साक्षी चौधरीला यामुळे गमवावी लागली आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धा | Boxing Sakshi Chaudhary Reviews
साक्षी चौधरीला यामुळे गमवावी लागली आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धा
Boxing Sakshi Chaudhary Reviews | भारतीय मुष्टियुद्धासाठी धक्कादायक बातमी आहे. आशियाई बॉक्सिंग (Boxing) स्पर्धेत साक्षी चौधरी (54 किलो) (Sakshi Chaudhary) हिला अंतिम फेरीतील स्थान गमवावे लागले आहे. कारण उपांत्य फेरीत कझाकिस्तानची प्रतिस्पर्धी खेळाडू डिना झोलमन हिने आक्षेप घेतला होता. हा आक्षेप योग्य ठरवत गुणांमध्ये झालेला बदल साक्षीच्या विरोधात गेला असून, उपांत्य फेरीतील झोलमन हिला विजयी ठरवण्यात आलं आहे. निकाल अचानक बदलल्याने ऑलिम्पिकला जाणाऱ्या भारतीय मुष्टियोद्ध्यांची संख्या आता चार झाली आहे.
Boxing Sakshi Chaudhary Reviews
Boxing Sakshi Chaudhary Reviews | आशियाई बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताच्या साक्षी चौधरीने झोलमनला 3-2 असे पराभूत केले होते. कझाकिस्तानची झोलमन या स्पर्धेतील अव्वल मानांकित बॉक्सर होती. मात्र, या निकालाला कझाकिस्तानच्या संघाने आव्हान दिले. निकालाचे समीक्षण केल्यानंतर स्पर्धेच्या न्यायाधीशांनी निकाल बदलला. आशियाई मुष्टियोद्धा महासंघाने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. त्यांनी जाहीर केले, की स्पर्धेत साक्षी चौधरीला बँटमवेट श्रेणीत झोलमनने पराभूत केले आहे. झोलमनला गुरुवारी, २७ मे २०२१ रोजी रात्री लढत संपल्यानंतर अधिकृतपणे विजयी घोषित करण्यात आले. डिना झोलमन आणि साक्षी चौधरी यांच्यात तिसऱ्या फेरीत लढत झाली. ही उपांत्य फेरीतली लढत होती. यात साक्षीने झोलमनचा 3-2 असा पराभव केला. मात्र, कझाकिस्तानला हा निर्णय मान्य नव्हता. यात काही तरी चूक झाल्याचे वाटत होते. हा निर्णय झोलमनच्या बाजूने लागायला हवा होता. त्यामुळे त्यांनी त्याबाबतचे पुरावे सादर केले. ज्युरींनी हे पुरावे योग्य ठरवत आपला निर्णय बदलत झोलमनला विजयी घोषित केले.
काय आहे नियम? Boxing Sakshi Chaudhary Reviews
Boxing Sakshi Chaudhary Reviews | मुष्टियुद्ध लढतीत निकालाबाबत आक्षेप असेल तर निकालाची समीक्षा करण्याचा नियम आहे. आंतरराष्ट्रीय मुष्टियोद्धा महासंघाने (AIBA) 2019 मध्ये लढतीची ही समीक्षा प्रणाली लागू केली होती. पराभूत झालेल्या मुष्टियोद्ध्याच्या संघातील मॅनेजर व मुख्य प्रशिक्षकाला लढतीच्या निर्णयानंतर विरोध नोंदवता येतो. मात्र, तो निर्णयानंतर 15 मिनिटांत नोंदवणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढच्या तीस मिनिटांत कागदोपत्री कार्यवाही पूर्ण करावी लागते. या समीक्षा प्रणालीचा उपयोग फक्त अटीतटीच्या लढतीसाठीच आहे. मात्र, 5-0 किंवा 4-1 अशा निर्णयात आक्षेप असला तरी लढतीची समीक्षा केली जात नाही. प्रत्येक संघाला समीक्षा करण्याची संधी फक्त दोन वेळा दिली जाते. आक्षेप योग्य असेल तर संधीत कपात होत नाही.
आता भारताचे चार जण ऑलिम्पिक पात्र
Boxing Sakshi Chaudhary Reviews | या निर्णयामुळे साक्षीची ऑलिम्पिकवारी हकुल्याने आता भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांची संख्या घटून चार उरली आहे. सहा वेळची विश्वविजेती एम. सी. मेरी कोम (51 किलो), लालबुआतसीही (64 किलो), पूजा रानी (75 किलो) आणि अनुपमा (81 किलोपेक्षा अधिक) यांनी गुरुवारी आपापल्या लढती जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. यापैकी प्रतिस्पर्धी न खेळल्याने पूजाला पुढे चाल मिळाली होती.