या ऑलिम्पिकमध्ये विजेत्याला देण्यात आले होते खऱ्या सोन्याचे पदक
टोकियो ऑलिम्पिक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. ऑलिम्पिकविषयी न ऐकलेल्या काही गोष्टी आहेत. ऑलिम्पिकचं सुवर्ण पदक एरव्ही सोन्याचा मुलामा असलेले असते. मात्र, एका ऑलिम्पिक स्पर्धेत विजेत्यांना चक्क खऱ्या सोन्याचे पदक देण्यात आले होते. 1904 ते 1920 दरम्यान ऑलिम्पिकशी संबंधित अशाच काही महत्त्वाच्या पैलूंवर टाकलेला प्रकाशझोत…
1904, सेंट लुई, अमेरिका |
1904 मध्ये प्रथमच ऑलिम्पिक युरोपबाहेर आयोजित करण्यात आले. |
याच ऑलिम्पिकपासून तीन पदके देण्याची पद्धत सुरू झाली. |
मुष्टियुद्ध (Boxing), डंबल, फ्रीस्टाइल कुस्ती आणि डेकॅथलॉन या खेळांना ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्यात आले. |
अमेरिकी जिम्नास्ट खेळाडू जॉर्ज इजर याने कृत्रिम पाय लावून स्पर्धेत भाग घेतला. विशेष म्हणजे तीन सुवर्ण पदकांसह सहा पदके त्याने जिंकली. तारुण्यात एका रेल्वे अपघातात त्याला आपला डावा पाय गमवावा लागला होता. |
तुम्हाला आज आश्चर्य वाटेल, पण जलतरण स्पर्धेसाठी कृत्रिम तलाव करण्यात आला होता. त्यात ही स्पर्धा घेण्यात आली. |
अमेरिकेने 239 पदके जिंकली. एका ऑलिम्पिकमध्ये एवढी पदके जिंकणारा एकमेव अमेरिका आहे. |
1904 मध्ये सेंट लुईसपर्यंत पोहोचण्यात अडचणी आणि रशिया- जपान युद्धामुळे युरोपातील तणावामुळे एकूण 630 खेळाडूच भाग घेऊ शकले. त्यातील 523 अमेरिकेचेच खेळाडू होते. निम्म्यापेक्षा अधिक स्पर्धांमध्ये स्थानिक खेळाडूंचाच सहभाग होता.
|
मॅरेथॉन स्पर्धा तर एखाद्या खेड्यात तरी बरी होईल, पण या ऑलिम्पिकमध्ये मॅरेथॉनची शर्यत धुळीने माखलेल्या रस्त्यावर घेतली होती. प्रचंड तापमानात धावताना खेळाडूंच्या अंगावर ही धूळ उडत होती. संपूर्ण शर्यतीच्या मार्गात पाण्याचं एकमेव स्टेशन होतं. |
दक्षिण आफ्रिकेने या ऑलिम्पिकमध्ये प्रथमच भाग घेतला होता. त्यांच्या आठ खेळाडूंपैकी लेन टाऊ आणि जान माशियानी हे दोन धावपटू होते. शर्यतीदरम्यान लेनच्या मागे कुत्री लागली होती. जवळजवळ एक मैलापर्यंत या कुत्र्यांनी त्याचा पाठलाग केला होता. |
अमेरिकेला प्रथमच ऑलिम्पिकचे यजमानपद मिळाले होते. त्यानंतर अमेरिकेने आठ वेळा उन्हाळी आणि हिवाळी ऑलिम्पिकचे यजमानपद भूषविले आहे. 2028 च्या उन्हाळी ऑलिम्पिकचे यजमानपदही अमेरिका भूषविणार आहे. ही स्पर्धा लॉस एजिल्स याच शहरात होणार आहे. |
1912, स्टॉकहोम ऑलिम्पिक | |
या ऑलिम्पिकमध्ये सुमारे 2400 खेळाडूंनी 28 देशांचं प्रतिनिधित्व केलं. यात 48 महिला खेळाडूंचा समावेश होता. महिला खेळाडूंनी 14 खेळांच्या 102 स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला होता. | |
ही अखेरची ऑलिम्पिक होती, ज्यात विजेत्या खेळाडूला खरोखरचं सुवर्ण पदक दिलं जात होतं. | |
ही पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा होती, ज्यात पाचही खंडांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. पाच रिंग या पाच खंडांचं ऑलिम्पिक प्रतीक आहे. | |
या ऑलिम्पिकमध्ये ट्रॅक शर्यतीत स्वयंचलित वेळेचं उपकरण (स्टॉप वॉच) आणि ‘फोटो फिनिश’ची सुरुवात करण्यात झाली. | |
फिनलंडचा आल्फ्रेड एसिकाइनेन आणि रशियाचा मार्टिन क्लेन यांच्यातील मिडलवेट कुस्ती स्पर्धेची उपांत्य फेरी तब्बल 11 तासांपेक्षा अधिक वेळ रंगली होती. यात क्लेन याने विजय मिळवला. या स्पर्धेत क्लेन हा खेळाडू इतका थकला होता, की त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. | |
सायकलिंग रोड रेससाठी कोर्स 320 किलोमीटरचा होता. ही रेस ऑलिम्पिकच्या इतिहासात सर्वांत लांब पल्ल्याची होती. | |
या ऑलिम्पिक प्रथमच महिलांची जलतरण स्पर्धा, तसेच डेकॅथलॉन आणि पेंटॅथलॉन स्पर्धा घेण्यात आल्या. | |
मुष्टियुद्ध स्पर्धा ऑलिम्पिक खेळातून वगळण्यात आली. कारण स्वीडनमध्ये हा खेळ आकर्षक नव्हता. |
1908, लंडन ऑलिम्पिक | |
या ऑलिम्पिकचे यजमान खरं तर रोमला मिळणार होतं. मात्र, 1906 मध्ये वेसुवियस ज्वालामुखी पर्वतावर मोठा स्फोट झाला. त्यात नेपल्स शहराला सर्वाधिक फटका बसला. इतका, की या आर्थिक संकटामुळे या स्पर्धेचं यजमानपद लंडनला देण्यात आलं. | |
लंडन ऑलिम्पिक 188 दिवसांपर्यंत सुरू होती. मात्र, या स्पर्धेचा अधिकृत उद्घाटन सोहळा 13 जुलैपर्यंत होऊ शकला नाही. | |
1908 चे ऑलिम्पिक खेळ 27 एप्रिल रोजी रॅकेट स्पोर्टसने सुरू झाले आणि समारोप 31 ऑक्टोबर रोजी हॉकीच्या फायनलने ऑलिम्पिकचा समारोप झाला. | |
प्रथमच ऑलिम्पिकसाठी विशेष स्टेडियम उभारण्यात आले होते. व्हाइट सिटी स्टेडियम खेळांसाठी विशेष आकर्षणाचं केंद्र झालं होतं. यात रनिंग ट्रॅक, जलतरण तलाव, सायकलिंग, कुस्ती आणि जिम्नॅस्टिक्सचाही मंच होता. | |
याच ऑलिम्पिकमध्ये जलतरण स्पर्धा खुल्या तलावात नव्हे, तर प्रथमच 66,000 प्रेक्षकांच्या उपस्थितीत स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आली. प्रेक्षकांनाही आपल्या आवडत्या जलतरणपटूला चीअरअप करण्याचा आनंदही याच ऑलिम्पिकमध्ये लुटता आला. | |
लंडन ऑलिम्पिक दरम्यान प्रथमच खेळाडू राष्ट्रीय ध्वजासह संचलनात सहभागी झाले. या संचलनात 13 जुलै 1908 रोजी किंग एडवर्ड सातवा यानेही भाग घेतला होता. | |
मॅरेथॉन स्पर्धेच्या निर्धारित अंतरापेक्षा (42 किलोमीटर) ही शर्यत 195 मीटरपर्यंत वाढवण्यात आली होती. ही शर्यत ‘विंडसर महाला’च्या नर्सरीच्या खिड़कीपासून सुरू झाली. तिचा समारोप स्टेडियमच्या रॉयल बॉक्ससमोर व्हावा म्हणून ही शर्यत 195 मीटरपर्यंत वाढवण्यात आली. त्यानंतर 1924 च्या ऑलिम्पिकपासून या शर्यतीचे अधिकृत अंतर 42.195 किलोमीटर झाले. | |
ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळविणारा जॉन टेलर हा पहिला कृष्णवर्णीय खेळाडू ठरला. अमेरिकेच्या 4 बाय 400 मीटर रिले संघात त्याचा समावेश होता. | |
पुरुषांच्या एका शॉटच्या 100 मीटर शर्यतीची ‘डीयर स्पर्धा’ 1908 च्या ऑलिम्पिकपासून सुरू करण्यात आली. या स्पर्धेत हरणाच्या आकाराचं लक्ष्य ठेवण्यात आलं होतं. स्पर्धेनुसार नेमबाज प्रत्येक शर्यतीत एक किंवा दोन शॉटमध्ये लक्ष्यभेद करीत होते. | |
या ऑलिम्पिकमध्ये प्रथमच अॅथलेटिक्स स्पर्धांचा समावेश करण्यात आला. त्या वेळी रिले शर्यतीला ‘ऑलिम्पिक रिले’ असे पुकारले जायचे. खेळाडूंनी 200 मीटर, 400 मीटर आणि 800 मीटर शर्यतीत सहभाग नोंदवला. | |
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचं एकच पथक ऑलिम्पिकमध्ये ‘आस्ट्रालासिया’ या नावाने खेळलं होतं. म्हणजे या संघात या दोन्ही देशांचे खेळाडू सहभागी झाले होते. |
1920, अँटवर्प ऑलिम्पिक | |
1916 ची ऑलिम्पिक स्पर्धा बर्लिनमध्ये होणार होते. मात्र, पहिल्या महायुद्धामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती. 1920 च्या ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद अँटवर्पला देण्यात आले. कारण पहिल्या महायुद्धात बेल्जियमच्या लोकांना खूप यातना भोगाव्या लागल्या होत्या. | |
जे देश पहिल्या महायुद्धात पराभूत झाले होते, त्यांना या ऑलिम्पिकसाठी आमंत्रण दिले गेले नाही. हे पराभूत देश होते जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी, बल्गेरिया आणि तुर्कस्तान. सोव्हिएत संघाने या स्पर्धेत भाग न घेण्याचा निर्णय घेतला होता. | |
खराब हवामान आणि आर्थिक संकटाशी सामना करणाऱ्या अँटवर्प शहराकडे युद्धातील नुकसान झालेल्या इमारतींचा कचरा साफ करण्यासाठी फारच कमी वेळ होता. त्यामुळे जेव्हा ऑलिम्पिक सुरू झाली तेव्हा अॅथलेटिक्स स्टेडियमचे काम अपूर्णावस्थेत होतं. खेळाडूंची गर्दीच्या खोल्यांमध्ये निवासव्यवस्था करण्यात आली होती. त्यांच्या खाटा फोल्डिंगच्या होत्या. | |
उद्घाटन सोहळ्यादरम्यान प्रथमच ऑलिम्पिकचा ध्वज फडकावण्यात आला होता. | |
प्रथमच खेळाडूंनी सर्व प्रतिस्पर्ध्यांसोबत ऑलिम्पिक शपथ घेतली आणि प्रथमच शांतीचे प्रतीक म्हणून पांंढऱ्या रंगाचे कबूतर हवेत सोडले होते. | |
इटलीचा नेडो नादी याने ऑलिम्पिक इतिहासातली सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने तलवारबाजीच्या सहा स्पर्धांमध्ये पाच सुवर्ण पदके जिंकली होती. | |
भारताकडून 1900 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नार्मन प्रिचार्ड पहिला खेळाडू खेळला होता. त्याच्यानंतर तब्बल 20 वर्षांनी भारताने आपलं पहिलं ऑलिम्पिक पथक 1920 च्या ऑलिम्पिकमध्ये पाठवलं होतं. | |
भारतीय संघात चार खेळाडूंचा समावेश होता. हे चार खेळाडू पुढीलप्रमाणे होते ः अॅथलीट ः पूर्मा बॅनर्जी (100 मीटर आणि 400 मीटर), फाडेप्पा चौगले (10,000 मीटर आणि मॅरेथॉन), सदाशिव दातार (मॅरेथॉन), कुस्ती ः कुमार नवाले आणि रणधीर शिंडेस. |
1932, लॉस एंजिल्स ऑलिम्पिक |
या ऑलिम्पिकपासून ऑलिम्पिक क्रीडाग्राम ही संकल्पना उदयास आली. जो बाल्डिवन हिल्सवर पहिले क्रीडाग्राम निर्माण करण्यात आले. हेच क्रीडाग्राम भविष्यातील स्पर्धांसाठी कायमस्वरूपी उपयोगात आणले गेले. या क्रीडाग्राममध्ये केवळ पुरुष खेळाडूंना ठेवण्यात आले. महिला खेळाडूंचा मुक्काम मात्र एका हॉटेलमध्ये करण्यात आला होता. | याच ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा विजेत्या तीन खेळाडूंसाठी तीन पोडियम उभारण्यात आले. ऑलिम्पिकमध्ये आजही ही पोडियम संकल्पना सुरू आहे. |
याच ऑलिम्पिकमध्ये आणखी एक महत्त्वाचा बदल करण्यात आला. सुवर्ण पदक जिंकणाऱ्या खेळाडूच्या देशाचे राष्ट्रगीत वाजवण्यात येऊ लागले. त्याचबरोबर त्या देशाचा ध्वजही फडकावण्यात येऊ लागला. | या ऑलिम्पिकमध्ये फिल्ड हॉकीमध्ये फक्त तीन देशांनी सहभाग नोंदवला होता. यात अमेरिकेने दोन्ही सामने गमावले. भारताने अमेरिकेचा तब्बल दोन डझन गोलने म्हणजे 24-1 असा दणदणीत पराभव केला, तर जपाननेही अमेरिकेचा खरपूस समाचार घेत 9-2 असा पराभव केला. असं असलं तरी अमेरिकेला कांस्य पदक मिळाले. |
लॉस एंजिल्सच्या प्रसिद्ध रस्त्याला खेळांच्या सन्मानार्थ ‘ऑलिम्पिक बोलवार्ड’ असे नाव देण्यात आले. यापूर्वी या रस्त्याचे नाव ‘टेंथ स्ट्रीट’ असे होते. | तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीचे अंतर चुकून 3,460 मीटर झाले होते. म्हणजे एक लॅप अधिक होता. |
या ऑलिम्पिकमध्ये कोलंबिया या देशाने पहिल्यांदाच सहभाग नोंदवला. |
1936, बर्लिन ऑलिम्पिक |
ही ऑलिम्पिक अॅडॉल्फ हिटलरच्या काळातली. हिटलरने आपले सिद्धान्त स्पष्ट करण्यासाठी ऑलिम्पिकचे यजमानपद स्वीकारले. मात्र, त्याचा हा प्रयत्न यशस्वी ठरला नाही. | 1936 मधील या ऑलिम्पिक स्पर्धेचे प्रथमच टीव्हीवर थेट प्रसारण करण्यात आले. ग्रेटर बर्लिन भागात टीव्ही पाहण्यासाठी 25 खोल्या बांधण्यात आल्या. स्थानिक लोकांना हे सामने पाहण्यासाठी विनामूल्य व्यवस्था करण्यात आली होती. |
या ऑलिम्पिकमध्ये एक लाख प्रेक्षकक्षमतेचा ट्रॅक अँड फील्ड स्टेडियम, सहा व्यायामशाळा तयार करण्यात आल्या. | या ऑलिम्पिकमध्ये प्रथमच क्रीडाज्योत रिले काढण्यात आली. |
अमेरिकेचा जेसी ओवेन्स या वेगवान धावपटूने शर्यत व लांब उडीमध्ये चार सुवर्ण पदके जिंकली. बर्लिन ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारा तो सर्वांत यशस्वी खेळाडू ठरला. | अमेरिकेची मार्जोरी जेस्ट्रिंग (Marjorie Gestring) हिने स्प्रिंगबोर्ड जलतरण प्रकारात सुवर्ण पदक जिंकले. ऑलिम्पिकच्या इतिहासात सुवर्ण पदक जिंकणारी ती सर्वांत लहान खेळाडू ठरली. |
डेन्मार्कची 12 वर्षीय इंज सोरेनसन (Inge Sorensen) हिने 200 मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये कांस्य पदक मिळविले. वैयक्तिक प्रकारात पदक जिंकणारी ती सर्वांत कमी वयाची खेळाडू ठरली. | जपानचे पोल व्हॉल्ट खेळाडू शुहेई निशिदा आणि सुएयो ओए संयुक्त दुसऱ्या स्थानी राहिले होते. त्याचे कारण म्हणजे या दोघांनीही एकमेकांविरुद्ध खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे दोघांना रौप्य व कांस्य पदके अर्धे अर्धे कापून ते एकमेकांना चिकटवून देण्यात आले. |
या ऑलिम्पिकमध्ये बास्केटबॉल, कनोइंग आणि फिल्ड हँडबॉल प्रथमच समाविष्ट करण्यात आले. | आउटडोर टेनिस कोर्टवर बास्केटबॉल स्पर्धा खेळविण्यात आली. हा कोर्ट माती आणि वाळूपासून बनिवण्यात आलेला होता. |
1948 लंडन ऑलिम्पिक |
दुसऱ्या महायुद्धामुळे 1948 मध्ये ऑलिम्पिक 12 वर्षांनंतर खेळविण्यात आले. | जर्मनी आणि जपानला या स्पर्धेचे आमंत्रण देण्यात आले नाही. कारण दुसऱ्या महायुद्धात हे दोन्ही देश पराभूत झाले होते. |
सोव्हिएत संघानेही या स्पर्धेत सहभाग घेतला नाही. कारण यात प्रथमच साम्यवादी देशांनी भाग घेतला होता. त्यात हंगेरी, युगोस्लाव्हिया आणि पोलंड या देशांचा समावेश होता. | या ऑलिम्पिकमध्ये कोणताही क्रीडाग्राम निर्माण केला नाही. पुरुष खेळाडूंची निवासव्यवस्था अक्सब्रिजमध्ये सेनेच्या शिबिरात, तर महिला खेळाडूंची निवासव्यवस्था साउथलँड महाविद्यालयात करण्यात आली होती. |
स्प्रिंट रेसमध्ये (100 ते 400 मीटर) खेळाडूंसाठी प्रथमच शर्यतीला सुरुवात करताना ब्लॉकचा उपयोग करण्यात आला. | नेदरलँडची खेळाडू फॅनी ब्लँकर्स कोएन हिने चार सुवर्ण पदके जिंकली होती. त्या वेळी ती दोन मुलांची आई होती. या 30 वर्षीय खेळाडूने चार शर्यतींमध्ये सहभाग घेतला होता आणि चारही स्पर्धा ती जिंकली. |
अमेरिकेचा 17 वर्षीय बॉब माथियास डेकॅथलॉनमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा सर्वांत लहान खेळाडू ठरला. विषेष म्हणजे तो चार महिन्यांपू्वीच या खेळात आला होता. | हंगेरीची नेमबाज कॅरोली टाकाक्स हिचा हात 1938 मध्ये एक ग्रेनेड बॉम्बमुळे तुटला होता. नंतर तिने डाव्या हाताने नेमबाजीचा सराव केला. दहा वर्षांनी तिने रॅपिड फायर पिस्तूलमध्ये ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकले. |
जलतरणपटू सॅमी ली याच्या नेतृत्वाखालील अमेरिका संघाने पुरुष गटातील प्रत्येक स्पर्धा जिंकली. |
1952 हेलसिंकी ऑलिम्पिक |
इस्राएलने प्रथमच ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला. |
सोव्हिएत संघ 1912 नंतर प्रथमच ऑलिम्पिक खेळाकडे वळला. |
या ऑलिम्पिकवर शीतयुद्धाचा परिणाम स्पष्टपणे जाणवला. कारण सोव्हिएत संघाने आपल्या जवळच्या देशांसाठी ऑलिम्पिक क्रीडाग्रामची उभारणी केली. |
सोव्हिएत संघाची (यूएसएसआर) महिला जिम्नास्ट खेळाडूने सांघिक स्पर्धा जिंकून एका अशा मालिकेची सुरुवात केली, जी सोव्हिएत संघाच्या विघटनापूर्वी 40 वर्षे सुरू राहिली. |
हेलसिंकीपासूनच ऑलिम्पिक स्पर्धेत जर्मनी आणि जपानी संघांचेही पुनरागमन झाले. पूर्व जर्मनीनेही स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी निवेदन दिले होते. मात्र, ते फेटाळण्यात आले. फक्त पश्चिम जर्मनीच्याच खेळाडूंना ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी देण्यात आली. |
चेकोस्लोव्हाकियाचा लांब पल्ल्याचा धावपटू एमिल जातोपेक याने 5,000 मीटर शर्यत जिंकली. पाठोपाठ 10,000 मीटर शर्यतीतही सुवर्ण पदक जिंकले. तो दोन सुवर्ण पदकांवरच थांबला नाही, तर तिने मॅरेथॉनमध्येही प्रथमच सहभाग नोंदवला. त्यातही त्याने सुवर्ण पदक जिंकले. एकाच ऑलिम्पिकमध्ये तीन शर्यतींत सुवर्ण पदके जिंकण्याचा हा विक्रम अद्याप कोणीही मोडू शकलेलं नाही. |
1956 मेलबर्न ऑलिम्पिक |
मेलबर्नने ब्युनॉस आयर्सचा अवघ्या एका मताने पराभव करीत 1956 च्या ऑलिम्पिकचे यजमानपद मिळविले. |
ही पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा होती, जी उत्तर गोलार्धात आयोजित करण्यात आली. |
इजिप्त, लेबानन आणि इराकने सिनाई प्रायद्वीपवरील इस्राएलच्या आक्रमणाचा विरोध करण्यासाठी ऑलिम्पिकवर बहिष्कार घातला. |
ऑस्ट्रेलियातील अश्वांसाठी विलगीकरण अपरिहार्य करण्यात आले होते. त्यामुळे घोडेस्वारीची स्पर्धा स्वीडनच्या स्टॉकहोममध्ये स्थानांतरित करण्यात आली होती. ऑलिम्पिकच्या पाच महिन्यांपूर्वीच मेलबर्नपासून सुमारे 9,700 मैलांची घोडेस्वारीची स्पर्धा झाली होती. |
पूर्व आणि पश्चिम जर्मनीने एकच संघ स्पर्धेत पाठवला. 1964 च्या ऑलिम्पिकपर्यंत जर्मनीचा एकच संघ सहभागी होत राहिला. |
सोव्हिएत संघाने हंगेरीवर केलेल्या आक्रमणाचा अनेक पाश्चिमात्य देशांनी विरोध केला. याच कारणामुळे स्पेन, स्वित्झर्लंड आणि नेदरलँडने ऑलिम्पिकमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला. |
पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाने चीन गणराज्याच्या (तैवान) उपस्थितीमुळे ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यास नकार दिला. |
1960, रोम ऑलिम्पिक |
रोम शहराला 1908 च्या ऑलिम्पिकच्या यजमानपदाचा अधिकार मिळाला. मात्र, 1906 मध्ये देशातील हिंसाचारामुळे त्यांना यजमानपदावर पाणी सोडावे लागले. त्यानंतर 54 वर्षांनी त्यांना यजमानपदाचा अधिकार मिळाला. | उद्घाटन आणि समारोप सोहळ्याबरोबरच ट्रॅक अँड फिल्ड स्पर्धेसाठी ऑलिम्पिक स्टेडियम आणि स्पोर्ट्स पॅलेसची निर्मिती करण्यात आली. याशिवाय अनेक खेळांच्या आयोजनासाठी प्राचीन स्थळांचेही पुनर्निर्माण करण्यात आले. |
इथिओपियाची धावपटू अबेबे बिकिला ही अनवानीच मॅरेथॉन स्पर्धेत धावली आणि जिंकलीही. ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी ती पहिली आफ्रिकी खेळाडू होती. | अमेरिकेचा कॅसियस मार्सेलस क्ले (नंतर मुहम्मद अली या नावाने त्यांना ओळखले जाऊ लागले) याने लाइट-हेविवेट मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले. |
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने 1958 मध्ये अधिकृत ऑलिम्पिक गीत स्वीकारले. कोस्टिस पालमास लिखित या गीताला स्पायरोस समरस यांनी संगीत दिले होते. हे गीत पहिल्यांदा 1960 च्या रोम ऑलिम्पिकमध्ये सादर करण्यात आले होते. | या ऑलिम्पिकनंतर दक्षिण आफ्रिकेवर निर्बंध घालण्यात आले. 1992 पर्यंत हे निर्बंध होते. आयओसीला दक्षिण आफ्रिका सरकारचं वर्णभेदी धोरण मान्य नव्हतं. |
या ऑलिम्पिकचं थेट प्रसारण 18 युरोपीय देशांमध्ये करण्यात आलं. मात्र, अमेरिका, कॅनडा आणि जपानमध्ये हे प्रसारण काही तास उशिराने सुरू झालं. |
One Comment