Cricket retirement of this controversial West Indies player | विंडीजच्या या वादग्रस्त खेळाडूने घेतला क्रिकेट संन्यास
विंडीजच्या या वादग्रस्त खेळाडूने घेतला क्रिकेट संन्यास
वेस्ट इंडीजचा मधल्या फळीतील फलंदाज मर्लोन सॅम्युअल्स Marlon Samuels | याने वयाच्या 39 व्या वर्षी 4 नोव्हेंबर 2020 रोजी क्रिकेटच्या सर्व प्रारूपांमधून निवृत्ती घेतली. controversial West Indies player
वेस्ट इंडीजने ज्या दोन टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत धडक मारली, त्यात सॅम्युअल्सने Marlon Samuels| संघातर्फे सर्वाधिक धावसंख्या रचल्या होत्या. उत्तम क्रिकेटपटू असला तरी सॅम्युअल्स नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे त्याच्यावर दोन वर्षांची बंदीही घातली होती.
क्रिकेट वेस्टइंडीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉनी ग्रेव यांनी सांगितले, की क्रिकेट मंडळाला सॅम्युअल्सने जून 2020 मध्येच निवृत्त होण्याचे संकेत दिले होते. सॅम्युअल्सने अखेरचा सामना डिसेंबर 2018 मध्ये खेळला होता.
Cricket retirement of this controversial West Indies player
सॅम्युअल्सने कारकिर्दीत 71 कसोटी, 207 वन-डे आणि 67 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्य़ाच्या नावावर 11,000 धावांची नोंद आहे. याशिवाय त्याने दीडशेपेक्षा अधिक विकेटही घेतल्या आहेत.
प्रतिष्ठेच्या सामन्यांत उत्तम कामगिरी करणारा खेळाडू म्हणून सॅम्युअल्सची ओळख होती. विशेषतः वर्ल्डकपमध्ये त्याची कामगिरी नजरेत भरणारी आहे. 2012 आणि 2016 मधील टी-20 विश्वकरंडक स्पर्धेतील त्याची कामगिरी लक्षवेधी ठरली होती.
सॅम्युअल्सने 2012 मध्ये कोलंबोत श्रीलंकेविरुद्ध 56 चेंडूंत 78 धावांची खेळी साकारली होती. तो मैदानात उतरला तेव्हा वेस्ट इंडीजची स्थिती 10 षटकांत 2 बाद 32 अशी होती. मात्र सॅम्युअल्सच्या वादळी खेळीने वेस्ट इंडीजने टी-20 वर्ल्डकपच्या विजेतेपदाला गवसणी घातली होती.
त्यानंतर चार वर्षांनी 2016 मध्ये कोलकात्यातही त्याने 66 चेंडूंत 85 धावा केल्या होत्या. या कामगिरीच्या जोरावरच वेस्ट इंडीजने चार गडी राखून टी-20 विश्वविजेतेपदाला दुसऱ्यांदा गवसणी घातली होती.
सॅम्युअल्स इंडियन प्रीमियर लीगही (आयपीएल) खेळला आहे. केवळ आयपीएलच नाही, तर टी-20 च्या इतर लीग सामन्यांतही त्याने आपली छाप सोडली आहे. आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघांकडून तो एकूण 15 सामने खेळला आहे.
वादग्रस्त सॅम्युअल्स
सॅम्युअल्स उत्तम कामगिरी साकारत असला तरी मैदानाबाहेर वेगवेगळ्या कारणांनी तो नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सॅम्युअल्सने 2008 मध्ये पैसे घेतल्याचे प्रकरण गाजले होते.
क्रिकेटला बदनाम केल्याप्रकरणी तो दोषी आढळल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली होती.
आयसीसीने 2015 मध्ये त्याची गोलंदाजीची शैली अवैध ठरवली होती. त्यामुळे एक वर्षासाठी त्याला गोलंदाजी करण्यासही बंदी घालण्यात आली होती.
[jnews_block_8 first_title=”Read more at :” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”65″]