झुकणे आणि पाठीचा कणा
मँचेस्टर मेट्रोपॉलिटन विद्यापीठाचे डॉ. क्रिस मॅक्कार्थी यांच्या अध्ययनानुसार, झुकणे तुमच्यासाठी अजिबात वाईट नाही. तुमच्या पाठीचा कणा दुखत असेल तर त्यामागचं कारण झुकून बसणे अजिबात नाही, असा वैज्ञानिक निष्कर्ष डॉ. मॅक्कार्थी यांनी काढला आहे.
काय रे, नीट बस. पाठीला वाक येईल… थोरामोठ्यांचे असे शब्द अनेकदा कानी पडतात. एकूणच घरोघरी किशोरवयीन मुलांना पुढे झुकून बसण्यास मनाई केली जाते. कारण असं मानलं जातं, की अशा प्रकारे बसणं ‘वाईट’ असतं. काही लोकांचा असाही दावा आहे, की यामुळे तुमच्या पाठीचा कणा दुखावेल.
सुमारे दीडशे वर्षे मुद्रा व्यक्तीचे मूल्य, गरिमा, आदर आणि नैतिकतेच्या पैलूंशी जोडलेली आहे. विविध संस्कृती, राजकीय आंदोलने आणि सोशल मीडियापर्यंतच्या प्रभावाने सरळ मुद्रेला ‘स्वस्थ’, ‘सुंदर’, ‘पराधीनतेविरुद्ध मजबुती’, ‘आकर्षक’ आणि ‘चांगले’ मानले आहे.
म्हणूनच हे पाहणं कठीण आहे, की झुकणे कसे काय आपल्यासाठी ‘वाईट’ मानले गेले? कारण मोठ्या कालावधीनंतर नकारात्मकतेचे ते प्रतीक मानले जात आहे. मात्र, मनोवैज्ञानिकांच्या अर्थाने मुद्रा अधिक स्पष्ट केलेली आहे. जर आपण झुकत असाल तर खरंच आपला कणा इतका वाईट असतो? काही मुद्रा खरोखर ‘चांगल्या’ असतात आणि इतर ‘वाईट’ असतात का?
झुकणे ‘वाईट’ नाही!
यातली मोठी बातमी अशी आहे, की गेल्या दोन दशकांत अनेक कठोर निष्कर्षांचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यातून असा निष्कर्ष निघाला, की झुकणे आणि पाठीच्या कण्याची वेदना यात कोणताही संबंध नाही. जे लोक झुकून बसत नाही, त्यांच्यापेक्षा जे झुकून बसतात त्यांना पाठ किंवा मानेची वेदना जाणवण्याची शक्यता अधिक आहे, या विधानाला पुष्टी देणारा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.
आपल्या डेस्कवर बसताना किंवा फोनचा वापर करताना झुकल्याने मणक्याला हानी पोहोचते, यालाही पुरावा नाही. एवढेच नाही, तर स्क्रीनसोबत काम करताना ब्रिटिश सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत. मात्र, यातही कोणत्याही आदर्श मुद्रेवर जोर देण्यात आलेला नाही.
याउलट, आरामदायी स्थिती योजणे, आपली स्थिती बदलणे, विचित्र मुद्रेपासून (जसे आपली पाठ किंवा मान मोडणे) वाचणे आणि संपूर्ण दिवस आपल्या स्थिर मुद्रेपासून नियमित ब्रेक घेण्याच्या महत्त्वावर जोर दिला जातो.
या सर्व युक्त्या वेदना आणि मांसपेशींच्या थकव्याची जोखीम कमी करण्यासाठी साह्यभूत ठरू शकतील.
बैठकमुद्रेशी पाठीच्या कण्याचा संबंध नाही…
म्हणून जर तुम्हाला पाठ किंवा मानेची वेदना जाणवली तर त्याचा तुमची बैठकमुद्रा किंवा चालण्याशी काहीही संबंध नाही.
कदाचित ती जीवनाच्या इतर वैशिष्ट्यांशी अधिक संबंधित असावी. म्हणजे आपण किती तणावग्रस्त आहात किंवा शारीरिक रूपाने किती सक्रिय आहात आणि तुम्हाला यापूर्वी पाठीच्या वेदना जाणवल्या आहेत का?
एक गोष्ट मात्र चांगली आहे, की झुकून बसल्याने आपल्या पाठीच्या कण्याला कोणतेही नुकसान होत नाही. चांगलं यासाठी, की ऑलिम्पिक भारतोलनापासून लिंबो डान्सिंगसारख्या विविध बाबींसाठी आपल्या पाठीच्या कण्याला डिझाइन केले आहे.
दीर्घ काळ उभं राहणं त्रासदायक
आपण थोड्या वेळ जरी बसलो तरी पाठीच्या कण्याला कोणतेही नुकसान होत नाही. भले आपण त्या वेळी की-बोर्डवर आपल्या बोटांची हालचाल करीत असेल. अलीकडे स्टँडिंग डेस्क लोकप्रिय आहे. दीर्घकाळ बैठकमुद्रेच्या तुलनेत दीर्घ काळ उभे राहणे पाठीच्या कण्यासाठी फारसे आरामदायी नाही.
संपूर्ण दिवस चांगली गोष्ट म्हणजे, आपल्या शरीराला अधिक आरामदायी करणे आणि उत्पादकता आणि सकारात्मक भावना वाढविण्यासाठी अधूनमधून मुद्रा बदलायला हवी. तुमच्या डेस्कवर दीर्घ काळ चालणे, खेचणे, उभे राहणे किंवा बसण्यासाठी एक ब्रेकही घ्यायला हवा.
कशी असते सकारात्मक मुद्रा?
मात्र एक क्षेत्र असंही आहे, जिथे झुकल्यामुळे नकारात्मक प्रभाव पडू शकतो. सरळ बसण्याच्या तुलनेत झुकल्याने माहिती आणि स्मृती कमकुवत होते, त्याचबरोबर मूडही खराब होतो. असं पाहिलं गेलं आहे, की झुकलेल्या मुद्रेतून सरळ मुद्रेत गेल्याने स्मृती आणि मनोवस्थेसंबंधीच्या समस्येतून वेगाने सुधारणा होते.
एकूणच या तथ्यात काही तरी दम आहे, की झुकणे अजूनही नकारात्मकतेचा संकेत असू शकतो. मात्र, याशिवाय पुराव्यांवरून असे समजते, की कोणतीही विशिष्ट अशी आदर्श किंवा चांगली मुद्रा नसते. मुद्रेत फरक केला तरी त्याचा पाठीच्या कण्याच्या वेदनेशी कोणताही संबंध नाही. वस्तुत: एका व्यक्तीची आसनमुद्रा दुसऱ्या व्यक्तीच्या आसनमुद्रेशी भिन्न असते. एवढेच नाही, तर जाती, लिंग आणि मूडच्या आधारावरही बैठकमुद्रा भिन्न असू शकते.
म्हणूनच जर तुम्ही झुकून बसणारे असाल तर तुम्ही निश्चिंत राहा. कारण ते वाईट नाही. किंबहुना तुम्ही कसेही बसलात तरी ते चांगलेच आहे. आरामदायी मुद्रा सुरक्षित आहेत आणि बसणे धोकादायक नसते.
गतिमान राहण्यासाठी मणक्याचे डिझाइन
एकूणच मानवाचा पाठीचा कणा दीर्घ काळ एकाच मुद्रेत स्थिर राहण्यापेक्षा तो गतिमान करण्यासाठी डिझाइन केलेला आहे. हेच कारण आहे, की थकवा आणि त्यानंतर होणारी अडचण कमी करण्यासाठी दिवसभर हालचाल करणे आणि आपली मुद्रा बदलणे महत्त्वपूर्ण आहे.
जर तुम्ही फेरफटका मारत नसाल आणि पूर्णदिवस कम्प्युटरसमोर झुकून बसत असाल, तर यामुळे तुम्हाला अडचण जाणवू शकेल. मात्र, तुमच्या पाठीच्या कण्याच्या वेदनेचं ते कारण अजिबातच नाही.
Visit Us
- Facebook page : @kheliyad
- Instagram : @kheliyad
- X : @kheliyad
- Linkedin : @MaheshPathade03
- Youtube Channel : Team Kheliyad
- WhatsApp Channel: kheliyad
- email : kheliyad.sports@gmail.com
What is Surya bhedan Pranayam? सूर्यभेदन प्राणायाम म्हणजे काय?
#पाठीचाकणा #backbone #spinal #spine #spinalcord #back-bone #chine #spina #bending #पाठदुखी
[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”60″]