sports news

टी-20 वर्ल्डकप स्थगित होणार?

टी-20 वर्ल्डकपचे काय होणार, आयपीएल होणार का, अशा अनेक प्रश्नांनी काहूर माजलेलं असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) लक्ष आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या बैठकीकडे लागले आहे. t-20 world cup postponed |


आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) 20 जुलै 2020 रोजी ऑनलाइन बैठक होणार आहे. या बैठकीत यंदा टी-20 वर्ल्डकपच्या भविष्यातील आयोजनाबाबत निर्णायक चर्चा होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) आशा आहे, की ही स्पर्धा स्थगित केली जाईल. त्यामुळे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेची वाट सुकर होईल.

टी-20 वर्ल्डकप स्पर्धा ऑस्ट्रेलियात 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरदरम्यान होणार आहे. मात्र, ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राज्यात करोना रुग्णांचे वाढते प्रमाण पाहता ही स्पर्धा घेण्याबाबत गेल्या महिन्यातच असमर्थता व्यक्त करण्यात आली. भारतातही करोनाचे संकट गहिरे आहे. रुग्णसंख्येने 11 लाखांचा टप्पा गाठला आहे, तर 26 हजारांवर रुग्णांनी जीव गमावला आहे. अशा स्थितीत आयपीएल स्पर्धा आयोजित करायचीच असेल तर केंद्र सरकारची मंजुरी घ्यावी लागेल. जर मंजुरी मिळाली तर ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीत आयोजित केली जाऊ शकते.

लक्ष्य टी-20 वर्ल्डकप स्थगित करण्याचे


बीसीसीआयच्या मुख्य समितीच्या एका सदस्याने सांगितले, की ‘‘पहिले पाऊल आशिया कप स्पर्धा स्थगित करणे होते. ते झाले आहे. टी-20 वर्ल्डकप स्पर्धा स्थगित केल्यानंतरच आम्ही आमची योजनेनुसार पुढे जाऊ शकू. क्रिकेट आस्ट्रेलियाने आधीच सांगितले आहे, की ते टी-20 वर्ल्डकप आयोजित करण्यास असमर्थ आहे. असे असूनही आयसीसीने कोणताही निर्णय घेतलेला नाही.’’ t-20 world cup postponed

यंदा होणारी टी-20 वर्ल्डकप स्पर्धा आता 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात होण्याची शक्यता आहे. कारण भारताकडे 2021 मध्ये या स्पर्धेचे यजमानपद आहे. ऑस्ट्रेलियासाठी ते बदलणे शक्य नाही. आयसीसीने जेव्हा इंग्लंडमध्ये मर्यादित षटकांच्या मालिकेची तयारी करण्यासाठी खेळाडूंना सांगितले तेव्हा ऑस्ट्रेलियाने टी-20 वर्ल्डकपचे आयोजन करण्यास असमर्थता व्यक्त केली होती. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या दौऱ्यासाठी 26 सदस्यांचा संघही जाहीर केला होता. आयसीसीने सांगितले, की एवढा मोठा निर्णय घेण्यापूर्वी संभाव्य संकटांचाही विचार करायला हवा.

म्हणून आयसीसीचा निर्णय लांबणीवर


आयसीसीच्या सूत्रांनी सांगितले, ‘‘पाकिस्तानला जेव्हा 2009 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद हवे होते. श्रीलंका संघाच्या बसवर दहशतवादी हल्ल्यानंतर सर्वांनाच कळून चुकलं होतं, की पाकिस्तान क्रिकेट बोर्ड भविष्यात मोठी स्पर्धा आयोजित करू शकणार नाही.’’ सूत्रांनी सांगितले, ‘‘यानंतरही आयसीसीने आपले कर्मचारी अनेक महिने पाकिस्तानातच ठेवले. मात्र तत्पूर्वीच दक्षिण आफ्रिकेने स्पर्धेच्या यजमानपदाची तयारी सुरू केली होती. सर्वांना हे माहिती होतं, पण स्थळ बदलण्याची औपचारिक घोषणा करण्यासाठी अनेक महिने लागले. कारण संकटाचे आकलन करणे नियमांचाच एक भाग आहे.’’ सूत्रांनी सांगितले, ‘‘आयसीसी नववी टी-20 विश्वकप स्पर्धा इतक्या सहजपणे स्थगित करणार नाही. कारण सुरुवातीला ऑस्ट्रेलिया सरकारचे प्रमुख मंत्र्यांनी यजमानपद घेण्यास उत्सुकता दाखवली होती.’’ t-20 world cup postponed

आशिया कप स्पर्धा 2021 पर्यंत स्थगित केली जाणे पाकिस्तानचे एहसान मनी आणि त्यांच्या टीमसाठी मोठा झटका आहे. कारण पाकिस्तान बीसीसीआयला विरोध करीत होते. आशिया कपचे यजमानपद पीसीबीलाच करायचे आहे. असे समजते, की पीसीबी अन्य बोर्डांच्या संपर्कात आहे, ज्यामुळे द्विपक्षीय पातळीवर मालिका आयोजित करता येऊ शकेल. कारण त्यांचा राष्ट्रीय संघ इंग्लंड दौऱ्यानंतर कोणतीही मालिका खेळू शकणार नाही. t-20 world cup postponed


हेही वाचा…

बीसीसीआय तोडणार का चिनी कंपनीशी करार?


बीसीसीआय विरुद्ध शशांक मनोहर


आयसीसीच्या बैठकीत पुढच्या अध्यक्षपदाच्या नावांवर चर्चा होऊ शकते. कारण शशांक मनोहर यांनी याच महिन्याच्या सुरुवातीला कार्यकाळ संपल्याने राजीनामा दिला आहे. अद्याप तरी उमेदवारांच्या निवडीबाबत काय पात्रता असावी यावर एकमत झालेलं नाही. आयसीसी बोर्डाच्या सदस्याने सांगितले, की ‘‘निर्णय घेण्यासाठी दोनतृतीयांश बहुमत घेतले जावे किंवा 17 सदस्यांतून सामान्य बहुमत घ्यावे, याबाबत बोर्डातच एकमत नाही.’’

अध्यक्षपदासाठी गांगुलीची उमेदवारी?


इंग्लंड क्रिकेट बोर्टाचे (ईसीबी) कॉलिन ग्रेव्स अध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. मात्र, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या नावाचीही चर्चा आहे. गांगुली यांना याबाबत विचारले असता, ते म्हणाले, मी अजून तरुण आहे आणि या पदासाठी अजिबात घाई नाही. न्यूझीलंडचे ग्रेगर बार्कले आणि हाँगकाँगचे इमरान ख्वाजा यांनाही संभाव्य दावेदार माले जात आहे. ख्वाजा सध्या प्रभारी अध्यक्ष आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!