ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधवनंतर भारतीय कुस्तीची 56 वर्षे
23 जुलाई 1952 ही तारीख म्हणजे भारताच्या कुस्तीच्या इतिहासातलं सुवर्णपान. याच तारखेला भारताचा पहिलवान खाशाबा जाधव यांनी हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कुस्तीतलं Olympic Wresling | पहिलं कांस्यपदक जिंकलं. भलेही हे कांस्यपदक असेल. मात्र, भारतासाठी त्याला सुवर्णझळाळी आहे. कारण अशी कामगिरी करणारे ते भारताचे पहिले कुस्तीगीर होते. त्यानंतर भारताला तब्बल 56 वर्षे वाट पाहावी लागली.
खाशाबा जाधव यांनी पदक जिंकलं असलं तरी भारतीय कुस्तीचा डंका वाजला तो गेल्या तीन ऑलिम्पिकमध्येच. भारताच्या ऑलिम्पिक Olympic प्रवासात कुस्तीला आणखी उंचीवर नेण्यासाठी बजरंग पूनिया आणि विनेश फोगाटसारखे पहिलवान कसून तयारी करीत असतील यात शंका नाही. भारताने ऑलिम्पिक Olympic | हॉकीनंतर सर्वाधिक पदके कुस्तीत जिंकली आहेत. कुस्तीत Wrestling | आतापर्यंत भारताने रौप्य आणि चार कांस्य पदकांसह एकूण पाच पदके जिंकली आहेत. यात सुशीलकुमारचे रौप्य आणि कांस्य पदकाचा समावेश आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे सात मल्ल
टोकियो ऑलिम्पिक 23 जुलैपासून सुरू होणार आहे. या ऑलिम्पिकमध्ये भारताचे सात पहिलवान आपले कौशल्य पणास लावतील. हे सातही पहिलवान आपापल्या वजनगटात पदकाचे दावेदार आहेत. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने उत्तम कामगिरी करणारा बजरंग पूनिया (पुरुष फ्रीस्टाइल 65 किलो), विनेश फोगाट (महिला 53 किलो) आणि सोनम मलिक (महिला 62 किलो) हे पहिलवान पदकाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. या तीन मल्लांव्यतिरिक्त ऑलिम्पिक Olympic | कुस्तीत भारताचे इतर मल्लही पदकांच्या लढाईत पूर्ण क्षमतेने उतरतील. यात सीमा बिस्ला (महिला 50 किलो), अंशू मलिक (महिला 57 किलो), रवी कुमार दहिया (पुरुष फ्रीस्टाइल 57 किलो) आणि दीपक पूनिया (पुरुष फ्रीस्टाइल, 84 किलो) यांचा समावेश आहे. एकूणच भारताचे तीन पुरुष आणि चार महिला पहिलवान ऑलिम्पिक कुस्तीत Olympic Wresling | क्षमता सिद्ध करतील.
1900 मध्ये ऑलिम्पिकमधून वगळले होते कुस्तीला
ग्रीको रोमन कुस्तीत भारताचा एकही पहिलवान ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकलेला नाही. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीच्या लढती एक ऑगस्टपासून सुरू होतील. विनेश फोगाटची लढत पाच ऑगस्ट 2021 आणि बजरंग पुनियाची लढत सहा ऑगस्ट 2021 रोजी होईल. ऑलिम्पिकमध्ये कुस्तीचा प्राचीन इतिहास दडलेला आहे. प्राचीन ऑलिम्पिकमध्येही कुस्तीचा Olympic Wresling | समावेश होता. आधुनिक युगात 1896 मध्ये पहिल्यांदा ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात आले. यात सुरुवातीला दहा खेळांची निवड करण्यात आली होती. या दहा खेळांमध्ये कुस्तीचाही समावेश होता. ऑलिम्पिकमध्ये एकदाच कुस्तीचा समावेश नव्हता. तो म्हणजे 1900 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये.
1920 मध्ये प्रथमच भारतीय कुस्ती ऑलिम्पिकमध्ये
1920 च्या अँटवर्प ऑलिम्पिकमध्ये भारताने पहिल्यांदा दोन पहिलवानांना पाठवले होते. त्यानंतर चार ऑलिम्पिकपासून भारतीय कुस्ती लांब राहिली. ही चार ऑलिम्पिकवर्ष होती 1924, 1928, 1932 आणि 1976. या चार ऑलिम्पिकमध्ये भारताने कुस्तीत सहभाग नोंदवलेला नाही. राहिला कुस्तीतील ऑलिम्पिक Olympic Wresling | पदक जिंकण्याचा प्रश्न. खरं तर पदार्पणातच म्हणजे 1920 च्या अँटवर्प ऑलिम्पिकमध्येच भारताने कुस्तीतलं पहिलं पदक जिंकलं असतं. त्या वेळी पहिलवान रणधीर सिंह पदकाच्या अगदी जवळ पोहोचले होते. मात्र, त्यांना पदकाने हुलकावणी दिली. त्यानंतर ऑलिम्पिकमध्ये भारत केवळ सहभागी होत राहिला. मात्र, खाशाबा जाधव यांनी सुखद धक्का दिला.
ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव यांनी रचला इतिहास
भारतीय कुस्तीच्या इतिहासात 23 जुलाई 1952 या दिवसाचं विशेष असं स्थान आहे. कारण याच दिवशी खाशाबा जाधव या मराठी मल्लाने हेलंसिकी ऑलिम्पिकमध्ये बँटमवेट गटात कांस्यपदक जिंकलं. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील गोळेश्वर (ता. कऱ्हाड, जि. सातारा) या छोट्याशा खेड्यातला. 15 नोव्हेंबर 1926 रोजी जन्मलेल्या खाशाबा जाधव यांनी पहिल्या फेरीत कॅनडाच्या एड्रियन पोलिक्विनवर पराभूत केले. ही लढत तब्बल 14 मिनिटे 25 सेकंदांपर्यंत चालली. पुढच्या फेरीत मेक्सिकोच्या लियांड्रो बासुर्तोला अस्मान दाखवले. ही लढत खाशाबा जाधव यांनी अवघ्या पांच मिनट 20 सेकंदांत निकाली काढली. त्यांनी जर्मनीच्या फर्डिनेंड श्मिज याला 2-1 असे पराभूत केले आणि अंतिम फेरी गाठली. त्या वेळी अंतिम फेरीत तीन पहिलवानांमध्ये व्हायची. या लढती राउंड रॉबिन पद्धतीने होत असत. अंतिम फेरीत सोव्हिएत संघाच्या (आताचा रशिया) राशिद मामदबायेव आणि जपानच्या सोहाची इशी या दोन मल्लांकडून जाधव पराभूत झाले. त्यामुळे जाधव यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
रेपेशाजमध्ये सुशीलकुमारला मिळाली संधी
खाशाबा जाधव यांच्यानंतर तब्बल 56 वर्षांनंतर म्हणजे 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुशीलकुमारने कुस्तीत पदक जिंकलं. सुशीलकुमारला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली. मात्र, त्याला अंतिम सोळामध्ये यूक्रेनच्या आंद्रेई स्टॅडनिककडून पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, नशिबाने सुशीलकुमारला साथ दिली. कारण हाच आंद्रेई नंतर फायनलमध्ये पोहोचला. या एका कारणामुळे सुशीलकुमारला पदक जिंकण्यासाठी आणखी एक संधी मिळाली. ती म्हणजे रेपेशाजमध्ये. सुशीलकुमारने काही तासांतच तीन कुस्त्या जिंकल्या आणि पदकावर नाव कोरले. सुशीलकुमारने रेपेशाजच्या पहिल्या फेरीत अमेरिकेचा डग श्वाब, दुसऱ्या फेरीत बेलारूसच्या अल्बर्ट बातिरोव याला, तर अंतिम फेरीत कजाकिस्तानच्या लियोनिड स्पिरडिनोव याला पराभूत करीत कांस्यपदक जिंकले. सुशीलकुमारने त्यानंतर लंडन ऑलिम्पिकही गाजवले. यात त्याने रौप्यपदक जिंकले. पाठोपाठ योगेश्वर दत्तनेही कांस्यपदक जिंकत भारतीय कुस्तीला उभारी दिली. सुशीलकुमारने उपांत्यपूर्व फेरीत उझबेकिस्तानच्या इख्तियोर नवरूजोव याला 3-1 असे पराभूत करीत प्रथमच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत कजाकिस्तानच्या अखजुरेक तनातारोव याला 6-3 असे पराभूत करीत ऐतिहासिक अंतिम फेरी गाठली. रौप्यपदक तर निश्चित होते. मात्र, लक्ष्य सुवर्णपदकाचे होते. दुर्दैवाने सुशीलकुमारला अंतिम फेरीत जपानच्या तात्सुहिरो योनेमित्सु याच्याकडून 0-1, 1-3 अशा पराभवास सामोरे जावे लागले.
योगेश्वर दत्तने जिंकले कांस्यपदक
सुशीलकुमारने रौप्य जिंकले. त्याच्या एक दिवस आधीच योगेश्वरने 60 किलो वजनगटात कांस्य पदक जिंकले होते. खरं तर योगेश्वर रशियाच्या बेसिक कुदखोव याच्याकडून पराभूत झाला होता. मात्र, हा रशियन मल्ल अंतिम फेरीत पोहोचल्याने योगेश्वरला रेपेशाजमध्ये लढण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करीत योगेश्वरने प्यूर्तोरिकाच्या फ्रँकलिन गोमेज आणि इराणच्या मसूद इस्माइलपुवर याला पराभूत केले. त्यानंतर अंतिम फेरीत उत्तर कोरियाच्या रि जोंग म्योंग याचे आव्हान मोडीत काढत कांस्य पदकावर मोहोर उमटवली.
ऑलिम्पिक कुस्तीत पदक जिंकणारी साक्षी मलिक भारताची पहिला महिला कुस्तीगीर
2016 च्या रियो ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकलाही महिला गटात 58 किलो वजनगटात उपांत्यपूर्व फेरीत रशियाच्या वेलारिया कोबलोवा हिच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. पदकाचे आव्हान तसे संपुष्टातच आले होते. मात्र, ही रशियन मल्ल जेव्हा अंतिम फेरीत पोहोचली तेव्हा साक्षीला रेपेशाजमध्ये पदक जिंकण्याची संधी मिळाली. त्ने प्योरदोरजिन ओरखोन आणि कजाकस्तानच्या आइसुलु टाइनिबेकोवा या दोघींना पराभूत करीत कांस्यपदक जिंकले. भारतीय महिला कुस्तीतला हा ऐतिहासिक विजय ठरला. ऑलिम्पिक Olympic | कुस्तीत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला पहिलवान ठरली.