David Warner confronted by spectator
खूशखबर! प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी!
दुबई | भारतीय संघ ऑस्ट्रेलिया लवकरच ऑस्ट्रेलिया दौरा करणार आहे. David Warner confronted by spectator | ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बायो बबलसह सर्व तयारी सुरू केली आहे. यात प्रेक्षकांनाही सामना पाहण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे.
तशी इच्छा ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने व्यक्त केली आहे. मात्र, किमान 25 टक्के प्रेक्षक स्टेडियममध्ये हवेत, असे त्याला वाटते.
वार्नर म्हणाला, की सर्वांत मोठा प्रतिस्पर्धी भारतीय संघाविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यास मी उत्सुक आहे. वॉर्नरने ऑनलाइन पत्रकार परिषदेत ही अपेक्षा व्यक्त केली आहे.
तो म्हणाला, ‘‘मायदेशात येणाऱ्या भारतीय संघाबाबत मी खूप उत्साही आहे. ही मालिका प्रेक्षणीय ठरेल. मी आशा करतो, की कमीत कमी 25 टक्के प्रेक्षकांना परवानगी दिली जाऊ शकते. काही फुटबॉल स्पर्धांमध्ये अशा प्रकारे प्रेक्षकांना परवानगी दिली आहे. तशीच भारताविरुद्धच्या क्रिकेट मालिकेतही दिली जाईल.’’
याच आठवड्यात व्हिक्टोरिया राज्याचे पंतप्रधान डॅनियल एंड्र्यूज यांनी सांगितले होते, की त्यांचे सरकार बॉक्सिंग डे कसोटी आणि ऑस्ट्रेलिया ओपनदरम्यान स्टेडियममध्ये प्रेक्षकांना परवानगी देण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि टेनिस ऑस्ट्रेलियासोबत चर्चा करीत आहे.
David Warner confronted by spectator |
वॉर्नर यूएईमध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 13 व्या पर्वात सनरायझर्स हैदराबादचे कर्णधारपद भूषवत आहे. जैविक सुरक्षित वातावरणणात आणि प्रेक्षकांशिवाय आयपीएल खेळण्याच्या आव्हानाबाबत वॉर्नरने मान्य केले, की हे बिलकुल वेगळे आणि कठीण असेल.
David Warner confronted by spectator | सद्य:स्थितीत आयपीएल स्वास्थ्य सुरक्षेच्या कडक नियमांत खेळली जाईल. यात स्पर्धेदरम्यान प्रत्येक पाचव्या दिवशी खेळाडूंची आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांची करोना चाचणी केली जाणार आहे.
वार्नर म्हणाला, ‘‘कुटुंबापासून लांब राहणे काही लोकांसाठी कठीण आहे. मात्र, मला वाटते, की ही लीग सुरू झाल्यानंतर खेळाडूंचं लक्ष सामन्यांवर अधिक असेल. मला वाटते, की बीसीसीआय आणि यजमानांनी आयपीएलच्या आयोजनासाठी खूप चांगले काम केले आहे.’’
[jnews_block_24 first_title=”हेही वाचा…” header_line_color=”#dd0000″ header_accent_color=”#dd0000″]