ना लस ना व्हिसा- नोवाक जोकोविच याच्यासमोर अडचणींची बाधा
ना लस ना व्हिसा- नोवाक जोकोविच याच्यासमोर अडचणींची बाधा
कोरोना प्रतिबंधक लस न घेतल्याने टेनिस स्टार नोवाक जोकोविच याचा व्हिसा ऑस्ट्रेलियाने रद्द केला होता. त्यामुळे जोकोविचने याविरुद्ध फेडरल कोर्टात दाद मागितली होती. यात नोवाक जोकोविच याच्या बाजूने निकाल देत कोर्टाने ऑस्ट्रेलियन सरकारला व्हिसा परत देण्याचा निर्णय 10 जानेवारी 2022 रोजी दिला. नऊ वेळा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारा जोकोविच पुन्हा ‘ऑस्ट्रेलियन कोर्ट’वर जिंकला. मात्र, या निकालानंतरही जोकोविचला व्हिसा मिळणे सोपे नसल्याचेच सध्याचे चित्र आहे.
लस न घेतल्याने नोवाक जोकोविच याने कायद्याची लढाई जिंकली असली तरी ऑस्ट्रेलियन सरकारने दुसऱ्यांदा व्हिसा रद्द करण्याची धमकी दिली आहे.
फेडरल सर्किट कोर्टाचे जज अँथोनी केली यांनी जोकोविच याचा व्हिसा बहाल केला. जोकोविच याचा व्हिसा 5 जानेवारी 2022 रोजी ऑस्ट्रिलेयात दाखल होताच कोरोना लसीकरणाच्या नियमांमुळे रद्द करण्यात आला होता. नियमांचे पालन न केल्यामुळे त्याचा व्हिसा रद्द करण्यात आला होता.
या प्रकरणी न्यायाधीशांनी ऑस्ट्रेलियन सरकारला स्पष्ट आदेश दिले आहेत. कोर्टाच्या निर्णयानंतर 30 मिनिटांत जोकोविचला मेलबर्न येथील विलगीकरण हॉटेलमधून बाहेर काढावे.
सरकारी वकील क्रिस्टोफर ट्रान यांनी न्यायाधीशांना सांगितले, की इमिग्रेशन, नागरिकत्व आणि बहुसांस्कृतिक विभागाचे मंत्री एलेक्स हॉके याबाबत निर्णय घेणार आहेत. जोकोविचला व्हिसा द्यायचा किंवा नाही याचा अधिकार हॉके यांना आहे.
याचाच अर्थ, जोकोविचला पुन्हा निर्वासित म्हणून राहावे लागणार आहे. त्यामुळे 17 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या आस्ट्रेलियन ओपन स्पर्धेपासून त्याला वंचित राहावे लागू शकते.
न्यायाधीश केली म्हणाले, ‘‘जर व्हिसा रद्द करण्याचा अधिकार वापरला गेल्यास या व्यक्तीला (जोकोविच) देशाबाहेर करावे लागेल. त्यामुळे पुढची तीन वर्षे तो ऑस्ट्रेलिया येऊ शकणार नाही.’’ ट्रान आणि त्यांच्या टीमनेही न्यायालयाच्या या मताला पुष्टी दिली.
जोकोविचने ऑस्ट्रेलियाच्या फेडरल सर्किंट आणि फॅमिली कोर्टाला या प्रकरणी आव्हान दिले होते. ऑस्ट्रेलिया सरकारने 5 जानेवारी 2022 रोजी मेलबर्नमध्ये पोहोचताच त्याचा व्हिसा रद्द केला होता. कारण कोरोना लसीकरण नियमांत वैद्यकीय चाचणीतून सवलत मिळण्यासाठी जे मानदंड आहेत, त्यात तो अपयशी ठरला होता.
जोकोविचने सांगितले, की मला लसीकरणाचा पुरावा देण्याची गरजच नाही. कारण मी गेल्या महिन्यात (डिसेंबर 2021) कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा पुरावा माझ्याकडे आहे. न्यायालयात जोकोविचने सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये नमूद केले आहे, की लसीकरण घेतलेले नाही.
कोरोना संसर्ग झालेल्या लोकांना सहा महिन्यांत लसीकरण करण्याची गरज नसल्याचे ऑस्ट्रेलियाच्या तपासणी विभागानेच स्पष्ट केले आहे.
सर्किट कोर्टाचे न्यायाधीश केली यांनी जोकोविचने सादर केलेली कागदपत्रे तपासली. ते म्हणाले, की जोकोविचने मेलबर्न विमानतळावरील अधिकाऱ्यांना टेनिस ऑस्ट्रेलियाद्वारे मिळालेल्या वैद्यकीय सवलतीची कागदपत्रे सोपवली होती.
जोकोविचचे वकील निक वूड यांना न्यायाधीशांनी विचारले, की ‘‘प्रश्न हा आहे, की जोकोविच आणखी काय करू शकला असता?’’
जोकोविचच्या वकिलांनी सांगितले, की तो यापेक्षा अधिक काहीच करू शकला नसता. वकील म्हणाले, जोकोविचने अधिकाऱ्यांना समजून सांगण्याचा बराच प्रयत्न केला. ऑस्ट्रेलियात प्रवेशासाठी तो जे काही करू शकत होता, ते सर्व त्याने केले.
या प्रकरणाची आभासी सुनावणी अनेक वेळा खंडित झाली होती. कारण जगभरातील टेनिस चाहते ही सुनावणी पाहत होते. एकवेळ तर कोर्टाची लिंकच हॅक झाली होती.
जोकोविच 20 वेळा ग्रँडस्लॅम जिंकला आहे. आणखी एक किताब जिंकला तर तो रॉजर फेडरर, तसेच रफाएल नदालच्या पुढे जाऊ शकेल. जोकोविचने ऑस्ट्रेलिया ओपन नऊ वेळा जिंकला आहे.
जोकोविचच्या आईवडिलांच्या काय आहेत भावना?
बेलग्रेड : टेनिस स्टार नोवाक जोकोविच याच्या समर्थनासाठी 10 जानेवारी 2022 रोजी मायदेशी सर्बियात एक रॅली काढण्यात आली. यात जोकोविचच्या आईवडिलांनीही सहभाग घेतला होता. जोकोविचची आई याना जोकोविच म्हणाल्या, ‘‘आज मोठा दिवस आहे. आज संपूर्ण विश्व सत्य ऐकेल. आशा आहे, की नोवाकला स्वातंत्र्य मिळेल. आम्हाला त्याच्यावर आणि कायद्यावर पूर्ण विश्वास आहे.’’
जोकोविचचे वडील एस जोकोविच म्हणाले, ‘‘हे यामुळे होत आहे, की आम्ही जगातील एक छोटासा भाग आहोत. मात्र, आम्हाला स्वत:वर अभिमान आहे. तो आम्ही तोडू नाही शकत. नोवाक स्वातंत्र्याचा पर्याय आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे.’’
जोकोविचची आई म्हणाली, की ज्या हॉटेलमध्ये नोवाकला ठेवले आहे, तेथील स्थिती अमानवीय आहे. त्या पुढे म्हणाल्या, की नोवाकला नाश्ताही मिळालेला नाही. तो ना रूमच्या बाहेर निघू शकत, ना पार्ककडे पाहू शकत.
या स्टार खेळाडूंना कोरोनाची बाधा
Follow on Facebook Page- kheliyad
[jnews_block_37 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”90″]