Kohli is fifth in the T20 rankings | टी20 मानांकन यादीत कोहली पाचवा
टी20 मानांकन यादीत कोहली पाचवा
Team kheliyad
टी20 फलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत T20 rankings | भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली Virat Kohli | याने पाचवे स्थान कायम राखले आहे. सलामीचा फलंदाज लोकेश राहुल सातव्या स्थानी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने April 2021 मध्ये नवी मानांकन यादी जाहीर केली आहे. पहिल्या दहा खेळाडूंमध्ये रिजवानचा समावेश आहे.
फलंदाजीत पाकच्या रिझवानने टाकले रोहितला मागे
पाकिस्तानचा मोहम्मद रिजवान याने पहिल्या दहा फलंदाजांमध्ये स्थान मिळवले आहे. यष्टिरक्षक फलंदाज रिजवान याने झिम्बाब्वेविरुद्ध पहिल्या आणि तिसऱ्या टी20 सामन्यात अनुक्रमे 82 आणि 91 धावा केल्या. यामुळे त्याने दहावे स्थान मिळविले आहे. त्याने इंग्लंडचा कर्णधार इयॉनन मॉर्गन आणि भारताचा सलामीवीर रोहित शर्माला मागे टाकले आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम तिसऱ्या स्थानी आहे. इंग्लंडचा डेव्हिड मलान 892 अंकांसह अव्वल स्थानावर आहे, तर अॅरोन फिंच 830 अंकांसह दुसऱ्या स्थानी आहे. गोलंदाज आणि अष्टपैलूंच्या यादीत भारताचा एकही खेळाडू पहिल्या दहामध्ये नाही. कसोटी फलंदाजांच्या यादीत कोहली पाचव्या, तर रोहित संयुक्त सातव्या स्थानी आहे. कसोटी फलंदाजांच्या यादीत T20 rankings | केन विल्यमसन अव्वल स्थानावर आहे. पॅट कमिन्स (908) गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. कमिन्स भारताचा रविचंद्रन अश्विन (850) याच्यापेक्षा 48 अंकांनी पुढे आहे. कसोटीत अष्टपैलूंच्या यादीत रवींद्र जडेजा तिसऱ्या, तर अश्विनने चौथे स्थान मिळविले आहे. जेसन होल्डर अव्वल स्थानावर आहे.
[visualizer id=”3636″]इंग्लंडने टाकले भारताला मागे
पाकिस्तान चौथ्या स्थानावर
टी20 आयसीसी क्रमवारीत T20 rankings | इंग्लंडने भारताला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे. इंग्लंड 272 गुणांसह पहिल्या, तर भारत 270 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. अर्थात, या दोन्ही देशांमध्ये अवघ्या दोन गुणांचा फरक आहे. ऑस्ट्रेलियाने 267 गुणांसह तिसरे, तर पाकिस्तान 260 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. या क्रमवारीवर नजर टाकली तर भारताची कामगिरी सातत्यपूर्ण राहिली आहे. 2018 मध्ये पाकिस्तानने अव्वल स्थान मिळवले होते, तर भारत दुसऱ्या स्थानावर होता. मात्र, एप्रिल 2021 च्या क्रमवारीत भारत दुसऱ्या स्थानावर असून, अव्वल स्थानावरील इंग्लंडपेक्षा अवघ्या दोन गुणांनी पिछाडीवर आहे. पाकिस्तानच्या आकडेवारीवर नजर टाकली, तर हा संघ बेभरवशाचाच असल्याचे स्पष्ट होते. हा संघ भारतापेक्षा 10 गुणांनी पिछाडीवर असून चौथ्या स्थानावर फेकला गेला आहे.
[visualizer id=”3633″]भारताची गोलंदाजी चिंताजनक
भारताकडे जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर, युझवेंद्र चहलसारखे गोलंदाज आहेत. मात्र, या गोलंदाजांची कामगिरी जागतिक क्रमवारीत T20 rankings | थिटी पडली आहे. किंबहुना टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात फलंदाजांनीच आपली छाप सोडली आहे. त्यामुळेच आयसीसीच्या गोलंदाजीच्या जागतिक क्रमवारीत भारताचा एकही गोलंदाज पहिल्या दहामध्ये स्थान मिळवू शकलेला नाही. तरीही टी20 च्या जागतिक क्रमवारीत भारताची सांघिक कामगिरी उजवी ठरली आहे. ज्या गोलंदाजांनी पहिल्या दहामध्ये स्थान मिळवले आहे, त्यांच्या संघाची कामगिरी यथातथाच राहिली आहे. गंमत म्हणजे, दक्षिण आफ्रिकेचा तबरेज शम्सी गोलंदाजांमध्ये अव्वल स्थानावर आहे. मात्र त्याच्या संघाची कामगिरी फारशी उंचावलेली नाही. दक्षिण आफ्रिका जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर आहे. तीच अवस्था अफगाणिस्तानची. क्रमवारीत अफगाणिस्तान सातव्या स्थानावर आहे. मात्र, त्या देशाचा राशीद खान 719 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. एकूणच गोलंदाजांच्या कामगिरीवर नजर टाकली तर भारताची गोलंदाजी चिंताजनक म्हणावी लागेल. सांघिक कामगिरीत अव्वल स्थान टिकवायचे असेल तर भारताला गोलंदाजीकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
[visualizer id=”3641″]अष्टपैलू कामगिरीतही भारतीयांची पिछाडी
गंमत पाहा, अष्टपैलू कामगिरीतही अफगाणिस्तानचा खेळाडू पहिल्या स्थानावर आहे. मोहम्मद नबी याने 285 गुणांसह पहिले स्थान मिळवले आहे. आश्चर्य म्हणजे, या यादीत भारताचा एकही खेळाडू नाही. तरीही भारत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर तर अफगाणिस्तानचा सातव्या स्थानावर आहे. या दोन देशांची तुलना केली तर अफगाणिस्तानचा एक गोलंदाज जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. अष्टपैलूंमध्ये त्यांचा एक खेळाडू अव्वल स्थानावर आहे. भारताचा मात्र एकही खेळाडू गोलंदाज आणि अष्टपैलूंच्या यादीत पहिल्या दहा खेळाडूंमध्ये नाही. तुम्ही झीशान मकसूदचं नाव ऐकलंय का… कदाचित नाहीच. हा खेळाडू ओमानचा आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण तो अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत दहाव्या स्थानावर आहे. रिचर्ड बेरिंग्टनचं नाव ऐकलंय का… नसेलच. हा स्कॉटलंडचा खेळाडू आहे. त्याने 194 गुणांसह चौथे स्थान मिळवले आहे. गंमत म्हणजे हे दोन्ही देश आयसीसीच्या एलिट संघांमध्ये नाही. मात्र, त्यांचे खेळाडू जागतिक अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या पाच क्रमांकांत स्थान मिळवतात. आणि जो देश जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे, त्या भारताचा एकही खेळाडू या यादीत पहिल्या दहामध्येही स्थान मिळवू शकलेला नाही.
[visualizer id=”3643″]एकूणच सांघिक खेळात वैयक्तिक कामगिरीपेक्षा सांघिक कामगिरीला महत्त्व आहे. वैयक्तिक कामगिरीत छोट्या छोट्या देशांचे खेळाडू अव्वल स्थानावर येत आहेत. याचाच अर्थ, भविष्यात भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानसारख्या संघांना कडवी टक्कर देण्यासाठी छोटे छोटे देश आव्हान उभे करतील. त्यासाठी काही काळ जावा लागेल. जेव्हा या संघांना एलिट संघांचा दर्जा मिळेल, तेव्हा विश्वविजेतेपदाच्या लढती अधिक रंगतदार होतील.
आपल्याला हा लेख कसा वाटला, यावर जरूर कमेंट करा. अशीच नवनवीन माहिती आपल्यासाठी आम्ही घेऊन येऊ. त्यासाठी आम्हाला फेसबुक पेज, इन्स्टाग्रामसह सोशल मीडियावर फॉलो जरूर करा…