cricket south africa suspension | दक्षिण आफ्रिका क्रिकेट निलंबित
दक्षिण आफ्रिका क्रिकेट निलंबित
दक्षिण आफ्रिकेचा क्रीडा महासंघ आणि ऑलिम्पिक समितीने (SASCOC) क्रिकेट दक्षिण आफ्रिकेला (CSA) निलंबित केले आहे. cricket south africa suspension | क्रिकेट संघटनेतील गैरप्रकार भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी निलंबनाची कारवाई केल्याचे कारण देण्यात आले आहे.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ आता संपूर्णपणे आफ्रिका सरकारच्या नियंत्रणाखाली आला आहे. मात्र, ही कारवाई आयसीसीच्या नियमाविरुद्ध आहे. कारण क्रिकेट संघटनेत सरकारी हस्तक्षेप आयसीसीच्या नियमाविरुद्ध आहे.
त्यामुळे आता आयसीसी दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघटनेला आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यास बंदी घालू शकते. तसे झाले तर दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघटनेवर दुहेरी संकट असेल. खेळाडूंनीही या प्रकरणावर चिंता व्यक्त केली आहे.
cricket south africa suspension | ऑलिम्पिक समितीची ही कारवाई दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळासाठी मोठा झटका मानला जात आहे. क्रिकेट संघटनेवर आधीपासूनच भ्रष्टाचार आणि वर्णभेदाचे आरोप लावले जात आहेत.
क्रिकेट संघटना संपूर्णपणे ऑलिम्पिक समितीच्या पंखाखाली आली आहे. ऑलिम्पिक समितीने ७ सप्टेंबर २०२० रोजी क्रिकेट मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघटनेत ‘‘गैरप्रकार आणि भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे पुढे आली असून, त्यामुळे क्रिकेटची बदनामी होत आहे,’’ असा आरोप ऑलिम्पिक समितीने लावला आहे.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघटनेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी थबांग मुनरो यांच्यावरच गेल्याच महिन्यात ऑगस्टमध्ये भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यामुळे त्यांना पदाचा राजीनामाही द्यावा लागला होता.
काळजीवाहू सीईओ जॉक फॉल आणि अध्यक्ष क्रिस नेनजानी यांनी गेल्याच महिन्यात राजीनामा दिला. फॉल यांची जागा आता कुगेंड्री गवेंडर यांनी घेतली आहे.
क्रिकेट संघटनेची ५ सप्टेंबरला होणारी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) पुढे ढकलल्याने देशातील आघाडीच्या खेळाडूंनी संघटनेवर जोरदार टीका केली होती.
दक्षिण आफ्रिका संघटनेवरील कारवाईचे हे प्रकरण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतही (ICC) गांभीर्याने घेतले जाऊ शकते. कारण आयसीसीच्या नियमानुसार, ऑलिम्पिक समितीची कारवाई हा सरकारी हस्तक्षेप मानला जातो.
cricket south africa suspension | ऑलिम्पिक समितीने केलेल्या निलंबनाच्या कारवाईवर दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघटनेनेही खेद व्यक्त केला आहे.
संघटनेने म्हंटले आहे, की ‘‘दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघटना आणि सदस्य परिषद ऑलिम्पिक समितीच्या कारवाईशी सहमत नाहीत. तसेच या प्रकरणात उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर बाजू मांडण्याची ऑलिम्पिक समितीने कोणतीही संधी दिलेली नाही.’’
ज्या आधारावर ऑलिम्पिक समितीने दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघटनेच्या आर्थिक बाबींत हस्तक्षेप केला आहे, त्यावर संघटना कायदेशीर सल्ला घेत आहे.
cricket south africa suspension | अर्थात, संघटना क्रिकेटच्या हितासाठी ऑलिम्पिक समितीसोबत यापुढे काम करण्यास तयार असल्याचे क्रिकेट संघटनेने म्हंटले आहे.
Follow us
[jnews_footer_social social_icon=”circle”]
2 Comments