All Sportssciencesports news

उरलेले अन्न सुरक्षित कसे ठेवता येईल?

उरलेले अन्न सुरक्षित कसे ठेवता येईल?

पैशांच्या बचतीसाठी, अन्नपदार्थांमध्ये वैविध्यासाठी आणि अन्नाची नासाडी टाळण्यासाठी उरलेले अन्न खाणे उत्तम उपाय होऊ शकतो. पण उरलेले अन्न खाणे धोक्याचंही असू शकतं! कारण ते जीवाणूंच्या संपर्कात येऊ शकते.

उरलेले अन्न आरोग्याला धोका
Photo Source: frreepik

Primrose Freestone, University of Leicester, UK

र तुम्ही उरलेले अन्न चांगल्या प्रकारे ठेवू शकला नाहीत आणि योग्य पद्धतीने गरम नाही केले तर तुम्हाला अन्नाची विषबाधा होऊ शकते. एकूणच हे जीवघेणे होऊ शकते. याचा अर्थ हा नाही तुम्ही उरलेले अन्न खाणे टाळावे. अन्न हाताळणीच्या योग्य पद्धतींचे पालन केल्यास तुम्ही उरलेले अन्न खाऊनही सुरक्षित राहू शकता.

उरलेले अन्न फ्रीजमध्ये किती लवकर ठेवायचे?

आपल्या पृथ्वीवर जीवाणू (Bacteria) प्रत्येक ठिकाणी आढळतात. यात स्वयंपाकघर आणि त्यात साठवलेले अन्नपदार्थही समाविष्ट आहेत. अन्नपदार्थ खराब करणारे जीवाणू पोषक तत्त्व, आर्द्रता आणि तापमानासह वेगाने वाढतात. काहींची संख्या 20 मिनिटांत दुप्पट होते.

  • हे महत्त्वाचं आहे, की उरलेले अन्न शक्य तितक्या लवकर आणि जास्तीत जास्त दोन तासांच्या आत फ्रीज किंवा फ्रिझरमध्ये (freezer) ठेवायला हवे.

मुळात हा सल्ला फ्रीजबाहेरच्या तापमानात अन्नामध्ये जीवाणू किती वेगाने वाढू शकतात, यावर आधारित आहे आणि याचा अर्थ असा होऊ शकतो, की 5 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात जास्त काळ शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे ते वापरासाठी कमी सुरक्षित होते.

  • उर्वरित अन्न चांगले झाकले आहे, याची खात्री करावी.
  • अन्नाला प्लास्टिकच्या फॉइलने किंवा हवेच्या संपर्कात येण्यापासून रोखणारे ‘हवाबंद’ (Airtight) झाकण असले पाहिजे. हे खूप महत्त्वाचे आहे. कारण बऱ्याचशा जीवाणूंना वाढण्यासाठी ऑक्सिजनची गरज लागते.

फ्रीजमधील उरलेले अन्न किती काळ खाणे सुरक्षित आहे?

उरलेले अन्न आरोग्याला धोका
Photo Source: freepik
  • तुमचे रेफ्रिजरेटर शून्य ते पाच अंश तापमानात ठेवा. कारण हे तापमान उरलेल्या अन्नामध्ये जीवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करते. अन्नातून विषबाधा होत नाही.
  • उर्वरित अन्न दोन दिवसांच्या आत खाल्ले पाहिजे. कारण त्यानंतर हानिकारक जीवाणूंना वाढीसाठी वेळ मिळतो.
  • खरं तर, लिस्टेरिया (Listeria)सारखे जंतू रेफ्रिजरेटरच्या तापमानातही वाढू शकतात आणि दोन दिवसांपेक्षा अधिक कालावधीनंतर त्यांच्या वाढीची शक्यता अधिक असते. म्हणूनच तुम्ही उरलेले अन्न दोन दिवसांच्या आत खाणे आवश्यक आहे.
  • जर तुम्ही दोन दिवसांच्या आत अन्न खाऊ शकणार नसाल तर अन्न साठवण्यावर पुनर्विचार करावा. उरलेले अन्न उणे 18 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात गोठवल्यास ते तीन महिन्यांपर्यंत ठेवले जाऊ शकते.
  • जेव्हा तुम्ही उर्वरित अन्न पुन्हा गरम करतात, तेव्हा ते पूर्णपणे गरम होईल, याची खात्री करा. जर तसे झाले नाही तर ते अन्न खाऊ नये.
  • उरलेल्या अन्नातील तापमान कमीत कमी 74 अंश सेल्सिअस होईल इतके गरम करावे. चटणी, सूप आणि ग्रेव्ही (तर्री) कमीत कमी तीन मिनिटांपर्यंत ढवळत राहावी.
  • कमीत कमी तीन मिनिटे ढवळत असताना चटण्या, सूप आणि ग्रेव्ही पूर्णपणे उकळणे चांगले. या पद्धती बहुतांश जीवाणू नष्ट करतील आणि विषारीपणा निर्माण करणारे इतर पदार्थ निष्क्रिय करतील.
  • मायक्रोवेव्हमध्ये गरम करतानाही अन्नातील तापमान 74 अंश सेल्सिअस राहील, याची खात्री करा.

उरलेले अन्न तुम्ही एकापेक्षा जास्त वेळा गरम करू शकता का?

  • जेव्हा जेव्हा अन्न गरम केले जाते आणि थंड केले जाते तेव्हा ते योग्य तापमान आणि कोणत्याही हानिकारक जीवाणूंना पुन्हा वाढण्यासाठी आवश्यक वेळ प्रदान करते.
  • त्यानंतर पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही उरलेले अन्न पुन्हा गरम कराल तेव्हा सर्व जंतूंना मारणे कठीण होईल. जर तुम्हाला खात्री नसेल, की तुम्ही दोन दिवसांत उरलेले सर्व अन्न खाऊ शकाल, तर ते फ्रीझरमध्ये गोठवा.

पॅकेज केलेले अन्न तुम्ही पुन्हा गरम करू शकता का?

  • तुम्ही पॅकेज करून आणलेले अन्न सुरक्षितपणे पुन्हा गरम करू शकता किंवा नाही हे तुम्ही कसे साठवले त्यावर अवलंबून असेल.
  • जर तुम्ही हे अन्न कारच्या मागे गरम ठेवले किंवा घराच्या खोलीतील तापमानावर दोन तासांपेक्षा अधिक वेळ ठेवले, तर अन्नातून विषबाधा होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. विशेषकरून तुम्ही त्या अन्नाला आधीच स्पर्श केला असेल किंवा अंशत: ते खाल्ले असेल तर हा धोका असू शकतो.
  • मात्र जेव्हा तुम्ही अन्नाला फार वेळा स्पर्श केला नसेल आणि खरेदीच्या दोन तासांत ते फ्रीजमध्ये ठेवले तर अन्नाला पुन्हा गरम करणे सुरक्षित राहील.
  • शिजलेल्या भाताचा पदार्थ वाचवणे सर्वाधिक जोखमीचे असते. कच्च्या तांदळात ‘बेसिलस सेरेस’ (Bacillus cereus)सारखे बीजाणू असू शकतात, जे अन्नाच्या विषारीपणास कारणीभूत ठरतात.
  • तांदूळ शिजवल्यास मूळ जीवाणू मरतात. मात्र, त्याचे बीजाणू उकळत्या पाण्यातील तापमानातही जिवंत राहू शकतात. तांदूळ शिजवल्यानंतर ते दोन ते तीन तासांच्या आत फ्रीजमध्ये ठेवले नाही तर जीवाणू वाढू शकतात आणि भात खराब करू शकतात. असा भात खाल्ल्यास अतिसार, पोटदुखी आणि उलटीसारख्या व्याधी होऊ शकतात.

शिल्लक अन्न कसे सुरक्षित ठेवता येईल यावरील हा व्हिडीओ अवश्य पाहा…

[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=ziNqv7NdOB8&t=3s” column_width=”4″]

मुलांसाठी डबाबंद दूध अनावश्यक!

#leftoverfood #उरलेलेअन्न #शिळेअन्न

Visit us

[jnews_block_9 first_title=”Read More At:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”65″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!