माजी कसोटीपटू मॅकगिलचे अपहरण
माजी कसोटीपटू मॅकगिलचे अपहरण
ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटी क्रिकेटपटू स्टुअर्ट मॅकगिल यांचे गेल्या महिन्यात सिडनीतील आपल्या निवासस्थानाहून अपहरण करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. मात्र, तासाभरात त्यांची सुटका झाली. Stuart MacGill abducted | न्यू साउथ वेल्स पोलिसांनी 5 मे 2021 रोजी ही माहिती दिली. या कथित अपहरणप्रकरणी चार जणांना ताब्यातही घेतले आहे.
Stuart MacGill abducted | अपहरणाची ही घटना घडली 14 एप्रिल रोजी. सिडनीतील उत्तरेतील रस्त्यावर एका व्यक्तीने मॅकगिल यांना रोखले. नंतर तेथे आणखी दोन व्यक्ती आल्या. त्यांनी मॅकगिल यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवले. मॅकगिल यांना सिडनीतील दक्षिण-पश्चिमेच्या भागात नेण्यात आले. तेथे त्यांना मारहाण करण्यात आली. नंतर तेथून पुन्हा दुसऱ्या ठिकाणी नेले आणि नंतर त्यांची सुटका केली. या दरम्यान त्यांना शस्त्रांचा धाक दाखवून धमकावण्यातही आलं होतं.
Stuart MacGill abducted | पोलिसांनी 27, 29, 42 आणि 46 वर्षांच्या चार जणांना अटक केली आहे. मॅकगिल यांचं अपहरण खंडणीसाठी झालं होतं, असं पोलिसांनी सांगितलं. अपहरणकर्त्यांना अशा व्यक्तीची गरज होती, ज्याच्याकडून बख्खळ पैसे मिळू शकतील. मात्र, मॅकगिल यांना पैसे न घेताच सोडून देण्यात आलं. माजी लेग स्पिनर मॅकगिल यांनी ऑस्ट्रेलियाकडून 1998 से 2008 दरम्यान 44 कसोटी सामने खेळले आहेत. य दरम्यान त्यांनी 208 गडी बाद केले आहेत.
[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”65″]