Don Bradman record | ब्रॅडमन यांचा हा विक्रम फलंदाजांसाठी स्वप्नच
Follow us
[jnews_footer_social social_icon=”rounded”]सर डॉन ब्रॅडमन Don Bradman record | यांच्या क्रिकेट कौशल्याची सर कुणालाही नाही. महान खेळाडूंच्या यादीत त्यांचं स्थान अढळ आहे यात कुणाचंही दुमत नाही.
त्यांची कसोटी क्रिकेटमधील फलंदाजीची ९९.९४ ची सरासरी जशी डोळे विस्फारणारी आहे, तसेच त्यांचे असेही काही विक्रम आहेत, जे आजपर्यंत कोणीही मोडू शकलेलं नाही.
ब्रॅडमन यांचा जन्म २७ ऑगस्ट १९०८ रोजी न्यू साउथ वेल्सच्या कुटामुंद्रा येथे झाला. त्याला आता ११२ वर्षे उलटली आहेत.
ब्रॅडमन Don Bradman | यांनी क्रिकेटच्या मैदानावर पाऊल ठेवलं आणि अनेक विक्रमांच्या record | राशी रचल्या. त्यांनी ५२ कसोटी सामन्यांत ६,९९६ धावा केल्या.
त्यांनी आपल्या कारकिर्दीतल्या अखेरच्या सामन्यात शून्यावर बाद होण्याऐवजी किमान चार धावा जरी काढल्या असत्या तरी त्यांची सरासरी १०० झाली असती.
अर्थात, ९९.९४ ची सरासरी अनेक फलंदाजांसाठी एक स्वप्नच झालं आहे. जर आकड्याचाच विचार केला तर कमीत कमी २० डाव खेळणाऱ्या फलंदाजांमध्ये सर्वाधिक सरासरीच्या बाबतीत ब्रॅडमननंतर मार्कस लबुशेनचा क्रमांक लागतो. त्याने ६३.४३ च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
लबुशेन अद्याप खेळत आहे आणि या सरासरीत आणखी बदल होऊ शकतो.
एखाद्या मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही ब्रॅडमन Don Bradman record | यांच्याच नावावर आहे. त्यांनी १९३० मध्ये इंग्लंडविरुद्ध त्यांच्याच देशात पाच सामन्यांत ९७४ धावा केल्या. त्या वेळी त्यांनी वॉली हॅमंड (ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९२८-२९ मध्ये ९०५) यांचा विक्रम मोडीत काढला होता.
कर्णधारपदावर असताना एका मालिकेत सर्वाधिक धावांचा विक्रमही ब्रॅडमन Don Bradman record | यांच्या नावावर आहे. त्यांनी १९३६-३७ मध्ये इंग्लंडविरुद्ध ८१० धावा केल्या.
इंग्लंडचा ग्रॅहम गूच हाच एकमेव या विक्रमाच्या किमान जवळ जाऊ शकला. त्याने १९९० मध्ये भारताविरुद्ध तीन सामन्यांत ७५२ धावा केल्या. ही मालिका जर पाच सामन्यांची असती तर कदाचित गूच याने हा विक्रम मोडीत काढलाही असता.
एखाद्या प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध सर्वाधिक धावा आणि शतके करण्याचा विक्रमही ब्रॅडमन Don Bradman record | यांच्याच नावावर आहे.
त्यांनी इंग्लंडविरुद्ध ३७ कसोटी सामन्यांत ५,०२८ धावा केल्या. यात १९ शतकांचा समावेश आहे.
धावांच्या बाबतीत त्यांच्यानंतर जॅक हॉब्स (ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३,६३६) आणि सचिन तेंडुलकर (ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३,६३०), तर शतकांच्या बाबती सुनील गावस्कर (वेस्ट इंडीजविरुद्ध १३ शतके) यांचा क्रमांक लागतो.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रमही ब्रॅडमन यांच्याच नावावर आहे. त्यांनी इंग्लंडविरुद्ध १९३० मध्ये लीड्स कसोटीत एका दिवसात ३०९ धावा केल्या होत्या.
हॅमंड (न्यूझीलंडविरुद्ध ऑकलंडमध्ये १९३३ मध्ये २९५) आणि वीरेंद्र सेहवाग (श्रीलंकेविरुद्ध २००९ मध्ये मुंबईत २८४) हे दोनच फलंदाज त्यांच्या विक्रमाजवळ जाऊ शकले.
ब्रॅडमन यांचा सर्वाधिक कसोटी शतकांचा विक्रम तर अनेक वर्षांपूर्वी सुनील गावस्कर यांनीच मोडीत काढला होता. मात्र, सर्वाधिक द्विशतकांचा (१२) विक्रम अद्याप कोणीही मोडीत काढू शकलेलं नाही.
Don Bradman record | ब्रॅडमन यांच्यानंतर कुमार संगकाराचा (११) क्रमांक लागतो. सध्याच्या खेळाडूंमध्ये विराट कोहली (७) ब्रॅडमन यांच्या विक्रमाजवळ जाऊ शकेल.
ब्रॅडमन यांच्या नावावर दोन त्रिशतकांचाही विक्रम आहे. तसं पाहिलं, तर त्यांच्या नावावर तीन त्रिशतकांचा विक्रम असता. मात्र एका सामन्यात ते २९९ वर नाबाद राहिले.
या विक्रमांच्या राशी इथंच संपत नाही, तर सर्वांत कमी डावांत २,००० (२२ डाव), ३,००० (३३), ४,००० (४८),५,००० (५६) आणि ६,००० (६८) कसोटी धावांचा विक्रमही ब्रॅडमन यांच्या नावावर आहे.
[table id=30 /] [jnews_block_39 first_title=”Read more” header_text_color=”#dd0000″ header_line_color=”#dd0000″ number_post=”4″ include_category=”65″]