Coronavirus : टोकियो ऑलिम्पिक अखेर स्थगित
Team kheliyad | Coronavirus sports | Tokyo Olympics 2020
टोकियो ऑलिम्पिक अखेर स्थगित
Team kheliyad | Coronavirus sports | Tokyo Olympics 2020
करोना विषाणू संसर्गाचा वणवा संपूर्ण विश्वात पेटला असताना जपानमध्ये टोकियो ऑलिम्पिकची लगबग सुरू होती. ऑलिम्पिक होणारच, स्थगित करण्याची गरज नाही वगैरे अशा भाबड्या अपेक्षा बाळगणाऱ्या जपानला २४ मार्च रोजी अखेर ही स्पर्धा एक वर्षासाठी पुढे ढकलावी लागली. आता ही स्पर्धा 2021 मध्ये होईल. करोनाच्या विळख्याने संपूर्ण जगच जिथं थबकलं, तिथं टोकियो ऑलिम्पिक कशी टिकाव धरणार? संपूर्ण जगच लॉकडाउन झालेलं असताना अखेर जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयापूर्वी ज्या काही घडामोडी घडल्या, त्या पाहणे महत्त्वाचे आहे…
Team kheliyad | Coronavirus sports | Tokyo Olympics 2020 |
टोकियो ऑलिम्पिक अखेर स्थगित
करोना विषाणू संसर्गाचा वणवा संपूर्ण विश्वात पेटला असताना जपानमध्ये टोकियो ऑलिम्पिकची लगबग सुरू होती. ऑलिम्पिक होणारच, स्थगित करण्याची गरज नाही वगैरे अशा भाबड्या अपेक्षा बाळगणाऱ्या जपानला २४ मार्च रोजी अखेर ही स्पर्धा एक वर्षासाठी पुढे ढकलावी लागली. आता ही स्पर्धा 2021 मध्ये होईल. करोनाच्या विळख्याने संपूर्ण जगच जिथं थबकलं, तिथं टोकियो ऑलिम्पिक कशी टिकाव धरणार? संपूर्ण जगच लॉकडाउन झालेलं असताना अखेर जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयापूर्वी ज्या काही घडामोडी घडल्या, त्या पाहणे महत्त्वाचे आहे…
kheliyad.sports@gmail.com
ऑलिम्पिकवर असे होते करोनाचे सावट
28 फेब्रुवारी ः आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बाक यांनी विश्वास व्यक्त केला, की करोना विषाणूचा धोका असला तरी ऑलिम्पिक स्पर्धा नियोजित कार्यक्रमानुसारच होईल. मात्र, थॉमस बाक यांचे विधान यासाठी महत्त्वपूर्ण आहे, की एक दिवसापूर्वीच त्यांचे सहकारी डिक पाउंड यांनी ऑलिम्पिक स्पर्धा रद्द होण्याची शंका व्यक्त केली होती. करोनाचा संसर्ग जगभर पसरत असताना टोकियो ऑलिम्पिक २४ जुलैपासून आयोजित करण्याची जपानला आशा होती. जपानमध्येच 28 फेब्रुवारीपर्यंत करोनाचे २०० संशयित सापडले आहेत. चार जणांचा मृत्यू झाला होता. आता रुग्णांची संख्या पाच पट झाली आहे. पंतप्रधान शिंजो आबे यांनी २ मार्चपासून बारावीपर्यंतच्या शाळा बंद करण्याचा आदेशही दिला. त्याच वेळी या स्पर्धेबाबत शंकेची पाल चुकचुकली. जपानने ऑलिम्पिकच्या तयारीसाठी आतापर्यंत 12.6 अरब डॉलर (सुमारे ९० हजार कोटी) खर्च केले आहेत. ही स्पर्धा टाळली किंवा रद्द झाली तर त्याचा खेळाडूंवर गंभीर परिणाम होऊ शकतो. कारण त्यांनी या स्पर्धेसाठी जी तयारी केली आहे, ती सगळीच वाया जाणार होती. Team kheliyad | Coronavirus sports | Tokyo Olympics 2020
खेळाडूंची सुरक्षा
जपानच्या ‘क्योदो’ या न्यूज एजन्सीला आयओसीच्या अध्यक्षांनी सांगितले, की खेळाडूंची सुरक्षा सर्वांत महत्त्वाची आहे. त्यासाठीच आम्ही जपान आणि चीन सरकारबरोबरच जागतिक आरोग्य संघटनेशीही चर्चा करीत आहोत. जपान मात्र नियोजित कार्यक्रमांनुसारच टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा व्हावी यासाठी आग्रही आहे. मात्र, त्यांनी आयओसीचे सदस्य डिक पाउंड यांनी स्पर्धा रद्द करण्याबाबत जे वक्तव्य केले होते, त्यावर कोणतेही भाष्य करणे टाळले.
दोनच पर्याय होते शिल्लक
जर करोनाचा संसर्ग नियंत्रणात आला नाही तर टोकियो ऑलिम्पिकचे काय होईल, असा प्रश्न ऐरणीवर आला. अशा वेळी दोनच पर्याय जपान आणि आयओसीसमोर होते- १. ऑलिम्पिक स्पर्धेची तारीख पुढे ढकलणे. २. स्पर्धाच रद्द करणे. मात्र, प्रसारमाध्यमांशी बोलताना आयओसीचे सदस्य डिक पाउंड यांनी पवित्रा बदलत हे दोन्ही पर्याय धुडकावले होते. असा निर्णय घेणे खूप कठीण होईल. कारण यात आर्थिक आणि मानवी नुकसान मोठे असेल.
Team kheliyad | Coronavirus sports | Tokyo Olympics 2020
स्पर्धा टाळणे का आहे कठीण?
जर ऑलिम्पिक स्पर्धा होणार असेल तर त्या वेळी जगभरात कोणतीही मोठी स्पर्धा होत नाही. आयओसीसह सर्व क्रीडा महासंघ ऑलिम्पिकच्या कार्यक्रमांना अनुसरूनच स्पर्धा आयोजित करीत असतात. हेतू हाच, की जगातील सर्वोत्तम खेळाडू यात सहभागी व्हावा. प्रसार यंत्रणा, प्रायोजकांनीही यात प्रचंड पैसा ओतलेला असतो. जर ऑलिम्पिक स्पर्धाच झाली नाही तर एकही स्पर्धा होऊ शकणार नाही. केवळ फुटबॉल, बास्केटबॉल आणि बेसबॉल स्पर्धाच सुरू राहू शकतात.
बी प्लॅन असेल का?
ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पर्यायी यजमान नसतो. कारण त्यासाठी ज्या सुविधा, खर्च करावा लागतो, तेवढी तयारी कोणताही देश एका रात्रीत करू शकत नाही. त्यामुळे जगातील सर्वांत मोठा क्रीडाकुंभ म्हणून ओळखली जाणारी ऑलिम्पिक स्पर्धा अन्य देशांत वा शहरांत होऊ शकत नाही. त्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धेसाठी कोणताही पर्याय उपलब्ध होत नाही.
Team kheliyad | Coronavirus sports | Tokyo Olympics 2020
आर्थिक नुकसान किती?
२०१६ पासून आतापर्यंत आयओसीने टोकियो ऑलिम्पिक २०२० साठी ५.७ अरब डॉलर (म्हणजे ४० हजार ४७० कोटी रुपए) महसूल गोळा केला आहे. यातील ७३ टक्के भाग केवळ प्रसारमाध्यमांना विकलेल्या हक्कांतून आलेला आहे. उर्वरित २७ टक्के निधी प्रायोजकांकडून मिळालेला आहे. जर ही स्पर्धाच रद्द झाली तर आयओसीला ही संपूर्ण रक्कम परत करावी लागणार आहे. एवढेच नाही, तर आयओसीने जगभरातील खेळाडूंसाठी शिष्यवृत्ती, शिक्षण कार्यक्रमांमबरोबरच क्रीडा महासंघाकडून जो निधी गोळा केला आहे, तोही परत करावा लागणार आहे.
यजमान जपानचे काय होणार?
टोकियो ऑलिम्पिक २०२० चे यजमानपद जपानकडे आहे. अधिकृत आकड्यांनुसार, जपानने या स्पर्धेच्या तयारीसाठी १२.६ अरब डॉलर खर्च केले आहेत. एकूण खर्च दुपटीपेक्षा अधिक असू शकेल. अशातच डिक पाउंड यांनी स्पर्धा रद्द होण्याची शंका व्यक्त केल्याने जपानची सर्वांत मोठी एजन्सी ‘देंत्सू’चे शेअर सात वर्षांत पहिल्यांदाच नीचांकी स्तरावर कोसळले आहेत. Team kheliyad | Coronavirus sports | Tokyo Olympic 2020
काय म्हणताहेत यजमान?
ऑलिम्पिकवर परिणाम नाही : आबे
३ फेब्रुवारी ः करोना विषाणूचा ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेवर कोणताही
परिणाम होणार नाही. हे विधान अशा वेळी आलं, ज्या वेळी चीनमध्ये करोना विषाणूने ३६० लोक मृत्युमुखी पडले होते, तर १७ हजारपेक्षा अधिक लोकांना या विषाणूने जर्जर केले होते. आबे म्हणाले, की जागतिक आरोग्य संघटनेसह World Health Organisation | अन्य आंतरराष्ट्रीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन आम्ही त्यावर तातडीने उपाययोजना करीत आहोत. आठवडाभरात या विषाणूचा संसर्ग रोखण्याचा प्रयत्न करू.
ऑलिम्पिक रद्द करणे ‘अकल्पनीय’ ः टोकियोच्या गव्हर्नर
12 मार्च ः टोकियो शहराचे गव्हर्नर यूरिको कोइके Yuriko Koike | यांच्यावर
ऑलिम्पिकच्या तयारीची जबाबदारी महत्त्वाची आहे. मात्र, जेव्हा करोना विषाणूच्या संसर्गामुळे ऑलिम्पिक रद्द करण्याच्या चर्चा झडू लागल्या तेव्हा त्या म्हणाल्या, की ऑलिम्पिक रद्द करणे ‘अकल्पनीय’ आहे. मात्र, करोना विषाणूच्या संसर्गाला महामारी जाहीर केल्याने इतर खेळांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता अधिक आहे.
Yuriko Koike
युरिको म्हणाल्या, ‘‘आपण असं नाही म्हणू शकत, की महामारी जाहीर केल्याने काही परिणाम होणार नाही. मात्र, मला वाटतं, की ऑलिम्पिक रद्द करण्याची कल्पनाही करू शकत नाही.’’ Team kheliyad | Coronavirus sports | Tokyo Olympics 2020
सातत्याने असे अंदाज बांधले जात आहे, की ऑलिम्पिक नियोजित २४ जुलै ते ९ ऑगस्टदरम्यान होऊ शकत नाही. आयोजकांनी तर दावा केला आहे, की नियोजनाप्रमाणेच स्पर्धा होतील. मात्र, अंतिम निर्णय ऑलिम्पिक समितीच (आईओसी) घेऊ शकेल. अद्याप तरी त्यांनी रद्द वा स्थगित करण्याबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही. Team kheliyad | Coronavirus sports | Tokyo Olympics 2020
Shinzo Abe
ऑलिम्पिकचे आयोजन नियोजनानुसारच ः आबे
14 मार्च ः करोना विषाणूच्या संसर्गामुळे ऑलिम्पिक कार्यक्रमात बदल करण्याबाबत दबाव वाढत असताना जपानचे पंतप्रधान शिंजो आबे Shinzo Abe | यांनी स्पर्धा नियोजनानुसारच होतील, याचा पुनरुच्चार केला.
जगभरात 14 मार्चपर्यंत जगभरात एक लाख 40 हजारपेक्षा अधिक लोकांना संसर्ग झाला आहे, तर 5,400 लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा स्थितीतही आबे म्हणाले, की या विषाणूंमुळे ‘आपात्कालीन स्थिती’ जाहीर करण्याची आमची अजिबात इच्छा नाही. जपानच्या योजनेनुसार या स्पर्धेचे यजमानपद जुलैतच करू.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले होते, की करोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार पाहता, ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्षासाठी स्थगित करायला हवी. मात्र, आबे यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले, की ‘‘आम्ही ऑलिम्पिक समितीसह संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतरच उत्तर देऊ.’’
आबे म्हणाले, ‘‘आम्ही करोनावर नियंत्रण मिळवून कोणत्याही अडचणींशिवाय ही स्पर्धा आयोजित करण्याचा प्रयत्न करू.’’ आयोजक, जपान सरकारचे अधिकारी आणि आयओसीने सांगितले, की तयारी योग्य दिशेने सुरू आहे आणि अशा स्थितीत स्पर्धा स्थगित किंवा रद्द केली जाणार नाही. ट्रम्प यांनी सल्ला दिल्यानंतर आबे यांनी त्यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. मात्र, स्पर्धा स्थगित करण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. जपानमध्ये 14 मार्च 2020 पर्यंत सातशेपेक्षा अधिक लोकांना करोनाचा संसर्ग झाला असून, 21 लोकांचा यात मृत्यू झाला आहे.
आयओसीला काय वाटते?
प्रश्नावलीतून आयओसी घेणार कानोसा
22 मार्च ः जगभरातील खेळाडू, नागरिकांच्या वाढत्या दबावामुळे अखेर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला Internationa Olympic committee | जाग आली आहे. खेळाडूंच्या तयारीवर करोना विषाणू संसर्गाचा काय परिणाम झाला आहे, याची माहिती आपल्या सदस्य देशांना ते विचारत आहे.
आयओसीने IOC | एक प्रश्नावली तयार केली आहे. या प्रश्नावलीचे शीर्षक आहे, ‘कोविड-19 आणि टोकियो 2020 ऑलिम्पिक खेळांसाठी तयारी’. या प्रश्नावलीत आयओसीने आपल्या सदस्य देशांतील ऑलिम्पिक समितीला विचारले आहे, की ‘कोविड-19 शी संबंधित आपत्कालीन दिशानिर्देश आपल्या खेळाडूंच्या प्रशिक्षण आणि सरावावर कसे मर्यादित करीत आहे? अमेरिकेच्या जलतरण महासंघाने टोकियो ऑलिम्पिक रद्द करण्याची जाहीरपणे मागणी केल्यानंतर आयओसीवर दबाव वाढला आहे. प्रश्नावलीत सराव शिबिरे बदलणे किंवा ते स्थानांतरित करण्याच्या शक्यतेबाबत विचारले आहे. आयओसी प्रश्नावली तर भरून घेत आहे, पण त्यातून मिळालेल्या उत्तरांचं ते नेमके काय करणार आहे, हे आयओसीने स्पष्ट केलेले नाही.
Toshiro Muto
ऑलिम्पिकला धोका नाही
६ फेब्रुवारी ः करोना विषाणूचा संसर्ग फैलावत असतानाही टोकियो २०२० ऑलिम्पिक
निर्धारित कार्यक्रमांनुसारच होईल, असे जपानला वारंवार सांगावे लागत होते. ऑलिम्पिक समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तोशिरो मुटो Toshiro Muto | यांनी सांगितले, की यजमानांनी करोनाचा सामना करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. त्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धा निर्धारित कार्यक्रमानुसारच होईल. मात्र, लोकांनी या विषाणूची इतकी भीती घातली आहे, की या आजारापेक्षा अफवाच अधिक वेगाने फैलावत असल्याचे ते म्हणाले.
तरीही ऑलिम्पिक रद्द करणार नाही…
14 फेब्रुवारी ः जागतिक आरोग्य संघटनेने ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करा किंवा दुसरीकडे घेण्याचे निर्देश दिले होते. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती International Olympic commitee | अशा सूचना जारी करेल, की ज्यामुळे चीनमधून आलेल्या खेळाडूंशी संपर्क आला तरी कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. आयओसीचे IOC | सदस्य जॉन कोट्स यांनी सांगितले, की जागतिक आरोग्य संघटनेने स्पर्धा रद्द करण्याबाबत किंवा स्थानांतर करण्याबाबत आम्हाला जे निर्देश दिले आहेत, त्यावर कोणतीही आकस्मिक योजना तयार केली नाही. कारण चीनमधून सहाशेवर खेळाडू जपानमध्ये दाखल होतील. यातील अनेक खेळाडू चीनबाहेर आहेत. त्यामुळे चीनच्या खेळाडूंबाबत चिंता करण्याची आवश्यकता नसल्याचे कोट्स यांनी सांगितले.
कटू निर्णय घेण्याची ही वेळ नाही ः आयओसी
१७ मार्च ः करोनाचे संकट असले तरी टोकियो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक रद्द वा स्थगित करण्याचा कोणताही कटू निर्णय घेण्याची ही वेळ नाही, असे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) स्पष्ट केले. समितीच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत आयओसीने हा खुलासा केला. ‘आयओसी टोकियो ऑलिम्पिक 2020 आयोजित करण्याबाबत वचनबद्ध आहे. अद्याप या स्पर्धेलाच चार महिने बाकी आहेत. त्यामुळे आताच यावर कोणताही निर्णय घेणे चुकीचे ठरेल,’ असे स्पष्ट करीत आयओसीने यजमान जपानला जोरदार समर्थन दिले आहे.
ऑलिम्पिकवर असे होते करोनाचे सावट
खेळाडूंची सुरक्षा
दोनच पर्याय होते शिल्लक
स्पर्धा टाळणे का आहे कठीण?
बी प्लॅन असेल का?
Team kheliyad | Coronavirus sports | Tokyo Olympics 2020 |
आर्थिक नुकसान किती?
यजमान जपानचे काय होणार?
काय म्हणताहेत यजमान?
ऑलिम्पिकवर परिणाम नाही : आबे
परिणाम होणार नाही. हे विधान अशा वेळी आलं, ज्या वेळी चीनमध्ये करोना विषाणूने ३६० लोक मृत्युमुखी पडले होते, तर १७ हजारपेक्षा अधिक लोकांना या विषाणूने जर्जर केले होते. आबे म्हणाले, की जागतिक आरोग्य संघटनेसह World Health Organisation | अन्य आंतरराष्ट्रीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन आम्ही त्यावर तातडीने उपाययोजना करीत आहोत. आठवडाभरात या विषाणूचा संसर्ग रोखण्याचा प्रयत्न करू.
ऑलिम्पिक रद्द करणे ‘अकल्पनीय’ ः टोकियोच्या गव्हर्नर
ऑलिम्पिकच्या तयारीची जबाबदारी महत्त्वाची आहे. मात्र, जेव्हा करोना विषाणूच्या संसर्गामुळे ऑलिम्पिक रद्द करण्याच्या चर्चा झडू लागल्या तेव्हा त्या म्हणाल्या, की ऑलिम्पिक रद्द करणे ‘अकल्पनीय’ आहे. मात्र, करोना विषाणूच्या संसर्गाला महामारी जाहीर केल्याने इतर खेळांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता अधिक आहे.
Yuriko Koike
|
Shinzo Abe |
आयओसीला काय वाटते?
प्रश्नावलीतून आयओसी घेणार कानोसा
22 मार्च ः जगभरातील खेळाडू, नागरिकांच्या वाढत्या दबावामुळे अखेर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला Internationa Olympic committee | जाग आली आहे. खेळाडूंच्या तयारीवर करोना विषाणू संसर्गाचा काय परिणाम झाला आहे, याची माहिती आपल्या सदस्य देशांना ते विचारत आहे.
आयओसीने IOC | एक प्रश्नावली तयार केली आहे. या प्रश्नावलीचे शीर्षक आहे, ‘कोविड-19 आणि टोकियो 2020 ऑलिम्पिक खेळांसाठी तयारी’. या प्रश्नावलीत आयओसीने आपल्या सदस्य देशांतील ऑलिम्पिक समितीला विचारले आहे, की ‘कोविड-19 शी संबंधित आपत्कालीन दिशानिर्देश आपल्या खेळाडूंच्या प्रशिक्षण आणि सरावावर कसे मर्यादित करीत आहे? अमेरिकेच्या जलतरण महासंघाने टोकियो ऑलिम्पिक रद्द करण्याची जाहीरपणे मागणी केल्यानंतर आयओसीवर दबाव वाढला आहे. प्रश्नावलीत सराव शिबिरे बदलणे किंवा ते स्थानांतरित करण्याच्या शक्यतेबाबत विचारले आहे. आयओसी प्रश्नावली तर भरून घेत आहे, पण त्यातून मिळालेल्या उत्तरांचं ते नेमके काय करणार आहे, हे आयओसीने स्पष्ट केलेले नाही.
Toshiro Muto |
ऑलिम्पिकला धोका नाही
निर्धारित कार्यक्रमांनुसारच होईल, असे जपानला वारंवार सांगावे लागत होते. ऑलिम्पिक समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तोशिरो मुटो Toshiro Muto | यांनी सांगितले, की यजमानांनी करोनाचा सामना करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. त्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धा निर्धारित कार्यक्रमानुसारच होईल. मात्र, लोकांनी या विषाणूची इतकी भीती घातली आहे, की या आजारापेक्षा अफवाच अधिक वेगाने फैलावत असल्याचे ते म्हणाले.
तरीही ऑलिम्पिक रद्द करणार नाही…
कटू निर्णय घेण्याची ही वेळ नाही ः आयओसी
जगाला काय वाटत होते?
ऑलिम्पिक स्थगित करा ः अमेरिका, फ्रान्सच्या जलतरणपटूंची मागणी
21 मार्च ः ऑलिम्पिक होण्याची अपेक्षा बाळगणारा यजमान जपान आणि स्थगितीबाबत कोणताही निर्णय न घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला अखेर आपला पवित्रा बदलावा लागण्याची चिन्हे आहेत. कारण जगभरातून आता ही स्पर्धा स्थगित करण्याची मागणी जोर धरत आहे. अमेरिका व फ्रान्समधील जलतरण महासंघाने ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक समितीला टोकियो ऑलिम्पिक २०२० Tokyo Olympics 2020 | स्थगित करण्याची मागणी केली आहे. अमेरिकी ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सारा हिर्शलँड यांना अमेरिकन जलतरण महासंघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम हिंचे यांनी पत्र पाठविले असून, त्यात नमूद केले आहे, की करोना विषाणूच्या संसर्गामुळे टोकियो ऑलिम्पिक एक वर्षासाठी स्थगित करावी. अमेरिकन जलतरण महासंघाने हे पत्र ट्विटरवरही पोस्ट केले आहे. जलतरण प्रशिक्षक बॉब बोमॅन यांनीही ऑलिम्पिक स्थगित करण्याच्या मागणीचे समर्थन केले आहे. बॉब बोमॅन ऑलिम्पिकमध्ये 28 पदके जिंकणाऱ्या मायकेल फेल्प्सचे प्रशिक्षक आहेत.
फ्रान्सच्या जलतरण महासंघाने आपल्या कार्यकारी समितीसोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये म्हंटले आहे, की ‘‘सध्याची स्थिती ऑलिम्पिक आयोजनासाठी अनुकूल नाही. त्यामुळे ती स्थगित करण्यावर विचार व्हावा.’’
करोनावर नियंत्रण मिळविल्याशिवाय ऑलिम्पिक होऊ नये : नार्वे
ऑलिम्पिक स्थगित करा ः ग्लोबल अॅथलीट
22 मार्च ः करोना विषाणूचा संसर्ग (कोविड १९) जोपर्यंत नियंत्रणात येत नाही तोपर्यंत टोकियो ऑलिम्पिक स्थगित करण्यात यावी, असे आवाहन ऑलिम्पिकच्या संभाव्य खेळाडूंचा समूह असलेल्या ‘ग्लोबल एथलीट’ने Global Athlete | केला आहे. ग्लोबल अॅथलीटने याबाबत 22 मार्च रोजी एक पत्रकच काढले आहे. संपूर्ण विश्व कोविड 19 चा संसर्ग रोखण्यासाठी एकजूट झाला आहे. आयओसीनेही आता आपला पवित्रा बदलायला हवा, असे पत्रकात नमूद केले आहे. ऑलिम्पिकच्या संभाव्य खेळाडूंची ही एकजूट अशा खेळाडूंचे समर्थन करते, ज्यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) सध्याच्या पवित्र्याविरुद्ध आवाज उठवला होता. आयओसी आता जागतिक आरोग्य संघटनेचा सल्ला घेत आहे आणि तरीही कोणताही निर्णय घेणे घाईचे ठरेल, असाच पवित्रा वारंवार घेत आहे. आयर्लंडचे ग्लोबल अॅथलीटचे संस्थापक कराड ओ डोनोवान यांनी सांगितले, ‘‘हे आश्चर्यकारक आहे, की अद्याप आयओसीने कोणतेही नेतृत्वकौशल्य दाखवलेले नाही. त्यांना अजूनही सामान्य स्थिती वाटत आहे.’’
आईओसीवर वाढला दबाव
22 मार्च ः अमेरिकेतील प्रभावशाली ट्रॅक अँड फिल्ड महासंघानेही ऑलिम्पिक स्थगित करण्याचा आग्रह धरला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीवर (आयओसी) टोकियो ऑलिम्पिक 2020 टाळण्याचा दबाव आता वाढत आहे.
अमेरिकेच्या ट्रॅक अँड फिल्ड महासंघाचे (यूएसएटीएफ) अध्यक्ष मॅक्स सीगल यांनी आपल्या पत्रात ‘सन्मानपूर्वक आग्रह’ केला आहे, की अमेरिकी ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक समितीने (यूएसओपीसी) ऑलिम्पिक स्थगित करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. यूएसओपीसीने सांगितले, की 24 जुलै ते 9 ऑगस्टदरम्यान होणारे ऑलिम्पिक खेळ स्थगित करणे घाईचे होईल. आयओसीचे प्रमुख थॉमस बाक यांनीही यापूर्वी असेच विधान केले होते. सीगल यांनी पत्रात नमूद केले आहे, की ‘‘कोणत्याही परिस्थितीत आरोग्य आणि सुरक्षेला प्राधान्य देणे योग्य आणि जबाबदारीचे पाऊल ठरते. करोनाच्या संकटकाळामुळे खेळाडू आणि ऑलिम्पिकच्या तयारीवर परिणाम होत आहेत.’’
स्पेनच्या अॅथलेटिक्स महासंघानेही ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. त्यांनी त्याबाबत एक पत्रकही काढले आहे. ब्रिटन अॅथलेटिक्स महासंघानेही ऑलिम्पिकच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेची काय होती भूमिका?
ऑलिम्पिक आयोजन एक जोखीम
19 फेब्रुवारी ः करोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने संपूर्ण विश्वाला गिळंकृत पाहत असतानाही जपानने ऑलिम्पिक स्पर्धा नियोजित तारखेप्रमाणेच घेण्याचा अट्टहास कायम ठेवला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने स्पर्धा रद्द करण्याबाबत किंवा स्थानांतर करण्याबाबत निर्देश दिल्यानंतरही जपानचा हेका कायम होता. त्यावर जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख अधिकारी म्हणाले, की चीनमध्ये करोना विषाणूचा संसर्ग फैलावत असताना टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेची जोखीम घेणे किंवा आयोजन रद्द करणे घाईचे ठरू शकते. आरोग्य संघटनेने जपानला वारंवार निर्देश दिले, की तुमच्याकडे २४ जुलै ते ९ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी कोणतीही आकस्मिक योजना नाही. संयुक्त राष्ट्राचे आपत्कालीन कार्यक्रमांचे निदेशक मायकेल रयान यांनी आरोग्य संघटनेच्या मुख्यालयात पत्रकारांना सांगितले, की ‘‘ऑलिम्पिक अजून खूप लांब आहे. जपानला आम्ही निर्णय सांगितला नाही, तर धोक्याची सूचना दिली आहे. चीननंतर जपानमध्येही या विषाणूंचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरलेला आहे.
करोनामुळे कुणाला बसला फटका?
जागतिक आरोग्य संघटनेची काय होती भूमिका?
ऑलिम्पिक आयोजन एक जोखीम
करोनामुळे कुणाला बसला फटका?
ऑलिम्पिक प्रशिक्षण स्थगित
22 फेब्रुवारी ः करोनाच्या धसक्यामुळे टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजकांनी स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यक्रम Volunteer Training Camp | स्थगित केला. असं असलं तरी ऑलिम्पिकला कोणताही धोका नाही, असेही आयोजकांनी स्पष्ट केले. स्वयंसेवकांना पुढची तारीख लवकरच सांगितली जाईल, मात्र ऑलिम्पिक नियोजित तारखेनुसारच होईल, असेही आयोजकांनी सांगितले.
ऑलिम्पिक मशाल प्रज्वलित
12 मार्च ः करोना विषाणूच्या संसर्गामुळे ग्रीसमध्ये पहिला मृत्यू समोर आल्याने या
महामारीचं भूत ऑलिम्पिक मशालीवरही होतं. अशा स्थितीतही टोकियो ऑलिम्पिक २०२० ची मशाल प्राचीन ऑलिम्पियात प्रज्वलित करण्यात आली. मात्र, या कार्यक्रमाला प्रेक्षकांना प्रवेश नव्हता. प्राचीन युनानच्या धार्मिक पोशाखात एका तरुणीने सूर्याच्या किरणांचा उपयोग करीत क्रीडाज्योत प्रज्वलित केली. याचबरोबर ग्रीसमध्ये आठवडाभर चालणारी मशाल रिलेही सुरू झाली. ही क्रीडाज्योत १९ मार्च रोजी टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजकांकडे सुपूर्द करण्यात येईल. Team kheliyad | Coronavirus sports | Tokyo Olympics 2020
५६ वर्षांनंतर क्रीडाज्योत टोकियोत
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बाक यांनी सांगितले, की ‘‘ग्रीसमधून ओलिम्पिक क्रीडाज्योतीची जपानपर्यंतची यात्रा सुरू होते. ही क्रीडाज्योत 56 वर्षांनंतर टोकियोत परतणार आहे. आम्ही आशा करतो, की ती संपूर्ण देशाला प्रकाशमान करेल.’’ करोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरातील खेळ प्रभावित झाले आहेत. त्यामुळे ऑलिम्पिकच्या भवितव्याबाबतही चिंतेचे सावट आहे. मात्र, आयोजकांनी ऑलिम्पिक स्पर्धा नियोजनाप्रमाणे पार पडेल. कारण आयओसीने अद्याप तरी ही स्पर्धा स्थगित करण्याबाबत कोणताही विचार केलेला नाही.
ऑलिम्पियन ज्यूदोपटू साओरी योशिदा आणि तदाहिरो नोमुरा यांच्या हस्ते ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित करण्यात आली. |
ओलिम्पिक ज्योतीचे जपानमध्ये स्वागत फिके
20 मार्च : करोना विषाणूच्या संसर्गामुळे Covid 19 | टोकियो ऑलिम्पिकबाबत अनिश्चिततेचे वातावरण आहे. अशा स्थितीत ग्रीसवरून जपानमध्ये ऑलिम्पिक ज्योत दाखल झाल्यानंतर तिचे स्वागत साध्या पद्धतीने झाले. ही ज्योत कंदिलातून विमानाने जपानमध्ये दाखल झाली. ऑलिम्पिक ज्योतीच्या स्वागतासाठी २०० शालेय विद्यार्थ्यांना बोलविण्यात येणार होते. मात्र, करोना विषाणू संसर्गाच्या धास्तीमुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. माजी ऑलिम्पियन ज्यूदोपटू साओरी योशिदा आणि तदाहिरो नोमुरा यांनी पारंपरिक अग्निकुंडात निवडक अधिकारी व पाहुण्यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करण्यात आली. टोकियो ऑलिम्पिक २०२० चे प्रमुख योशिरो मोरी यांनी सांगितले, ‘‘मुले या ऑलिम्पिक ज्योतीचे स्वागतासाठी येणार होते; पण सुरक्षेच्या कारणास्तव हा कार्यक्रम रद्द करावा लागला.’’ मशाल रिले २६ मार्चपासून सुरू होईल. रिलेच्या मार्गात प्रेक्षकांची गर्दी करू नये, असे आवाहन या वेळी करण्यात आले.
ऑलिम्पिक ज्योतीसाठी जपानमध्ये उडाली झुंबड
भारतीय क्रीडामंत्र्यांचा ऑलिम्पिक दौरा स्थगित
15 मार्च ः कोविड-19 महामारीमुळे भारतीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू Kiren Rijiju | आणि इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाचा टोकियो दौरा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. हा दौरा 25 ते 29 मार्चपर्यंत होणार होता. ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंच्या व्यवस्थेशी संबंधित असलेल्या तयारीबाबत हा दौरा होणार होता. मात्र, हा दौरा आता पुढे ढकलण्यात आला असून, त्याची पुढची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. रिजिजू यांच्याशिवाय पथकातील इतर सदस्यांमध्ये भारतीय ऑलिम्पिक संघाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा, महासचिव राजीव मेहता, भारतीय बॉक्सिंग महासंघाचे अध्यक्ष अजय सिंह, क्रीडा सचिव राधेश्याम जुलानिया आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे महानिदेशक संदीप प्रधान यांचा समावेश होता.
ऑलिम्पिक समितीच्या उपाध्यक्षालाच करोना
Kozo Tashima |
भारताला काय वाटते?
ऑलिम्पिक स्थगित होणे आवश्यक : शरथ कमल
21 मार्च ः भारताचा अनुभवी टेबल टेनिसपटू शरथ कमल आपला चौथ्यांदा ऑलिम्पिक खेळण्यास उत्सुक आहे. मात्र, कोविड-१९ च्या संसर्गामुळे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने हा क्रीडाकुंभ स्थगित करावा, अशी मागणी शरथने केली आहे. शरथने गेल्याच आठवड्यात आयटीटीएफ ओमान ओपनचा किताब जिंकला आहे. दहा वर्षांतली ही त्याची पहिलीच ट्रॉफी आहे. ओमानवरून १६ मार्च रोजी मायदेशी परतल्यानंतर त्याने स्वतःला विलग केले आहे. आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाने आपल्या सर्वच स्पर्धा एप्रिलअखेरपर्यंत स्थगित केल्या आहेत. पुढच्या महिन्यात बँकॉकमध्ये होणारी आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धाही अनिश्चित काळासाठी स्थगित केली आहे.
३७ वर्षीय शरथने सांगितले, की ‘‘एक खेळाडू म्हणून मलाही वाटतं, की ऑलिम्पिक स्पर्धा व्हावी. मात्र, सध्याच्या स्थितीत ती न होणेच आवश्यक आहे. करोना विषाणू संसर्गाचे केंद्र आता बदलत आहे. आधी चीन होते, आता इटली आहे आणि त्याखालोखाल आशिया खंडातील इराणमध्येही हा संसर्ग मोठ्या प्रमाणावर संक्रमित झाला आहे. त्यामुळे हा काळ ऑलिम्पिकसाठी अजिबात सुरक्षित नाही.’’
शरथची जागतिक रँकिंग ३८ आहे. आणि ३१ व्या रँकिंगवर असलेला जी. साथियन आपल्या रँकिंगच्या आधारावर ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकेल. करोना संसर्गाच्या धास्तीमुळे भलेही ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा झाली नाही तरी त्याची ऑलिम्पिकवारी निश्चित असेल. शरथने सांगितले, ‘‘सध्या एकही स्पर्धा नाही. त्यामुळे रँकिंगमध्ये कोणताही बदल होणार नाही. जर स्थिती अशीच राहिली तर आम्हाला आमच्या रँकिंगच्या आधारावर ऑलिम्पिकसाठी पात्र ठरवायला हवे.’’
खेळांसाठी ही योग्य वेळ नाही : मनु भाकेर
22 मार्च ः स्पर्धा स्थगित होणे, निवड चाचण्या, शिबिरे रद्द होणे हे भारताची युवा नेमबाज मनू भाकेरसाठी फारसे विशेष राहिलेले नाही. तिला फक्त एवढीच अपेक्षा आहे, की कोविड-19 महामारीविरुद्धचं युद्ध जगाने जिंकावं. या महामारीमुळे टोकियो ऑलिम्पिकबाबत अनेक शंकाकुशंका उपस्थित होत आहेत. टोकियोमध्ये पदकाची प्रबळ दावेदार मानली जाणारी १८ वर्षीय मनू भाकेरला मात्र याबाबत कोणताही विचार करीत नाही. भाकेर म्हणाली, ‘‘निवड चाचण्या, स्पर्धा सध्याच्या परिस्थितीत स्थगित व्हायला पाहिजेत. कारण कोविड १९ चे उच्चाटन होणे अत्यंत आवश्यक आहे. भाकेरने काही नेमबाजांसोबत भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेच्या (एनआरएआय) निवड चाचणीत सहभाग घेतला होता. ती म्हणाली, ‘‘शिबिराची स्थिती चांगली होती. तिथे जास्त गर्दी नव्हती. ही चाचणी केवळ तीनच दिवसांसाठी होती. केव्हाही ऑलिम्पिक स्पर्धा झाली तरी मी तयार आहे. माझा योजनाबद्ध सराव सुरू आहे.’’
भारताला काय वाटते?
ऑलिम्पिक स्थगित होणे आवश्यक : शरथ कमल
खेळांसाठी ही योग्य वेळ नाही : मनु भाकेर
क्रीडामंत्र्यांचा भाबडा आशावाद
Kiren Rijiju
27 फेब्रुवारी ः करोन विषाणूचा धोका आ वासून उभा असताना क्रीडामंत्री किरेन रीजीजू यांनी मात्र, टोकियो ऑलिम्पिक नियोजित कार्यक्रमांनुसारच होतील, अशी आशा व्यक्त केली. याउलट आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) वरिष्ठ सदस्य डिक पाउंड यांनी करोना विषाणूच्या संसर्गामुळे क्रीडाकुंभ म्हणून ओळखली जाणारी ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करावी लागण्याची शक्यता व्यक्त केली आहे. भारतीय खेळाडूंसाठी झालेल्या एका कार्यशाळेत आपले क्रीडामंत्री रिजीजू म्हणतात, ‘‘करोना चीनमध्ये आहे, टोकियोत नाही.’’ Team kheliyad | Coronavirus sports | Tokyo Olympics 2020
क्रीडामंत्र्यांचा भाबडा आशावाद
Kiren Rijiju |
भारताच्या ऑलिम्पिकच्या तयारीवर परिणाम
6 मार्च ः करोना विषाणूच्या संसर्गामुळे भारताच्या ऑलिम्पिक तयारीवर परिणाम झाला आहे. मात्र, अशाही स्थितीत पी. व्ही. सिंधू आणि बजरंग पूनियासारख्या दिग्गज खेळाडूंना आशा आहे, की जगाला अस्वस्थ करणाऱ्या करोना विषाणूच्या संसर्गानंतरही टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा नियोजित कार्यक्रमानुसारच होईल.
पी. व्ही. सिंधूला वाटते…
ऑलिम्पिक रौप्यपदक प्राप्त पी. व्ही. सिंधूने चौथ्या टीओआयएसए Times of India
Sports Award | पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान सांगितले, की ‘‘अद्याप इंग्लंड चॅम्पियनशिप स्थगित झालेली नाही. सगळं काही व्यवस्थित सुरू आहे. मात्र, करोना विषाणूचा संसर्ग वेगाने पसरत आहेत. ऑलिम्पिक वर्षात असे होणे वाईट आहे. काही स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुढे काय होते, हे पाहण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही.’’ Team kheliyad | Coronavirus sports | Tokyo Olympics 2020
प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनीही ऑलिम्पिक स्पर्धेच्या काळात करोना विषाणूच्या संसर्गामुळे चिंता व्यक्त केली आहे.
पहिलवान बजरंग पूनियाला वाटते…
पहिलवान बजरंग पूनियाने Bajrang Punia | सांगितले, की ‘‘आम्हाला सरावासाठी
देशाबाहेर जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक देशांचा दौरा करण्यास निर्बंध आहेत. मात्र, आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा स्थगित झाल्यामुळे काही मल्ल चिंतीत आहेत. अशा स्थितीतही मी माझ्या दिनचर्येत कोणताही बदल केला नाही. लोकांनीही फारसे घाबरण्याचे कारण नाही. ऑलिम्पिक स्थगित होवो अथवा न होवो, मी माझा सराव सुरूच ठेवला आहे. ऑलिम्पिकवर निर्णय घेण्याचे काम आयोजक आणि आयओसीकडे आहे.’’ Team kheliyad | Coronavirus sports | Tokyo Olympics 2020
वेगवान धावपटू द्युती चंदला वाटते…
वेगवान धावपटू द्युती चंदने Dutee Chand | आतापर्यंत टोकियो ऑलिम्पिकसाठी
पात्रता सिद्ध केलेली नाही. तिने सांगितले, की जर बहुतांश देश स्पर्धेत भाग घेणार नसतील तर ऑलिम्पिक स्पर्धा घेतली जाऊ नये. धावणे माझे काम आहे. त्यामुळे निर्णय सरकारनेच घ्यावा, की मी सरावासाठी बाहेर जावे किंवा नाही. मला परदेश दौऱ्याचे तिकीट होते, पण करोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीमुळे सरकारने मला व्हिसा दिलेला नाही.
पी. व्ही. सिंधूला वाटते…
Sports Award | पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान सांगितले, की ‘‘अद्याप इंग्लंड चॅम्पियनशिप स्थगित झालेली नाही. सगळं काही व्यवस्थित सुरू आहे. मात्र, करोना विषाणूचा संसर्ग वेगाने पसरत आहेत. ऑलिम्पिक वर्षात असे होणे वाईट आहे. काही स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुढे काय होते, हे पाहण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही.’’ Team kheliyad | Coronavirus sports | Tokyo Olympics 2020
पहिलवान बजरंग पूनियाला वाटते…
देशाबाहेर जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक देशांचा दौरा करण्यास निर्बंध आहेत. मात्र, आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा स्थगित झाल्यामुळे काही मल्ल चिंतीत आहेत. अशा स्थितीतही मी माझ्या दिनचर्येत कोणताही बदल केला नाही. लोकांनीही फारसे घाबरण्याचे कारण नाही. ऑलिम्पिक स्थगित होवो अथवा न होवो, मी माझा सराव सुरूच ठेवला आहे. ऑलिम्पिकवर निर्णय घेण्याचे काम आयोजक आणि आयओसीकडे आहे.’’ Team kheliyad | Coronavirus sports | Tokyo Olympics 2020
वेगवान धावपटू द्युती चंदला वाटते…
पात्रता सिद्ध केलेली नाही. तिने सांगितले, की जर बहुतांश देश स्पर्धेत भाग घेणार नसतील तर ऑलिम्पिक स्पर्धा घेतली जाऊ नये. धावणे माझे काम आहे. त्यामुळे निर्णय सरकारनेच घ्यावा, की मी सरावासाठी बाहेर जावे किंवा नाही. मला परदेश दौऱ्याचे तिकीट होते, पण करोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीमुळे सरकारने मला व्हिसा दिलेला नाही.