All SportsCricketIPL

Chris Gayle sixer king | षटकारांचा बादशाह

 

षटकारांचा बादशाह


Follow us

[jnews_footer_social social_icon=”circle”]

डाकेबाज फलंदाज म्हणून ओळख असलेल्या ख्रिस गेलला टी-20 क्रिकेटमध्ये षटकारांचा बादशाह Chris Gayle sixer king | होण्याची संधी आहे. त्याला ही संधी मिळणार आहे इंडियन प्रिमियर लीगच्या माध्यमातून.

हजाराचा टप्पा गाठण्यासाठी 22 षटकारांची गरज

ख्रिस गेलने आयपीएलमध्ये सर्वाधिक 326 षटकार खेचले आहेत. हा आयपीएलमधील विक्रम आहे. टी-20 क्रिकेटमधील षटकारांचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे. त्याने एकूण 978 षटकार खेचले आहेत. Chris Gayle sixer king | षटकारांचा हजाराचा टप्पा गाठण्यासाठी त्याला फक्त 22 षटकारांची गरज आहे.

चौकारांचा विक्रम

गेलने आतापर्यंत आयपीएलमध्ये 11 स्पर्धा खेळल्या आहेत. त्यापैकी सहा स्पर्धांमध्ये त्याने 22 पेक्षा अधिक षटकार खेचण्याचा विक्रम केला आहे. केवळ षटकारच नाही, तर चौकारांचीही आतषबाजी करण्यात ख्रिस गेलचा हात कुणीही धरू शकलेला नाही.

Chris Gayle sixer king |त्याने टी 20 मध्ये सर्वाधिक 1,026 चौकार लगावले आहेत. हा विक्रमही त्याच्याच नावावर आहे.

ख्रिस गेलने मायभूमीतल्या कॅरेबियन प्रिमियर लीगमध्ये CPL | वैयक्तिक कारणामुळे सहभाग घेतला नाही. मात्र, आयपीएलमध्ये तो किंग्स इलेव्हन पंजाबचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तो सज्ज झाला आहे. गेल्या वर्षी त्याने या संघाकडून 34, तर 2018 मध्ये 27 षटकारांची आतषबाजी केली होती.

chris gayle sixer king

सर्वाधिक स्पर्धा, सर्वाधिक षटकार

गेल एकमेव असा फलंदाज आहे, ज्याने आयपीएलच्या चार स्पर्धांमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम Chris Gayle sixer king | नोंदवला आहे. ही कामगिरी अद्याप कोणालाही करता आलेली नाही. त्याने 2011 (44 षटकार), 2012 (59), 2013 (51) आणि 2015 (38) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूकडून (आरसीबी) खेळताना हा विक्रम नोंदवला आहे.

41 व्या वाढदिवशी आयपीएल

Chris Gayle sixer king | संयुक्त अरब अमिरातमध्ये होणारी आयपीएल गेलसाठी विशेष आहे. कारण या लीगदरम्यान तो 21 सप्टेंबर रोजी आपला 41 वाढदिवस साजरा करणार आहे.

नाबाद 175 धावांची विक्रमी खेळी

विंडीजच्या या डावखुऱ्या फलंदाजाने 2013 मध्ये आरसीबीकडून खेळताना पुणे वारिअर्सविरुद्ध नाबाद 175 धावांची विक्रमी खेळी रचली होती. ही दीडशतकी खेळी 17 षटकारांनी सजलेली होती. हादेखील एक विक्रम आहे.

एका सामन्यात 18 षटकारांचा विक्रम

टी 20 मध्ये एकाच सामन्यात 18 षटकार खेचण्याचा विक्रमही Chris Gayle sixer king | गेलच्याच नावावर आहेत. अर्थात, ही कामगिरी त्याने 2017 मध्ये बांग्लादेश प्रिमियर लीगमध्ये केली होती.

आयपीएलमध्ये गेलनंतर सर्वाधिक षटकार एबी डिविलियर्सचा क्रमांक लागतो. त्याने 212 षटकार खेचले आहेत. त्यानंतर महेंद्रसिंह धोनी (209 षटकार) तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र हे दोन्ही खेळाडू गेलपेक्षा 100 षटकारांनी पिछाडीवर आहेत.

एकूण कामगिरीचा विचार केला तर गेलनंतर वेस्ट इंडीजचा किरोन पोलार्ड (672) याचा क्रमांक आहे. मात्र, तोही गेलपेक्षा तब्बल 300 षटकारांनी मागे आहे.

सर्वाधिक अर्धशतकांचाही विक्रम

गेलच्या विक्रमांची यादी इथेच थांबत नाही. त्याने टी 20 मध्ये सर्वाधिक धावांचाही (13,296) विक्रम नोंदवला आहे. सर्वाधिक अर्धशतके (82), एकाच डावात सर्वोच्च धावा (नाबाद 175), सर्वांत जलद शतक (30 चेंडूंत), पराभूत संघाकडून सामन्यात सर्वाधिक धावा (नाबाद 151), एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा (2015 मध्ये 1,665), सर्वाधिक सामनावीर (58 वेळा) आणि एकाच डावात चौकार आणि षटकारांच्या मदतीने सर्वाधिक धावा (154 वि. पुणे वॉरिअर्स) या विक्रमांच्या राशीही गेलच्याच नावावर आहेत.

…तर भोपळा न फोडण्याचाही विक्रम!

Chris Gayle sixer king | या विक्रमांबरोबरच आणखी एक विक्रम नोंदवण्याची संधी आहे. कदाचित हा विक्रम करण्याचा विचार तो मनातही आणणार नाही. हा विक्रम म्हणजे टी-20 मध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा!

गेलला टी 20 मध्ये आतापर्यंत 27 वेळा भोपळाही फोडता आलेला नाही. या कामगिरीत त्याने पाकिस्तानच्या उमर अकमलशी बरोबरी केली आहे. हे दोघेही संयुक्त दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर वेस्ट इंडीजचाच ड्वेन स्मिथ (28 वेळा) आहे.

सर्वाधिक डाव खेळणारा तो एकमेव

शून्यावर बाद होण्याची विक्रमी कामगिरी त्याला रुचणारी नाही. मात्र, त्याच्या नावावर आणखी एक विक्रम आहे. तो म्हणजे सर्वाधिक डाव खेळण्याचा. त्याने टी 20 क्रिकेटमध्ये 145 डाव खेळले आहेत. हा विक्रम त्याने 10 फेब्रुवारी 2012 ते 5 फेब्रुवारी 2016 दरम्यान केला आहे.

[qcld-ilist mode=”one” list_id=”2300″ column=”2″ upvote=”on” disable_lightbox=”true”]
[jnews_block_18 first_title=”Read more” header_text_color=”#7100e2″ header_line_color=”#7100e2″ include_category=”87″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!