All SportsCricketSports Historysports newsVirat Kohli

Virat Kohli च्या वेगवान 25 हजार धावा

विराट कोहली (Virat Kohli) वेगाने 25 हजार धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांच्या यादीत तो सहावा आहे. त्याने 19 फेब्रुवारी 2023 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत हा टप्पा ओलांडला. पहिल्या डावात विराट कोहली याने 44 आणि दुसऱ्या डावात 20 धावा केल्या. त्यामुळे त्याच्या (Virat Kohli) 492 आंतरराष्ट्रीय सामन्यांत (कसोटी, वन-डे आणि टी20) 25 हजार 12 धावा केल्या आहेत.

  • विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये वेगवान 17 शतके ठोकली आहेत. यात त्याने सौरव गांगुली याचाही विक्रम मोडीत काढला आहे.
  • विराट कोहली याने सलग तीन वर्षांत 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो भारतातला चौथाच फलंदाज आहे. यापूर्वी अशी कामगिरी सौरव गांगुली (1997-2000), सचिन तेंडुलकर (1996-1998) आणि महेंद्रसिंह धोनी (2007-09) यांनी केली आहे.
  • विराट सलग पाच अर्धशतके बनविणारा जगातला पहिलाच फलंदाज आहे.

या पाच संघांविरुद्ध विराटने केली द्विशतके

  1. 200 धावा- वेस्ट इंडीजविरुद्ध, नॉर्थ साउंड, जुलै 2016
  2. 211 धावा- न्यूझीलंडविरुद्ध, इंदूर, ऑक्टोबर 2016
  3. 235 धावा- इंग्लंडविरुद्ध, मुंबई, डिसेंबर 2016
  4. 204 धावा- बांगलादेशविरुद्ध, हैदराबाद, फेब्रुवारी 2017
  5. 213 धावा- श्रीलंकाविरुद्ध, नागपूर, नोव्हेंबर 2017

Read more : हा कसोटी सामना विराट कधीही विसरू शकणार नाही…

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

फलंदाज सामने धावा सरासरी सर्वोच्च 100-50
सचिन तेंडुलकर 664 34,357 48.52 248* 100-164
कुमार संगकारा 594 28,016 46.77 319 63-153
रिकी पाँटिंग 560 27,483 45.95 257 71-146
माहेला जयवर्धने 652 25,957 39.15 374 54-136
जॅक कॅलिस 519 25,534 49.10 224 62-149
विराट कोहली 492 25,012 53.20 254* 74-129

कोहलीच्या धावा

106 8,195 271 12,809 115 4,008
कसोटी धावा वन-डे धावा टी-20 धावा

[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.facebook.com/kheliyad/” column_width=”4″] [jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”65″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!