दक्षिण आफ्रिकेवर क्रिकेटबंदीचा धोका | South African cricket in danger of ban as government intervenes
South African cricket in danger of ban as government intervenes
दक्षिण आफ्रिकेवर क्रिकेटबंदीचा धोका
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघटनेसमोर South African cricket | अडचणी वाढल्या असून, अस्तित्वाचा प्रश्न उभा ठाकला आहे. या संघटनेवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटबंदीची टांगती तलवार आहे.
संघटनेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी हस्तक्षेप करण्याशिवाय पर्याय नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (आयसीसी) दक्षिण आफ्रिकेवर क्रिकेटबंदी लादण्याची शक्यता आहे.
South African cricket in danger of ban as government intervenes
क्रीडामंत्री नाथी मेथेथवा यांनी म्हंटले आहे, की आम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) या संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली आहे. आयसीसीच्या घटनेत सरकारी हस्तक्षेप करण्यास बंदी आहे.
जर राष्ट्रीय क्रिकेट संघटना स्वतंत्रपणे काम करू शकत नसेल तर अशा संघटनेच्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास आयसीसी बंदी घालते. सरकारी हस्तक्षेप वाढल्याने दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.
क्रिकेट मंडळाच्या कारभारावर दीर्घकाळ सुरू असलेली चौकशीच दक्षिण आफ्रिका सरकार आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) यांच्यातील तणावाचे मूळ कारण आहे. सीएसएचे मुख्य कार्यकारी अधिकारी थाबंग मेरोई यांची गंभीर गैरवर्तनाच्या आरोपावरून ऑगस्टमध्ये हकालपट्टी करण्यात आली.
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने South African cricket | स्वतंत्र तपासणी अहवाल सार्वजनिक करण्यास नकार दिला आहे. त्याच वेळी सीएसएशी संबंधित प्रकरणांची चौकशी करणाऱ्या सरकारशी संबंधित दक्षिण आफ्रिका स्पोर्ट्स फेडरेशन आणि ऑलिम्पिक समितीलाही सीएसएने विरोध केला आहे.
अर्थात, सीएसएला सरकारपुढे झुकावे लागले आणि त्यांनी फॉरेन्सिक तपासणीचा अहवाल या महिन्यात सार्वजनिक केला. हा अहवाल मिळाल्यानंतर दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ हा अहवाल सार्वजनिक करण्यात आला.
खेळाडूंच्या संघटनेने मागितला संचालक मंडळाचा राजीनामा
दक्षिण आफ्रिका क्रिकेटर्स असोसिएशनने (एसएसीए) क्रिकेट दक्षिण आफ्रिका (सीएसए) संचालक मंडळाच्या सामूहिक राजीनाम्याची मागणी केली आहे. देशातील क्रीडा, कला व संस्कृती मंत्री (डीएसएसी) नाथी मॅथेथवा यांच्या मागणीनुसार, प्रशासनातील गैरव्यवहार संपवण्यासाठी सरकारच्या हस्तक्षेपाची घोषणा केली.
केंद्र सरकारने सीएसएवर प्रशासनातील वर्णभेद, आर्थिक देवाणघेवाणीचे मुद्दे आणि गैरवर्तनाचा आरोप ठेवला आहे.
“सीएसए संचालक मंडळाच्या कारकिर्दीत गेल्या 18 महिन्यांत संकटे पराकोटीला गेली असून, आता या संचालकांवरील विश्वास उडाला आहे. ते संघटना चालवूच शकत नाहीत,” असे एसएसीएने निवेदनात नमूद केले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून क्रिकेटवर निर्बंध लादण्याची टांगती तलवार असल्याने खेळाडूंच्या संघटनेने संचालकांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
[jnews_block_8 first_title=”Read more at” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”87″]