All Sportssciencesports news

युरोपमध्ये प्रीगाबालिन – Pregabalin ची चिंता

युरोपमध्ये प्रीगाबालिन – Pregabalin ची चिंता

चिंता, भीतीवरील औषध- प्रीगाबालिन (Pregabalin)मुळे युरोपमध्ये मृत्यू का वाढले? काय आहे यामागची खरी कारणे? लिव्हरपूल जॉन मूरेस विद्यापीठातील मादक पदार्थ विषयांचे अभ्यासक हॅरी सुमनॉल, यॉर्क विद्यापीठाच्या आरोग्य विज्ञान विभागाचे मानद फेलो इयान हॅमिल्टन यांनी दिलेली अभ्यासपूर्ण माहिती खास ‘खेळियाड’च्या वाचकांसाठी.

युरोपमध्ये प्रीगाबालिन - Pregabalin ची चिंता

सामान्यपणे चिंता, भीती या समस्यांवर प्रीगाबालिन – Pregabalin हे औषध दिले जाते. युरोपमध्ये प्रीगाबालिन (Pregabalin)मुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

2018 मध्ये इंग्लंड आणि वेल्समध्ये प्रीगाबालिनशी संबंधित 187 मृत्यू झाले होते, तर 2022 मध्ये यात दुपटीने वाढ होऊन मृत्युसंख्या 441 वर गेली. त्यामुळे प्रीगाबालिन माध्यमांमध्ये कमालीचा चर्चेत आला. ‘जीवघेण्या औषधामुळे अमेरिकन शैलीतील ओपिओइड (Opioid) महामारी’ अशी अवहेलना अलीकडे माध्यमांमध्ये सुरू झाली.

हजारो अमेरिकी नागरिक ओपिओइड्स (Opioids- वेदनाशामक औषध)मुळे मरण पावले आहेत. त्यामुळे ही तुलना तार्किकदृष्ट्या योग्य नाही.

हे अहवाल केवळ औषधाबद्दल अवाजवी दहशत निर्माण करू शकतात. विशेषत: डॉक्टरांनी ज्या रुग्णांना हे औषध वापरण्याचा सल्ला दिला आहे.

प्रीगाबालिन (हे औषध लिरिका- LYRICA आणि अल्झेन – ALZEN या ब्रँड नावानेदेखील ओळखले जाते) हे एपिलेप्सी, मज्जातंतूचे दुखणे आणि चिंता-भीती यासह विविध आरोग्य समस्यांवर उपचार करण्यासाठी वापरले जाते. हे औषध प्रथम 2004 मध्ये युरोप आणि अमेरिकेत वापरण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती.

प्रीगाबालिन (Pregabalin)मध्ये अनेक फायदेशीर गुणधर्म आहेत. त्यामुळे उत्साह, शांतता आणि सामान्य स्थितीची भावना निर्माण होऊ शकते. ज्यांच्याकडे डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन नाही, असे लोकही प्रीगाबालिनचा शोध का घेतात? यावरून युरोपमध्ये या औषधाचा प्रभाव किती आहे, याची प्रचीती येते.

मुळात प्रीगाबालिन (Pregabalin) धोकादायक नसते, जरी सर्व औषधांप्रमाणे त्याचे संभाव्य दुष्परिणाम असले तरी. या दुष्परिणामांत भ्रम स्थिती निर्माण होणे आणि डोकेदुखीचाही समावेश आहे. विशेषत: तुम्ही दीर्घ कालावधीपासून हे औषध घेत असाल तर या त्याचं व्यसन लागण्याचाही धोका असू शकतो.

प्रीगाबालिन – Pregabalin चा केव्हा धोकादायक होऊ शकतं?

तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या अथवा नका घेऊ, पण तुम्ही इतर औषधांसोबत हे औषध घेतलं तर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. प्रीगाबालिन हे इतर ओपिओइड्स औषधांसोबत घेणे टाळणेच श्रेयस्कर राहील. विशेषत: काही झोपेसाठी लागणारी सहाय्यक औषधे, बेंझोडायझेपाइन्स (चिंतामुक्त करण्यासंबंधित औषधे), स्नायूंना आराम देमारी औषधे, एवढेच नाही, तर मधुमेह आणि मिर्गीसंबंधी औषधांसोबत प्रीगाबालिन अजिबात घेऊ नये.

प्रीगाबालिन इतर औषधांसोबत घेतल्यानेच बहुतांश मृत्यू झाले आहेत. यामुळे होणाऱ्या रिॲक्शनमुळे श्वास घेण्यास त्रास होतो.

वर्ष 2004 ते 2020 दरम्यान इंग्लंडमध्ये प्रीगाबालिनमुळे होणाऱ्या मृत्यूंचे विश्लेषण करण्यात आले होते. त्यातून असे समोर आले, की 90 टक्क्यांपेक्षा अधिक मृत्यूंमध्ये इतर ओपिओइड (मेथाडोन किंवा मॉर्फिनसह)ची मात्रा आढळली. अर्थात, एकचतुर्थांश प्रकरणांमध्येच लोकांना हे ओपिओइड निश्चित करण्यात आले होते.

यातून असे स्पष्ट होते, की बहुतांश लोक ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अवैध पद्धतीने घेत असण्याची शक्यता आहे. मात्र, डेटावरून हे स्पष्ट नाही, की प्रीगाबालिन घेण्यास सांगितले होते का किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही औषधे घेतली होती का?

अर्थात, हा डेटा केवळ 2020 पर्यंतचा आहे. मात्र, हे चित्र प्रीगाबालिनशी संबंधित अलीकडील मृत्यूंसारखेच असण्याची शक्यता आहे.

प्रीगाबालिन Pregabalin : घातक परिणाम

प्रीगाबालिनमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये अलीकडेच झालेली वाढ औषधे लिहून दिलेल्या लोकांच्या मृत्युसंख्येत झालेल्या वाढीशी किंचित रूपाने मेळ खाते. एकट्या इंग्लंडमध्ये, 2022 या वर्षात प्रीगाबालिनसाठी 8.4 दशलक्ष प्रिस्क्रिप्शन लिहिल्या गेल्या. ही संख्या 2016 या वर्षातील संख्येपेक्षा किती तरी पटीने अधिक आहे. 2016 मध्ये 55 लाख प्रिस्क्रिप्शन लिहिल्या गेल्या होत्या.

आकडेवारी हे सुचवू पाहतेय, की जोखीम कमी करण्यासाठी रुग्णाला अधिक साह्य करण्याची गरज आहे. विशेषतः इतर औषधांच्या सह-वापराच्या संबंधात. प्रिस्क्रिप्शन आणि रुग्ण या दोघांनाही प्रीगाबालिनच्या वापराच्या संभाव्य धोक्याबाबत जागरूक करण्याची गरज आहे. यात अवलंबित्वाच्या शक्यतेचाही समावेश आहे. रुग्ण आणि डॉक्टरांना अशा औषधांबाबतही जागरूक होणे गरजेचे आहे, ज्याच्यासोबत प्रीगाबालिनची परस्परक्रिया होते आणि अशा क्रियेचा परिणामही होऊ शकतो.

रुग्णांना त्याचा फायदा होत आहे, याची खात्री करण्यासाठी डॉक्टरांनी प्रीगाबालिनशी संबंधित प्रिस्क्रिप्शनचे नियमितपणे पुनरावलोकन केले पाहिजे. तसे नसल्यास, इतर उपचारांची शिफारस करणे अधिक योग्य ठरेल. जसे, मानसिक उपचार. जर एखादी व्यक्ती चिंतेसाठी औषधे घेत असेल तर त्याला मानसिक उपचाराची शिफारस करायला हवी.

मात्र, प्रीगाबालिनशी संबंधित मृत्यूंमध्ये गुंतलेल्या औषधांच्या संदर्भात, हे स्पष्ट आहे की केवळ औषधांबद्दल जागरूकता पुरेशी नाही. पुरावा असेही सूचित करतो, की प्रीगाबालिनचा बेकायदेशीर वापर ही युरोप आणि उत्तर अमेरिकेची वाढती समस्या आहे.

त्याची उघडपणे उपलब्धता याचा अर्थ असा होऊ शकतो, की वापरकर्त्यांना सिंथेटिक ओपिएट्स, मेथाडोनसारख्या इतर औषधांसह प्रीगाबालिन घेण्याच्या जोखमींबद्दल माहितीच नाही.

#प्रीगैबलिन #pregabalin #प्रीगॅबलिन #प्रीगाबालिन

इतिहासात डोकावताना… पाकिस्तान महिला क्रिकेट

Visit us

[jnews_block_9 first_title=”Read More At :” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ header_filter_category=”2123″]

Related Articles

4 Comments

  1. I’m no longer positive the place you are getting your information, however good topic. I must spend some time studying more or figuring out more. Thank you for fantastic info I used to be on the lookout for this info for my mission.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!