पॅरालिम्पिकमध्ये विश्वविक्रम रचत जाझरियाने मिळविले भारतीय संघात स्थान
पॅरालिम्पिकमध्ये विश्वविक्रम रचत जाझरियाने मिळविले भारतीय संघात स्थान
भारताचा दिग्गज पॅरालम्पियन भालाफेकपटू देवेंद्र झाझरिया (Devendra Jhajharia) याने आपलाच विक्रम मोडीत काढत नवा विश्वविक्रम (world record) प्रस्थापित केला आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय निवड चाचणीत त्याने ही कामगिरी केली आहे. या विश्वविक्रमी कामगिरीसह त्याने टोकियो पॅरालिम्पिकची (Tokyo Paralympic) पात्रताही गाठली आहे.
पॅरालिम्पम्मध्ये पुरुषांच्या एफ-46 प्रकारात दोन सुवर्णपदके जिंकणारा 40 वर्षीय झाझरियाने बुधवारी, 30 जून 2021 रोजी निवड चाचणीदरम्यान 65.71 मीटर भाला फेकला. या कामगिरीमुळे तो पॅरालिम्पिकसाठीच पात्र ठरला नाही, तर नवा विश्वविक्रमही रचला. यापूर्वीचा 63.97 मीटरचा विक्रम त्याच्याच नावावर होता. 2016 च्या रियो ऑलिम्पिकमध्ये त्याने ही विक्रमी कामगिरी केली होती. त्यात त्याने सुधारणा करीत 65.71 मीटर भाला फेकून नवा विक्रम केला.
Paralympic Jhajharia world record | झाझरियाने हिंदीत ट्वीट करून ही माहिती दिली. तो म्हणाला, ‘‘दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये आज ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत 63.97 मीटरचा माझाच विश्वविक्रम मोडीत काढत नवा 65.71 मीटरचा विक्रम रचत मी टोकियोसाठी पात्र ठरलो आहे.’’ त्याने पुढे लिहिले, ‘‘माझ्या कुटुंबाचं सहकार्य, तसेच प्रशिक्षक सुनील तंवर आणि फिटनेस ट्रेनर लक्ष्य बत्रा यांच्या मेहनतीमुळेच मी करू शकलो.’’
टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धा 24 ऑगस्ट 2021 पासून सुरू होणार आहे. झाझरिया तिसऱ्यांदा पॅरालिम्पकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. त्याने 2004 ची अथेन्स पॅरालिम्पिक आणि 2016 च्या रियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.