Barcelona members strike back vs. Bartomeu
‘बार्सिलोना’त खांदेपालटाची मागणी
बार्सिलोना | स्पेनच्या बार्सिलोना फुटबॉल क्लबच्या अध्यक्षांविरुद्ध तीव्र मोहीम सुरू झाली असून, अध्यक्ष बदलाची मागणीने जोर धरला आहे. Barcelona members strike back vs. Bartomeu | मात्र, बार्सिलोनाचे अध्यक्ष जोसेफ बारटोम्यू यांनी राजीनामा देण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे.
बारटोम्यू आणि त्यांच्या कार्यकारिणीला मतदान करण्याचा आग्रह धरण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून बार्सिलोना क्लबच्या 20 हजारावरील सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
Barcelona members strike back vs. Bartomeu | बारटोम्यूने ‘टीव्ही 3’ या स्थानिक वाहिनीला सांगितले, ‘‘कोणीही पदाधिकारी राजीनामा देणार नाही.’’
नेतृत्वबदलाच्या मागणीवर याचिका केल्यानंतर गुरुवारी क्लबच्या 20,687 सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. ही संख्या एकूण सदस्यांच्या १५ टक्के अधिक आहे. ही संख्या मतदान घेण्यास पुरेशी आहे.
Barcelona members strike back vs. Bartomeu
मोठ्या संख्येने सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्यानंतर स्थानिय माध्यमांनी असा कयास लावला, की आता बारटोम्यू अध्यक्षपदाचा राजीनामा देतील.
गेल्या महिन्यात चॅम्पियन्स लीगमध्ये बायर्न म्युनिखकडून बार्सिलोनाचा (8-2) लाजीरवाणा पराभव झाला, दिग्गज खेळाडू लियोनेल मेस्सीनेही क्लब सोडण्याची तयारी केल्याने मंडळावरील पदाधिकाऱ्यांना बदलण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सर्व स्वाक्षऱ्यांची वैधता तपासल्यानंतर मतदान होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
[jnews_block_24 first_title=”Read more” header_text_color=”#dd0000″ header_line_color=”#dd0000″ post_offset=”2″ include_category=”63″]