संतुलित आहार आणि मेंदूचे आरोग्य यांचा एकमेकांशी थेट संबंध
संतुलित आहार आणि मेंदूचे आरोग्य यांचा एकमेकांशी थेट संबंध
संतुलित आहार आणि मेंदूचे आरोग्य यांचा एकमेकांशी थेट संबंध असल्याचे नुकतेच एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. संतुलित आहार आणि मेंदूचे आरोग्य यांचा एकमेकांशी कसा संबंध आहे हे केम्ब्रिज विद्यापीठ आणि चीनमधील फुदान विद्यापीठाच्या अभ्यासातून स्पष्ट करण्यात आले आहे.
Barbara Jacquelyn Sahakian / Christelle Langley,
University of Cambridge,
Jianfeng Feng, Wei Cheng,
Fudan University
भाज्यांच्या ताजेपणापासून क्रीमयुक्त मिठाईच्या चवीपर्यंत, आपणा सर्वांच्या खाण्याच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. आमच्या रुचिकलिका (स्वाद ग्रंथी) अनुवांशिक, संस्कृती आणि वैयक्तिक अनुभवांवर आधारित विशिष्ट प्रकारे विकसित होतात.
आपल्या आहाराच्या सवयींना आकार देण्यात अन्न प्राधान्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. साखर, चरबी आणि मिठाने समृद्ध असलेले अत्यंत रुचकर पदार्थ अनेकदा लोकांच्या ‘रुचिकलिका’ (tastebuds) आकर्षित करतात आणि त्वरित समाधान देतात. तथापि, या पदार्थांमध्ये सामान्यत: कॅलरी जास्त असतात आणि आवश्यक पोषक घटक कमी असतात, ज्यामुळे वजन वाढते आणि शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या स्थितीचा धोका वाढतो.
आम्ही आता शोधले आहे, की तुम्ही जे अन्न खाण्यासाठी निवडता ते तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याशीच नाही तर तुमच्या संज्ञानात्मक कार्याशी, मेंदूची रचना आणि आनुवंशिकतेशीही जोडलेले असते.
जगभरात फास्ट फूड आवडीने खाल्ले जाते. हे फास्ट फूड जगभरात लठ्ठपणा वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO), 2022 मध्ये जगात आठ व्यक्तींमध्ये एक व्यक्ती लठ्ठ असल्याचे म्हटले आहे. हा दर 1990 पासून दुप्पट झाला आहे.
लठ्ठपणाचा संबंध केवळ टाइप 2 मधुमेह आणि हृदयरोग यांसारख्या आजारांच्या वाढीशी नाही, तर मानसिक आरोग्य विकारांच्या 30-70 टक्के जास्त जोखमीशीही आहे.
संतुलित आहार आणि मेंदूचे आरोग्य
नेचर मेंटल हेल्थ ( Nature Mental Health)मध्ये प्रकाशित झालेल्या चीनचे फुडान विद्यापीठ (Fudan University) आणि इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठाच्या (Cambridge University) आमच्या नवीन सहयोगी अभ्यासात, यूके बायोबँक (UK Biobank)मधील 1,81,990 सहभागींची आहार तपासणी केली. त्यात अन्न निवडीचा संज्ञानात्मक कार्य, मानसिक आरोग्य, चयापचय, मेंदूवर कसा परिणाम होतो हे तपासण्यासाठी आणि अनुवांशिकता कशी जोडलेली आहे, याचा अभ्यास करण्यात आला.
आम्ही भाज्या, फळे, मासे, मांस, चीज, तृणधान्ये, रेड वाइन, स्पिरिट आणि ब्रेड यांच्या वापराचे परीक्षण केले. आम्हाला आढळले, की 57 टक्के सहभागींनी निरोगी संतुलित आहाराला प्राधान्य दिले. त्यात आम्ही चाचणी केलेल्या सर्व पदार्थांचे संतुलित मिश्रण होते. कुठेही जास्त नाही की कमी नाही.
आम्ही पुढे नोंदवले, की ज्यांनी निरोगी संतुलित आहार घेतला त्यांच्या मेंदूचे आरोग्य, संज्ञानात्मक कार्य आणि मानसिक आरोग्य इतरांपेक्षा चांगले होते. आम्ही संतुलित आहाराची तुलना इतर तीन आहारगटांशी केली- कमी कार्ब (18 टक्के), शाकाहारी (6 टक्के) आणि उच्च प्रथिने/कमी फायबर (19 टक्के).
आम्हाला आढळले, की ज्या लोकांनी अधिक संतुलित आहार घेतला त्यांची बुद्धिमत्ता (नवीन समस्या सोडवण्याची क्षमता), प्रक्रिया गती, स्मृती आणि कार्यकारी कार्य (मानसिक कौशल्यांचा एक संच ज्यामध्ये लवचिक विचार आणि आत्म-नियंत्रण समाविष्ट आहे) इतर आहार घेतलेल्या लोकांपेक्षा चांगले होते. हे चांगल्या मेंदूच्या आरोग्याशीदेखील संबंधित आहे- उच्च राखाडी पदार्थाचे प्रमाण (higher grey matter volumes- मेंदूचा सर्वांत बाहेरील थर) आणि अधिक चांगले संरचित न्यूरॉन्स (मेंदूच्या पेशी), जे मेंदूच्या आरोग्याचे प्रमुख संकेतक आहेत.
कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण शाकाहारी आहार संतुलित आहाराइतका चांगला नव्हता. याचे एक कारण हे असू शकते, की अनेक शाकाहारी लोकांना पुरेशी प्रथिने मिळत नाहीत. मेंदूसाठी दोन निरोगी, संतुलित आहार भूमध्यसागरीय (Mediterranean) आणि माइंड (MIND) (न्युरोडीजेनेरेटिव्ह-neurodegenerative विलंबासाठी भूमध्यसागरी हस्तक्षेप) आहार आहेत. हे मासे (विशेषतः तेलकट मासे), गडद पालेभाज्या आणि ताजी फळे, धान्ये, सुकामेवा, बिया, तसेच काही मांस, जसे की चिकन यांना प्रोत्साहन देतात. मात्र, हे आहार लाल मांस, चरबी आणि साखरदेखील मर्यादित करतात.
खरं तर, संशोधनात असं दिसून आलं आहे, की भूमध्यसागरीय आहार आपला मेंदू आणि आकलनशक्ती बदलू शकतो. एका अभ्यासात असे दिसून आले आहे, की या आहारावर फक्त 10 आठवड्यांनंतर लोकांना छान अनुभूती मिळाली.
दुसऱ्या अभ्यासात असे दिसून आले आहे, की भूमध्यसागरीय आहाराचे पालन केल्याने मेंदूतील बीटा-अॅमिलॉइड (beta-amyloid) नावाच्या हानिकारक पेप्टाइड (peptide)ची पातळी कमी होते. बीटा-ॲमिलॉइड, टाऊ प्रथिनांसह (tau protein), अल्झायमर रोगात होणारे मेंदूचे नुकसान अधोरेखित करते. तांदूळ, मासे आणि शेल्फिश, मिसो, लोणचे आणि फळे यांचा समावेश असलेल्या जपानी आहारामुळे मेंदूच्या संकोचनापासून संरक्षण होते, असेही यापूर्वीच्या अभ्यासातून दिसून आले आहे.
आम्हाला असेही आढळले, की काही जनुके (genes) असे आहेत, जे आहारातील नमुने आणि मेंदूचे आरोग्य, संज्ञानात्मक कार्य आणि मानसिक आरोग्य यांच्यातील संबंधात योगदान देऊ शकतात. याचा अर्थ असा असू शकतो, की आपली जनुके (genes) अंशतः आपल्याला काय खायला आवडते हे ठरवतात, ज्यामुळे आपल्या मेंदूचे कार्य निश्चित होते.
तथापि, आमच्या खाद्यपदार्थ निवडीच्या प्राधान्यांवर किंमत, वावडं (ॲलर्जी), सुविधा आणि आमचे मित्र आणि कुटुंब काय खातात यासह अनेक घटकांवर प्रभाव टाकतात.
ज्यामुळे वजन कमी होऊ शकते, अशा आहाराचा पर्याय काही लोक निवडतात. मात्र, मेंदूसाठी महत्त्वाचा असलेला संपूर्ण अन्नगट वगळला जातो. केटोजेनिक आहार (ketogenic diets लो-कार्ब), उदाहरणार्थ, रोगप्रतिकारक शक्ती आणि मानसिक आरोग्यावर लाभदायी प्रभाव पाडतात असे काही पुरावे असले तरी भूमध्यसागरी आहारासारखा संतुलित आहार संपूर्ण मेंदूच्या आरोग्यासाठी आणि आकलनशक्तीसाठी सर्वोत्तम आहे असे दिसते.
Read More… उरलेले अन्न सुरक्षित कसे ठेवता येईल?
पुढचा मार्ग
हे स्पष्ट आहे, की निरोगी संतुलित आहाराचा अवलंब करणे आणि व्यायाम करणे आपल्या मेंदूसाठी चांगले असू शकते. मात्र, बऱ्याच लोकांसाठी हे सांगणं सोपं आहे, पण करणं कठीण आहे. विशेषतः अशा लोकांसाठी, ज्यांची सध्याची खाद्यान्न प्राधान्ये खूप गोड किंवा जास्त चरबीयुक्त पदार्थांची असतील.
तथापि, अन्न प्राधान्ये हे काही तुमचं नशीब नाही. उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमच्या साखरेचे आणि चरबीचे सेवन हळूहळू कमी केले आणि कित्येक महिन्यांपर्यंत ते अगदी कमी पातळीवर ठेवले तर तुम्हाला खरोखरच अशा प्रकारचे अन्न आवडू लागेल.
निरोगी अन्न प्राधान्ये आणि जीवनाच्या सुरुवातीला सक्रिय जीवनशैली अवलंबणे महत्त्वाचे आहे. इतर महत्त्वाची तंत्रे म्हणजे जाता जाता सँडविच संपवण्यापेक्षा किंवा मोबाइलच्या स्क्रीनकडे पाहण्यापेक्षा तुम्ही काय खात आहात याकडे लक्ष द्या आणि त्याचा आनंद घ्या, हळूहळू खा.
तुमचे पोट भरले आहे हे तुमच्या मेंदूत उतरायला वेळ लागतो. उदाहरणार्थ, असे दिसून आले आहे, की टीव्ही पाहताना, संगीत ऐकताना किंवा इतरांच्या उपस्थितीत आपण अधिक खातो. कारण लक्ष विचलित झाल्याने आंतरिक तृप्ती संकेतांकडे आपलं लक्ष कमी जातं.
संज्ञानात्मक वर्तणूक थेरपीप्रमाणेच, मित्रांकडून सामाजिक समर्थनदेखील निरोगी खाण्याच्या सवयींचे पालन करण्यास प्रोत्साहित करते. लक्ष विचलित करणे हे आणखी उत्कृष्ट तंत्र आहे – तुम्हाला जे काही करायचे आहे (ते खाणेच असेल असे नाही), ते ही सवय मदत करू शकते.
एका मनोरंजक सर्वेक्षण अभ्यासात असे दिसून आले आहे, की तुम्ही तुमचे प्राधान्यक्रम कसे ठरवता, याचा तुमच्या खाद्यपदार्थांच्या निवडीवर परिणाम होतो. तुम्हाला निरोगी राहण्यात आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त दिसण्यात स्वारस्य असल्यास, तुम्ही निरोगी पदार्थ निवडाल.
आपण कठीण आर्थिक काळात जगत आहोत. सामाजिक-आर्थिक स्थिती आहाराच्या निवडींवर मर्यादा घालू नये. अर्थात सध्या तरी तसंच दिसतंय. स्पष्टपणे, स्वस्त आरोग्यदायी अन्नपर्यायांना प्राधान्य देणे हे सरकारचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. हे आपल्यापैकी अनेकांना आरोग्याच्या कारणांसाठी, अन्नाच्या किमती कमी किंवा दोन्हींसाठी निरोगी आहार निवडण्यात मदत करेल.
आता आपल्याला माहीत झालं आहे, की आपण जे अन्न सेवन करतो, ते आपल्या मेंदूला प्रभावित करू शकतो आणि आपण संज्ञानात्मकतेने चांगले कार्य करू शकतो. तेव्हा निरोगी संतुलित आहार घेणे पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे.
Visit us
- Facebook page : @kheliyad
- Instagram : @kheliyad
- X : @kheliyad
- Linkedin : @MaheshPathade03
- Youtube Channel : Team Kheliyad
- WhatsApp Channel: kheliyad
- email : kheliyad.sports@gmail.com
#genes #diets #tau protein #FudanUniversity #CambridgeUniversity