Ashok Mustafi passes away

अनुभवी प्रशिक्षक अशोक मुस्तफी यांचे निधन
क्रिकेटचे अनुभवी माजी प्रशिक्षक अशोक मुस्तफी ashok mustafi passes away | यांचे दीर्घ आजाराने ३० जुलै २०२० रोजी सकाळी कोलकात्यात निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या मागे एक मुलगी आहे. ती लंडनमध्ये राहते.
अशोक मुस्तफी यांची ओळख बऱ्याच जणांना माहिती नसेल. पण भारतीय संघाचा माजी कर्णधार व सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली यांचे ते प्रशिक्षक होते.
अशोक मुस्तफी यांना हृदयरोगाचा त्रास होता. त्यामुळे एप्रिलमध्ये त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर ३० जुलै २०२० रोजी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ashok mustafi passes away |
क्रिकेटची नर्सरी होते मुस्तफी यांचे प्रशिक्षण केंद्र
कोलकात्यातील प्रसिद्ध दुखीराम क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचे ते प्रशिक्षक होते. हे प्रशिक्षण केंद्र नंतर आर्यन क्लब गॅलरीजच्या अखत्यारीत आलं. हे केंद्र बंगालची क्रिकेट नर्सरी मानलं जायचं. या प्रशिक्षण केंद्रात सौरव गांगुलीसह डझनभर रणजीपटू दिले आहेत.
सौरव गांगुलीनेही गिरवले मुस्तफी यांच्याकडून धडे
सौरव गांगुलीला त्याच्या वडिलांनी सुरुवातीला अशोक मुस्तफी यांच्याकडे प्रशिक्षणास पाठवले होते. तेथे सौरव गांगुलीचा मित्र संजय दासही त्यांच्याकडे प्रशिक्षण घेत होता. गेल्या महिन्यात जूनमध्ये अशोक मुस्तफी यांची तब्येत बिघडली होती. त्या वेळी तो व त्याचा जवळचा मित्र संजय या दोघांनी मिळून मुस्तफी यांच्या उपचाराचा खर्च उचलला होता. ashok mustafi passes away |
वर्षभरापूर्वीच मुस्तफी यांच्या पत्नीचं निधन झालं होतं. आता अशोक मुस्तफी ashok-mustafi-passes-away यांनीही या जगाचा निरोप घेतला. त्यांची मुलगी लंडनमध्ये असल्याने ती आल्याननंतरच त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.
One Comment