११ च्या विश्वकपच्या उपांत्य फेरीत अधिक दृढ झालं.
हा सामना मोहालीत होता. महत्त्वपूर्ण अशा सामन्याचं तिकीट मिळणं शक्यच नव्हतं. मात्र, धोनीने ६५ वर्षीय बशीर यांच्यासाठी तिकिटाची व्यवस्था केली.
बशीर चाचा यांना तीन वेळा हृदयविकाराचा सामना करावा लागला आहे. धोनीला पाहण्यासाठी जगभर प्रवास करणारे बशीर चाचा यांच्यासाठी आता क्रिकेट पहिल्यासारखं राहिलेलं नाही.
आता ते स्टेडियममध्ये सामना पाहणार नाहीत. आता त्यांचं पुढचं ध्येय रांचीत धोनीला भेटणं एवढंच आहे.
ते म्हणाले, ‘‘सगळं काही पूर्ववत सुरू झाल्यानंतर (कोविड-19 महामारीनंतर) मी रांची येथे त्याच्या घरी जाईन. त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी मी एवढं तरी करू शकेन. मी राम बाबू (मोहालीतला एक सुपरफॅन) यांनाही सोबत येण्यास सांगेन.’’
बशीर चाचा यांची पत्नी भारतातील हैदराबाद येथील आहे. त्या जानेवारीत हैदराबादेत गेल्या, तशा अद्याप तेथेच आहेत.
ते म्हणाले, ‘‘मी त्याला भेटण्यासाठी आयपीएलमध्ये जाणार होतो. मात्र, आंतरराष्ट्रीय प्रवास बंद आहेत आणि हृदयविकारामुळेही असं करणं आता आरोग्यदृष्ट्या सुरक्षित नाही.’’
[jnews_block_24 first_title=”Read also…” header_text_color=”#dd0000″ header_line_color=”#ff0000″ number_post=”7″ include_category=”812″]बशीर चाचांनी धोनीशी असलेल्या मजबूत नात्याचे कारणही सांगितले. ते म्हणाले, की धोनीसोबत आमचं नातं एका कारणामुळे मजबूत झालं, ते म्हणजे धोनी स्पर्धेदरम्यान कोणाशीही बोलत नाही. मात्र, काही सांगण्यापूर्वीच हा दिग्गज खेळाडू मदतीसाठी नेहमी तत्पर असतो.
ते म्हणाले, ‘‘काही अशाही संधी मिळाल्या, जेथे मला त्याच्याशी संवाद साधता आला. मात्र, २०१९ (आयसीसी क्रिकेट विश्वकप) मध्ये आम्ही फारसं बोलू शकलेलो नाही. असं असलं तरी त्याने माझ्यासाठी तिकिटाची व्यवस्था केली.’’
बशीर चाचा म्हणाले, ‘‘२०१८ आशिया कपदरम्यान त्याने मला त्याच्या खोलीत बोलावलं आणि त्याची जर्सी मला भेट दिली. ते माझ्यासाठी खूप विशेष होतं. त्याने मला त्याची बॅटही भेट दिली होती.’’
धोनीसोबतच्या आठवणीतल्या एखाद्या अविस्मरणीय क्षणाविषयी विचारल्यानंतर बशीर चाचा म्हणाले, ‘‘२०१५ च्या विश्वकपमधील एक घटना मी कदापि विसरू शकणार नाही. मी सिडनीत सामना पाहण्यासाठी पोहोचलो होतो. त्या वेळी मी उन्हात बसलो होतो. खूप उकाडा जाणवत होता.’’
‘‘तेवढ्यात सुरेश रैना आला आणि मला सनग्लास दिला. तो म्हणाला, ‘हा धोनी भाईने दिला आहे; मी नाही!’ सनग्लास पाहून मी स्मितहास्य केलं.’’
Dhoni’s Fan Chacha Chicago | धोनीविषयी बशीर चाचांनी जाहीरपणे आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. त्यामुळे पाकिस्तानी समर्थकांचा प्रचंड रोष त्यांना सहन करावा लागला आहे.
ते म्हणाले, ‘‘एकदा बर्मिंगहममध्ये पाकिस्तानी चाहत्यांनी माझ्यावर अपमानजनक टिप्पणी केली. गद्दार म्हणून माझी संभावना केली. मी अशा गोष्टींकडे नेहमीच दुर्लक्ष केलं आहे. मी दोन्ही देशांवर प्रेम करतो. तसंही मानवता सर्वांत आधी असते.’’
2 Comments