All Sportscoronavirus

कोरोना महामारीमुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा झाल्या होत्या स्थगित

कोरोना विषाणूच्या संसर्गाने जगभरात हाहाकार माजवला असून, प्रत्येक देशाने निर्बंध लादत स्वतःला बंदिस्त करून घेतले आहे. यातून क्रीडाविश्वही सुटले नाही. कोरोना महामारीमुळे जगभरातील सर्वच क्रीडा स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. जगाचा क्रीडाकुंभ म्हणून ओळखली जाणारी ऑलिम्पिक स्पर्धाही स्थगित करावी लागली आहे. एकूणच संपूर्ण क्रीडाविश्वच थबकले आहे. हे किती दिवसांसाठी असेल याची शाश्वती कुणीही देऊ शकणार नाही. पाहूया 2020 मध्ये जगभरातील कोणकोणत्या क्रीडा स्पर्धा स्थगित झाल्या…
कोरोना स्पर्धा स्थगित

भारतात का घडले?

तेरे नाम से शुरू तेरे नाम से खतम’ इतकं प्रेमाचं भरतं येणाऱ्या भारतात ‘कोविड 19’मुळे क्रिकेट तर थांबलेच, शिवाय इतर क्रीडा स्पर्धांनाही फटका बसला आहेजगातील सर्वांत ताकदवान आणि श्रीमंत क्रिकेट बोर्डालाही BCCI | आयपीएलवर फेरविचार करण्यास भाग पाडले आहे. त्यांना 14 मार्च 2020 रोजी आठही संघमालकांची बैठक घ्यावी लागली.

आयपीएल टी-20 (IPL T-20) या सर्वांत मोठ्या क्रिकेटपर्वणीची नियोजित तारीख 29 मार्च होती. आता ही स्पर्धा 15 एप्रिल 2020 पर्यंत स्थगित करण्यात आली आहे. एवढेच नाही, तर इतर स्थानिक क्रिकेट सामनेही पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आले आहेत. तत्पूर्वीच, क्रिकेट बोर्डाने BCCI | दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिकाही रद्द केली होती.

कोरोना विषाणू संसर्गाची धास्ती क्रिकेटनेच नाही, तर फुटबॉल, बॅडमिंटन आणि हॉकी स्पर्धांनीही घेतली. राष्ट्रीय फुटबॉल महासंघाने 31 मार्चपर्यंत सर्वच सामने स्थगित केले. त्याचबरोबर इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धाही रद्द झाली आहेकारण जागतिक बॅडमिंटन संघटनेनेच 12 एप्रिलपर्यंत जगभरातील बॅडमिंटन स्पर्धा रद्द केल्या आहेत.

कोरोना महामारीमुळे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने प्रो हॉकी लीग स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत स्थगित केले आहेतभारतीय फुटबॉल महासंघाने सांगितले, ‘‘आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या व राज्य सरकारांनी केलेल्या सूचनांचे पालन करीत एआयएफएफ (AIFF) अंतर्गत येणाऱ्या सर्व फुटबॉल स्पर्धा 31 मार्च 2020 पर्यंत स्थगित राहतील. ’’

बीसीसीआयने BCCI | ज्या स्पर्धा स्थगित केल्या आहेत, त्यात इराणी करंडक, विज्जी ट्रॉफी, वरिष्ठ महिला एकदिवसीय नॉकआउट आणि सीनिअर महिला वनडे चॅलेंजर या महत्त्वाच्या स्पर्धांचा समावेश आहेज्युनिअर महिला गटातील ज्या स्पर्धा पुढील सूचना मिळेपर्यंत रद्द केल्या आहेत, त्यात 19 वर्षांखालील वनडे नॉकआउट, 19 वर्षांखालील टी-20 लीग, सुपरलीग आणि नॉकआउट, 19 वर्षांखालील टी-20 चॅलेंजर ट्रॉफी, 23 वर्षांखालील नॉकआउट आणि 23 वर्षांखालील वनडे चॅलेंजर या स्पर्धांचा समावेश आहे.

भारतात 14 मार्चपर्यंत कोरोना विषाणू संसर्गामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर 80 पेक्षा अधिक लोक संक्रमित झाले होते. अशा स्थितीत हे निर्णय घेण्यात आले होते. एकूणच परिस्थितीचे गांभीर्य पाहता सरकारने गर्दी टाळण्यासाठी क्रीडा स्पर्धांमध्ये प्रेक्षकांना प्रवेशास निर्बंध घालण्याचे निर्देश दिले होते.

कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या धास्तीमुळे भारताने प्रवास दौऱ्यावरही निर्बंध घातल्याने भारतीय महिला हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षक सोर्ड मारिन (Sjoerd Marijne) यांना मायदेशी नेदरलँडला जाण्याचे नियोजन रद्द करावे लागले. 45 वर्षीय मारिन यांना महिला हॉकी संघाच्या आठवडाभराच्या राष्ट्रीय शिबिरानंतर 13 मार्च रोजी मायदेशी परतायचे होते. मात्र, प्रवास दौऱ्यावर निर्बंध आल्याने त्यांना आपला हा नियोजित दौरा रद्द करावा लागला.

बॉक्सिंग स्पर्धा

23 जानेवारी 2020: जानेवारीमध्ये चीनमध्ये कोरोना विषाणूचे वृत्त जसे वाऱ्यासारखे पसरले तसतशी अनेकांना आरोग्याची काळजी वाटू लागली. याच काळात चीनच्या वुहानमध्ये 15 फेब्रुवारी 2020 रोजी मुष्टियोद्धा ऑलिम्पिक पात्रता चाचणी स्पर्धा Olympic Qualifier Tournament | होणार होती. हेच ते वुहान शहर जेथे कोरोना विषाणूचं केंद्रबिंदू होतं, असा दावा केला जात आहे. या शहराला कोरोना महामारीने विळखा घातल्यानंतर ही स्पर्धा रद्द करण्यात आली.

जानेवारीत या विषाणूची नुकतीच सुरुवात होती. त्यात 17 जणांचा बळी गेला होता, तर साडेपाचशेपेक्षा अधिक जणांना या विषाणूची बाधा झाली होतीभारतीय मुष्टियोद्धा संघटनेने (Boxing Faderation of India) उत्साह दाखवून भारतातील दिल्ली शहरात ही स्पर्धा आयोजित करण्याचे पत्र आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे चेअरमन मोरीनारी वटानबे यांना लिहिलं.

जर चीनव्यतिरिक्त कुठे स्पर्धा आयोजित केले जात असेल तर या स्पर्धेचे यजमानपद भारताला बहाल करावे. ही स्पर्धा आम्ही दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमच्या के. डी. जाधव इंडोअर हॉलमध्ये घेऊ, जेथे नोव्हेंबरमध्ये एआयबीएफ एलिट महिला मुष्टियुद्ध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, असे संघटनेचे अध्यक्ष अजय सिंह यांनी पत्रात नमूद केले होते.

वटानबे यांनीही त्याला सकारात्मकता दर्शविली होती. अर्थात, त्या वेळी भारताला या कोरोना विषाणूचं गांभीर्य लक्षात आलं नव्हतं. अन्यथा यजमानपदासाठी ही उत्सुकता त्यांनी दाखवलीच नसती.

महिला बॅडमिंटन संघाची माघार

8 फेब्रुवारी 2020: कोरोना विषाणूचा संसर्ग आता जगभरात फैलावत होता. त्यामुळे प्रत्येक देशाने या विषाणूचा धसकाच घेतला होता. अशातच फिलिपीन्समधील मनिला येथे 11 ते 16 फेब्रुवारी 2020 दरम्यान आशियाई बॅडमिंटन स्पर्धा होणार होतीभारताचे पुरुष आणि महिला संघ या स्पर्धेत सहभाग घेणार होते. मात्र, कोरोनाच्या धसक्याने महिला संघाने या स्पर्धेतून अंग काढून घेतले.

मात्र, पुरुष संघाने अशी कोणतीही भूमिका घेतली नाही. त्यांनी स्पर्धेत भाग घेण्याचे निश्चित केले होते. कारण आशिया बॅडमिंटनने या विषाणूंपासून संरक्षणासाठी खेळाडूंना पुरेपूर सुविधा दिल्या जातील असे आश्वासन दिले होते. मात्र, साईना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू या दोन प्रमुख खेळाडूंनीच या स्पर्धेत न खेळण्याचे जाहीर केल्याने त्यांच्यासोबत अस्मिता छालिहा आणि मालविका बनसोड या दोन खेळाडूंनीही माघार घेतली.

जागतिक नेमबाजीतून सहा देशांची माघार

26 फेब्रुवारी 2020: नवी दिल्ली येथील कर्णी सिंह नेमबाजी रेंजवर 15 ते 26 मार्च 2020दरम्यान होणाऱ्या आयएसएसएफ विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेतून चीनसह सहा देशांनी माघार घेतल्याने ही स्पर्धाही अडचणीच्या फेऱ्यात अडकली आहे. भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेने (National Rifle Association of India) ही माहिती दिली.

एनआरएआयचे अध्यक्ष रनिंदर सिंह यांनी सांगितले, की काही देश स्पर्धा खेळण्यास इच्छुक होते; पण त्यांच्या देशातील धोरणानुसार कोरोना विषाणूंच्या भीतीने त्यांनी माघार घेतली आहे. चीनने योग्य निर्णय घेतला आहे. कारण त्यांच्यामुळे इतरांना संसर्ग होऊ नये म्हणूनच त्यांनी माघार घेतली आहे. तैवान, हाँगकाँग, मकाऊ आणि तुर्कमेनिस्ताननेही माघार घेतली आहे. याच महिन्यात आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपसाठी भारताने चीनच्या पहिलवानांना व्हिसा देण्यास नकार दिला होता. पाकिस्ताननेही नेमबाजी स्पर्धेतून माघार घेतली आहे. कारण त्यांचे नेमबाज नव्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सराव करण्यात व्यस्त आहेत.

गेल्या वर्षी विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेसाठी पाकिस्तानी नेमबाजांना भारताने व्हिसा दिला नव्हता. त्यामुळे भारताला आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे यजमानपद भूषविण्यापासून निलंबितही करण्यात आले होते. मात्र, नंतर क्रीडा मंत्रालयाने खुलासा केला, की राजकीय मुद्दे खेळाडूंच्या व्हिसात अडचण ठरू नये.

आपल्याच देशात करा सराव

26 फेब्रुवारी 2020: कोरोनाचा धसका घेतलेल्या भारतीय नेमबाजांना भारतीय नेमबाजी महासंघाने (National Rifle Association of India) परदेशात प्रशिक्षण घेण्यास मनाई केली. जर कोरोनाचा प्रभाव कायम राहिला तर टोकियो ऑलिम्पिक चाचणी स्पर्धेतून माघार घेण्यासही मागेपुढे पाहणार असे महासंघाने स्पष्ट केले. भारतीय नेमबाज 16 से 26 एप्रिल 2020 दरम्यान जपानची राजधानी टोकियोत ऑलिम्पिक चाचणी स्पर्धेत भाग घेणार होते. याच ठिकाणी जुलै ते ऑगस्टदरम्यान ऑलिम्पिक स्पर्धाही होणार आहे.

राष्ट्रीय रायफल महासंघाचे रनिंदर सिंह यांनी सांगितले, की आम्ही चाचणी स्पर्धेसाठी संघाची निवड केली आहे. मात्र, आम्ही संघ पाठवणार किंवा नाही यावर निर्णय घेतलेला नाही. आम्ही खेळाडूंना पाठवण्याची जोखीम घेणार नाही. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) किंवा आंतरराष्ट्रीय महासंघाकडून सल्ला मिळाल्यास किंवा आम्हाला काही धोका वाटल्यास आम्ही संघ पाठवण्याची जोखीम अजिबात घेणार नाही. भलेही पदक जिंकण्याची आम्हाला संधी असेल.

कुस्तीच्या यजमानपदाबाबत नापसंती

28 फेब्रुवारी 2020: ज्या उत्साहाने भारताने आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी प्रस्ताव ठेवला होता, तो उत्साह कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मावळला आहे. या स्पर्धेच्या यजमानपदाबाबत भारताने नापसंती दर्शविली आहे.

दोन आशियाई स्क्वॅश स्पर्धा स्थगित

2 मार्च 2020: कोरोना महामारीमुळे मलेशियातील आशियाई टीम चॅम्पियनशिप आणि चीनमधील आशियाई ज्युनिअर वैयक्तिक चॅम्पियनशिप या दोन आशियाई स्पर्धा स्थगित करण्यात आल्या. आशियाई टीम चॅम्पियनशिप 25 से 29 मार्च 2020 दरम्यान मलेशियातील क्वालालंपूरमध्ये, तर आशियाई ज्युनिअर चॅम्पियनशिप चीनमधील क्विंगदाओमध्ये 29 जून ते 4 जुलैदरम्यान होणार होतीआशियाई स्क्वॅश महासंघाच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या दोन्ही स्पर्धांची सुधारित तारीख नंतर जाहीर करण्यात असल्याचे महासंघाने सांगितले.

बेंगलुरू फिबा ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा स्थगित

4 मार्च 2020: फिबा थ्री बाय थ्री FIBA 3×3 | बास्केटबॉल ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा स्थगित करण्यात आली. ही स्पर्धा बेंगलुरू येथे 18 ते 22 मार्चदरम्यान होणार होती. कोरोना विषाणूच्या संसर्गानंतर भारतातील ही पहिली बास्केटबॉल स्पर्धा आहे, जी स्थगित करण्यात आली. जगभरात 4 मार्चपर्यंत 94 हजार लोकांना कोरोना संसर्ग झाला होता.

यात तीन हजारावर लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल महासंघाने (फीबा) International Basketball Federation | FIBA | ही स्पर्धाच स्थगित करण्याचा निर्णय घेतलाया स्पर्धेत पुरुष आणि महिला गटातील स्पर्धांमध्ये प्रत्येकी 20 संघ सहभागी होणार होते. यातील सहा संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणार होते. बास्केटबॉलचा थ्री बाय थ्री हा क्रीडा प्रकार प्रथमच ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करणार आहे.

जागतिक नेमबाजी स्पर्धा स्थगित

6 मार्च 2020: नवी दिल्ली येथे 15 ते 25 मार्च रोजी होणारी विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धा (World Shooting Championship 2020) 6 मार्च रोजी स्थगित करण्यात आली. आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या (आयएसएसएफ) मान्यतेने होणारी ही स्पर्धा नवी दिल्ली येथील के. डी. कर्णी सिंह शूटिंग रेंजवर होणार होती. त्याचबरोबर 16 एप्रिल 2020 पासून सुरू होणारी ऑलिम्पिक निवड चाचणी स्पर्धाही रद्द करण्यात आली आहे. भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेच्या (एनआरएआय) अधिकाऱ्याने सांगितले, की ‘‘दिल्ली येथे आता ही स्पर्धा ऑलिम्पिकपूर्वी दोन भागांत आयोजित केली जाईल. त्याची तारीखही लवकरच जाहीर केली जाईल.’’ कोरोना विषाणूचा संसर्गाचा प्रकोप असलेले चीन, इटली, दक्षिण कोरिया, जपान आणि इराण या देशांतील प्रवाशांना भारतात प्रवेशबंदी केली आहे. त्यामुळे 22 देशांचा सहभाग असलेली ही स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भारताचा पात्रता फेरीतला फुटबॉल सामना स्थगित

7 मार्च 2020: भारताचा 26 मार्च रोजी कतारविरुद्ध होणारा फिफा विश्वकरंडक फुटबॉल पात्रता सामना स्थगित करण्यात आला आहे. आशियाई चॅम्पियन असलेल्या कतार संघाविरुद्ध भुवनेश्वर येथे हा सामना होणार होता. मात्र कोरोना विषाणूंच्या प्रकोपामुळे हा सामना रद्द करण्यात आला असून, लवकरच पुढची तारीख जाहीर करण्यात येईल, अशी माहिती अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) महासचिव कुशाल दास यांनी दिलीभारताने आतापर्यंत एकही पात्रता सामना जिंकलेला नाही. त्यामुळे तो 2022 मध्ये होणाऱ्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

स्थगित झालेल्या स्थानिक स्पर्धा

बुद्धिबळ :

  • सर्व राष्ट्रीय स्पर्धा 31 मेपर्यंत स्थगित

क्रिकेट :

  • इंडियन प्रीमियर लीग 15 एप्रिलपर्यंत स्थगित.
  • भारत और दक्षिण आफ्रिकेदरम्यान होणारा दुसरा आणि तिसरा वनडे सामना रद्द
  • सर्वच स्थानिक क्रिकेट स्पर्धा स्थगित
  • मुंबई आणि पुण्यात ७ ते २२ मार्चपर्यंत होणारी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजही रद्द

गोल्फ :

  • नवी दिल्ली येथे 19 ते 22 मार्चपर्यंत होणारा इंडिया ओपन स्पर्धा स्थगित
  • भारतीय व्यावसायिक गोल्फ टूरच्या (पीजीटीआय) सर्व स्पर्धा 16 मार्चपासून अनिश्चित काळासाठी स्थगित

मोटरस्पोर्ट्स :

  • एफआयए आशिया पॅसेफिक चॅम्पियनशिपच्या सुरुवातीच्या काळात होणारी साउथ इंडिया रॅली चेन्नईमध्ये 20 ते 22 मार्चदरम्यान प्रेक्षकांविना घेण्याचा निर्णय

टेनिस :

  • सर्वच स्थानिक टेनिस स्पर्धा रद्द

एआयएफएफकडून सर्वच फुटबॉल स्पर्धा ३१ मार्चपर्यंत स्थगित

14 मार्च 2020: खिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) कोविड-19 महामारीमुळे १४ मार्च रोजी आय लीगसह सर्वच स्पर्धा ३१ मार्चपर्यंत स्थगित केल्या आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशभरात गर्दी करणारे सर्वच कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना सरकारने केल्या आहेत.

इंडिया ओपन बॅडमिंटन स्थगित

14 मार्च 2020: इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धा 12 एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. कारण जागतिक बॅडमिंटन महासंघाने (बीडब्लूएफ) 16 मार्च ते 12 एप्रिलदरम्यान होणाऱ्या जगभरातील सर्वच स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थगित करण्यात आलेल्या या स्पर्धांमध्ये योनेक्स स्विस ओपन 2020, योनेक्स सनराइज इंडिया ओपन 2020, ओरलियान्स मास्टर्स 2020, सेलकोम एक्सियाटा मलेशिया ओपन 2020 आणि सिंगापूर ओपन 2020, तसेच अंतरराष्ट्रीय ग्रेड थ्री स्पर्धेचाही समावेश असल्याचे बीडब्लूएफने स्पष्ट केले आहे.

बीसीसीआयने इराणी कपसह सर्वच सामने केले स्थगित

14 मार्च 2020: बीसीसीआयने कोविड-19 महामारीमुळे शेष भारत आणि रणजी स्पर्धा, सौराष्ट्राविरुद्ध होणाऱ्या इराणी कपसह सर्वच स्थानिक क्रिकेट स्पर्धा स्थगित केल्या आहेत. विज्जी ट्रॉफी, सीनियर महिला एकदिवसीय नॉकआउट आणि सीनिअर महिला वनडे चॅलेंजर स्पर्धांचाही यात समावेश आहे.

झारखंड तिरंदाजी चॅम्पियनशिप स्थगित

14 मार्च 2020: कोरोना विषाणूंच्या प्रकोपामुळे झारखंडमध्ये होणारी राज्यस्तरीय तिरंदाजी चॅम्पियनशिप स्थगित करण्यात आली आहे. ही स्पर्धा 27 मार्च ते 31 मार्चपर्यंत जमशेदपूर येथे होणार होती. झारखंड तिरंदाजी संघटनेच्या महासचिव पूर्णिमा महतो यांनी ही माहिती दिली.

एमसीएच्याही स्पर्धा 31 मार्चपर्यंत स्थगित

14 मार्च 2020: महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) आपले सर्वच सामने 31 मार्चपर्यंत स्थगित केले आहेत. एमसीएच्या 14 ते 31 मार्च 2020 दरम्यान होणाऱ्या सर्वच क्रिकेट सामन्यांचा यात समावेश आहे.

क्रीडामंत्र्यांचा ऑलिम्पिक दौरा स्थगित

15 मार्च 2020: क्रीडामंत्री किरेन रिजिजू आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या प्रमुख अधिकाऱ्यांसह मार्चअखेरीस टोकियो ऑलिम्पिक दौरा होणार होता. मात्र, कोविड-19 महामारीमुळे हा दौरा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. ऑलिम्पिकसाठी भारताच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी 25 ते 29 मार्चदरम्यान हा दौरा होणार होता. या दौऱ्याबाबत पुढच्या तारखेबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

हॉकी इंडियाने सर्वच स्पर्धा केल्या स्थगित

16 मार्च 2020: कोविड 19 महामारीमुळे हॉकी इंडियाने 10 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या सर्वच ज्युनिअर आणि सबज्युनिअर राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा स्थगित केल्या आहेत. हॉकी इंडिया च्या कार्यकारी मंडळाने हा निर्णय घेतला.

राष्ट्रीय चॅम्पियनशिपच्या नव्या तारखा पुढीलप्रमाणे :

क्र. स्पर्धा सुधारित तारखा
1 दहावी हॉकी इंडिया ज्युनिअर महिला चॅम्पियनशिप 2020 (बी डिव्हिजन) रांची येथे 10 ते 20 एप्रिलऐवजी 29 एप्रिल ते ९ मे 2020 पर्यंत
2 दहावी हॉकी इंडिया ज्युनिअर राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2020 (बी डिव्हिजन) चेन्नई येथे 15 से 26 एप्रिलऐवजी 14 ते 21 मे 2020 दरम्यान
3 दहावी हॉकी इंडिया सबज्युनिअर राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2020 (बी डिव्हिजन) हिसार येथे 13 से 24 एप्रिलऐवजी तीन ते 14 मे 2020 दरम्यान
4 दहावी हॉकी इंडिया ज्युनिअर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2020 (ए डिव्हिजन) चेन्नई येथे 10 ते 17 एप्रिलऐवजी 19 ते 30 मे 2020 दरम्यान
5 दहावी हॉकी इंडिया ज्युनिअर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप (ए डिव्हिजन) रांची येथे 18 से 28 एप्रिलऐवजी सात ते 17 मे 2020 दरम्यान
6 दहावी हॉकी इंडिया सबज्युनिअर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप (ए डिव्हिजन) हिसार येथे 22 एप्रिल ते तीन मेऐवजी 12 ते 23 मे 2002 दरम्यान
7 दहावी हॉकी इंडिया सबज्युनिअर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप (बी डिव्हिजन)  इम्फाळ येथे 26 एप्रिल ते तीन मेऐवजी 28 मे ते चार जून 2020 दरम्यान
8 दहावी हॉकी इंडिया सबज्युनिअर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप (ए डिव्हिजन) इम्फाळ येथे 7 ते 17 मेऐवजी तीन ते 13 जून 2020 दरम्यान

चेन्नई सिटीचे एएफसी कप सामने स्थगित

18 मार्च 2020: आय लीग टीम चेन्नई सिटी एफसीचे पुढचे दोन्ही सामने निर्धारित कार्यक्रमानुसार आता होणार नाहीत. कारण आशियाई फुटबॉल महासंघाने आशिया खंडातील सर्वच स्पर्धा एप्रिलअखेरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नई सिटीला एप्रिलमध्ये मालदीवच्या टीसी स्पोर्ट्स क्लबशी खेळायचे होते, तर 29 एप्रिल 2020 रोजी बांग्लादेशी क्लबशीही खेळायचे होते. मात्र आता हे सामने रद्द करण्यात आले आहेत.

15 एप्रिलपर्यंत स्पर्धा न घेण्याच्या क्रीडा मंत्रालयाच्या सूचना

19 मार्च 2020: क्रीडा मंत्रालयाने 15 एप्रिलपर्यंत सर्वच राष्ट्रीय महासंघांना स्पर्धा आणि निवड चाचण्या न घेण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच ऑलिम्पिक जाणाऱ्या संघातील खेळाडूंना इतरांपासून लांब ठेवण्याच्या सूचनाही केल्या आहेत. कोविड-19 महामारीमुळे या सूचना करण्यात आल्या आहेत.

एएफआयकडून इंडियन ग्रां प्री रद्द

19 मार्च 2020: भारतीय अॅथलेटिक्स महासंघाने इंडियन ग्रँड प्रिक्स Indian Grand Prix | रद्द केली आहे. क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय महासंघांना यापूर्वीच निर्देश दिले होते, की 15 एप्रिलपर्यंत कोणतीही स्पर्धा किंवा निवड चाचण्या घेऊ नये. त्यानुसार भारतीय अॅथलेटिक्स महासंघाने हा निर्णय घेतला आहे. ही स्पर्धा 25 मार्च 2020 रोजी पतियाळा येथील एनआयएस स्टेडियमवर होणार होती. एप्रिलमध्ये फेडरेशन कप राष्ट्रीय सीनियर चॅम्पियनशिपही (10 ते 13 एप्रिल) Federation Cup National Senior Athletics Championships 2020 | स्थगित करण्यात आली आहे. ही स्पर्धा टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता स्पर्धा होती.

एएफआयची निवडणूक स्थगित

20 मार्च 2020: भारतीय अॅथलेटिक्स महासंघाने (एएफआय) Athletics Federation Of India | एप्रिलमध्ये जयपूर येथे होणारी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि निवडणूक स्थगित केली आहे. ही बैठक जयपूर येथे 3 ते 5 एप्रिलदरम्यान होणार होती. कोरोना विषाणू संसर्गामुळे सरकारने प्रवासबंदी केली आहे. त्यामुळे भारतीय अॅथलेटिक्स महासंघाच्या सदस्यांना देशातील अनेक राज्यांतून प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे ही निवडणूक रद्द करण्यात आली आहे. पुढची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे महासंघाने स्पष्ट केले आहे.

एएफआयने फेडरेशन कप स्पर्धा पुढे ढकलली

23 मार्च 2020: भारतीय अॅथलेटिक्स महासंघाने (एएफआय) कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या वाढत्या प्रकोपामुळे एप्रिलमध्ये होणारी फेडरेशन कप राष्ट्रीय सीनियर चॅम्पियनशिप स्थगित करण्याची घोषणा केली. एएफआयच्या स्पर्धा समितीने 23 मार्च रोजी हा निर्णय घेतला.

बॅडमिंटन संघटनेचे ‘वर्क फ्रॉम होम’

20 मार्च 2020: भारतीय बॅडमिंटन संघटनेने BAI |कोविड 19 महामारीमुळे आपले कार्यालय २३ मार्चपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बॅडमिंटन संघटनेचे महासचिव अजय के. सिंघानिया यांनी सांगितले, की 31 मार्चपर्यंत आम्ही स्थितीवर लक्ष ठेवून आहोत. संघटनेने वर्क फ्रॉम होम सुरू केले आहे. स्टाफच्या आरोग्य आणि सुरक्षेला आमचे प्राधान्य आहे.

बीडब्लूएफने आणखी पाच स्पर्धा केल्या रद्द

20 मार्च 2020: विश्व बॅडमिंटन महासंघाने आणकी पाच स्पर्धा रद्द केल्या. यात क्रोएशिया इंटरनॅशनल (16 ते 19 एप्रिल), पेरू इंटरनॅशनल (16 ते 19 एप्रिल), युरोपीय चॅम्पियनशिप (21 ते 26 एप्रिल), बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिप (21 ते 26 एप्रिल) आणि पॅन एएम वैयक्तिक चॅम्पियनशिप (23 ते 26 एप्रिल) या स्पर्धांचा समावेश आहे.

कोरोना स्पर्धा स्थगित

जपान : आशियाई चालण्याची स्पर्धा रद्द

2 मार्च 2020: जपानमध्ये 15 मार्च रोजी होणारी आशियाई चालण्याची स्पर्धा रद्द करण्यात आली. कोरोना विषाणू संसर्गाच्या धास्तीमुळे जपान अॅथलेटिक्स महासंघाने केलेल्या विनंतीनंतर आशियाई अॅथलेटिक्स महासंघाने (एएए) Asian Athletics Federation | ही स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला. एएएचे (AAA)| अध्यक्ष दहलान अल हमद यांनी ही माहिती दिली. घातक कोरोना विषाणू संसर्गाच्या धास्तीमुळे यापूर्वी अनेक क्रीडा स्पर्धा रद्द, स्थगित, तसेच स्थानांतरित करण्यात आल्या आहेत. जगभरात 2 मार्चपर्यंत तीन हजारपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, तर रुग्णसंख्या 86 हजारपेक्षा अधिक होती. जपानमध्येच या आजाराचे सुमारे 100 रुग्ण होते.

टोकियो ऑलिम्पिक जिम्नॅस्टिक चाचणी रद्द

18 मार्च 2020: टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजकानी 4 आणि 5 एप्रिल रोजी होणारा जिम्नॅस्टिक टेस्ट टुर्नामेंट रद्द केली आहे. जपान जिम्नॅस्टिक संघाने आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक ऑल अराउंड विश्व करंडक स्पर्धा रद्द केली आहे.

चीन : बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिप आता फिलिपीन्समध्ये

4 मार्च 2020: कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकोपामुळे एप्रिलमध्ये चीनमधील वुहानमध्ये होणारी बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिप आता फिलिपीन्सची राजधानी मनिला येथे होणार आहे. मनिला येथे ही स्पर्धा 21 ते 26 एप्रिलदरम्यान होईल. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे अनेक स्पर्धा स्थगित किंवा रद्द, तसेच स्थानांतरित करण्यात आल्या आहेत. चीनमध्येच 4 मार्चपर्यंत कोरोना संक्रमणामुळे 2900 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळेच ही स्पर्धा स्थानांतरित करण्यात आली आहे.

फ्रान्स : पॅरिस मॅरेथॉन 18 ऑक्टोबरपर्यंत स्थगित

6 मार्च 2020: जगभरातील धावपटूंचे लक्ष लागलेली पॅरिस मॅरेथॉन स्पर्धा 18 ऑक्टोबरपर्यंत स्थगित करावी लागली आहे. ही स्पर्धा 5 एप्रिल रोजी होणार होती. त्यासाठी तब्बल 60 हजार धावपटूंनी नावनोंदणी केली होती. आठ दिवसांपूर्वीच पॅरिसमधील हाफ मॅरेथॉन स्पर्धाही रद्द करण्यात आली होती. कोरोना विषाणूचा प्रकोप वाढत असून, 6 मार्चपर्यंत जगभरातील 3300 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ही स्पर्धा रद्द करावी लागली. आता ही स्पर्धा 18 ऑक्टोबर रोजी होईल.

फ्रेंच ओपनही सप्टेंबरपर्यंत स्थगित

17 मार्च 2020: कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरातील स्पर्धा धडाधड स्थगित होत आहेत. यातून फ्रेंच ओपनसारखी प्रतिष्ठित स्पर्धाही सुटलेली नाही. ही स्पर्धा सप्टेंबरपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. रोलँड गॅरो (Roland Garros 2020) नावाने प्रसिद्ध असलेली ही स्पर्धा आता 20 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरदरम्यान होईल. ही स्पर्धा यापूर्वी 24 मे ते 7 जूनदरम्यान होणार होती. शहरे लॉकडाउन केल्यामुळे स्पर्धेची तयारी करणे अशक्य असल्याचे आयोजकांनी या वेळी स्पष्ट केले.

बोस्टन मॅरेथॉन 14 सप्टेंबरपर्यंत स्थगित

14 मार्च 2020: जगातील सर्वांत लोकप्रिय असलेली ‘बोस्टन मॅरेथॉन’ 14 सप्टेंबरपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. बोस्टनचे महापौर मार्टी वॉल्श यांनी 14 मार्च रोजी ही घोषणा केली. ही स्पर्धा 20 एप्रिल रोजी होणार होती.

डब्ल्यूटीए, एटीपी सात जूनपर्यंत स्थगित

19 मार्च 2020: कोरोना विषाणू संसर्गामुळे सर्वच पुरुष आणि महिला गटातील व्यावसायिक टेनिस स्पर्धा 7 जूनपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. एटीपी (Association of Tennis Professionals)| आणि डब्ल्यूटीएने (Women’s Tennis Association) जाहीर केले, की क्ले कोर्टचे पूर्ण सत्र नियोजित कार्यक्रमानुसार होणार नाही. फ्रेंच ओपनने यापूर्वीच स्पर्धा स्थगित करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर टेनिसविश्वाने सर्वच स्पर्धा स्थगित केल्या आहेत. यात माद्रिद आणि रोम स्पर्धांसह डब्लूटीएची स्ट्रासबोर्ग (फ्रान्स) आणि रबात (मोरोक्को), तसेच एटीपीची म्युनिच, पोर्तुगाल, जिनिव्हा आणि फ्रान्समधील लियोन येथे होणाऱ्या स्पर्धेचाही समावेश आहे. आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने कनिष्ठ श्रेणीच्या स्पर्धाही सात जूनपर्यंत स्थगित केल्या आहेत.

हंगेरी : एआयबीएची सभा पुढे ढकलली

4 मार्च 2020: आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेने (एआयबीए) हंगेरीतील बुडापेस्ट येथे होणारी वार्षिक सभा कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. ही बैठक आता 20 जून 2020 मध्ये होईल. हंगेरी बॉक्सिंग महासंघाने पाठविलेल्या निवेदनावर एआयबीएने हा निर्णय घेतला. यापूर्वी एआयबीएने AIBA | यूरोपीय टप्प्यातील इटलीमध्ये होणारी बैठकही रद्द करण्यात आली होती.

नेपाळ : टी-20 स्पर्धा स्थगित

6 मार्च 2020: नेपाळने टी-20 स्पर्धा स्थगित केली आहे. ख्रिस गेलसह अनेक दिग्गज क्रिकेटपटू या स्पर्धेत खेळणार होते. एव्हरेस्ट प्रीमियर लीग (ईपीएलEverest Premier League T20) म्हणून ओळखली जाणारी ही स्पर्धा 14 मार्च रोजी होणार होती. कोरोना विषाणू संसर्गाच्या धास्तीने हा निर्णय घेण्यात आला. जेव्हा सर्व परिस्थिती पूर्ववत होईल, तेव्हा स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर केला जाईल, असे ईपीएलतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. नेपाळमध्ये अद्याप कोरोना विषाणू संसर्गाचा एकही रुग्ण दाखल झालेला नाही.

उझबेकिस्तान : आशियाई भारतोलन चॅम्पियनशिप स्पर्धा स्थगित

7 मार्च 2020: कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे उझबेकिस्तानमधील ताश्कंदमध्ये 16 ते 26 एप्रिलदरम्यान होणारी आशियाई भारतोलन चॅम्पियनशिप (ऑलिम्पिक क्वालिफाइंग स्पर्धा) स्थगित करण्यात आली आहे. या स्पर्धेत माजी विश्व चॅम्पियन मीराबाई चानूसह इतर आठ भारतीय खेळाडू सहभागी होणार होते. आंतरराष्ट्रीय भारतोलन महासंघाने (आयडब्लूएल) ही माहिती दिली.

पाकिस्तानी खेळाडूंचाही चीनमधून काढता पाय

12 फेब्रुवारी 2020: पाकिस्तानचे पाच खेळाडू चीनमध्ये प्रशिक्षण शिबिरासाठी गेले होते. मात्र, चीनमधील घातक कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे या खेळाडूंनी प्रशिक्षण शिबिर अर्ध्यावरच सोडून माघारी परतण्याचा निर्णय घेतला. हे खेळाडू टोकियो ऑलिम्पिकसह इतर स्पर्धांच्या तयारीसाठी चीनमध्ये प्रशिक्षणासाठी आले होते. कोरोनामुळे चीनला फुटबॉल आणि बॅडमिंटन वर्ल्ड टूर 2020 सारख्या स्पर्धांचे यजमानपद गमवावे लागले. टोकियो ऑलिम्पिकसाठी भालाफेक स्पर्धेत पात्र ठरलेला अर्शद नदीम याने सांगितले, की मला 28 फेब्रुवारीपर्यंत चीनच्या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन घ्यायचे होते. मात्र, कोरोनाचा संसर्ग पसरल्यानंतर चीनमध्ये दहशत आणि भीतीचे वातावरण वाढले आहे. त्यामुळे आम्ही तातडीने माघारी परतण्याचा निर्णय घेतला. अर्शदबरोबर मेहबूब अली, समीउल्लाह, अजीज आर. रहमान, मुहम्मद नईम यांचाही प्रशिक्षण शिबिरात समावेश होता.

बांग्लादेशचा पाकिस्तान दौरा अनिश्चित काळासाठी स्थगित

16 मार्च 2020: पाकिस्तान आणि बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने कराची येथे होणारी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय लढती आणि कसोटी सामने अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. बांग्लादेश एक एप्रिल रोजी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना आणि 5 ते 9 एप्रिलदरम्यान दुसरा आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशिप सामना खेळणार होते. त्यासाठी 29 मार्च 2020 रोजी त्यांचा पाकिस्तान दौरा होता.

कतार : यूरो 2020 का अभ्यास टूर्नामेंट रद्द

12 मार्च 2020: युरोपीय चॅम्पियन पोर्तुगाल, विश्वकप स्पर्धेतील उपविजेता क्रोएशिया, तसेच बेल्जियम आणि स्वित्झर्लंड या संघांमध्ये 26 ते 30 मार्च रोजी कतारमध्ये गोणारी युरो 2020 वॉर्मअप स्पर्धा रद्द करण्यात आली. स्पर्धा रद्द करण्याचे कोणतेही कारण देण्यात आले नाही. मात्र, कोरोना विषाणू संसर्गाच्या धास्तीमुळेच ही स्पर्धा रद्द करण्यात आल्याचे मानले जात आहे. कारण जगभरात एक लाख 24 हजार 101 नागरिक या आजाराने संक्रमित झाले आहेत, तर 4,566 लोकांचा 12 मार्चपर्यंत मृत्यू झाला आहे.

जर्मनी : ऑलिम्पिक बॅडमिंटन पात्रता स्पर्धा स्थगित

27 फेब्रुवारी 2020: कोरोना विषाणूंच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जर्मन ओपन बॅडमिंटन टूर्नामेंटही अडचणीत सापडली आहे, तर पोलिश ओपन बॅडमिंटन स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. या दोन्ही ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा होत्या. जागतिक बॅडमिंटन महासंघाने (बीडब्लूएफ) ३ से ८ मार्चदरम्यान होणारी जर्मन ओपन बॅडमिंटन स्पर्धा स्थगित किंवा रद्द करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. पोलिश ओपन स्थगित करण्यात आली.

जर्मनीइटलीदरम्यान होणारा मैत्रीपूर्ण फुटबॉल सामना रद्द

14 मार्च 2020: जर्मनी आणि इटलीदरम्यान 31 मार्च रोजी होणारा मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना रद्द करण्यात आला आहे. जर्मनीतील बावारिया प्रांतात शंभरपेक्षा अधिक लोकांना जमा होण्यास बंदी घातली आहे. जर सामना स्टेडियममध्ये प्रेक्षकांविना घेतला तरी संघाचे सदस्य, सहयोगी स्टाफ आणि माध्यमांच्या प्रतिनिधींची संख्या शंभरपेक्षा अधिक होते. जर्मनीला स्पेनविरुद्धही 26 मार्च रोजी माद्रिद येथे खेळायचे आहे. मात्र, अद्याप तरी हा सामना अधिकृतपणे रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आलेले नव्हते.

ऑस्ट्रेलियान्यूझीलंड मालिका रद्द

14 मार्च 2020: ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडदरम्यान सुरू असलेली चॅपेलहॅडली वनडे मालिका रद्द करण्यात आली. या मालिकेतील दोन सामने बाकी असतानाच ही स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

शेफिल्ड शील्डची अंतिम सामना रद्द

15 मार्च 2020: ऑस्ट्रेलियातील प्रमुख प्रथम श्रेणी लीग असलेली शेफिल्ड शील्ड स्पर्धा दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच रद्द झाली आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या धास्तीमुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शेफिल्ड शील्ड स्पर्धेचा अंतिम सामना रद्द केला आहे. हा अंतिम सामना न्यू साउथ वेल्स ब्लूज विरुद्ध चॅम्पियन व्हिक्टोरियादरम्यान होणार होता.

ऑस्ट्रेलियात नॅशनल रग्बी लीग स्थगित

23 मार्च 2020: ऑस्ट्रेलियात होणारी नॅशनल रग्बी लीग (एनआरएल) पुढे ढकलण्यात आली आहे. या स्पर्धेत स्थानिक 16 संघांचा समावेश होता. याआधी ही स्पर्धा प्रेक्षकांविना आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, सरकारने ही स्पर्धा स्थगित करण्याची सूचना केली होती. त्यानंतर ही स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

श्रीलंका : इंग्लंडश्रीलंका कसोटी मालिका रद्द

श्रीलंकेतील गॉलमध्ये 19 मार्च 2020 पासून होणारी दोन कसोटी सामन्यांची मालिका रद्द करण्यात आला. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड संघाला लंडनमध्ये परतावे लागले. कोरोना विषाणू संसर्गाच्या धास्तीमुळे श्रीलंकेने हा निर्णय घेतला. इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूटने श्रीलंकेच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

झिम्बाब्वे : डर्बिशायरने झिम्बाब्वे दौरा अर्थ्यावर सोडला

15 मार्च 2020: टी-20 खेळण्यासाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर आलेल्या डर्बिशायर संघाने कोरोना विषाणूच्या प्रकोपामुळे हा दौरा अर्ध्यावरच सोडत मायदेशी इंग्लंडला परतण्याचा निर्णय घेतला. डर्बिशायरने झिम्बाब्वेतील सिलेक्ट एकादश संघाविरुद्ध एकमेव टी-20 सामना खेळल्यानंतर हा निर्णय घेतला. या सामन्यात डर्बिशायरने 48 धावांनी विजय मिळवला होता.

न्यूझीलंडमध्ये सामुदायिक क्रिकेटही रद्द

18 मार्च 2020: न्यूझीलंडने कोविड19 महामारीच्या धास्तीमुळे क्लब आणि शाळांसह सर्वच सामुदायिक क्रिकेट कार्यक्रम रद्द करण्यात आले. न्यूझीलंड क्रिकेटचे मुख्य कार्यकारी डेव्हिड व्हाइटने न्यूझीलंड क्रिकेटशी संलग्न सर्वच संघटनांना सामुदायिक क्रिकेट रद्द करण्याच्या सूचना केल्या आहेत. यापूर्वीच न्यूझीलंडमध्ये प्लंकेट शील्डचे (Plunket Shield 2020) अखेरचे दोन सामने रद्द केले होते.

कॅमेरून : आफ्रिकन चॅम्पियन करंडक स्पर्धा स्थगित

18 मार्च 2020: कॅमेरूनमध्ये 4 ते 25 एप्रिलपर्यंत होणारी आफ्रिका चॅम्पियन्स नेशन्स करंडक स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित केली आहे. अन्य देशांच्या तुलनेत आफ्रिकन देशांमध्ये कोविड19 ची तीव्रता कमी असली कोणताही अंदाज व्यक्त करणे अशक्य आहे. त्यामुळे ही स्पर्धा रद्द करीत असल्याचे आफ्रिका फुटबॉल महासंघाने स्पष्ट केले आहे.

स्वित्झर्लंड : एफआयएच प्रो लीगच्या स्थगितीत 17 मेपर्यंत वाढ

19 मार्च 2020: आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच International Hockey Federation) कोविड-19 महामारीमुळे प्रो लीगचे सर्व सामन्यांच्या स्थगितीत 17 मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. यातील भारतातील सामन्यांचाही समावेश आहे. एफआयएचने यापूर्वी प्रो लीगचे सामने 15 एप्रिलपर्यंत स्थगित केले होते.

इंग्लंडमध्ये ३० एप्रिलपर्यंत फुटबॉल सामने बंद

19 मार्च 2020: इंग्लंडने प्रीमियर लीग आणि इंग्लिश फुटबॉल लीग (ईएफएल) English Premier League | दरम्यान झालेल्या आपत्कालीन बैठकीत 30 एप्रिलपर्यंत सर्वच फुटबॉल सामने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लिश फुटबॉल संघटना, प्रीमियर लीग, ईएफएल, खेळाडू आणि व्यवस्थापकांच्या संस्थांनी एकत्रितपणे हा निर्णय घेतला आहे.

जागतिक स्नूकर चॅम्पियनशिप स्थगित

20 मार्च 2020: कोरोना विषाणूच्या प्रकोपामुळे जागतिक स्नूकर चॅम्पियनशिप स्पर्धा स्थगित करण्यात आली. ही स्पर्धा 18 एप्रिल रोजी इंग्लंडमध्ये होणार होती. सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, अशी माहिती विश्व स्नूकर टूरतर्फे World Snooker Tour | देण्यात आली.

ईसीबीच्या व्यावसायिक क्रिकेट स्पर्धा स्थगित

21 मार्च 2020: इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने कोविड 19 महामारीमुळे 28 मेपर्यंत सर्व व्यावसायिक क्रिकेट स्पर्धा स्थगित केल्या आहेत. ईसीबीने प्रथम श्रेणी कौंटी संघ, मेरिलबोन क्रिकेट क्लब आणि व्यावसायिक क्रिकेटर संघटनेशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. गेल्या आठवड्यातच इंग्लंडचा श्रीलंका दौराही रद्द करण्यात आला होता. ब्रिटनमध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूचे चार हजार चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत, तर १७७ लोकांचा मृत्यू झाला आहे.

आयर्लंडबांग्लादेश क्रिकेट मालिका स्थगित

21 मार्च 2020: कोरोना विषाणू संसर्गामुळे आयर्लंडबांग्लादेशदरम्यानची सात सामन्यांची क्रिकेट मालिका स्थगित करण्यात आली आहे. या मालिकेत तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने उत्तर आयर्लंडची राजधानी बेलफास्ट येथे होणार होते. उर्वरित चार सामने इंग्लंडमध्ये मेमध्ये होणार होते. मात्र, प्रवासबंदी असल्याने ब्रिटन आणि आयर्लंड सरकारने स्पर्धा न घेण्याचा सल्ला दिला आहे, तसेच गर्दी टाळण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.

डेन्मार्क : थॉमस आणि उबेर कप स्थगित

21 मार्च 2020: बॅडमिंटन विश्व महासंघाने पुरुष आणि महिला गटातील थॉमस आणि उबेर कप स्पर्धा तीन महिन्यांसाठी पुढे ढकलल्या आहेत. या स्पर्धा डेन्मार्कमध्ये होणार होत्यात. डेन्मार्कने या स्पर्धा रद्द करण्याबाबत शिफारीश केल्यानंतर बीडब्लूएफने हा निर्णय घेतला. आता या स्पर्धा 15 ते 23 ऑगस्टदरम्यान डेन्मार्कमधील आरहस aarhus | येथे होतील.

दुबई : आयसीसी कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम

23 मार्च 2020: आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने (आयसीसी) कोरोना विषाणूंच्या वाढत्या संक्रमणामुळे आपल्या बहुतांश कर्मचाऱ्यांना घरात बसूनच काम करण्यास सांगितले आहे. संघटनेचे अध्यक्ष शशांक मनोहर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनू साहनी यांनी हा निर्णय घेतला.

अझरबैजान ग्रँड प्रिक्स स्थगित

23 मार्च 2020: कोरोना महामारीमुळे अझरबैजान ग्रँड प्रिक्स Azerbaijan Grand Prix 2020 | स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे जूनपर्यंत कोणतीही फॉर्म्युला वन रेस होऊ शकणार नाही, हे स्पष्ट झालं आहेअझरबैजान ग्रँड प्रिक्स स्पर्धा बाकू सिटी सर्किंटवर सात जून रोजी होणार होती.

इटलीतील यूरोपीय फोरम रद्द

27 फेब्रुवारी 2020:कोरोनाची बाधा इटलीलाही बसली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने (एआयबीए) यूरोपीय फोरम रद्द केली. त्यामुळे इटलीत सराव सत्रासाठी गेलेल्या भारतीय मुष्टियोद्ध्यांना मायदेशी परतावे लागले.

स्पेनमधील व्यावसायिक फुटबॉल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित

23 मार्च 2020: ला लिगा आणि स्पॅनिश फुटबॉल महासंघाने (आरएफईएफ) स्पेनमध्ये व्यावसायिक फुटबॉल स्पर्धा स्थगित केल्या आहेत. दोन विभागांत ही स्पर्धा होणार होती. मात्र, पहिल्या टप्प्यातील सामने 12 मार्चपासून दोन आठवड्यांसाठी स्थगित करण्यात आली होती. स्पेनमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले दोन हजारपेक्षा अधिक रुग्ण आहेत. इटली, चीननंतर या महामारीचा सर्वांत मोठा फटका स्पेनला बसला आहे.

चीन : मेबँक चॅम्पियनशिप आणि वोल्वो चायना ओपन स्थगित

14 फेब्रुवारी 2020: कोरोना विषाणूमुळे अनेक स्पर्धा चीनला रद्द व स्थगित कराव्या लागल्या, तशा इतर देशांनाही त्याचा फटका बसला आहे. मलेशियातील क्वालालंपूर येथे 16 ते 19 एप्रिलदरम्यान होणारी मेबँक चॅम्पियनशिप गोल्फ Maybank Championship 2020 | स्पर्धा स्थगित करावी लागली. त्यापाठोपाठ चीनमधील गुआंगडोंगमध्ये 20 ते 23 एप्रिलदरम्यान होणारी वोल्वो चायना ओपन Volvo China Open 2020 | स्पर्धाही स्थगित करावी लागली.

बहारीनची नेमबाजीतून माघार

27 फेब्रुवारी 2020: भारतात 15 ते 26 मार्चदरम्यान आयएसएसएफ विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेसाठी दक्षिण कोरिया सहभागी होणार आहे. मात्र, भारत त्यांना व्हिसा देणार का, याबाबत संभ्रम असल्याने दक्षिण कोरियाच्या नेमबाजी महासंघाने भारताला याबाबत विचारणा केली. कोरोनाची बाधा ज्या देशांमध्ये वेगाने पसरली त्यात दक्षिण कोरियाचा समावेश आहे. बहारीनने तर या स्पर्धेतून माघार घेतली आहे. चीन, तैवान, हाँगकाँग, मकाऊ, उत्तर कोरिया और तुर्कमेनिस्तानने तर यापूर्वीच स्पर्धेतून अंग काढून घेतले आहे. इराणबाबतही साशंकता निर्माण झाली आहे. आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी चीनला व्हिसा देण्यास भारताने नकार दिला होता. अशातच दक्षिण कोरियालाही धास्ती आहे, की भारत आपल्यालाही स्पर्धेसाठी व्हिसा नाकारू शकतो. त्यामुळे त्यांना भारतीय नेमबाजी महासंघालाच पत्र लिहून व्हिसा देणार किंवा नाही याबाबत प्रश्न विचारला.

सायप्रसमधून भारताची माघार

28 फेब्रुवारी 2020: सायप्रसमध्ये नियोजित 4 ते 13 मार्च दरम्यानच्या विश्वकप नेमबाजी स्पर्धेतून भारताने माघार घेतली आहे. शॉटगन वर्ल्ड कप आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघाने ISSF | या स्पर्धेला मान्यता दिली होती. भारतीय राष्ट्रीय रायफल संघाने ISSF | सरकारच्या सल्ल्यानुसार या स्पर्धेतून अंग काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूमुळेच या स्पर्धेतून माघार घेतल्याचे भारताने स्पष्ट केले. भारतही 16 से 26 मार्चदरम्यान डॉ. कर्णी सिंह रेंजवर संयुक्त वर्ल्ड कपचे यजमानपद भूषविणार आहे. सायप्रसमध्ये अद्याप कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे वृत्त नाही. मात्र, भारत जोखीम घेण्यास तयार नाही.

Coronavirus sports

[jnews_block_37 first_title=”Read more at” header_text_color=”#008080″ header_line_color=”#008080″ include_category=”80″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!